आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोप फ्रान्सिस ह्यांचे पुतिन ह्यांना युक्रेनमध्ये शांततेसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

दोन दिवसांपुर्वी जगातील आघाडीच्या 'जी-७' गटाने युक्रेन मुद्द्यावरुन रशियन राष्ट्राध्यक्षांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. ह्यानंतर पुतिन ह्यांनी 'जी-६' गटातील इटलीचा दौरा करणे महत्वाचे ठरते. पुतिन ह्यंची ही भेट म्हणजे रशियाच्या विरोधात युरोपियन एकजुटीत असलेला कमकुवतपणा दर्शवणारी घटना असल्याचा दावा विश्लेषकांनी केला. बुधवारी मिलान येथे इटलीचे पंतप्रधान मॅटिओ रेन्झी ह्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पुतिन यांनी रोममध्ये पोप फ्रान्सिस ह्यांची भेट घेतली. व्हॅटिकनच्या प्रवक्त्यांनुसार ह्या चर्चेत युक्रेनमधील संघर्ष व आखाती देशांतील ख्रिश्चनांची स्थिती ह्या मुद्द्यांवर भर दिला गेला. शांततेच्या आवाहनाबरोबरच पोप फ्रान्सिस ह्यांनी युक्रेनमधील मानवतावादी संकटावर मात करण्याची गरज असू, संघर्ष सुरु असलेल्या भागांमध्ये मदत पोहोचण्याची आवश्यकता आहे व शांतता संघर्षावर मात करते असे म्हटले.

काही काळापुर्वी बोस्नियाच्या दौर्‍यात पोप फ्रान्सिस ह्यांनी जगभरात तिसर्‍या महायुद्धाचे वातावरण असल्याचे म्हटले होते. जगाच्या विविध भागांत असलेले संघर्ष, तुकड्या तुकड्यांमध्ये तिसरे महायुद्ध चालू असल्याचे दर्शवतात. काही व्यक्ती शस्त्रांचय व्यापारातून मिळणार्‍या फायद्यासाठी व स्वतःच्या राजकिय उद्दिष्टांसाठी संघर्ष मुद्दाम निर्माण करत आहेत असेही त्यांनी आपल्या इशार्‍यात म्हटले.

युद्ध म्हणजे निर्वासितांच्या छावण्यांमधील लहान मुले, महिला व वयोवृद्ध.... युद्ध म्हणजे जबरदस्तीने होणारे विस्थापन, उध्वस्त घरे, रस्ते, कारखाने आणि असंख्या आयुष्यांचा चुराडा अश्या शब्दांत पोप फ्रान्सिस ह्यांनी युद्धाची भयावहता स्पष्ट केली.

बोस्नियाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर 'आयएस' ने एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन त्यात बाल्कन देशांतील इस्लाम धर्मिय लोकांनी जिहाद स्वीकारावा असे आवाहन केले होते.

ketumi, त्या विकीच्या लिंकमध्ये नक्की काय आहे ते तिथे थोडक्यात लिहाल का? Happy विकीशिवाय अजून लिंक आहे का त्याबद्दल?

केश्विनी,

विकिवरून हा रोचक दुवा मिळाला : http://in.rbth.com/blogs/2013/12/04/how_indias_cryogenic_programme_was_w...

नंबीनारायण यांना खोट्या प्रकरणात अडकवणारे आजूनही मोकळेच फिरताहेत. मधल्या मध्ये नंबीनारायण यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंच शिवाय भारताचा अतिशीत बाणयंत्राचा (क्रायोजेनिक रॉकेट इंजिन) कार्यक्रम रखडला. Angry

आ.न.,
-गा.पै.

विकिदुवा वाचून माझ्या संशयाला अजून बळकटीच आली Sad

भारताचा क्रायोजेनिक इंजिनाचा प्रोजेच्क्ट पुर्ण न झाल्यास कुणाचा तरी अर्थिक फायदा दिसतो आहे.

जेथे आर्थिक फायदा तेथे (फक्त) आम्ही असे धोरण आहे. आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवणारे देश आहेत हे...

चीनने 'सुपरसॉनिक न्युक्लिअर डिलिव्हरी वेहिकल'ची चाचणी केली. पिपल्स लिबरेशन आर्मीची ही गेल्या १८ महिन्यांतील चौथी चाचणी आहे.

http://m.thehindubusinessline.com/news/international/china-confirms-test...

चीन आणि युरोपला जोडणारी 'ट्रान्स युरोप' मालवाहू रेल्वे शनिवारपासून सुरु झाली. चीन (हार्बिन) व युरोपला जोडणार्‍या ह्या रेल्वेला ४९ डबे आहेत व १०००० किमी चा हा प्रवास रशिया व पोलंडमधून होईल. ही सेवा आठवड्यातून एक दिवस असेल. चीन, द. कोरिया व जपान ह्यांच्या मालाची युरोपिय देशांमध्ये वाहतूक ह्या मार्गाने होईल.

भारत व ३ सार्क देशांत (बांगलादेश, नेपाळ आणि भूतान) ह्यांच्यात वाहतूक करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. भूतानची राजधानी थिम्पू येथे काल 'बांगलादेश-भूतान-इंडिया-नेपाल मोटर व्हेईकल्स अ‍ॅग्रीमंट' झाले. पुढील सहा महिन्यात चारही देश कार्यवाहीसाठी विशेष योजना करतील व त्यानुसार द्विपक्षीय वा त्रिपक्षीय स्वतंत्र करार करण्यात येतील. ह्या करारामुळे ह्या सर्व देशांमधील नोंदणीकृत वाहने मुक्तपणे एकमेकांच्या भागात सहजपणे फिरु शकतील अशी ग्वाही भारताने दिली. सार्क देशांना वाहतुकीद्वारे जोडल्याने व्यापार तसेच इतर संबंध व्यापक बनतील. ह्यापाठोपाठ म्यानमार व थायलंड ह्या देशांबरोबरही अश्याच स्वरुपाचा करार करण्यात येणार आहे.

हा प्रस्ताव सार्कमध्ये सादर करण्यात येणार होता. परंतु पाकिस्तानने विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव प्रत्येक देशाबरोबर द्विपक्षीय पातळीवर मांडण्याची तयारी केली गेली आहे. इतर देशांकडून ह्या प्रयत्नांना मिळणारा प्रतिसाद ह्या वाहन कायद्याद्वारे स्पष्ट होत असून पकिस्तान एकाकी पडेल.

ग्रीस व युरोपिय महासंघादरम्यान चर्चा फिस्कटल्याने आणीबाणी घोषित करण्यासाठी सज्ज रहा असा इशारा जर्मनीने दिला आहे.

शनिवारी ग्रीसचे उपपंतप्रधान यॅनिस ड्रॅगासॅकिस ह्यांनी युरोपिय कमिशनला नवा सुधारणांचा प्रस्ताव दिला होता. रविवारी फक्त ४५ मिनिटांच्या बैठकीनंतर महासंघाच्या अधिकार्‍यांनी ग्रीसचा प्रस्ताव फेटाळून चर्चा फिस्कटल्याचे जाहीर केले.

ग्रीसच्या मुद्द्यावर आता २५ जूनला युरोझोनची अंतिम बैठक होणार आहे. जर्मनीतील युरोपिय महासंघाचे आयुक्त गुंथर ऑटिंगर यांनी, १ जुलैला ग्रीसमध्ये आणीबाणी जाहिर करण्यासाठी योजना तयार करा असा गंभीर इशारा दिला आहे.

इराणमध्ये सर्वोच्च राजकीय अधिकार असलेले धर्मगुरु आयातुल्लाह खामेनी ह्यांना कॅन्सरचे निदान झाल्याने इराणमध्ये राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. इराणअंतर्गत सत्ता संघर्ष पेटल्याने इराण व अमेरिकेदरम्यान होणार्‍या अणुकरारावर परिणाम होवू शकतो. ८४ वर्षांचे अयातुल्लाह मोहम्मद याझदी, ५४ वर्षांचे सादेक लारिजानी हे सर्वोच्च धर्मगुरुच्या स्पर्धेत आहेत. ह्या दोघांचाही इराणच्या लष्करावर प्रभाव आहे असे पाश्चात्य विश्लेषकांचे म्हणणे आहे. खामेनींप्रमाणेच लारिजाने हे देखिल अमेरिकेबरोबरच्या वाटाघाटींच्या विरोधात आहेत.

७५ वर्षांच्या खामेनींचा कॅन्सर लास्ट स्टेजचा असून त्यांच्या आयुष्याचे काहीच महिने शिल्लक असल्याचे ब्रिटनच्या 'द टेलिग्राफ' ह्या दैनिकाने म्हटले आहे.

सद्दाम हुसेन यांच्यावेळचे परराष्ट्रमंत्री तारिक अझीझ यांचे नुकतेच निधन झाले. ते सद्दाम यांच्या मंत्रीमंडळातील एकमेव ख्रिश्चन सदस्य होते. त्यांचे इंग्रजी भाषेवर विशेष प्रभुत्व होते. ते सद्दाम यांची बाजू अतिशय प्रभावीपणे सादर करीत.

अधिक माहिती : http://www.bbc.co.uk/news/world-middle-east-33021771

-गा.पै.

तळटीप : कुठल्याही मराठी वृत्तपत्रात ही बातमी आली नाही. आश्चर्य आहे!

सिरिया व तुर्की सीमेवरील 'ताल अबयाद' ह्या शहरातून आयएसच्या दहशतवाद्यांना पिटाळून कुर्द बंडखोरांनी ह्या शहराचा ताबा घेतला. पण ह्या संघर्षात भयभीत झालेल्या २३००० सिरियन नागरिकांनी सीमेवरील सुरक्षा कुंपण मोडून तुर्कीमध्ये धाव घेतली. त्यामुळे तुर्कीतील विस्थापितांच्या कँपवरील ताण वाढणार आहे.

कुर्दांच्या ह्या लष्करी कारवाईला अमेरिका व मित्र देशांच्या लढाऊ विमानांनी साथ दिली.

सिरियातील 'आयएस' वर विजय मिळवायचा असेल तर अस्साद ह्यांना सत्तेवरुन खाली खेचा अशी सूचना अमेरिकेतील विश्लेषक करत आहेत.

जगभर इतके लोक अश्या युद्धांमुळे विस्थापित होत आहेत. बायका मुलाबाळांचीही त्यासोबत फरफट होत आहे. त्या मुलांच्या शिक्षणाचं काय? पुढली पिढी कशी निपजणार? ते कधी स्थिरस्थावर होणार की नाही? की असेच कायम भितीच्या सावटाखाली जगण्यासाठी संघर्ष करत राहणार? की युद्धाचं वातावरण हेच त्यांच्यासाठी नॉर्मल असेल?

http://ngm.nationalgeographic.com/2015/03/syrian-refugees/stanmeyer-phot...

http://ngm.nationalgeographic.com/2015/03/syrian-refugees/stanmeyer-phot...

http://ngm.nationalgeographic.com/2015/03/syrian-refugees/stanmeyer-phot...

अश्विनी व इतर .. हे नॅशनल जिऑग्रॉफी मधे आलेले सिरीयन रेफ्युजींचे फोटो जरुर बघा. अतिशय ह्रुदयद्रावक व काळीज पिळवटुन टाकणारे हे फोटो आहेत.. खासकरुन आइवडिलांपासुन ताटातुट झालेल्या मुलांचे दिनवाणे व हतबल चेहरे बघुन माणुसकीवरचा विश्वासच उडुन जातो.:(

कंटेनर घरं, त्यासमोर सायकल चालवणारा मुलगा/दारात वडिलांनी अडकवून दिलेल्या झुल्यात झोके घेणारी मुलगी, तंबूच्या घराबाहेर व तंबूच्या डोक्यावर मेहनतीने उगवलेले ओअ‍ॅसिस, दारावर तुर्कीचा झेंडा लावून तुर्कीप्रती कृतज्ञता दर्शवणारा सिरियन विस्थापिताचा निवारा, २०' कंटेनरचं परिपूर्ण नीटनेटकं घर, एका बेकरीसमोर कुपन्स व फ्री ब्रेडसाठी जमा झालेली बायकामुलं, तंबूतली शाळा, कुटुंबाच्या चरितार्थाला हातभार लावण्यासाठी केमिकल्सच्या संपर्कात काम करावं लागणारी छोटी मुलं, मायदेशी परतीची खात्री नसल्याने उघड्या माळरानावर अनिश्चित काळापर्यंत थाटलेले तंबूतले, कनातींतले संसार, घरदार सोडून सुरक्षित राहण्यासाठी सीमेवरील तारेच्या कुंपणापर्यंत जावे लागलेले असहाय्य नागरिक, एकदा कुंपण तोडल्यावर परराष्ट्रात फक्त कपडे घेवून रातोरात निघून जाणारे लोक....... जगातल्या प्रत्येक खंडात हे चालू असेल.....

"आ अब लौट चले
नैन बिछाये, बाहें पसारे, तुझको पुकारे देश तेरा"

असं कधी होईल ह्या लोकांच्या बाबतीत?

यूएस काउंटर टेररीझम ऑफिशिअल्सच्या मते नायजेरियात 'बोको हराम' नायजेरियन, चाड, नायजर लष्कराला डोईजड ठरतेय. तुरळक भागातील कब्जा लष्कराने परत मिळवला असला तरी अजून बर्याच भूभागावर बोको हरामचा कब्जा आहे.

फ्रान्सकडून ट्रेनिंग मिळालेले चाड देशाचे सैनिक खूप शूर आहेत पण बराच काळ चालणारा संघर्ष हाताळायची त्यांची क्षमता नाही. कॅमेरून, नायजेरिया, नायजर, चाड फोर्सेसना अमेरिकेचे जरी सहाय्य असले तरी दहशतवादी आणि लष्करात कंट्रोलचा सी सॉ दिसून येतो आहे.

http://www.nbcnews.com/news/world/boko-haram-winning-n376786

इटालियन फ्रेन्च सीमेवरील विस्थापितांच्या प्रश्नावर बोलताना पोप फ्रान्सिस ह्यांनी खरोखर अडचणीत असलेल्या विस्थापितांना हाकलून लावू नका/त्यांच्यासाठी तुमचे दरवाजे बंद करू नका असे आवाहन केले आहे.

ते म्हणाले की हे आपलेच बंधू भगिनी त्यांच्या देशापासून खूप दूर आसरा मागण्यासाठी आले आहेत. त्यांना भयमुक्त जीवन जगायचं आहे. विस्थापित असले तरी त्यांचा माणूस म्हणून आदर राखला गेला पाहिजे.

त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला असेही आवाहन केले की सर्वांनी एकत्र येवून ह्या सक्तीच्या विस्थापनामागचे मूळ कारण नष्ट करण्याचे प्रयास करावेत.

http://m.hindustantimes.com/world-news/pope-criticises-nations-that-clos...
--------------------
हल्ली पोप फ्रान्सिस आंतरराष्ट्रिय पेच प्रसंगात मानवतावादी दृष्टीकोनातून लक्ष घालताना वाचण्यात आलं. ज्यांच्या म्हणण्याचा मोठा समुदाय सिरियसली विचार करेल अश्या धार्मिक उच्च अधिकार असलेल्या व्यक्तींनी, धर्मगुरूंनी त्यांच्या लोकांच्या मनातील स्थानाचा जागतिक शांततेसाठी पुरेपूर वापर करण्याची खरोखर गरज आहे. निदान जी युद्धं धर्म, वंशाच्या नावावर लढली जात आहेत ती तरी उतरणीला लागोत. खरं कुठला धर्म आज इतका खतरेमें आहे का की त्याच्या रक्षणार्थ दुसर्या धर्माच्या लोकांना मारावेच लागेल? शांती, सत्य, प्रेम, आनंद म्हणजेच खराखुरा धर्म हे त्यांना कधी कळेल? लोकाना दहशत बसवून पळवून लावणारा मोठा की सर्वांना प्रेमाने सामावून घेणारा मोठा? लोकांच्या तोंडचे घास हिरावून त्यांना लुटून बलशाली बनलेला समुह मोठा की सहिष्णू म्हणून हिणवला जावूनही वेळ पडल्यास स्वत:चा घास भुकेल्याला वाटून देवून त्याला धीर देणारा, त्याच्या पंखात बळ येईपर्यंत आपल्या पंखाखाली घेणारा मोठा?

केश्विनी,

>> जगभर इतके लोक अश्या युद्धांमुळे विस्थापित होत आहेत. बायका मुलाबाळांचीही त्यासोबत फरफट होत आहे. त्या
>> मुलांच्या शिक्षणाचं काय? पुढली पिढी कशी निपजणार? ते कधी स्थिरस्थावर होणार की नाही? की असेच कायम
>> भितीच्या सावटाखाली जगण्यासाठी संघर्ष करत राहणार? की युद्धाचं वातावरण हेच त्यांच्यासाठी नॉर्मल असेल?

या मुलांना रूढ अर्थाने शिक्षण मिळत नाही. केवळ किंवा बापाचा धंदा पुढे चालवणं वा वाटमारी करणं हा एकमेव पर्याय उरतो. २००३ मध्ये इराकात युद्ध सुरू झाल्यावर तेव्हा ५ वर्षाच्या असलेल्या मुलांची शाळा बंद झाली. ती आता १६/१७ वर्षांची झाली आहेत. म्हणजे भारतातल्या दहावी पास या वयाची आहेत. त्यांच्या अंगी जेमतेम कौशल्ये आहेत. गिळायला पैसा हवा आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे हाती हत्यार घेणे. १९९१ पूर्वी सद्दामच्या राज्यात इराक शैक्षणिक क्षेत्रात बराच आघाडीवर होता (संदर्भ : विकीवरील पाहिलं वाक्य https://en.wikipedia.org/?title=Education_in_Iraq).

हे सारं जर जीव जाग्यावर राहिला तरंच बरंका! तो बालमजुरी, बालबलात्कार, उपासमार, रोग, विकार, दैन्य, युद्ध, अपघात, आंतरराष्ट्रीय निर्बंध कशामुळेही जाऊ शकतो.

Sad

आ.न.,
-गा.पै.

गापै, जगभरातच युद्धबंदी केली पाहिजे. ज्याने त्याने जिथे कुठे असाल तिथे सुखाने राहा. दुसर्याचे हक्क हिसकावून घ्यायला बघू नका, बस्स. विस्थापितांचा विषय निघाला की काश्मिर खोरे सोडावे लागलेल्या काश्मिरी पंडिताची आठवण होतेच.
--------
ॲंजेलिना जोली (The Hollywood star and special envoy of the UN refugee agency) हिनेही सिरियन विस्थापितांसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला व जागतिक नेत्यांना आवाहन केले आहे.

http://m.hindustantimes.com/world-news/angelina-jolie-calls-for-help-for...

केश्विनी, युद्ध संपणं शक्य नाही. पण नागरिकांना वेठीस धरणं संपलं पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.

१५० हून अधिक देशांप्रमाणेच स्वित्झर्लंडमध्येही योग दिवस अतिशय उत्साहात साजरा झाला. मी गेलो त्या कार्यक्रमात दोन स्विस योगशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विविध देशांच्या आणि धर्माच्या स्त्रीपुरुषांनी तासभर योगासने केली.

योग ही हिन्दू संस्कृतीची जगाला देणगी आहे असे नि:संदिग्धपणे सांगण्यात या शिक्षकांना कुठला संकोच वाटला नाही. आणि ओंकार वा शांतीमंत्र म्हणण्यात उपस्थितांना कुठली अडचण वाटली नाही.

इकडे समाजवादी अजून पोहोचले नसावेत, त्यामुळे मूळ कार्यक्रम बाजूला राहून वाद, विघ्ने आणि तंटे हेही झाले नाही. पण संघ / मोदी विद्वेषाने खदखदणार्‍या, हिंदू या शब्दाच्या नुसत्या उल्लेखानेच अंगाचा भडका उडणार्‍या काही मंडळींनी भारतात सोशल मिडियात जो काही थयाथयाट केला आहे त्याने मनोरंजन तर झाले आहेच पण त्यांचेच पितळही उघडे पडले आहे.

मोदी भारतासाठी अनेक चांगल्या गोष्टी करत आहेत, देशाचे चित्र बदलण्याचा सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत आहेत यात मला तरी शंका नाही. अर्थात सगळीच पावले योग्य दिशेने असतील, वा यशस्वी होतील असेही नाही. पण आंधळ्या नमोद्वेषींनी आणि नमोभक्तांनी सोशल मिडियावर जो हैदोस घातला आहे त्याकडे दुर्लक्ष करून पंतप्रधानांच्या नवा भारत घडवण्याच्या प्रयत्नांना सर्व सुजाण भारतीयांनी ते जगात कुठेही असले तरी हातभर लावला पाहिजे असे मला वाटते. योग दिवस ही अशीच एक गोष्ट आहे.

As we all witnessed today, International Day of Yoga is indeed a great idea, not just for spreading the awareness about Yoga, but also for asserting/boosting the "soft power" of India. Kudos to Modi for making it happen

सौदीसह इतर आखाती देश अमेरिका व इराण ह्यांच्यातील आण्विक चर्चेवर तीव्र नाराजी व्यक्त करत असताना रशियाने ह्या देशांसमोर सहकार्याचा हात पुढे केला आहे व ह्या असंतोषाचा लाभ उचलण्याची संधी साधली आहे. सौदी अरेबियाने रशियाबरोबर कोट्यवधी डॉलर्सचा अणुउर्जा करार केल्यावर सौदी अरेबियाने रशियाकडून शस्त्रास्त्रांची खरेदी केल्याचे जाहिर केले. तसे करण्यापासून कोणताही देश सौदीला अडवू शकत नाही असेही बजावले.

सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान ह्यांनी गेल्या आठवड्यात रशियाचा दौरा करुन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन ह्यांची भेट घेतली. ह्या भेटीत आर्थिक व व्यापारी सहकार्य वाढवण्यासंबंधी नऊ करार करण्यात आले.

इंधना व्यतिरिक्त पर्यायी ऊर्जास्त्रोताच्या वापरासाठी सौदी खूप वर्षं प्रयत्न करत आहे. रशियाकडून आवश्यक असलेले अणुऊर्जा निर्मिती सहाय्य मिळाल्यास सौदीच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण होतील असा विश्वास सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला.

गेल्या महिन्यात ओबामांनी इराणसोबतच्या चर्चेमुळे अस्वस्थ झालेल्या आखाती देशांची समजूत काढण्यासाठी व्हाईट हाऊस व कँप डेव्हिड येथे विशेष बैठक आयोजित केली होती. पण ह्या बैठकीसाठी आखाती राष्ट्रप्रमुखांनी आपल्या प्रतिनिधींना पाठवून नाराजी दर्शवली होती.
----------------

समिकरणं किती बदलत असतात !!!

इकडे येमेनमध्ये सौदी व रशिया एकमेकांविरोधी पक्षात आहेत आणि आता इराणवरुन नाराज होवून सौदी रशियाचीच मदत घेतोय. येमेनमधला इंटरेस्ट कमी झाला काय? येमेनच्या बाबतीत आता ह्या दोन राष्ट्रांची काय धोरणं असतील कुणास ठाऊक...

अमेरिका इराण अणुकराराला थोडेच दिवस उरले असताना इराणच्या संसदेने लष्करी ठिकाणांचे सर्व्हे व सायंटिस्ट्सच्या चौकशीवर बंदी घातली आहे. ही बंदी म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचे उल्लंघन ठरू शकते. इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी अजूनही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग समाधानी नाही. इराणने आपल्या वादग्रस्त अणुप्रकल्प व लष्करी ठिकाणांच्या सर्वेक्षणासाठी परवानगी द्यावी अशी सूचना आयोगाने केली होती. परंतु, पाश्चिमात्य देशांनी इराणवर लादलेले निर्बंध मागे घेतल्यासच आपल्या देशाच्या लष्करी ठिकाणांच्या सर्वेक्षणाची परवानगी मिळेल असे इराणी संसदेने ठरावात म्हटले आहे.

३० जूनला इराणला आपले अणुप्रकल्प व लष्करी ठिकाणे सर्वेक्षणासाठी उपलब्ध करुन द्यायची होती. पण संसदेने हा निर्णय घेतल्यावर फ्रान्सने ह्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. अमेरिकेने ह्याबाबतीत सौम्य भूमिका घेतली असली तरी इतर देश ही सवलत देणे कठिण आहे.

गापै, तुमची विपु बंद दिसली म्हणून इथेच विचारतेय. तुम्ही एखाद्या प्रतिसादाची लिंक कशी देता?

मला तर कंटाळाच आला ट्राय करायचा..
निवडक १० मध्ये टाकून ठेवलय फक्त..
गा पै कस एवढ्या लिंका देतात देव जाणे ..

केश्विनी आणि प्रकु,

मी एक स्क्रिप्ट लिहिलंय. ते इन्स्टॉल केलं तर अनुबंध (लिंक) थेट मिळते. हे स्क्रिप्ट सध्या फायरफॉक्स आणि क्रोम वर चालतंय. लवकरच इथे टाकेन : http://www.maayboli.com/node/7676

आ.न.,
-गा.पै.

Pages