आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.
कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.
कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.
वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.
धन्यवाद.
================================================
NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील 'सँटा बार्बरा कौंटी'च्या समुद्रकिनार्यावर मोठ्या प्रमाणात तेलगळती झाली आहे. 'प्लेन्स ऑल अमेरिकन पाईपलाईन एलपी' ह्या कंपनीच्या समुद्रात फुटलेल्या पाईपलाईनीतून एक लाख गॅलनहून जास्त क्रूड ऑइल समुद्रात पसरले आहे. ह्या आपत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गव्हर्नर जेरी ब्राऊन ह्यांनी आणीबाणीची घोषणा केली आहे. साधारण ९ मैलांत पसरलेल्या तेलाचा मुकाबला करण्यासाठी ३०० हून अधिक कर्मचारी व जवान कार्यरत आहेत.
इस्रायलचे अमेरिकेबरोबरचे
इस्रायलचे अमेरिकेबरोबरचे संबंध सद्ध्या तणावपुर्ण झाले असल्याची कबूली इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेस ह्यांनी दिली. अमेरिकेतील दोन्ही पक्षांशी चांगले संबंध ठेवून हा तणाव दूर करता येईल. पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर 'द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत' (टू स्टेट्स) उत्तम पर्याय ठरेल असा सल्ला त्यांनी दिला.
मार्च महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे आमंत्रण स्वीकारुन संसदेला स्ंबोधीत केले होते. तेव्हा त्यांनी ओबामांच्या इराणविषयक धोरणावर सडकून टीका केली होती. त्यामुळे ओबामा प्रशासनाने भाषणाला विरोध म्हणून इस्रायली पंतप्रधानांची भेट घेण्याचे नाकारले होते. अमेरिका आणि इराण अणुचर्चेतील डिटेल्स इस्रायलने जगजाहीर करु नये असे बजावले होते.
नेतान्याहू ह्यांनी 'टू स्टेट'चा तोडगा स्वीकारुन पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचे नाकारतानाच पॅलेस्टाईनच्या जमिनीवर नव्या वस्त्या उभारण्याचे धोरण राबविण्याचा निर्धार जाहीर केला आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष पेरेस ह्यांनी इस्रायलच्या राजकीय नेतृत्वाने पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या प्रयत्नांना समर्थन द्यायला हवे असे म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास ह्यांची प्रशंसा केली.
नेपाळमध्ये सतत होणार्या
नेपाळमध्ये सतत होणार्या भूकंपांमुळे मोठ्याप्रमाणावर भूस्खलन होवून काली गंडकी नदीचा प्रवाह अवरोधीत झाला आहे. त्यामुळे एक खोल व विस्तार होत राहणारा मोठा तलाव निर्माण झाला आहे. तसेच कृत्रिम धरणातील पाण्याची पातळी १५० मिटर्सने वाढून फ्लॅश फ्लडचा धोका निर्माण झाला आहे.
http://wap.business-standard.com/article/pti-stories/landslide-blocks-ri...
अश्विनी आता लक्षात येतय की
अश्विनी आता लक्षात येतय की काही वर्षान्पूर्वी सुन्दरलाल बहुगुणा ( अमिताभ् कडुन निवडणूकीत हरलेले पण एक अभ्यासु समाजसेवक) यानी हिमालयातल्या टिहरी धरण प्रकल्पाला का विरोध केला होता ते. त्यान्चे म्हणणे होते की हिमालय भुकन्प प्रवण आहे, उद्या देव न करो जर तिथे मोठे भुकम्प झाले तर ही धरणे कोसळतील, उध्वस्त होतील आणी यातुनच पाण्याचे लोन्ढे च्या लोन्ढे हिमालयातली अनेक गावे उध्वस्त करुन मोठ्या प्रमाणावर मनुष्य व वित्त हानी होईल.:अरेरे:
नेपाळच्या भुकम्पाने आता अस्वस्थता जाणवते आहे.
खरं आहे रश्मी. एकावर एक
खरं आहे रश्मी. एकावर एक आपत्ती कोसळतायत नेपाळवर....
--------====
Malaysian police have discovered mass graves in more than a dozen abandoned camps used by human traffickers on the border with Thailand, where Rohingya Muslims fleeing Myanmar have been held.
The Malaysian newspaper The Star has reported that as many as 100 bodies were found at one camp.
http://www.independent.co.uk/news/world/asia/mass-graves-of-muslim-migra...
रश्मी, अमिताभकडून हरलेले ते
रश्मी, अमिताभकडून हरलेले ते हेमवतीनंदन बहुगुणा. दोघांचा काही संबंध नाही एकमेकांशी.
अर्र सॉरी मोठी चूक झाली.
अर्र सॉरी मोठी चूक झाली. धन्यवाद फारएण्ड लक्षात आणुन दिल्याबद्दल.
केश्विनी, गंडकी नदी पात्र
केश्विनी, गंडकी नदी पात्र बदल्यासाठी कुप्रसिद्ध आहेच. त्यात ही भर!
रश्मी.., टिहरी प्रकल्पाबद्दल अशीच भीती व्यक्त केली जाते.
आ.न.,
-गा.पै.
सुंदरलाल बहुगुणा 'चिपको'
सुंदरलाल बहुगुणा 'चिपको' आंदोलनासाठी प्रसिद्ध.
Oxford University has
Oxford University has appointed terrorism expert Louise Richardson as its next vice-chancellor, the first female head in the institution’s 800 year history.
आधीचे ३०० चॅंसलर पुरुष होते.
http://m.theaustralian.com.au/higher-education/after-800yrs-oxford-appoi...
इराणच्या इंधन मंत्रालयावर
इराणच्या इंधन मंत्रालयावर अमेरिकेतून सायबर हल्ला झाला. हा हल्ला परतवण्यात आला असल्याची माहिती इराणने जाहिर केली आहे व अमेरिकेला ह्या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे असे इराणच्या सायबर सुरक्षा विभागाचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल 'सयेद कमाल हादियानफार' ह्यांनी म्हटले आहे.
ह्या आधी अमेरिकेने २०१० साली इराणच्या अणुप्रकल्पावर सायबर हल्ला चढवून हजार सेंट्रिफ्युजेस निकामी केले होते.
इराणी नववर्षानिमित्ताने २१-२४ मार्च सोजी सुट्टी असताना इराणच्या मंत्रालयावर सायबर हल्ला झाला. ह्या हल्ल्यामागे असलेले सगळे IP address अमेरिकेतील होते. २०१० सालचा हल्ला 'स्टक्सनेट' ह्या व्हायरसचा वापर करुन केला गेला होता.
नंतर अमेरिकेनेही इराण आपल्या देशात सायबर हल्ले चढवत आहे असे आरोप लावले होते.
अमेरिकेने क्यूबाला दहशतवादाला
अमेरिकेने क्यूबाला दहशतवादाला खतपाणी घालणार्या राष्ट्रांच्या यादीतून वगळले. ह्या घडामोडीमुळे क्यूबाला अमेरिकेत इतर क्षेत्रांबरोबर बॅंकिंग क्षेत्रातही उतरता येईल.
हे कसं कसं घडलं?
http://www.bbc.com/news/world-us-canada-32926821
जपानला आज ७.८ मॅग्निट्यूडचा
जपानला आज ७.८ मॅग्निट्यूडचा भूकंपाचा धक्का बसला आहे.
http://m.ndtv.com/world-news/strong-earthquake-shakes-buildings-in-tokyo...
अमेरिकेचा चिनला सुक्का
अमेरिकेचा चिनला सुक्का डोस...
http://news.yahoo.com/us-says-china-artillery-vehicles-artificial-island...
भारताचे राष्ट्रपती श्री प्रणव
भारताचे राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी ३१ मे ते ४ जून स्विडन व बेलारूसचा दौरा करतील. त्यांच्या सोबत Minister of State for Chemicals and Fertilisers हंसराज गंगाराम अहिर आहेत. गुलाम नबी आझाद व अश्वनी कुमार हे राज्यसभा व लोकसभेचे सदस्य आहेत. ७ विद्यापिठांचे व्हाईस चॅंसेलर्स/ डायरेक्टर्स, ६०उद्योगपती हे स्वतंत्ररित्या त्यांच्यासोबत आहेत.
This is the first presidential visit to both countries and is intended to bolster of bilateral ties as well as a push to the government's initiatives like Make in India, Swachh Bharat and Skill India.
ह्या दौर्याची सविस्तर माहिती ...
http://zeenews.india.com/news/india/president-pranab-mukherjee-to-leave-...
अमेरिका आणि इराण दरम्यानचा
अमेरिका आणि इराण दरम्यानचा अणूकरार फायनलाईझ करायची शेवटची तारिख ३० जून जसजशी जवळ येतेय तसतसे हा करार होण्यामधले अडथळे वाढत चालले आहेत.
http://www.theglobeandmail.com/news/world/us-and-iran-address-obstacles-...
Nigeria's Maiduguri city hit
Nigeria's Maiduguri city hit by deadly bomb, overnight attack
The attacks occurred a day after the inauguration of President Muhammadu Buhari, who swore to crush the Islamist militant group and move the command centre for military operations away from the capital Abuja to Maiduguri.
http://af.reuters.com/article/worldNews/idAFKBN0OF0EV20150531
डिजिटल करन्सी बिटकॉईनच्या
डिजिटल करन्सी बिटकॉईनच्या माध्यमातून ऑनलाईन ड्रग्ज विक्री.
The accused mastermind behind the underground website Silk Road has been sentenced to life in prison for orchestrating a scheme that enabled more than $200m of anonymous online drug sales using the digital currency bitcoin.
http://m.independent.ie/business/technology/silk-road-creator-jailed-for...
बुरुंडी इलेक्शन क्रायसीस.
बुरुंडी इलेक्शन क्रायसीस. बुरुंडीच्या गाजलेल्या इलेक्शनच्या गोंधळात अजून एक भर. बुरुंडी इलेक्शन कमिशनमधील एक सदस्य देश सोडून शेजारील रवांडामध्ये पळून गेला. दुसरा पळून जायच्या विचारात आहे :अओ:. ५ पैकी ४ सदस्य जागेवर असतील तर निवडणूका होवू शकतील. पण अजून एक पळून जावून ३ च उरल्यास होवू शकत नाहीत.
http://m.gulfnews.com/news/africa/burundi-election-panel-vice-president-...
केश्विनी, प्रणव मुखर्जींची
केश्विनी,
प्रणव मुखर्जींची स्वीडन आणि बेलारूसची भेट अधिकृतरीत्या व्यापारासाठी आहे. मात्र आजून एक हेतू असावा अशी शंका आहे. पुढे जुलैत होणाऱ्या मोदींच्या रशियादौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट चाचपणी स्वरूपाची दिसते आहे.
आ.न.,
-गा.पै.
US police kill more than two
US police kill more than two people a day, report suggests
http://www.bbc.com/news/world-us-canada-32950383
पुढे जुलैत होणाऱ्या मोदींच्या
पुढे जुलैत होणाऱ्या मोदींच्या रशियादौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट चाचपणी स्वरूपाची दिसते आहे.>>> सविस्तर लिहाल का प्लिज?
केश्विनी, अहो, त्यात सविस्तर
केश्विनी, अहो, त्यात सविस्तर काय लिवायचंय! नाटो आणि रशियाचं वाजलंय ना. म्हणून रशियाला जाण्याआधी थोडा कानोसा घ्यायचा प्रयत्न केलाय मोदींनी. इतकंच.
आ.न.,
-गा.पै.
गापै, पण आपला काय संबंध
गापै, पण आपला काय संबंध त्यांचं नाटोशी वाजलं असेल तरी? आंतरराष्ट्रीय संबंधांत असलं काही येत नसावं बहुतेक.
पाक चीन गळ्यात गळे घालतात म्हणून चीनशी व्यापारी किंवा इतर संबंधांत फटकून थोडंच वागून चालतंय.
रशियाने पाश्चिमात देशांतील ८९
रशियाने पाश्चिमात देशांतील ८९ नेत्यांना सिक्रेट बॅन लिस्ट मध्ये टाकलंय.
http://m.timesofindia.com/world/uk/Russia-puts-89-western-leaders-on-sec...
केश्विनी, >> पण आपला काय
केश्विनी,
>> पण आपला काय संबंध त्यांचं नाटोशी वाजलं असेल तरी?
आपलं (= मोदींचं) अमेरिकेशी, क्यानडाशी, ब्रिटनशी चांगलं आहे. गुजराती माणस प्रभावशाली छे ने ए देशमां! रशियाशी सलगी वाढवण्यापूर्वी चाचपणी केलेली बरी. स्वीडन/फिनलंड तटस्थ असतात ते रशियाच्या बळावर.
बेलारूस रशियाच्या प्रभावाखाली आहे हे उघड आहे. त्यामुळे रशियाच्या प्रभावक्षेत्रातील देशांना आगाऊ भेटी देण्यामागे पाश्चात्य राष्ट्रांची प्रतिक्रिया आजमावणे हा हेतू आहेच. पुढेमागे युनोकडून युक्रेनमध्ये 'तटस्थ निरीक्षक' नेमले जाऊ शकतात. ते भारतीय असण्याची शक्यता वाढवता येईल काय याची चाचपणी करणे हा दीर्घकालीन हेतू असू शकतो.
आ.न.,
-गा.पै.
गापै, अशीच टिपण्णी हवी होती
गापै, अशीच टिपण्णी हवी होती मला :-). धन्यवाद.
आंतरराष्ट्रिय ख्यातीच्या
आंतरराष्ट्रिय ख्यातीच्या शास्त्रज्ञ व बायोलॉजिस्ट अमिना गरिब-फकिम ह्यांची मॉरिशसच्या प्रेसिडेंटपदी नियुक्ती झाली आहे. मॉरिशसच्या त्या पहिल्या स्त्री प्रेसिडेंट होत.
http://m.economictimes.com/news/international/world-news/government-of-m...
चीनमध्ये जहाजाला
चीनमध्ये जहाजाला जलसमाधी.
http://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/...
उत्तर कोरियाची 'सायबर आर्मी'
उत्तर कोरियाची 'सायबर आर्मी' नरसंहार घडवू शकते असा माजी कोरियन अधिकार्यांनी इशारा दिला आहे. उ. कोरियाकडे हजारो 'वॉरियर्स'ची सायबर आर्मी आहे व ह्या हॅकर्सचे हल्ले नरसंहार करु शकतात तसेच शहरे नष्ट करु शकतात.
उत्तर कोरियाच्या लष्करात 'ब्यूरो १२१' असा स्वतंत्र विभाग आहे. ह्यात उ. कोरियातील निष्णात सायबर तज्ञ, हॅकर्सना भरती करुन घेतले जाते. उ. कोरियाचे उपराष्ट्रप्रमुख किम जाँग-उन ह्यांच्याकडे ह्या सायबर आर्मीचे नियंत्रण असल्याची माहिती प्राध्यापक किम ह्यूंग-क्वांग ह्यांनी दिली. प्रा. किम ह्यांनी २००४ साली उ.कोरियातून पळ काढला. त्या आधी त्यांच्याच देखरेखीखाली हे वॉरियर्स तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी बीबीसी ला दिली. आज ह्या पथकात कमीतकमी ६००० हॅकर्स असल्याचा दावा त्यांनी केला.
उ. कोरियातील संरक्षण खर्चातील २०% तरतुद सायबर आर्मीसाठी असते.
काही महिन्यांपुर्वी 'सोनी पिक्चर्स'च्या साईटवर उ.कोरियाने हल्ला केल्याचा आरोप होता. ह्या कंपनी द्वारे प्रदर्शित होणार्या हॉलिवूडपड 'द इन्टर्व्ह्यू' च्या विरोधात हा हल्ला होता कारण ह्या सिनेमात उ.कोरियाचे राष्ट्रप्रमुख किम जाँग-उन ह्यांची व्यक्तिरेखा हास्यास्पदरित्या मांडण्यात आली होती. अर्थात उ. कोरियाने हे आरोप फेटाळले होते.
Pages