आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुद्दा झाल्या आहेत च्या ऐवजी झाल्या आहे इतकाच असेल तर किरकोळ आहे. भाषेची बोंब अश्या गोष्टींनी थोडीच होते.
दुष्यंतकुमारने शह्र च्या ऐवजी शहर केले तर उर्दूच्या लोकांनी अश्याच बोंबा मारल्य?, काय झाले ?
आता सर्रास अश्या सुटा घेतल्या जातात.
जसे ढसाळ माणसांना ऐवजी माण्सांना लिहितात. जसे बोलतो तसे लिहा अशी पण एक विचारधारा असू शकते. जसं आमच्या घरी बोलताना कोणीच आहे, नाही इथे स लावत नसे. पुण्यात अनेक ठिकाणी तसे लावले जाते. ह्याचा अर्थ असा नव्हे कित्येक शतके बोलली गेलेली आमची मराठी भाषा चुकीची. या (ह्या) गोष्टींचा कवी म्हणून विचार कराल.

बाकी, आपल्या शेरात लहजा गडबडलाय. स्वाभाविकता लोपलीय. क्राफ्टमनशिप जाणवतेय.

आपल्या शेरात लहजा गडबडलाय. स्वाभाविकता लोपलीय. क्राफ्टमनशिप जाणवतेय.<<<

तुमच्या शेरापेक्षातरी कमीच आहे की पण !

तुमच्या शेरापेक्षातरी कमीच आहे की पण !

शेर सुचला तसा लिहिला तेव्हा क्राफ्टमनशिपचा प्रश्नच नाही.
तुम्ही सुचवलेला विचार मी काही शेरात राबवलाय ह्या अगोदर.
नंतर लक्षात आले की त्याने भाषेची शुध्दता येते मात्र निर्मीतीतील गोंधळ कमी होतो,
त्यातील उत्कटता अफेक्ट होते. पूर्ण फुटकर शक्यतो जसे सुचले तसेच ठेवणार आहे. कोणाला काय वाटते हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. मी कोणाला इस्लाह देत नाही. कुणी दिलेला इस्लाह मला आवडत नाही, असे नाही. पण त्यात तसा कन्टेन्ट हवा.
थातुरमातुर बदलांनी काय साधणार ?

धन्यवाद.

शेर सुचला तसा लिहिला तेव्हा क्राफ्टमनशिपचा प्रश्नच नाही.<<< शेर जसाच्या तसा सुचला म्हणजे क्राफ्टमनशिप नसतेच असे मला वाटत नाही शेर तयार करणे ही प्राक्रिया नक्कीच जटील असते शेर करताकरतानाच कसलेला शायर / सराईत शायर क्षणार्धात वेगवेगळे निर्णय घेवून शेर क्राफ्टच करत असतो पण ही कृत्रीमता त्याच्या स्वतःच्याही लक्षात येत नाही . आपण हवे तर असे म्हणू शकतो की ही कृत्रीमता नैसर्गिकतेच्या अधिकाधिक जवळ नेणारी आहे इत्यादी
जिथे जिथे एखादी गोष्ट माणूस करतो तिथे कृत्रीमता येतेच नैसर्गिक म्हणजे निसर्गाने केले असते ते

थातुरमातुर बदलांनी काय साधणार ?<<<
आपला गैरसमज होत आहे बदल काही मी फार खुशीने दिला असे नाही आणि शेरात बदल सुचवताना मी कमीत कमी कानेमात्रे बदलून काही होते आहे का हे आधी पाहतो मग शब्दांच्या नादी लागतो अर्थाला सहसा हात लावत नाही माझी पद्धत अशीच आहे ह्याला थातुरमातुर म्हणणार्‍या पांडित्याची मी तरी कीवच करीन

हवा असल्यास अख्खा शेर बदलून देवू शकतो ..पण मला हवा असल्यास ..इतराना नाही

असो

तुम्ही स्वतःच्या मतांसाठी कमालीचे हट्टी आहात असा माझा अनुभव आहे म्हणून इथेच थांबतो
पण तुम्ही तुमचा जो लहेजा म्हणताय तो प्रमाणबाह्य उर्दुळाळलेला आहे ह्यात कुणाचेही दुमत नसावे असा माझा विश्वास आहे हवे असल्यास आपल्या जवळच्या मित्राना वगैरे विचारून पाहू शकता

अजून एक म्हणजे तुम्ही लवकर नाराज होता असाही अनुभव आहे मला त्यामुळे वरील प्रतिसाद न पटल्यास मी तो दिलाच नव्हता असे समजून् रहावे ही विनंती
शेवटी तुम्ही नाराज झालात की मलाही फार वाईट वाटते म्हणून मी काळजी घेत आहे

धन्यवाद

>>>शेर करताकरतानाच कसलेला शायर / सराईत शायर क्षणार्धात वेगवेगळे निर्णय घेवून शेर क्राफ्टच करत असतो<<<

सहमत आहे.

समीर,

येथे मला वैवकुंच्या म्हणण्यातील तथ्य पटत आहे. गझलेस योग्य असा आशय मनात आल्यानंतर अभिव्यक्त होताना त्यात गझलेच्या अंतरंगी सौंदर्याबरोबरच (आशय) बाह्य सौंदर्याचाही (अभिव्यक्ती, सफाई, सहज भिडण्याची क्षमता) विचार शायराने करायला हवा असे मला वाटते. उत्कटता अप्रभावित ठेवूनही हे जमू शकते असा मला तरी विश्वास वाटतो. अर्थात, प्रत्येकाचे स्वातंत्र्य आहे हे मान्यच!

वैवकु,

हा शेर समीरने मला ऐकवला होता. पार्श्वभूमी समजली तर हा शेर किती उत्कट आणि किती अर्थपूर्ण आहे हे तुमच्याही लक्षात येईलच. दुसरी ओळ समीरच्या खोल विचाराचे प्रतिबिंब आहे. बरेचदा असे होते की एखादा कसलेला शायर वरवर सामान्य वाटणारे काहीतरी लिहून जातो व लोक त्या 'वरवर सामान्य वाटण्याबाबत' चर्चा करतात. तरीही मला हे मत मान्य आहे (किंबहुना ते माझेच मत आहे की) जे काही लिहिले आहे त्याचा शब्दार्थ सहज समजण्याजोगा आणि अभिव्यक्ती उत्तम असावी.

धन्यवाद व चु भु द्या घ्या

एकंदर मुद्दा शैलीदारपणाचा आहे बेफीजी लहेजा शब्दनिवड आणि त्यांची क्रमवार मांडणी इत्यादी बाबत आहे उत्कटता वा सखोल वैचारिकता हे मुद्दे चर्चेत घेतलेच नाहीयेत कारण त्याबाबत मतांतर असण्याचा प्रश्नच नव्हता

एकतर समीरजींचे शेर तुम्ही मी समजू शकतो म्हणून ते समजून घेण्याकडे आपला कल असतो मग एकदा समजून घेतले की आवडून घेण्याकडे बाकी स्व्तःच्या अंगभूत अश्या कोणत्या खासियतीमुळे ते लोकांना आवडून जावेत असे होतात अगदीच सपाट वाटू शकतील असे (असलेले म्हणत नाहीये )शेर भासतात त्यांचे अनेकदा

शेर समजला नाही तरी अवडत रहावा अशी जादू निर्माण करणे आक्रुतीबंधाला सहजशक्य असताना फक्त वेगळेपणा राखायच्या नादात लोकाभिमुखतेला असे शेर पारखे होतात असे मला वाटते
अर्थात लोकांसाठी ज्याना लिहायचे नाहीच त्यांना फरकही का पडावा मुळी हेही आहेच Happy

धन्यवाद !!

शेर समजला नाही तरी अवडत रहावा अशी जादू निर्माण करणे आक्रुतीबंधाला सहजशक्य असताना फक्त वेगळेपणा राखायच्या नादात लोकाभिमुखतेला असे शेर पारखे होतात असे मला वाटते<<<

थोडे अधिक स्पष्ट करतो वैवकु:

जसा प्रत्येक कवीकवीत फरक असतो तसाच समीर व इतर अनेक कवींमध्ये एक अतिशय ठळक फरक आहे.

हे मला केवळ त्या त्या कवीशी चर्चा केल्यामुळेच जाणवते असे नव्हे तर नुसत्या गझला वाचूनही हे समजू शकते.

समीरच्या शेरांच्या निर्मीतीची प्रक्रिया ही 'गझलेच्या शेरास अनुकुल' असा आशय 'निव्वळ सुचणे, मनात येणे' येथेच थांबते. ती तेथे न थांबवता समीर पुढे नेऊ शकेलही, पण तो ती वाट निवडत नाही. त्याला त्याचे ते 'सुचणे' हेच अंतिम म्हणून नोंदवावेसे वाटते. एक प्रकारे तुम्ही आम्ही धरतो त्यापेक्षा ही वाट अधिक जोखमीची व कस लावणारी आहे. ह्या प्रक्रियेत अभिव्यक्ती मार खाते मात्र समीरला त्याची फिकीर नसते. आता हे महान आहे की नाही हा भाग वेगळा, पण हे त्याने स्वतःपुरते ठरवलेले आहे. त्याने ठरवलेले आहे म्हणून तो दुसर्‍याच्या क्राफ्ट्समनशिप असलेल्या शेरांना दाद देणार नाही असे नाही.

तुम्ही वर म्हणाला आहात की समीरच्या गझलेवर उर्दूचा प्रभाव आहे. मला तसे वाटत नाही. मला तुकारामांच्या काव्यासारख्या काव्याचा प्रभाव जाणवतो. उर्दूचा प्रभाव माझ्या गझलांवर अधिक आहे आणि वैभव देशमुखांच्या गझलांवर काहीसा असावा.

काहीही झाले तरी आपण एखाद्या कवीच्या कविता सुचण्याच्या प्रक्रियेला व अभिव्यक्तीबाबत असलेल्या स्वातंत्र्याला आव्हान देऊ शकत नाही. (हे विधान फक्त आणि फक्त गंभीरपणे गझल रचणार्‍यांसाठी आहे व त्यात मी स्वतःलाही अजून मोजत नाही इतके प्रामाणिकपणे लिहितो).

तसेच, समीरनेही किंवा कोणीच असे आव्हान एखाद्या गंभीर गझलकाराला देऊ नये असेही म्हणावेसे वाटते.

गंभीर गझलकाराची ओळख होणे सोपे आहे. पण ते कसे, हे लिहिणे हा ह्या धाग्याचा हेतू नाही, तेव्हा थांबतो.

शेर जसाच्या तसा सुचला म्हणजे क्राफ्टमनशिप नसतेच असे मला वाटत नाही शेर तयार करणे ही प्राक्रिया नक्कीच जटील असते शेर करताकरतानाच कसलेला शायर / सराईत शायर क्षणार्धात वेगवेगळे निर्णय घेवून शेर क्राफ्टच करत असतो पण ही कृत्रीमता त्याच्या स्वतःच्याही लक्षात येत नाही . आपण हवे तर असे म्हणू शकतो की ही कृत्रीमता नैसर्गिकतेच्या अधिकाधिक जवळ नेणारी आहे इत्यादी

सहमत.

थातुरमातुर बदलांनी काय साधणार ?<<<
आपला गैरसमज होत आहे बदल काही मी फार खुशीने दिला असे नाही आणि शेरात बदल सुचवताना मी कमीत कमी कानेमात्रे बदलून काही होते आहे का हे आधी पाहतो मग शब्दांच्या नादी लागतो अर्थाला सहसा हात लावत नाही माझी पद्धत अशीच आहे ह्याला थातुरमातुर म्हणणार्‍या पांडित्याची मी तरी कीवच करीन

बदल सुचवण्याची गरज काय होती. सुचवला तर सुचवला त्या बदलाने शेर सव्वाशेर होतो का ?
होत नसेल तर अश्या बदलाला मी थातुरमातुर म्हणीन. मी स्वतःला जाहीरपणे पंडित म्हटले नाही. मी एक कवी आहे.
कीव, दया कुणाला येत असेल तर त्याला मी काय करू शकतो.
तुमचा निर्णय.

हवा असल्यास अख्खा शेर बदलून देवू शकतो ..पण मला हवा असल्यास ..इतराना नाही

अजिबात नको. आपला प्रोफेसर न होवो ही सदिच्छा.

तुम्ही स्वतःच्या मतांसाठी कमालीचे हट्टी आहात असा माझा अनुभव आहे म्हणून इथेच थांबतो
पण तुम्ही तुमचा जो लहेजा म्हणताय तो प्रमाणबाह्य उर्दुळाळलेला आहे ह्यात कुणाचेही दुमत नसावे असा माझा विश्वास आहे हवे असल्यास आपल्या जवळच्या मित्राना वगैरे विचारून पाहू शकता

हट्टीपणाबद्दल मान्य. लहजाबद्दल भूषणने मत नोंदवलेय. भूषण, धन्यवाद.

अजून एक म्हणजे तुम्ही लवकर नाराज होता असाही अनुभव आहे मला त्यामुळे वरील प्रतिसाद न पटल्यास मी तो दिलाच नव्हता असे समजून् रहावे ही विनंती

तुमच्यावर नाराज होण्याचा मला हक्क आहे. तुम्ही बरेचदा मला घालूनपाडून बोललात.

शेवटी तुम्ही नाराज झालात की मलाही फार वाईट वाटते म्हणून मी काळजी घेत आहे

अश्या काही मित्रांमुळेच मायबोलीवर राहवेसे वाटते.
धन्यवाद.

ठेवला विश्वास आणी मांडला मी खेळ देवा
वेदना अन संयमाचा पण जमेना मेळ देवा

सांगता येते उद्याचे का कधी येथे कुणाला
दे कमी दे.. आज पण सुख दे जरा निर्भेळ देवा!

-प्राजु

ठेवला विश्वास आणी मांडला मी खेळ देवा
वेदना अन संयमाचा पण जमेना मेळ देवा<<< छान मतला

दे कमी दे.. आज पण सुख दे जरा निर्भेळ देवा!<<< माफ करा, पहिली ओळ नीट वाचलेली असूनही दुसर्‍या ओळीतील 'आज' ह्या शब्दाआधीच्या टिंबांमुळे गोंधळ झाला, हाही शेर छान आहे. शुभेच्छा!

एक शेर सुचला ह्या जमीनीतः

दे मला माध्यान्ह एखादी तरी उष्टावलेली
शुद्ध का देतोस तू प्रत्येक कातरवेळ देवा

चु भु द्या घ्या

प्राजुताई ..छान शेर .

दे मला माध्यान्ह एखादी तरी उष्टावलेली
शुद्ध का देतोस तू प्रत्येक कातरवेळ देवा<< super..

दोन शेर :

दिवस संपवला इथे की खुमखुमी अंगात येते
शेवटी मरणाकडे मी चाललो आहे तरीही
=====================
पक्षी उडुन गेले तरी ना हळहळावे वाटले
सांगा कसे चालायचे मग कैदखाने आमचे ?

--सुशांत

ओळखून आहे देवा, तुझी वागण्याची रीत
हात जोडण्यासाठी आता हात धजत नाही

- रोहित

ठेवला विश्वास आणी मांडला मी खेळ देवा
वेदना अन संयमाचा पण जमेना मेळ देवा

सांगता येते उद्याचे का कधी येथे कुणाला
दे कमी दे.. आज पण सुख दे जरा निर्भेळ देवा!

.... अह्हा… खूप आवडले दोन्ही शेर… खासच

कशी संपायची सांगा जगामधली गुन्हेगारी
कृतीला ठेवली शिक्षा , गुन्हा केला विचारानी

व्वा. दुसरी ओळ अधिक आवडली.

क्षणांचे कोसळणारे कडे
हृदय माळीणसारखे रडे

नशा नाकर्ते असण्यातही
फिरावे तर्गो करुनी सडे

-'बेफिकीर'!

>>>शेर समजला नाही. तर्गो म्हणजे ?<<<

समीर, कोल्हापूरी भाषेत ह वाक्प्रचार वापरला जातो. 'तर्गो करून फिरणे' (किंवा तर्गो करून बोलणे) म्हणजे स्वतःचे काहीही कर्तृत्व नसताना उगाचच टिकोजीरावासारखे वागणे, बोलणे वगैरे!

(आता हे वाचून सहमती दर्शवायला काही अतृप्त आय डी धावणार ह्यात शंका नाही) Proud

Pages