(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)
सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,
गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!
गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं." (साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.
सार्या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....
असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||
सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....
वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
उलट्या तुतारीसारखी ही फुले
उलट्या तुतारीसारखी ही फुले श्रीलंकेत नुआरा एलियाच्या वाटेवर खूप बघितली. चहाच्या मळ्यांच्या काठाकाठाने मुद्दाम लावलेली वाटली. कोणती बरे असावीत ही फुले अशी रुखरुख वाटत होती. आज नाव समजल्यावर हुश्श्य वाटले.
तिथे आणखी एक मोठ्ठे ओंजळीएव्हढे आणि सफेद कागदी कमळासारखे फूल बघितले. डिट्टो कमळच. पण याची वीस-पंचवीस फूट उंच झाडे असतात. बुद्धाच्या प्रत्येक देवळात या फुलांची सजावट होती. बुद्धाला ही आवडतात असे तिकडे मानतात. त्यांच्याकडे याला पारिजात म्हणतात.
हीरा.. ती कमळाची झाडे
हीरा.. ती कमळाची झाडे निवडुंगासारखी होती का ? केनयात ती खुप आहेत. त्यात लाल, पिवळे, गुलाबी, केशरी असे प्रकारही आहेत. तिथल्या हवेत ती फुले संध्याकाळ पर्यंत टवटवीत राहतात. पांढरी फुले संध्याकाळी उमलतात व सकाळी कोमेजतात. रंगीत फुले दिवसा फुलतात.
दिनेश, नाही निवडुंगासारखी
दिनेश, नाही निवडुंगासारखी नव्हती. माझ्याकडे मोबाइलवर घेतलेला फोटो आहे. जमल्यास लवकरच इथे टाकेन. फारसा स्पष्ट नाहीये, पण चालून जाईल कदाचित.
Gustavia augusta हे तर नाही?
Gustavia augusta हे तर नाही? हे अगदी कमळासारखे दिसते पण थोडे गुलाबीसर असते.
मानुषी, भुभू एकदम भारी दिसतोय. उचलुन घ्यावासा वाटेलसा.
साधना अगं तिथे ५/६ पिल्लं
साधना अगं तिथे ५/६ पिल्लं होती पण हेच तेवढे पोझेस देत होते. बाकीची घाबरत होती. जरा जवळ गेलं की पळत होती.
आमच्याकडे ७ पिल्ले घातलेली.
आमच्याकडे ७ पिल्ले घातलेली. वाटेवरच होती. एक सेम वरच्या फोटोतले. आवाज केला की सातही लुटूलुटू धावत यायची आणि पायाला हुंगायची. गावावरुन परतलो तर ३ शिल्लक होती.
गेलेलो तेव्हा आईच्या दुधावर होती, मस्त गुटगुटीत. परत आलो तेव्हा आईपण कुठेतरी बेपत्ता आणि पोरे अगदी बारीक झालेली. त्यांना अधुन मधुन खायला देतो. एक पिल्लु आहे ते टग्या आहे. ते येते आधी धावत आणि सग्ळे खाणे ताब्यात घेते. उरलेले दोन फक्त उभे राहुन बघत बसतात. त्या टग्याला थोडे देऊन दुर घालवले तरी त्या उरलेल्या दोघांची हिम्मत होत नाही तोंड लावायची. ते दोघेही जाणार लवकरच. एकाचा फक्त सापळा उरलाय... खायला काय मिळतच नाही तर काय करणार.
साधना, त्यांच्या जगात बळी तो
साधना, त्यांच्या जगात बळी तो कान पिळी हाच न्याय आहे. जर ती पिल्ले स्वतःचे पोट भरायला समर्थ नसली तर निसर्ग त्यांना जगू देत नाही.
हीरा.. फोटोची वाट बघतोय.
मा नु षी ताई भु भु मस्तय प ण
मा नु षी ताई भु भु मस्तय प ण मला कु त्री पाळायला आवड त नाही ग ..
सुप्र निगकर्स....
सुप्र निगकर्स....

मानुषी ताई....
मानुषी ताई.... अमेझींग...
प्रतिबिंब काय क्लास आलय!
मानुषी.. सुंदर फोटो !
मानुषी.. सुंदर फोटो !
मानुषीताई, प्रतिबिंब लवली.
मानुषीताई, प्रतिबिंब लवली.
मानुषी.. सुंदर फोटो ! >> +1
मानुषी.. सुंदर फोटो ! >> +1
सायली दिनेश अंजू इनमीनतीन
सायली दिनेश अंजू इनमीनतीन धन्यवाद!..........ती बाटली सुंदर आहे. म्हणून फुटु बी सुंदर!
४ वेगवेगळ्या रंगांच्या. ओढण्यात गुंडाळून एकदम जबरी पॅकिन्ग करून बॅगेतून न फोडता आणल्या. आता माझ्या हॉलमधे असतात त्या.
या बाटल्या मी आयकियातून आणलेल्या.बर्याच जणांचा(:डोमा:!!) विरोध पत्करून!
मानुषी सुंदर फोटो अन मला
मानुषी
सुंदर फोटो अन मला बाटली पण फारच आवडली.
सुसंध्याकाळ
सुसंध्याकाळ
प्रतिबिंब काय क्लास आलय!...
प्रतिबिंब काय क्लास आलय!...
वॉव क्लासिक आलाय फोटो.. मला
वॉव क्लासिक आलाय फोटो..
मला मुंबईत आणी भारतात ही ? एकही आयकिआ नाही हे पाहून भारी डिसअपॉइंटमेंट झालंय..
वर्षू गुड न्यूज ऐकिवात आहे.
वर्षू गुड न्यूज ऐकिवात आहे. आयकिया येऊ घातलंय भारतात.
काऊच घरट
काऊच घरट


उजू, मस्त रंग आहे फुलाचा
उजू, मस्त रंग आहे फुलाचा या.
नितीन, संभाळून रे कावळेदादांना प्रायव्हसी प्रिय असते !
निळी अंडी? काउच्या घरट्यात
निळी अंडी? काउच्या घरट्यात कोकिलाबेन बसून गेल्या की काय?
मानुषी फोटो मस्तच आलाय. उजू
मानुषी फोटो मस्तच आलाय.
उजू कसली आहेत ग ही फुल?
कावळ्याच घरटं ही क्यूट .
मानुषी ताई तु झ्या क ल्पक
मानुषी ताई तु झ्या क ल्पक तेला सलाम... प र त प र त पाहातेय तो फोटो....
उजु दुपार शेन्द्री च फुल आहे ते...
नितीन काय म स्त फो टो...
साधना गुड गेस...:)
आज सकाळी भारद्वाज जोड्प्यानी ह जे री लाव ली हो ती..
>
एक आडोश्याला होता..
पिवळ्या लीलीला प हिले फुलं आले... जागु ची आठवण आली:)
झाले एकदाचे फोटो चिकटवून.
झाले एकदाचे फोटो चिकटवून. काहीतरी गडबड होत होती.
हे ते श्रीलंकेतले कमळासारखी फुले असलेले झाड, ज्याला तिकडे पारिजात म्हणतात. गुस्टाविआ ऑगुस्टाच्या फुलांप्रमाणे ही फुले गुलबट नव्हती. पाने साधारण चाफ्याच्या झाडाप्रमाणे लांबटसर, पण झाड खूप बळकट होते आणि त्याच्या फांद्या चाफ्याप्रमाणे वेड्यावाकड्या फुटलेल्या नव्हत्या. झाड उंच असल्यामुळे फोटो जवळून काढता आला नाही. शिवाय सभोवार छोटी छोटी बांधकामे असल्याने कोनही चांगला मिळत नव्हता. फुलांचाही फोटो होता. नंतर टाकेन.
हीरा सु रेख फो टो... ए वढ्या
हीरा सु रेख फो टो... ए वढ्या उंचाव र कमळा सार खी फुलं प हि ल्यांदाच ब घ तेय...
उजू कसलं आहे हे फूल?? वॉव..
उजू कसलं आहे हे फूल??
वॉव.. कावळ्याचं घरटं, चक्क अंड्यांसकट?.. खूप क्लिअर छान आलाय फोटो..
हीरा.. किती वेगळी फुलं आहेत ही... खरीच कमळा च्या आकाराची.. गंमतच वाटली..
कुणीतरी एक्सपर्ट सांगतीलच नाव ..
हीराताई हि फुले होती का?
हीराताई हि फुले होती का?
सुदुपार! निगकर्सनी खालील
सुदुपार! निगकर्सनी खालील धाग्यावर हजेरी न लावलेली पाहून आश्चर्य वाटले... तरी ती लावावी, लावावी, विणंति
http://www.maayboli.com/node/53868
डपो
डपो
Pages