आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.
कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.
कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.
वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.
धन्यवाद.
================================================
NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP
China’s maritime claims are
China’s maritime claims are so sweeping—almost the entire South China Sea and all its features—the fear in Southeast Asia is that China is temporarily suppressing an urge for all-out control of its “lake” and its passageways.
http://www.wsj.com/articles/beijing-hint-no-more-mr-nice-guy-in-south-ch...
अमेरिकी नागरिकांवर टेहळणी
अमेरिकी नागरिकांवर टेहळणी करणारा वादग्रस्त 'पॅट्रियट अॅक्ट' रद्द होऊन त्याजागी ओबामांनी 'यूएसए फ्रीडम अॅक्ट' वर स्वाक्षरी केली. ह्या कायद्या नुसार ह्यापुढे अमेरिकेच्या 'नॅशनल सिक्युरिटी एजन्सी'ला देशातील नागरिकांच्या फोन अथवा इंटरनेट व्यवहारांची माहिती सरसकट उपलब्ध होणार नाही. आणि तसे करायचे झाल्यास न्यायालयाकडून निर्देश मिळवणे आवश्यक आहे. त्याच वेळी परदेशातील नागरिकांची माहिती मिळवण्यावर निर्बंध नाहीत. अमेरिकेतील ९/११ दहशतवादी हल्ल्यानंतर यूएस पॅट्रियट अॅक्ट अस्तित्वात आला होता.
'लोन वुल्फ' प्रकारातील दहशतवाद्यांच्या हालचालींवर व व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. जुना कायदा रद्द करुन नविन कायद्यानुसार अंमलबजावणी सुरु होईपर्यंत सहा महिन्यांचा कालावधी 'ट्रान्झिशन पिरिअर' म्हणून निश्चित करण्यात आला आहे.
रिपब्लिकन पक्षाने नव्या कायद्यावर टिका करताना म्हटले आहे की त्यामुळे अमेरिकेची राष्ट्रिय सुरक्षा कमकुवत झाली आहे.
वर उत्तर कोरियाची सायबर आर्मी
वर उत्तर कोरियाची सायबर आर्मी बद्दलची एक बातमी आहे त्यात ते हॅकर्स नरसंहार करू शकतात अस म्हणलंय
हॅकर्स नरसंहार कसे करू शकतात ते माझ्या लक्षात नाही आल..
ते क्षेपणास्त्रे वगेरे हॅक करतात का .?
प्रकु, संगणक प्रणालीद्वारे
प्रकु, संगणक प्रणालीद्वारे कार्यान्वित होत असलेल्या प्रकल्पांमध्ये डिझास्टर्स घडवून आणू शकत असतील. इराणच्या अणुप्रकल्पावरही हॅकर्सचा हल्ला झाला होता.
हम्म ओके ओके .. धन्स!
हम्म ओके ओके .. धन्स!
सिरियन राष्ट्राध्यक्ष अस्साद
सिरियन राष्ट्राध्यक्ष अस्साद ह्यांच्या संकटात सापडलेल्या राजवटीला वाचवण्यासाठी इराक व अफगाणिस्तानसह इराणचे १५००० जवान सिरियात दाखल होत आहेत. दहशतवादी आणि बंडखोरांच्या कारवायांना चार वर्षांपासून सिरियन लष्कराने थोपवून ठेवले होते. ह्यात लेबेनॉनमधील हिजबुल्लाह ह्या दहशतवादी संघटनेचे समर्थकही सहभागी झाले होते. पण गेल्या महिन्यात त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. सिरियाचा अर्धा भाग आपल्या ताब्यात आल्याचे 'आयएस'ने जाहिर केले होते. ७००० इराणी सिरियाच्या पश्चिमेकडील लताकिया बंदरात दाखल झाले आहेत व उर्वरित काही दिवसांत दाखल होतील.
दहशतवाद्यांच्या ताब्यात गेलेली राजधानी दमास्कस सुरक्षित करुन 'जिस्र अल-शुघूर' आणि 'हमा' ह्या दोन महत्वाच्या भागांचे नियंत्रण मिळवण्यासाठी इराणचे बंडखोर प्रयत्न करतील.
दरम्यान, सिरियन लष्कराने इदलिब येथील 'आयएस' विरोधी संघर्षात केमिकल वेपन्स वापरल्याचा आरोप मानवाधिकार संघटनेने केला आहे. त्यात सिरियन नागरिकांनाही बाधा झाली होती.
अमेरिका-इराणची जुंपावी म्हणून
अमेरिका-इराणची जुंपावी म्हणून इस्रायल अमेरिकेत हल्ला घडवेल? अमेरिकेत खोटा हल्ला घडवून त्याचे खापर इराणवर फोडण्याची योजना इस्रायलने आखली आहे व असेल झाले तर अमेरिका इराणवर हल्ला चढवेल आणि इस्रायलचे काम सोपे होईल असा दावा इराणच्या 'प्रेस टिव्ही' ह्या वृत्तवाहिनीने केला आहे. अमेरिकन सिनेटचे माजी सदस्य मार्क डॅन्कॉफ ह्यांनी माहिती दिल्याचे त्या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
क्षमस्व धागा पुर्ण वाचला.
क्षमस्व
धागा पुर्ण वाचला. येथील 80% बातम्या हे proxy war मधील आहे ज्या धागाकर्त्यांनी नजरचुकीने खरे मानून दिल्या आहेत
म्हणजे? जे वाचायला मिळतं
म्हणजे?
जे वाचायला मिळतं जगाला तेच लिहिलं आहे 
चीन जहाज दुर्घटनेतील मृतांची
चीन जहाज दुर्घटनेतील मृतांची संख्या ३३१ झाली असून अजून १०० बेपत्ता आहेत.
http://mobile.reuters.com/article/idUSKBN0OM00L20150606?irpc=932
ह्या कायद्या नुसार ह्यापुढे
ह्या कायद्या नुसार ह्यापुढे अमेरिकेच्या 'नॅशनल सिक्युरिटी एजन्सी'ला देशातील नागरिकांच्या फोन अथवा इंटरनेट व्यवहारांची माहिती सरसकट उपलब्ध होणार नाही. आणि तसे करायचे झाल्यास न्यायालयाकडून निर्देश मिळवणे आवश्यक आहे. त्याच वेळी परदेशातील नागरिकांची माहिती मिळवण्यावर निर्बंध नाहीत.
हा प्रकार थोडा विस्ताराने चर्चा व्हावा असा आहे. यातला त्याच वेळी परदेशातील नागरिकांची माहिती मिळवण्यावर निर्बंध नाहीत. हा भाग महत्त्वाचा आहे.
याचे कारण म्हणजे जगातील पाच देशात FVEY असा एक करार अस्तित्त्वात आहे. याला फाइव्ह आईज असेही म्हणतात.
या कराराअंतर्गत अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड आणि कॅनडा हे देश आहेत.
FVEY या करारा अंतर्गत या देशांना एकमेकांच्या नागरिकांवर पाळत ठेवायला मुभा आहे.
मग पॅट्रियट अॅक्ट ला तसा काही अर्थ नव्हताच. कारण अमेरिकन हेरखात्याला माहिती हवी असेल तर ती FVEY या करारा अंतर्गत, ब्रिटन किंवा इतर देश देतात आणि हेच उलटही चालते. पॅट्रियट अॅक्ट नुसार हेच सरळ अमेरिकेला अमेरिकेतच करता येणार होते. आजही आपले सर्व संवाद या यंत्रणेमार्फत चाळले जात आहेतच...
FVEY या कराराची अधिक माहिती येथे http://en.wikipedia.org/wiki/Five_Eyes
या करारानुसार पाळत ठेवायला ECHELON नावाची एक मोठी सॉफ्ट्वेयर यंत्रणा काम करते. या भल्या मोठ्या हेर यंत्रणेचे एक स्टेशन दिल्ली मध्ये ही गुप्ततेने चालवले जाते असे विकिलिक्स च्या कागदपत्रात आढळले आहे!
या ECHELONचा उपयोग जसा नागरिकांवर शासकिय हेरगिरीसाठी होतो तसा व्यावसायिक भामटेगिरीसाठीही केला जातो.
उदाहरणार्थ फ्रान्स या FVEY या करारात नाही. एरबस ही फ्रेन्च कंपनी आहे. या कंपनी ने १९९४ मध्ये सौदी ला सुमारे ६ बिलियन डॉलर्सच्या विमान विक्रीचा घाट घातला होता. हे डिल होते आहे या सुगावा या ECHELON नावाच्या यंत्रणे मार्फत अमेरिकेला लागला. मग पद्धतशीररित्या एरबस ने लाचखोरी केली असे सिद्ध करून हे उधळले गेले.
अर्थातच, पुढे हे कंत्राट मॅक्डोनेल डग्लस या अमेरिकन कंपनीला मिळाले.
असे अनेक प्रकार झाले आहेत ज्याचा फायदा या पाच देशांना(च) होतो.
या प्रकारावरून मला संशय आहे की तेजस या भारतीय लढाउ विमानाचे कामही असेच होउ दिले जात नसावे. अन्यथा भारतीय तंत्रज्ञांना ३० वर्षात जेट इंजिन बनवता येत नाही हे अशक्य वाटते. शेवटी भारताने जी इ चे अमेरिकन इंजिन या विमानाला बसवले आहे!
(हा प्रतिसाद बहुदा धाग्याच्या विषयाला धरून आहे असा माझा समज आहे तसे नसल्यास क्षमस्व!)
निनाद, अगदी माहितीपुर्ण आणि
निनाद, अगदी माहितीपुर्ण आणि विषयाला धरूनच तुमचा प्रतिसाद आहे. धन्यवाद.
निनाद, तुमचा वरील प्रतिसाद
निनाद,
तुमचा वरील प्रतिसाद उत्कृष्ट आहे. धन्यवाद!
दिल्लीप्रमाणे चीनमध्ये शांघाय इथेही असेच एक केंद्र आहे असं म्हणतात.
आ.न.,
-गा.पै.
'साउथ चायना सी' वादात
'साउथ चायना सी' वादात अमेरिकेने हस्तक्षेप केल्यास 'तिसरे महायुद्ध' भडकेल असा इशारा चीनच्या लष्कराने 'श्वेतपत्रिके'द्वारे दिला. लष्कराला बचावात्मक धोरण सोडून तिसर्या महायुद्धाची तयारी म्हणून आक्रमक धोरण स्वीकारण्याचे आदेश दिले गेले आहेत. चीनच्या लष्कराशी संबंधीत वरिष्ठ अधिकारी अमेरिकेच्या दौर्यावर रवाना झाले आहेत.
स्प्रार्टली बेटांच्या हद्दीत चीनने एकूण आठ कृत्रिम बेटांची निर्मिती सुरु केली आहे. फिलिपाईन्सच्या लष्कराने उपग्रहीय छायाचित्रांच्या सहाय्याने हे पाहिल्यावर फिलिपाईन्सने विरोध व्यक्त केला. नंतर चीनच्या नौदलाने फिलिपाईन्सच्या विनाशिकांना दटावले होते. फिलिपाईन्स, व्हिएतनाम व मलेशियाने उघडपणे चीनच्या विरोधात भूमिका स्वीकारली होती. अमेरिकेनेही चीनला माघार घ्यायची सूचना केली होती व दक्षिण कोरियाच्या नौदलाबरोबर पाणबुडीभेदी युद्धसराव सुरु करून अमेरिकेने चीनला इशाराही दिला होता. आग्नेय आशियाई देशांच्या सुरक्षेसाठी साऊथ चायना सीमध्ये सागरी तसेच हवाई गस्त सुद्धा सुरु केली होती. चीनच्या युद्धनौकेने हवाई गस्त घालणार्या अमेरिकेच्या विमानाला आडकाठी केली होती. आता 'तिसर्या महायुद्धा'च्या उल्लेखाने तणाव वाढला आहे.
तिसरे महायुद्ध ! निनाद यांची
तिसरे महायुद्ध !
निनाद यांची पोस्ट उत्तम आहे..
या भल्या मोठ्या हेर यंत्रणेचे एक स्टेशन दिल्ली मध्ये ही गुप्ततेने चालवले जाते असे विकिलिक्स च्या कागदपत्रात आढळले आहे! >>> हे आपल्या सरकारच्या परवानगी शिवाय असते कि सरकारला सगळे माहित आहे .?
त्या करारात नसलेले देश अशा प्रकारचे केंद्र चालवण्यास परवानगी का देतील .?
निनाद, तुमच्या प्रतिसादातील
निनाद, तुमच्या प्रतिसादातील पहिला भाग आवडला. माहितीबद्दल धन्यवाद. परंतु
>>या प्रकारावरून मला संशय आहे की तेजस या भारतीय लढाउ विमानाचे कामही असेच होउ दिले जात नसावे. अन्यथा भारतीय तंत्रज्ञांना ३० वर्षात जेट इंजिन बनवता येत नाही हे अशक्य वाटते. शेवटी भारताने जी इ चे अमेरिकन इंजिन या विमानाला बसवले आहे!>> हे शक्य नाही.
भारताने तेजस साठी स्वतःचे कावेरी हे इंजिन तयार केले होते पण ते अपेक्षित उंचीवर विमानास हवा तेवढा थ्रस्ट (मराठी प्रतिशब्द माहिती नाही) देऊ शकत नाही म्हणून वापरता येत नाही. रशिया मधील केंद्रात त्या चाचण्या झाल्या व बर्याच प्रयत्नांनंतरही अपेक्षित कामगिरी होत नसल्याने भारत सरकारने कावेरी प्रोजेक्ट बंद केला. ह्याचा अर्थ असा नाही कि तयार केलेले एंजिन कशालाच वापरता येणार नाही. त्यासाठी दुसरे काही उपयोग बघितले जातीलच. उदाहरणाअर्थ, तेजस च्या शिकावू (ट्रेनर) आवृत्ती मधे ते वापरले जाऊ शकेल. आणि ह्याचा अर्थ असाही नाही कि आपण दुसरे इंजिन तयारच करणार नाही. प्रत्येक प्रोजेक्टचे एक ध्येय असते व ते गाठण्यासाठी काही अॅसम्पशन्स आधीच निश्चित केलेली असतात. पूर्ण प्रोजेक्ट थांबविला गेला म्हणजे ठरविलेल्या अॅसम्पशन्स व डिझाईन हवी ती कामगिरी करू शकत नाहीत. कावेरी प्रोजेक्ट ची अॅसम्पशन्स बदलून किंवा प्रोजेक्ट स्पेसिफिकेशन्स बदलून नवीन इंजिन तयार करण्याचे प्रयत्न सुरु झालेही असतील.
आता कावेरी ने कधी चांगली कामगिरी करूच नये ह्यासाठी भारतीय तंत्रज्ञांना परकिय कंपन्यांनी फितविले असेल अशी एक शक्यता उरतेच पण मला ती ही शक्यता खूपच कमी वाटते.
अश्चिनी के, अवांतराबद्दल क्षमस्व.
चौकट राजा, त्या बातमीच्या
चौकट राजा, त्या बातमीच्या अनुषंगानेच आलेले प्रतिसाद आहेत तुम्हा दोघांचे. उलट, अश्या चर्चेतून माहिती मिळतेय
गेली कित्येक वर्षे स्वतःचा
गेली कित्येक वर्षे स्वतःचा अणूकार्यक्रम गुप्त ठेवणार्या इस्रायलने अण्वस्त्रवाहू 'डर्टी बॉम्ब'ची यशस्वी चाचणी घेतली. ह्या डर्टी बॉम्ब मध्ये भूअंतर्गत प्रकल्प किंवा खंदकांना नष्ट करण्याची क्षमता आहे.
डिमोना अणुप्रकल्पाच्या हद्दीत नेगेव्ह वाळवंटात ही चाचणी घेतली गेल्याचे 'हारेत्झ' ह्या इस्रायली दैनिकाने प्रसिद्ध केले. २५० ग्रॅम ते २५ किलो स्फोटकांचा वापर करुन किमान २५ चाचण्या केल्या गेल्या. त्या प्रत्येक चाचणीनंतर जागेची पाहणी करण्यासाठी मानवरहित 'ड्रोन' पाठवून इस्रायली लष्कराने सर्वे केला. आसपासच्या भागातील किरणोत्सर्गाच्या प्रमाणाचा अभ्यास करण्यात आला. स्फोट घडलेल्या ठिकाणी सर्वात जास्त उत्सर्जन झाले. वार्याच्या वेगाबरोबर हे किरणोत्सर्जन कमी होत असल्याची नोंद केली.
इराणच्या अण्वस्त्रनिर्मितीला रोखण्यासाठी या बॉम्बचा वापर करण्याचा इशारा इस्रायलने दिला होता. इराणच्या फोर्दो येथील भुयारी अणुप्रकल्पावर ह्या बॉम्बचा मारा करण्याचे संकेत इस्रायलने दिले होते.
प्रकु अशी परवानगी कोण देईल?
प्रकु
अशी परवानगी कोण देईल? त्यामुळे चोरून हेरगिरी चे प्रयत्न चालवले जातात.
स्नोडेन कृपेने हे कळले/उघड झाले. अन्यथा गपचुप चालू राहिले असते.
काही चिनि ब्रँड चे मोबाईल वापरायला भारतीय नौदलाची बंदी आहे. तसे पत्रकच होते. (कुठे पाहिले ते आठवत नाहीये.)
याचे कारणही चिनि हेरगिरी हेच असणार.
भारतही अशी हेरगिरी करत असेल अशी आशा आहे. (नसेल तर खरच काळजी करण्यासारखे आहे!)
चौकट राजा
आता कावेरी ने कधी चांगली कामगिरी करूच नये ह्यासाठी भारतीय तंत्रज्ञांना परकिय कंपन्यांनी फितविले असेल अशी एक शक्यता उरतेच तंत्रज्ञांना फितवले की नाही हे माहिती नाही.
भारतीय संशोधक हुषार आहेतच पण तरीही इंजिन पुर्ण्त्वाला गेले नाही. काहीही करून भारतीय इंजिन बनू न देणे हे कोणाच्या पथ्यावर पडले आहे? कुणाचा थेट फायदा झाला आहे?
म्हणून संशय आहे!
चीन ने बेटे विकसित करून लढाउ नौका आणि त्यांना आवश्यक रसद याची सोय केली आहे. काही ठिकाणी विमानतळ पण बांधले आहेत.
पण तिसरे महायुद्ध करण्या इतका फायदा अमेरिकेचा होईल असे यात दिसत नाही. त्यामुळे ते घडेल असे वाटत नाही. अशा धमक्या अनेकदा दिल्या जातात. पण प्रत्यक्षात येत नसतात असे वाटते. तेलाचा हिस्सा मिळत असेल किंवा नसेल तर मात्र युद्ध होउ शकेल. पण युद्धाची किंमत मिळणार्र्या तेलाच्या प्रमाणात असेल असे वाटते.
आता कावेरी ने कधी चांगली
आता कावेरी ने कधी चांगली कामगिरी करूच नये ह्यासाठी भारतीय तंत्रज्ञांना परकिय कंपन्यांनी फितविले असेल अशी एक शक्यता उरतेच
अरेरे, अशी शक्यता वाटावी? भारतीय शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांच्या संबंधी अश्या शंका? का ते देशभक्त नाहीत? पैशासाठी देश विकतील? की त्यांना जे जमत नाही ते कसे जमले असते याबद्दल या लोकांना काही शास्त्रीय, तांत्रिकी माहिती आहे? की आपले उगीचच?
आपल्याच देशातल्या हुषार लोकांवर असले संशय? उद्या एखादा टिनपाट राजकारणी याचे भांडवल करून स्वतःचा स्वार्थ साधू पाहील. नेहेमीप्रमाणे मिडिया याचे भांडवल करील!
हे केवळ इतक्या उच्च स्तरावरील तांत्रिकी, शास्त्रीय काम करणार्यांबद्दलच नाही तर इमाने इतबारे साधी नोकरी करणार्या लोकांनाहि अशीच वागणूक देत असतील, म्हणूनच जो तो परदेशी जायला धडपडतो, नि परदेशात जाऊन चांगली कामगिरी केली की हे असलेच भुक्कड लोक, फुक्कट, पहा भारतीय किती हुष्षार, आमच्या जीवावर अमेरिका चालते वगैरे असले बाष्कळ बडबडतात!
काय झालायं देश!!
झक्कि, मी आपल्याशी सहमत आहे.
झक्कि, मी आपल्याशी सहमत आहे. प्रोजेक्ट अयशस्वी झाला म्हणजे भारतीय शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांच्या देशभक्तीबद्दल संशय घेण्याचा उद्देश अजिबात नाही. पण तशी शक्यता असल्याचा प्रतिवाद कोणी करू शकेलच ना? भारतीय शास्त्रज्ञांना फितविले असण्याची शक्यता मला अतिशय कमी वाटते हे मा वै म माझ्या प्रतिसादात आहे.
कुर्दीस्तानात प्राचीन
कुर्दीस्तानात प्राचीन झोराष्ट्रीयन धर्माचे पुनरुज्जीवन !
ज्यांना सनातन प्रभात मधील बातम्यांचा तिटकारा आहे त्यांच्यासाठी हा दुवा : http://ekurd.net/iraqi-kurds-revive-ancient-kurdish-zoroastrianism-relig...
आयसिसला कुर्द जोरदार टक्कर देत आहेत. या पार्श्वभूमीवर झरतुष्ट्रीय धर्माचे पुनरुज्जीवन ही एक महत्त्वाची घटना आहे.
-गा.पै.
लोकहो, अरेवा कंपनीच्या
लोकहो,
अरेवा कंपनीच्या फ्लामनविल येथील अणुभट्टीतल्या सदोष झडपा आण्विक विलयन (न्यूक्लियर मेल्टडाऊन) घडवून आणू शकतात असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित वृत्त : http://www.telegraph.co.uk/news/worldnews/europe/france/11662889/Faulty-...
हीच अरेवा कंपनी जैतापुराच्या अणुभट्ट्या बांधणार आहे.
रात्र वैऱ्याची आहे.
आ.न.,
-गा.पै.
अरेवा - अरिवा असा उच्चार
अरेवा - अरिवा असा उच्चार आहे.
धन्यवाद उदय! आ.न., -गा.पै.
धन्यवाद उदय!
आ.न.,
-गा.पै.
मॅकडोनल्ड या बर्गर विकणार्या
मॅकडोनल्ड या बर्गर विकणार्या कंपनीने जगातल्या निरनिराळ्या देशात कर वाचवला आहे. फ्रान्स मध्ये यामुळे एक वादळ उभे राहिले होते. तसेच ऑस्ट्रेलिया मध्येही सुमारे पन्नास कोटी डॉलर्सचा कर वाचवला आहे.
या कंपनीची कर वाचवण्याची पद्धती सर्वसाधारणपणे; अगम्य असे कंपन्यांचे जाळे बनवणे आणि मग त्यात आपासात व्यवहार करत प्रमुख फायदा देशाबाहेर नेणे अशी राहिली आहे.
कंपनीचा बहुतेक व्यवसाय फ्रँचायझी मार्फत केला जातो. यात खाद्यावर रॉयल्टी कमी पण लोगो वापरण्यावर सर्वात जास्त अशी अंतर्गत आकारणी केली जाते. ऑस्ट्रेलिया मध्ये फ्रँचायझी कडून मॅकडोनल्डने ५% रॉयल्टी घेतली पण मुख्य कंपनीला ९% दिली! अर्थातच ऑस्ट्रेलियातील कंपनीचा फायदा कमी झाला आणि करही कमी झाला.
लोगो चे सर्व हक्क मुख्य कंपनीकडे असतात. ही कंपनी बहुदा जेथे जास्त कर नाहीत किंवा अजिबात कर नाहीत अशा ठिकाणी स्थापीत असते. तेथे हा फायदा पोहोचवला जातो. उदाहरणार्थ फ्रान्स मध्ये झालेला एक अब्ज डॉलर्सचा फायदा वरील प्रकारे लग्झेंबर्ग स्थित कंपनीकडे पाठवला गेला. जेथून हे पैसे कमावले त्या फ्रान्सला करातून मिळणार नाहीत याची काळजी घेतली गेली.
ऑस्ट्रेलियातील सुमारे पन्नास कोटी डॉलर्सचा फायदा सिंगापुरच्या कंपनीला पोहोचला. मॅकडोनल्डच्या अजिबात कर नाहीत अशा ठिकाणी सुमारे ४२ कंपन्या आहेत. या पैकी १२ त्यांनी जाहिर मान्य केल्या आहेत.
मात्र यात गोष्ट प्रकर्षाने पाळली गेली आहे ती म्हणजे कंपनीने कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही. अथवा तसे उघडकीला आलेले नाही! कायद्यातील पळवाटांचा वापर करून फायदा अलगदपणे देशाबाहेर नेला आहे.
मात्र ज्या देशातून फायदा कमवायचा तेथे किंवा तिथल्या जनतेसाठी काहीच करायचे नाही यावरून विवीध संसदांमध्ये संताप व्यक्त केला आहे. युरोपिय युनियन यासाठी कायदे बदलण्याच्या प्रयत्नात आहे.
हाच प्रकार गुगल पण करत आहे. आज कंपन्यांना गुगल वर रँकिंगमध्ये वर येण्यासाठी प्रचंड पैसे मोजावे लागतात. हा फायदा मग व्यवस्थितपणे जेथे जास्त कर नाहीत किंवा अजिबात कर नाहीत अशा ठिकाणी पाठवला जातो.
ऑस्ट्रेलियाने आता असे घडू नये म्हणून विवीध देशांशी कंपन्यांची कर विषयक माहिती एकमेकांना देण्याचा करार करण्याचा सपाटा लावला आहे.
भारतात हे घडू नये म्हणून काय काळजी घेतली जाते, हे येथे असलेले तज्ञ सांगू शकतील का?
उदा. नेस्लेचा भारतातला नक्की फायदा किती?
त्यांनी भरलेला कर किती आणि
मुख्य कंपनीला मिळालेला फायदा किती याची आकडेवारी कशी सापडेल?
निनाद, मस्त पोस्ट. वाचत वाचत
निनाद, मस्त पोस्ट. वाचत वाचत खाली येताना <<<भारतात हे घडू नये म्हणून काय काळजी घेतली जाते>>>> हेच मनात आलं होतं. मुळात काळजी घेतली जाते की नाही ते कुणी सांगेल काय?
वरचं वाचून अजून एक प्रश्न पडला. जर जास्तीत जास्त नफा जेथे जास्त कर नाहीत किंवा अजिबात कर नाहीत अशा ठिकाणी पाठवला जातो तर त्याचा पुढे विनियोग कसा केला जातो? तो वापरण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणाहून बाहेर काढावा लागत असेलच ना? जगभरात पसरलेल्या जाळ्याची वेगवेगळी बिल पेमेंट्स व इतर ट्रॅन्झॅक्शन्स त्या पैशांतूनच होत असतील की कसं?
काय विकतात? तर बर्गर!!! आणि ग्लोबल फॉर्चून ५०० मध्ये येण्याजोगा बिझिनेस
मधे बर्याच ठीकाणी वाचण्यात
मधे बर्याच ठीकाणी वाचण्यात आले होते अमेरिकन कंपन्याना सुमारे १ ट्रीलियन डॉलर चा नफ़ा अमेरिकेत परत आणत नाही आहेत कारण त्यावर त्यांना कर भरावा लगेल.
'ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी
'ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी पीएलसी)ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या 'स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू ऑफ वर्ल्ड एनर्जी' अहवालानुसार रशिया व सौदी अरेबिया ह्या प्रमुख इंधन उत्पादक देशांना मागे सारुन अमेरिका जगातील प्रमुख इंधन उत्पादक देश बनली आहे. ह्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर 'ओपेक'ने ह्या वर्षअखेरपर्यंत क्रूडचा अतिरिक्त पुरवठा बंद होईल असे संकेत दिले आहेत. २०१४ साली इंधन क्षेत्रात झालेल्या घडामोडींची माहिती असलेल्या ह्या अहवालात 'शेल रिव्होल्यूशन'मुळे झालेले बदल, चीनकडून इंधनाच्या मागणीत झालेली घट, दरांतील घसरण ह्या मुद्द्यांचा उल्लेख आहे.
गेल्या काही वर्षांत इंधन उत्खननासाठी 'शेल' टेक्नॉलॉजीचा वापर सुरु झाला आहे. ह्यात खडकांमधील इंधन 'फ्रॅकिंग' पद्धतीचा वापर करुन बाहेर काढण्यात येत आहे. अमेरिकेतील शेकडो कंपन्या ह्या व्यवसायात उतरल्या आहेत. शेल रिव्होल्यूशनच्या जोरावर अमेरिकेने २०१४मध्ये रोज तब्बल १.१६ कोटी बॅरल्स क्रूड उत्पादन केलं तर सौदीने रोज १.१५ कोटी बॅरल्स क्रूड उत्पादन केलं. क्रूड उत्पादनात अमेरिकेने १५.९% इतकी मोठी वाढ नोंदवली आणि सलग ३ वर्षे क्रूडच्या उत्पादनात १० लाख बॅरल्सहून अधीक वाढ करणारा पहिलाच देश ठरला आहे.
नैसर्गिक इंधन वायू उत्पादनातही अमेरिकेने आघाडी घेतली आहे. शेल गॅसच्या उत्पादनात १३%हून अधिक वाढ नोंदवली असून ह्याचमुळे एकूण वाढ झाली आहे. जगात गेल्यावर्षी झालेल्या इंधन वायू उत्पादनवाढीत अमेरिकेचा वाटा ८०% असल्याचा दावा अहवालात आहे.
काही वर्षांनी पृथ्वीच्या पोटात तेल उरेल की नाही?
भारतीय संशोधकांबद्दल २
भारतीय संशोधकांबद्दल २ वर्षांपूर्वी हि एक घटना उजेडात आली होती.
http://en.wikipedia.org/wiki/Nambi_Narayanan
Pages