आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदी मध्ये लिहिलेलं काही चालेल का इथे डकवलं तर.

जे लिहिलंय त्याला शेर म्हणतात की नाही माहीत नाही.

उदा. हे

खत भेजा था मगर जवाब ना आया मुद्दत से
वफा-ए-इझहार किया था हम ने बडी शिद्दत से

उर्दू भाषा वा लिखावट वै. चा माझा जराही अभ्यास नाही. थोडं बहुत ऐकीव आणि वाचीव ज्ञान आहे. तितक्यावर हे लिहिलंय.

इथे चालणार असेल तर सांगा. सुधारणा सुचवा चुकले असल्यास. Happy

घोडे की नस्ल उसके रंग से नही
उसकी चाल से जानिये हुजूर
रुपरंग तो खुदा की जिस्मानी मेहेरबानी है
फितरत से पेहेचानीये रूह का असली नूर

नुकतेच गुलझार ह्यांचे 'मिर्झा गालिब' वाचले. त्यातले नवाबजान हे पात्र खरोखरीचे की काल्पनिक माहीत नाही. पण तिने मिर्झांना सतत पत्रे पाठवणे, त्यांची वाट बघणे, त्यांच्या शायरीच्या प्रेमात असणे ह्या पार्श्वभूमीवर मघाशी लिहिलेल्या ओळी सुचल्या होत्या.

खत भेजा था मगर जवाब ना आया मुद्दत से
वफा-ए-इझहार किया था हम ने बडी शिद्दत से

नंतर नवाबजान स्वतःच त्याचे उत्तर कसे देईल त्यासाठी हे सुचले:

वक्त का तकाझा कहता है के
वक्त का ना रखना हिसाब
खत नही दिल भेजा था सनम को
यकीन है, खाली नही आयेगा जवाब

दिल के उसुलोंकी खातिर हमने
जमाने को ठुकराया है, जनाब
केहती है तो केहती रहे दुनिया
के दिल का लगाना है खराब

मोल मत लगाना उसके हर्फ-ओ-लफ्जों का
चुटकी मे कैसे सिमटेगा सैलाब
क्या अशर्फियोंसे तोल सकते हो
रोशन सूरज और नूर-ए-माहताब

कातिल तो रोज आते है इस दर पे
पर तेरे जितना कोई नही काबील-ए-नवाब
जहा भी है सुन ले तु, गालिब
काटों मे भी खिल रहा है गुलाब

धागा खूपच मस्त आहे.
बरेचसे शेर अगदी मनाला भिडले.

माझ्याकडून काही ओळी.

इतक्या ओळी इथे लिहिण्याचे कारण इतकेच की गझलेतले सर्व शेर ओळीने येणारे आहेत आणि सन्दर्भ एकच आहे. जाणकारांच्या सूचना, सुधारणा नक्कीच या व पुढ्च्या लेखनाला मार्गदर्शक ठरतील

कभी पूछी थी किसीने मेरी चाहत की हदें
चाहा इतना की उन्हीकोंही अलविदा कह गये

क्योंकी आये थे रचाकर वो मेहंदी हाथोंमें
तोहफे में देदो रिहाई बस इतनाही कह गये

बननेसे पेहले ही जल गया आशियां अपना
जा सदा रोशन रहे तेरा वो शामियां कह गये

जानते थे की ये आसांन नही था उनके लिये
फिर भी अपनी सलामती की दुवाए कह गये

किसने देखी है जन्नतें खुदाकी मरने के बाद
बनके रूहें रहेंगे साथ तसल्ली में कह गये

ती मैफिलीत माझ्या बसते अशाप्रकारे
तारेवरी विजेच्या पक्षी जसा बसावा...

- सतीश दराडे

(Asaa sher kadhee vaachalaa naahee Maraatheet)

ज्ञानेश पाटील ते सतीश दराडे!

स्वतःला विसरून काही गुणगुणावे असे माझ्या बाबतीत, माझ्याच घरात कित्येकदा घडले आणि घडते. ज्ञानेश पाटील ह्यांची 'जुने विसरून गेलेले' ही गझल मला संपूर्ण पाठ आहे, इतकेच नाही तर मी ती रात्री बेरात्री गुणगुणत बसतो.

कधी रडवून गेलेले, कधी हसवून गेलेले
पुन्हा का आठवावे ते जुने विसरून गेलेले

पुन्हा ती भेटली तेव्हा जराशी वेगळी होती
इरादे वाटले आता तिचे बदलून गेलेले

दिसावी वाट एखादी दिशा छेदून जाणारी
असावे गाव एखादे व्यथा हरवून गेलेले

मल भेटायला आले, मला भेटून जाताना
'मला भेटायचे नाही' असे ठरवून गेलेले

वगैरे वगैरे!

अफाट गझल!

ह्या गझलेनंतर मी नकळतपणे गुणगुणलेला शेर असेल तर तो चित्तरंजन भट ह्यांचा!

खरे तर अनेक शेर!

ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास, वाटले बरे किती

तूच सांग आजकाल चालले कसे तुझे
चार शब्द बोललीस, वाटले बरे किती

बोललो, काय बोललो नाही
आठवे तू, न आठवे काही

आणि कित्येक!!!!

असेच प्रदीप कुलकर्णी, अनंत ढवळे आणि वैभव जोशींचे कित्येक शेर!

पण आज मी एक वेगळाच शेर गुणगुणत राहिलो.

ती मैफिलीत माझ्या बसते अशाप्रकारे
तारेवरी विजेच्या पक्षी जसा बसावा...

ह्या सतीश दराडेंच्या शेरातील दुसरी ओळ फार जीवघेणी आहे. मी ती ओळ खूपवेळा गुणगुणली आणि सतीशला फोनही केला.

कसे असते ना?

माणसामुळे त्याच्या कृत्यांवर प्रेम बसावे हे सामान्य माणसाच्या बाबतीत होते.

कृत्यामुळे (येथे, शेरामुळे) माणसावर प्रेम बसावे हे क्वचितच होते.

सतीशवर माझे पूर्वीपासून प्रेम आहेच, पण आजचा हा 'तारेवरी विजेच्या' वाला शेर फार फार आवडला.

आपले काय आहे ना? शेर आवडला तर माणूसही आवडून जातो.

शेवटी समीरचे दोन शेर देतो:

काहीतरी तुटल्याप्रमाणे वाटते
हातातुनी सुटल्याप्रमाणे वाटते

बोलायचे होते तुझ्याशी, राहिले
ही हौसही फिटल्याप्रमाणे वाटते

-'बेफिकीर'!

दे, नको देऊ परत, पण एवढे करशील ना
मी तुला जे मन दिले ते नीट वापरशील ना

पाहण्यालायक जगाने ठेवला नाहीच तर
ओंजळीमध्ये तुझ्या हा चेहरा धरशील ना

-'बेफिकीर'!

सुशांत खुरसालेंची अप्रतीम गझलः

येत नाहीत ते क्षण बघावे किती
एक अज्ञात कुंपण बघावे किती

फक्त नाही मुभा हात लावायची
फक्त लांबून आपण बघावे किती

काय उघडून डोळे करू मी तरी
आपले आंधळेपण बघावे किती

बेगडी एक तू ,बेगडी एक मी
बेगडांचे समर्पण बघावे किती

पाहणे फक्त माहीत असले तरी
फक्त पाहून आपण बघावे किती

कारणे,चांदणे,पेच,इच्छा,भुका
काय देशील आंदण..बघावे किती ?

मैत्रिणींच्या बटांतून दिसतेस तू
कारणांतून कारण बघावे किती

--सुशांत..

सतीश दराडेंची एक सुपर्ब गझलः

गझल

मी तिचा टवका मला उडवा कुणी
वेगळे लेणे तिचे घडवा कुणी

चांगले होते ..कशाने माजले ?
या जगाला एकदा तुडवा कुणी..

मी कटेवर हात कायम ठेवतो
द्या मलाही चांगला बडवा कुणी..

कोरडा होऊन मी भेगाळलो
या मला ओला करा रडवा कुणी...

कल्पना जाईल माघारी पुन्हा
अक्षरांनो जा तिला अडवा कुणी...

मी कुणाचा कोण आहे विसरलो
नाव माझे घ्या मला चिडवा कुणी...

आठवण रक्तात शिकली पोहणे
इंद्रियांनो जा तिला बुडवा कुणी...

- सतीश दराडे

समकालीन गझल ह्या अनियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला आहे. 'समकालीन गझल' ह्या फेसबुक समुहामधे तो पाहता येईल. #samakaaleengazal

सर्व काव्यप्रेमींनी अंक वाचून त्यावर आपल्या प्रतिक्रीया, टीका कळवाव्यात ही विनंती.

एक नोट -

समकालीनच्या पहिल्या अंकासाठी गझल मागवताना कवी 'आपल्या जवळचे / आपल्याला मानणारे /आपल्याला दादा बाबा म्हणणारे / आपल्या मित्रयादीतलेच असावेत' असा कुठलाही संकुचित विचार संपादकांनी केलेला नाही. ज्या कवींच्या गझलेत स्वतंत्र अभिव्यक्ती किंवा तिची चिन्हे दिसताहेत अशा कवींना सन्मानपुर्वक विचारणा करूनच गझल घेतलेल्या आहेत. गटतटांच्या क्षुल्लक आणि काल्पनिक मर्यादांवर विश्वास ठेवणारा हा उपक्रम नाही !

निवडकच गझल ठेवायच्या असल्याने सगळ्याना विचारणा करता आलेली नाही हे ही येथे सविनय नमूद करावेसे वाटते.

गेल्या काही दिवसांत एक 'कविता+गझल संग्रह' व एक गझल संग्रह मिळाला.

कविता + गझलसंग्रह - बस, बाकी काही नाही - नि:शब्द देव (देवेंद्र गाडेकर)

गझल संग्रह - कैदखान्याच्या छतावर - सतीश दराडे

नकळतपणे व आपोआपच असे घडले की दोन्ही संग्रह वेगवेगळ्या वातावरणात आस्वादले गेले.

कैदखान्याच्या छतावर हा संग्रह काही दर्दी गझलकार व खुद्द सतीश दराडे ह्यांच्या उपस्थितीत एका धुंद वातावरणात आस्वादला गेला. प्रत्येक शेर वाचून वाहवा उमटत राहिली.

'बस, बाकी काही नाही' हा संग्रह मी घरात एकटाच असताना एकट्यानेच वाचला. प्रत्येक कविता व गझल वाचून 'उगाच वाचले, त्रास झाला मनाला' अशी भावना निर्माण होत राहिली.

दोन्हीही संग्रह तितक्याच ताकदीचे, दोन्हीही शायर एकमेकांना स्वतःहून अधिक मानणारे, दोघांचेही काव्य एकमेकांपेक्षा पूर्ण भिन्न रंगाचे पण तरीही अस्सल! मजा म्हणजे दोन्ही संग्रह वाचतानाचे वातावरणही असे होते की ते त्या तया संग्रहासाठी अगदी समर्पक होते. त्याहून मजा म्हणजे, हेच उलट झाले असते, नि:शब्द देवचा संग्रह जाहीरपणे आणि सतीश दराडेंचा संग्रह एकांतात वाचला गेला असता, तरीही इफेक्ट तोच झाला असता.

किती आनंद वाटला ते सांगू शकत नाही.

-'बेफिकीर'!

नुसतेच वा वा !

त्या पुस्तकातील दोन चार शेरही लिहिले असते तर चालले असते की.

एकटा जगण्यात वेगळीच मस्त मजा आहे
सुख नसले आयुष्यात तरी दूखः वजा करावे

खोटे खोटे हसावे खुश तूला करावे
मनात रडत कसे माफ मी तूला करावे

हसवुन तुला कसे दूःख सर्व मी विसरावे
हरवुुन मलाच कसे माफ मी तुला करावे

आपले नाते फक्त नावापुरतेच रहावे
तूच सांगना आज कसे माफ मी तूला करावे

माझही एक मन आहे 'अनामिका' तूला कळावे
अशक्य असूनी वाटते आता माफ मी करावे

नाती बांधलेली काही नसतात खरी सगळी
पोकळ राहलेली काही तू स्वतःच जपलेली

वाटतो आनंद मलाही तरी असतात का परकी
सुखाची तरल भावनाही दूःख मनी भारलेली

हे तुम्हा सर्वांसाठी

नवीनच लिहतोय काही चूक झाल्यास ही आगळी
अधुरी माझी साधना ही माफी ही मागितलेली

तू सोबत असताना वाट वाकडी केली
अगणित वणव्यांशी मैत्री खूशाल केली

अंधार जीवनाचा तेव्हा उजाळ झाला
जाळून जीव माझा जेव्हा मशाल केली

मदमस्त या रुपाने भलतीच कमाल केली
अंधारातही आरशाला दृष्टी बहाल केली

तू फूल मागण्याला खुपच उशीर केला
ओसाड बाग त्यांनी नुकतीच काल केली

डोळे‬ भरले ‪पुन्हा‬ तुझी ‪‎आठवण‬ आली
हृदयास ‪धडधड ही‬ 'अनामिक' बहाल केली

पुन्हा एकदा मृतदेहांचा खच आहे
जन्माला आलेला मरणारच आहे

अंत कुणाचा असा कधी व्हायला नको
अशी अपेक्षा बाळगणे फारच आहे

आज कुणी दुसरा अन मी असणार उद्या
तिसऱ्यालाही परवाची लालच आहे

डोळे भरले ज्याचे त्याने रक्त दिले
टीव्हीवरती इतरांची मचमच आहे

सुरु असावी तगमग दुसऱ्या पुलाकडे
डागडुजी कैलास तशी बंदच आहे

-- डॉ. कैलास गायकवाड

तिसऱ्यालाही परवाची लालच आहे >>

प्रतिसाद तुमचा शेरामध्येच सगळा आहे
परंतु लालच मधला च वेगळा आहे

संस्कृतोद्भव 'च' असतो तालव्य जरी
चमच्यामधला 'च' थोडा आगळा आहे

खच, फारच, बंदच मध्ये तालव्य नाही
लालचीचा 'च' हंसांत बगळा आहे

हर्पा म्हणे बस आज छिद्रान्वेष झाला
व्याक्रणाचा शर्ट माझा ढगळा आहे

Pages