आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत सर्जन जनरल असं पद असतं हेच मला माहित नव्हतं
असते ना. सिगरेटच्या पाकीटावर काय धोक्याच्या सूचना लिहायच्या हे तेच ठरवतात.
ते सांगतात लहान मुलांना व्हॅक्सिन द्यावीत, पण बरेच लोक ऐकत नाहीत आणि त्या बद्दल या जनरल ला काही करता येत नाही.
तसेच एक पोस्ट मास्टर जनरल पण असतो. पोस्ट ऑफीस चालवायला पैशाची भीक मागणे हे त्यांचे मुख्य काम. अधून मधून तिकीटाचा दर वाढवणे, शनिवारी टपाल वितरित करणार नाही, अश्या धमक्या देणे हेहि यांचेच काम.
Happy

Sangeeta Bhatia, an Indian-origin scientist at the Massachusetts Institute of Technology has been named the recipient of the 2015 Heinz Award for Technology, the Economy, and Employment.
Bhatia who has developed artificial human microlivers for drug testing, won a prestigious $2,50,000 Heinz award for her work in tissue engineering and disease detection.

http://zeenews.india.com/news/health/health-news/sangeeta-n-bhatia-india...

रेडिओ इराणने अशी बातमी दिली आहे की जगातील सर्वात खतरनाक आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी 'आयसिस'चा अल बगदादी ठार झाला आहे.

ही बातमी खरी असेल तर आता यापुढे या संघटनेची पुढील वाटचाल कशी रोकता येईल आणि तिचा संपुर्ण खात्मा करण्याकरीता जगातील सर्वच देशांनी एकत्र येऊन या भयंकर मुलतत्ववादी आणि अतिरेकी संघटनेचा सफाया करण्यासाठी प्रयत्न करायला हवे हे महत्त्वाचे.

http://maharashtratimes.indiatimes.com/international/ISIS-Al-bagdadi-Rad...

नरेश, बगदादी जबर जखमी झाल्याच्या मार्चपासूनच बातम्या आहेत. पण पेंटॅगॉनने त्याच्या जखमी होण्याबद्दलही संशय व्यक्त केला होता. बगदादी मरून एवढी विस्तारलेली ही संघटना बंद पडणार नाही. त्यातल्या नेत्यांमध्येही भयानक ॲंबिशन असलेले लोक असतीलच.

येमेनमध्ये गृहयुद्ध सुरु व्हायची लक्षणं आहेत. 'आयएस' येमेन मध्ये दाखल झाल्याची घोषणा झाली आहे. हे दहशतवादी येमेनमधे संघर्ष पुकारण्यासाठी तयार असून सर्वप्रथम हौथी बंडखोरांचे गळे चिरू अशी धमकी दिली आहे. एके ४७, रॉकेट लॉंचर्स, लष्करी वाहनांसकट सज्ज असलेल्या दहशतवाद्यांची ९ मिनिटांची फिल्म प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एकिकडे 'अल-कायदा' दक्षिण येमेनमध्ये लष्करी तळ, इंधन प्रकल्प व इतर महत्वाच्या ठिकाणांचा ताबा घेउन प्रभाव वाढवत आहे.

एकिकडे 'आयएस'शी सलग्न 'ग्रीन ब्रिगेड' हा ग्रूपही कार्यरत आहे.

शनिवारपासून मलेशियात चालू असलेल्या 'आसियन'च्या बैठकीत आसियनचे प्रमुख आणि व्हिएतनामचे माजी अधिकारी 'ली लॉंग मिन्ह' ह्यांनी जाहिररित्या 'साउथ चायना सी'मधील चीनच्या दावेदारीला मान्य करणार नसल्याचे सांगून ह्या सागरी क्षेत्राला स्वतंत्र नियमावली तयार करण्याची घोषणा केली.

'आसियन'ने कुणाचीही बाजू न घेता तटस्थ रहावे ह्या चीनच्या मागणीचा समाचार घेताना ते म्हणाले की सदस्य देशांचे हित लक्षात न घेणारा तटस्थपणा काय कामाचा?

जपानच्या विश्लेशकांनुसार, ह्या क्षेत्रातून अमेरिकेने माघार घेतली तर त्यापुढील २० वर्षांत चीन हे क्षेत्र गिळंकृत करेल.

शनिवारी लास वेगास येथे व्हेनेशिअन हॉटेलमध्ये रिपब्लिकन पक्षाचे समर्थन करणार्‍या 'रिपब्लिकन ज्यूईश कोअ‍ॅलिशन'च्या बैठकीत जॉर्ज बुश ह्यांनी इराण अणुकरार व 'आयएस' संदर्भात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ओबामांवर टीका केली आहे.. इराणच्या अणुकार्यक्रमावर तोडगा म्हणून समजला गेलेला हा करार राष्ट्रिय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे आणि निर्बंध उठवण्याचा निर्णयही घाईगडबडीचा आहे असं ते म्हणाले. आयएस विरोधातही अमेरिका अयशस्वी ठरल्याचाही ठपका ठेवला. ही टीका अमेरिकेत पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचाराचा भाग मानला जातो आहे. आयएस ही अल कायदाचीच पुढारलेली आवृत्ती असून इराकमधून २०११ साली अमेरिकी लष्कर मागे घेणे ही ओबामा सरकारची सामरिक चूक आहे असंही ते म्हणाले. जॉर्ज बुश ह्यांनी त्यांच्या काळात दहशतवादाचा कठोर मुकाबला केल्याचे सांगून डॅनियल पर्लची हत्या करणार्‍या दहशतवाद्याला पकडल्याचाही दाखला दिला.

डेमोक्रॅट व रिपब्लिकन पक्षांकडून पुढल्या वर्षीच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी काही उमेदवरांची दावेदारी दाखल केली आहे. प्रचार व निधी जमवणे सुरु झाले आहे. बुश ह्यांचे वक्तव्य अश्याच मोहिमेचा भाग असल्याचे दिसत आहे.

झक्की.. Rofl

खरच आहे तुमचे झक्की.. अमेरिकेत सर्जन जनरल, पोस्ट मास्टर जनरल झालच तर अ‍ॅटर्नी जनरल ही असली पदे नुसती नावाला व शिक्कामोर्तबीसाठी असतात.. (नाही म्हटले तर ५०-६० वर्षात जॉन एफ केनेडींचे धाकटे बंधु रॉबर्ट एफ केनेडी हेच ते काय जरा कणा असलेले व कर्ते अ‍ॅटर्नी जनरल ६० च्या दशकात होउन गेले ज्यांनी माफिया लोकांना पळता भुई थोडी केली होती .. बाकी जेनेट रिनो, एरिक होल्डर वगैरे सगळे सुमार! ) पण तरीही डॉ. मुर्तींचे अभिनंदन.

सर्जन जनरलपेक्षा प्रेसीडेंटने नेमलेल्या वैद्यकिय अ‍ॅडव्हाय़जर या पदाला जास्त महत्व व वेटेज असते. प्रेसिडेंट क्लिंटन यांच्या कारकिर्द्रीत अजुन एक भारतिय डॉक्टर डॉ. अतुल गवांदे यांना तसे सिनिअर प्रेसिडेंशिअल अ‍ॅडव्हायजरचे पद मिळाले होते. (र्‍होड्स स्कॉलर व अतिशय हुशार अश्या डॉ. अतुल गवांदेंचे " अ सर्जन्स नोट ऑन अ‍ॅन इंपर्फेक्ट सायंस" हे पुस्तक फारच चांगले आहे.. पुस्तकप्रेमींनी जरुर वाचावे.)

अश्विनी.. जॉर्ज बुश यांनी ओबामांना फॉरेन पॉलिसी वर लेक्चर द्यावे म्हणजे एक मोट्ठा जोक आहे! लगेच ओबामांनी त्यांना चोख उत्तर देउन चपराक दिली.. ते म्हणाले की आज व्हाइट हाउसमधे ओबामा असण्याचे मुख्य कारण म्हणजे २००८ च्या निवडणुकीत लोकांनी बुशच्या इराक युद्धाच्या चुकीच्या निर्णायाला शेवटी ओळखले. पुढे ओबामा असेही म्हणाले की बुश यांनी सुरु केलेल्या त्या चुकीच्या युद्धामुळेच आज अल कायदा व आयसस सारख्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सना फोफवायला मदत झाली आहे.

त्या बुशच्या इराक युद्धाच्या चुकीच्या निर्णयामुळेच २००२ पासुन ते आजच्या २०१५ पर्यंतच्या घटना मध्यपुर्वेत डॉमिनो इफेक्टप्रमाणे घडत गेल्या! मान्य आहे की सद्दाम हुसेन हा एक क्रुर डिक्टेटर होता.. पण निदान त्याच्या कारकिर्द्रीत मध्यपुर्वेतले सगळे गट त्याच्या हुकुमशाहीला वचकुन होते व एक डेलिकेट बॅलंस मध्यपुर्वेत राहीला होता. अमेरिकेने उगाचच इराक मधे अल कायदा घुसल्याचे खोटे निमित्त व सद्दामकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असल्याचे खोटे कारण पुढे करुन (आठवा..युनोत अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री कॉलिन पॉवेल सगळ्यांना पाँइंटरने.... जमिनीखाली लपवलेले डबे दाखवत होते.. जे म्हणे केमिकल वेपन्सने भरले होते... पण प्रत्यक्षात ते रंगाचे डबे निघाले!) इराक वॉर सुरु केले व सबंध मध्यपुर्वेतला डेलिकेट बॅलंस उधळुन लावला.

काय साधले अमेरिकेने ते करुन? मायनॉरीटी असलेली सद्दामच्या बाथ पार्टीची सुनी माणसे.. (ज्यांनी ऑटोमन एंपायरच्या काळापासुन शिया मॅजॉरिटी असलेल्या इराकमधे ४०० वर्षे राज्य केले होते).. त्यांना हाकलुन अमेरिकेने तिथे नौरी अल मलिकीचे शियांचे सरकार स्थापन केले.

एकीकडे शेजारच्या इराणच्या शिया गव्हरमेंटला अ‍ॅक्सिस ऑफ इव्हल चा एक देश म्हणायचे व इराकमधे तश्याच शिया लोकांचे सरकार बनवायला मदत करायची.. हा निर्णय म्हणजे अमेरिकेने यापुर्वीही (बोनहेड, दुरद्रुष्टी नसलेल्या व स्किझोफ्रेनिक असे म्हणता येइल अश्या) मध्यपुर्वेतल्या राजकारणात घेतलेल्या निर्णयांपैकी एक निर्णय आहे.खर म्हणजे अमेरिकेला(बुशला नव्हे!) कळुन चुकले आहे की इराणमधले शिया कितीही कट्टर असले तरी आयसस व अल कायदातल्या कट्टर सुनी मुस्लिमांपेक्षा ते बरेच मॉडरेट आहेत व बरे आहेत. तेहरानमधे त्यांच्याशी अमेरिका आज संवाद तरी साधू शकत आहे.सबंध मध्यपुर्वेत(बहरीन, यु ए ई, ओमान वगैरे छोटे देश व सौदी अरेबिया जे अमेरिकेचे बाहुले आहे .. सोडले तर) आज इराणमधेच स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे व तोच सगळ्यात जास्त मॉडरेट मुस्लीम देश आहे. (खासकरुन हसन रुहानी हा मॉडरेट अध्यक्ष निवडुन आला हे इराणच्या मॉडरेट्पणाकडे झुकण्याचेच द्योतक आहे)

पण आता लिबिया व सिरिया मधे जे सिव्हिल वॉर चालु आहे त्यामुळे पुढे आलेल्या आयसस या कट्टर व क्रुर अश्या सुनी मुसलमानांच्या दह्शतवादी व अत्यंत क्रुर क्रुत्यांकडे बघुन सद्दाम परवडला असता असे म्हणायची पाळी अमेरिकेवर आली आहे.. ती कोणामुळे? ती याच बुशच्या २००२ च्या इराक युद्ध सुरु करायच्या चुकीच्या निर्णयामुळे! व आज तेच बुश महाशय ओबामांना फॉरेनपॉलीसी वर लेक्चर देत आहेत! Happy

आता यात अजुन एक अमेरिकेसाठी काँप्लिकेशन म्हणजे एकीकडे इराणच्या शिया सरकारशी न्युक्लिअर वाटाघाटी चालु असताना येमेनमधे याच इराणमधल्या कट्टर शियांचे बॅकिंग असलेल्या हौदी ग्रुपने आता आपले राज्य तिथे आता आहे असे घोषीत केले आहे. ते कट्टर शिया अमेरिकेला येमेनमधे नको आहेत. तसेच ते शिया सरकार येमेनमधे आयससलाही नको आहे! त्या शिया हौदी सरकारला हुसकावयाला आयसस आता येमेनमधे येउन दाखल होणार आहे. मग एकीकडे लिबिया,सिरिया व इराकमधे आयससशी लढणारी अमेरिका.. आता येमेनमधे (आयसस जरी कट्टर शियांना हरवायला येणार असली तरी) आयससला पाय पसरण्यास जागा देइल का?

थोडक्यात म्हणजे त्या बुशने २००२ मधे उगीचच सुरु केलेल्या कॉस्टली इराक वॉरमुळे आता मध्यपुर्वेत अमेरिकेची जाम गोची झाली आहे हे निश्चित!

अमेरिकेने उगाचच इराक मधे अल कायदा घुसल्याचे खोटे निमित्त व सद्दामकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असल्याचे खोटे कारण पुढे करुन>>>> आता त्या मास डिस्ट्रक्शन वेपन्स बद्दल कुणीच काही बोलत नाही. जशी काही सद्दामच्या अस्ताबरोबर हवेत विरघळून गेली ती एकाएकी.

जॉर्ज बुश यांनी ओबामांना फॉरेन पॉलिसी वर लेक्चर द्यावे म्हणजे एक मोट्ठा जोक आहे! >>>> निवडणुका आल्यात ना! केवळ भारतातच असल्या खेळ्या चालतात असं नाही Wink

सबंध मध्यपुर्वेतला डेलिकेट बॅलंस उधळुन लावला. >>>> त्या आधीही आखाती युद्धं झालीच होती. पण हे युद्ध खर्‍या अर्थाने थांबलंच नाही. ते ह्या ना त्या रुपाने मध्यपुर्वेत रेंगाळत राहिलं आणि आता परत उद्रेक होतोय.

(खासकरुन हसन रुहानी हा मॉडरेट अध्यक्ष निवडुन आला हे इराणच्या मॉडरेट्पणाकडे झुकण्याचेच द्योतक आहे) >>> +१

त्या शिया हौदी सरकारला हुसकावयाला आयसस आता येमेनमधे येउन दाखल होणार आहे. >>>> झाले सुद्धा. मी वर एका बातमीत लिहिलं आहे त्याबद्दल.

त्या शिया हौदी सरकारला हुसकावयाला आयसस आता येमेनमधे येउन दाखल होणार आहे. मग एकीकडे लिबिया,सिरिया व इराकमधे आयससशी लढणारी अमेरिका.. आता येमेनमधे (आयसस जरी कट्टर शियांना हरवायला येणार असली तरी) आयससला पाय पसरण्यास जागा देइल का?>>>> सेम असंच अफगाणिस्तानमध्ये सुरु होतंय. आयसिसपेक्षा तालिबान बरं असं अफगाणीस्तानला वाटतंय.

तेलाच्या किंमतीत जरुरी पेक्षा जास्त चढ उतार झाले (उतार जास्त) की मध्यपुर्वेत युद्ध पेटतात. तो भाग जास्त अशांत होतो.

मायग्रंट माफिया, कॅश पेमेंट्स, वायर ट्रांस्फर्स, हवाला, खंडणी - सहारा-स्विडन स्मगलिंग नेटवर्क -

It's the Mediterranean piece of the global human trafficking pie that the U.N. says helps generate some $150 billion in illicit profits from forced labor each year.

स्वदेशातील अस्थैर्य, गरीबी ह्यातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबापासून दूर गेलेल्या व human trafficking च्या जाळ्यात अडकलेल्या एरिट्रियन, लिबियन आणि इथिओपियनांच्या कहाण्या आणि स्मगलर्सची मोडस ऑपरेंडी इथे वाचा...

http://www.foxnews.com/world/2015/04/27/cash-payments-wire-transfer-exto...

इराणमधील आघाडीची बँक 'बँक मेल्ली ऑफ इराण' चे डेप्युटी गव्हर्नर घोलम रेझा पनाही ह्यांनी इराण व रशियादरम्यान रुबल चलनात व्यवहार सुरु झाल्याची माहिती दिली. चीनबरोबरील व्यापारातही रुबलचा व्यापार सुरु झाला आहे. रशियन अर्थ व्यवस्थेसाठी ही महत्वाची घटना आहे.

बाली ९ - At last, इंडोनेशियाने परदेशी ड्रग्स स्मगलर्सना ठोठावलेली देहदंडाची शिक्षा अंमलात आणली. ऑस्ट्रेलियाने ह्या निषेधार्थ त्यांचे इंडोनेशियातले राजदूत परत बोलावले आहेत. ड्रग माफियांशी संघर्ष चालूच राहील असे इंडोनेशियाने म्हटले आहे.

http://m.voanews.com/a/indonesia-confirms-executions-brazil-australia-ou...

नायजेरियन मिलिटरीने बोको हरामने पळवलेल्या२०० मुली व ९३ स्त्रियांची सम्बिसा जंगलातून सुटका केली.

गेल्यावर्षी चिबॉक बोर्डिंग स्कूल मधून पळवलेल्या २१९ मुलींपैकी ह्यात कुणी आहेत का तपासले जात आहे.

पळवलेल्या स्त्रियामुलींचा वापर बोको हराम दहशतवादी मिलिटरी विरोधात मानवी ढालीसारखा करतात. तसेच लैंगिक गुलाम म्हणूनही वापरतात.

ह्या मोहिमेत नायजेरियन मिलिटरीने सम्बिसा जंगलातले बोको हरामचे ४ कॅम्प्स उद्ध्वस्त केले.

Nigeria's military largely stood by last year as Boko Haram took over dozens of towns and declared a large swath of northeastern Borno state an Islamic caliphate.

That changed when a multinational offensive led by Chad began at the end of January. Now, Nigeria's military says it has driven the Islamic extremists out of all towns with help from troops from Chad and Niger while Cameroonian soldiers have been guarding their borders to prevent the militants from escaping.

http://www.dailymail.co.uk/wires/ap/article-3060640/Military-evacuating-...

सौदी अरेबियाचे राजे सलमान ह्यांनी राजगादीचे उत्तराधिकारी बदलले.

In moves announced on Saudi state television, Salman replaced Crown Prince Muqrin bin Abdulaziz and named the powerful interior minister, Prince Mohammed bin Nayef, as next in line.

He also named his son, Prince Mohammed bin Salman, as deputy crown prince and relieved the long-serving foreign minister, Prince Saud al-Faisal, who has shaped the kingdom’s foreign policy for nearly four decades.

http://mobile.nytimes.com/2015/04/29/world/middleeast/king-salman-of-sau...

ईशान्य नायजेरियातील Damasak town मधील shallow graves व रस्त्यांमधे आज ४०० सडलेले मृतदेह सापडले Sad

The victims included men, women and children murdered by Boko Haram when they seized the area in November, said Abubakar Kyari, a senator-elect for the region.

"The staggering number of dead bodies found in Damasak is a testimony of the large-scale atrocity Boko Haram committed when they were in control of the town" Kyari added.

http://cnnphilippines.com/world/2015/04/29/Nigeria-Damasak-decomposed-co...

गेल्या आठवड्यात The second floor ह्या स्वयंसेवी संस्थेच्या संचालिका सबीन महमूद यांची कराची येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या आईवर देखिल गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यांची प्रकृती गंभीर आहे. सबीन ह्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून विविध विषयांवर पुरोगामी वैचारिक चर्चा घडवून आणण्यात आघाडीवर होत्या. त्यामुळे त्यांनी अनेकदा धार्मिक मूलतत्त्ववादी लोकांचा रोष ओढवून घेतला होता. Her death is a great loss to the movement of bringing transformational change in urban Pakistani society. May her soul rest in peace!
http://www.dawn.com/news/1177956/director-t2f-sabeen-mahmud-shot-dead-in...

आज कराची विद्यापीठातील एक प्राध्यापक डॉ.यासिर रिझवी ह्यांची देखिल गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्या हत्येमागील कारण अजून उघडकीस आलेले नाही.
http://www.dawn.com/news/1178894/ku-professor-shot-dead-in-karachi

Sad

I haven't read the news completely म्हणून लिहिता येत नाहीये पण कोणीतरी कालपासून बाल्टिमोर मध्ये चालू असलेल्या दंगलीविषयी पण लिहा ना..in general गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत विविध ठिकाणी पोलिसांविषयी वाढता असंतोष चिंताजनक आहे.

जिज्ञासा, काल वेळेअभावी बाल्टिमोर बद्दल लिहिले नाही. आज लिहितेय.

मेरीलँड प्रांताचे गव्हर्नर लॉरी होगन ह्यांनी अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरात कृष्णवर्णीय तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्यानंतर उसळलेला हिंसाचार रोखण्यासाठी आणीबाणी घोषित करण्यात आली. १९ एप्रिलला फ्रेडी ग्रे ह्या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप ग्रेच्या आप्तांनी केला आहे.

ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन संसदेत पोलिसांकडून होणार्‍या अतिरिक्त बळाच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी विधेयक दाखल करण्यात आले. शहरात 'नॅशनल गार्ड' तैनात केले गेले आहे. सोमवारी फ्रेडी ग्रे चे फ्युनरल झाल्यानंतर शहरात दगडफेक, जाळपोळ, लुटालूट सुरु झाली. पोलिसांच्या पथकांवर दगड, बाटल्या व विटांचा मारा करण्यात आला.

बल्टिमोरच्या महापौर स्टेफनी ब्लेक ह्यांनी मंगळवारपासून एक आठवडा रात्री सात तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे.

बाल्टिमोरचा रहिवासी असलेल्या फ्रेडी ग्रे ला घातक हत्यार बाळगल्याच्या आरोपात १२ एप्रिलला पोलिसांनी पकडले. पकडल्यावर लगेच तासाभरात त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. नंतर फ्रेडी ग्रे कोमात गेला. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला, मानेला व कण्याला जखमा दिसून आल्याचा दावा केला आहे. ह्या प्रकरणी बाल्टिमोर पोलिसदलाने ६ पोलिस अधिकार्‍यांना निलंबित केले.

ह्या आधीही अमेरिकेच्या विविध प्रांतांमध्ये पोलिसांकडून सामान्य नागरिकांवर अतिरिक्त बळाचा वापर केल्याच्या घटना मोठ्याप्रमाणावर समोर येत आहेत. गेल्यावर्षीही मिसौरी प्रांतात पोलिस कारवाई चालू असताना मायकल ब्राऊन ह्या कृष्णवर्णीय तरुणाचा मृत्यू झाला होता. २०१४ पासून असे १०हून अधीक मृत्यू झाल्याच्या घटना आहेत.

न्यूयॉर्कमधील संसद सदस्य हकीम जेफ्रीस ह्यांनी पोलिसांकडून होण्यार्‍या अनावश्यक बळाचा वापर रोखण्यासाठी 'एक्सेसिव्ह यूझ ऑफ फोर्स प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट' नावाचे विधेयक दाखल केले आहे. अन्य संसद सदस्यांनीही ह्या विधेयकास समर्थन दिल्याचे समजते.

चार दशकांनंतर प्रथमच श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारात कपात करण्यात आली आहे आणि ह्यासाठी सद्ध्याचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना ह्यांनी पुढाकार घेतला.. आता श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांकडे संसद बरखास्त करणे किंवा स्वतःच्या अधिकारांमध्ये वाढ करण्याचा थेट अधिकार नसेल. ह्या जानेवारीत सूत्रे हाती घेतलेल्या राष्ट्राध्यक्ष सिरिसेना ह्यांनी श्रीलंकेतील राजकीय आणि सामाजिक घडी बसवण्यासाठी मर्यादित प्रमाणात अधिकार असणेच योग्य ठरेल असे म्हटले आहे. त्याप्रमाणे संसदेत १९वे सुधारणा विधेयक मंगळवारी रात्री ११ वाजता बहुमताने पारित करण्यात आले. मंजुरीसाठी दोन तृतियांश मते आवश्यक असतात पण २२५ संसद सदस्यांपैकी २१२ सदस्यांनी ह्या विधेयकाला समर्थन दिले.

१९७८ पासून श्रीलंकेतील राष्ट्राध्यक्षांनी (महिन्दा राजपक्षे) आपल्या अधिकारात वाढ करायला सुरुवात करुन स्वतःचा भाऊ बासिल राजपक्षे ह्याला देशाच्या अर्थमंत्रीपदावर १० वर्षे ठेवले. घटने नुसार एक व्यक्ती फक्त २ सत्रांसाठी राष्ट्राध्यक्षपदावर राहू शकते पण राजपक्षे ह्यांनी स्वतःचा कार्यकाळ वाढवण्यासाठी एखादी व्यक्ती तीन सत्रं देशाचे राष्ट्राध्यक्षपद भूषवू शकते असा नियम मंजूर करुन घेतला. कोणत्याही क्षणी संसद बरखास्त करण्याचे अधिकारही स्वतःकडे घेतले. श्रीलंकेतील इलेक्शनच्यावेळीही त्यांनी अधिकारात वाढ करुन घेतली होती.

ह्या विधेयकाला मंजूरी मिळाल्यामुळे सिरिसेना ह्यांचा जनाधार वाढला आहे व राजपक्षे व त्यांच्या कंपूला चपराक बसल्याचे दिसते.

केश्विनी,

फ्रेंच सैनिकांनी जे केलंय ते भारतात ब्रिटीश सोल्जर्स सर्रास करायचे. सध्या हे प्रकार अनेक चर्चेसमध्ये बऱ्याच प्रमाणावर बोकाळले आहेत.

आ.न.,
-गा.पै.

'साऊथ चायना सी' मधील चीनच्या लष्करी आक्रमतेविरोधात इतर देशांची काय काय तयारी चालू आहे. ह्या क्षेत्रात अमेरिकेसोबत जपाननेही हवाई गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे असे अमेरिकेच्या भेटीवर असलेल्या जपानच्या पंतप्रधानांनी 'अमेरिकन काँग्रेस'ला अ‍ॅड्रेस करताना म्हटले. ह्या वादाचा वापर करुन जपान व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सबरोबर लष्करी सहकार्य वाढवत असल्याचा आरोप चीनने केला आहे.

ह्या हवाई गस्तीसाठी 'ईस्ट चायना सी'मधील जपानच्या ओकिनावा बेटावरील लढाऊ विमानांचा वापर केला जाईल. तर 'साऊथ चायना सी'मधील गस्तीसाठी फिलिपाईन्समधील लष्करी तळांचा वापर केला जाऊ शकतो.

अमेरिकेने फिलिपाईन्समध्ये ८ लष्करी तळ उभारण्याची घोषणा केली. अमेरिका/फिलिपाईन्सच्या लष्करामध्ये सर्वात मोठा युद्धसरावही सुरु झाला आहे.

ह्या आधी 'ईस्ट चायना सी'मधील सेंकाकू बेटांच्या अधिकारावरून चीन व जपानच्या युद्धनौका आणि विमाने आमनेसामने आले आहेत.

व्हिएतनामनेही पाणबुडीतून प्रक्षेपित होणार्‍या 'क्लब' क्षेपणास्त्रांची रशियाकडून खरेदी केली. पाणबुडीतून जमिनीवरचे लक्ष भेदण्याची क्षमता असलेली ही क्षेपणास्त्रे चीनच्या किनार्‍यापर्यंत पोहोचू शकतात.

संरक्षण विषयक अहवाल प्रसिद्ध करणार्‍या 'सिप्री' ह्या आंतरराष्ट्रिय संघटनेने व्हिएतनाम कसा शस्त्रसज्ज होतोय ह्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. व्हिएतनामने आधीच रशियन बनावटीच्या किलो श्रेणीतील पाणबुड्या खरेदी केल्या व ह्या पाणबुड्यांसाठी त्यांच्याकडूनच 'क्लब' खरेदी केली. त्यांना ह्या पाणबुडयांसाठी विनाशिकाभेदी टॉर्पेडो खरेदी करायचे होते.

Pages