Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53
सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...
न्याययंत्रणेचे अभिनंदन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बी, तुम्ही हे सर्वांना
बी,
तुम्ही हे सर्वांना उद्देशून विचारत आहात की मला हे माहीत नाही. (माझ्या पोस्टखाली तुमची पोस्ट आहे म्हणून)
माझे उत्तर असे:
कलाकृती पाहताना कलाकाराचे खासगी जीवन विचारात घेऊ नये. कलाकाराच्या खासगी जीवनाकडे पाहताना त्याची प्रतिभा मध्ये आणू नये. हे झाले कलाकाराबाबतचे:
एक वेगळे मतः
पाप आणि पुण्य ह्या संकल्पना 'प्लस-मायनस' करून नेट इफेक्टनुसार फळ मिळत नाही. पापाचे प्रायःश्चित्त घ्यावे लागते आणि पुण्याचे शुभफळ उपभोगावे लागते. वेगवेगळे! आता पाप, पुण्य, चित्रगुप्त-बिप्त विषय ह्या धाग्याशी संबंधीत नाहीतच. मुद्दा इतकाच की 'बीइंग ह्युमन' संघटना चालवणे हे जर पुण्य असेल तर ते 'पादचारी मार्गावर झोपलेल्या गरिबांना निष्काळजीपणे गाडीखाली मारणे' ह्या पापाला नलिफाय करत नाही. आपली न्यायसंस्था इतके नक्कीच क्लीअर थिंकिंग ठेवते. भावनिक व व्यक्तीपूजक माणसे ठेवत नाहीत.
बेफिकिर, माझा प्रश्न
बेफिकिर, माझा प्रश्न सगळ्यांना उद्देशून होता. फक्त तुमच्या पुरता मर्यादित नव्हता. तुम्ही उत्तर छान दिले. वेगळे मत थोडे कळले नाही.
कलाकृती पाहताना कलाकाराचे खासगी जीवन विचारात घेऊ नये. कलाकाराच्या खासगी जीवनाकडे पाहताना त्याची प्रतिभा मध्ये आणू नये. हे झाले कलाकाराबाबतचे:>>
मला देखील नेमके हेच वाटते. ज्यांनी सलमानचा मैने प्यार किया पाहिला त्यावेळी तो गुन्हेगार नव्हता. आता तो सिनेमा जर कुणाला परत पाहायचा असेल तर सलमान तर आता गुन्हेगार आहे.. मी नाही पाहत. असा हा विचार नाही पटत.
संजय दत्तची फारशी आठवण कुणाला
संजय दत्तची फारशी आठवण कुणाला येत नाही आता. ( त्याला शिक्षा झाली होती तेव्हाही पब्लिकला असेच उमाळे आले होते ) सलमानचेही तसेच होईल. मिडीयाला नेहमी ताजे बकरे लागतात.
जगात असे काही देश आहेत जेथे
जगात असे काही देश आहेत जेथे गुन्हेगाराला प्रथम 'आत' टाकण्यात येते आणि तो निर्दोष आहे हे त्यानंतर सिद्ध करत बसण्याचा प्रयत्न करणे ही त्या गुन्हेगाराची जबाबदारी असते.
>>
जर तो निर्दोष असला तर गेला बाराच्या भावात? विनाकारण कशाला जायचे आत? तशी व्यवस्थित ओळख असेल तर आपल्याकडेपण डायरेक्ट आत टाकता येते की. काही कायदे पण आहेत तसे … उदा. ४९८ अ
http://zeenews.india.com/mara
http://zeenews.india.com/marathi/news/images/salman-these-photos-could-s...
बी असा गुन्हा जर एखाद्या
बी असा गुन्हा जर एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या हातून घडला तर त्याला ताबडतोब नोकरीवरून कमी करण्यात येईल. अन्यथा कामाच्या ठीकाणी त्याचे जिणे एवढे असह्य होईल की तो स्वतःच नोकरी सोडेल. त्याला परत नो़करी कुठेही लागणार नाही!! मग कलाकार आहे म्हणून वेगळी ट्रीटमेंट का द्यावी? आपण बहिष्कार टाकल्याने कलेचा काहीही अपमान होत नाही कारण गुन्हा करून कलाकराने तो आधीच केलेला आहे. जराशीही संवेदनशीलता न दाखविता बॉलीवूडचे दिग्गजसुद्धा कालपासून कलेचा अपमानच करित आहेत
बी, ह्यात घोळ आहे. येथे
बी,
ह्यात घोळ आहे.
येथे चर्चा सुरू आहे ती 'ह्यापुढे मुद्दामहून थेटरात जाऊन सलमानचा चित्रपट पाहणार नाही' ह्या विषयाची! टीव्ही लावला आणि समोर हम आपके है कौन किंवा मैप्याकि लागला असेल आणि आपल्याला वेळ आहे म्हणून सहज बसून चार प्रसंग पाहिले तर त्यात काही बिघडणार नाही. भविष्यातील त्याचे चित्रपट पाहणार नाही असे येथील काहींचे म्हणणे आहे. कारण त्यातून त्याला नवे मानधन मिळणार.
सुमुक्ता, मी इथे शिक्षा होणे
सुमुक्ता, मी इथे शिक्षा होणे ह्याबद्दल बोलत नाही आहे. वर तू जे उदाहरण दिले ती व्यक्ती फक्त नोकरी करते. तिच्याकडे कला नाही. त्यामुळे हा प्रश्न उदभवत नाही. पण इथे सलमान एक कलाकार आहे. त्याचे पंखे त्याचे सिनेमे पाहत असतील तर ते चुक करत आहे असे म्हणने योग्य की अयोग्य. मी इथेही संभ्रमात आहे.
जगात असे काही देश आहेत जेथे
जगात असे काही देश आहेत जेथे गुन्हेगाराला प्रथम 'आत' टाकण्यात येते आणि तो निर्दोष आहे हे त्यानंतर सिद्ध करत बसण्याचा प्रयत्न करणे ही त्या गुन्हेगाराची जबाबदारी असते.
आपल्याकडे उलटे आहे. आपण त्याला आत का टाकत आहोत हे सिद्ध करण्याच्या कालावधीत त्याला बाहेर ठेवतो.
आपल्याकडेही आतच टाकतात हो. पण सलमानला किंवा त्या जागी इतर कोणीही ज्याचे खिसे भरुन पैसे ओतताहेत तो जामिन घेऊन बाहेर राहतो. जामिन घ्यायला आणि त्यासाठी हरिश साळवेसारखे वकिल ५ मिनिटांच्या आत हायर करायला लाखोंनी पैसे ओतावे लागतात. सामान्य माणसांकडे ते नसतात त्यामुळे सामान्य माणसे आत बसतात, पैसेवाले बाहेर राहतात.
उद्या माझ्या गाडीखाली कोणी आले तर मलाही लगेच आत जावे लागेल. आणि जामिन देण्याइतके पैसे खिशात नसतील तर कोर्टात केस उभी राहीपर्यंत मी आतच राहिन.
बी, तुमचा जो संभ्रम आहे तो
बी,
तुमचा जो संभ्रम आहे तो प्राजक्तांचा प्रतिसाद वाचून जाईल.
कलाकार आहे म्हणून कोणतेही रिलॅक्सेशन मिळता कामा नये. कलाकार असण्याबद्दल प्रसिद्धी आणि पैसे मिळतातच की? मग सदोष मनुष्यवधाबद्दल शिक्षाही मिळावी.
त्याच्या पंख्यांनी त्याचे सिनेमे अवश्य पाहावेत पण म्हणून त्याच्या बाजूने गळे काढू नयेत अश्या प्रसंगी!
कालपासून सगळेजण खरे तर तेच तेच बोलत आहेत इथे, पण तरी चर्चा सुरूच आहे. बी, हे तुम्हाला उद्देशून नसून प्रत्येकाला आहे.
कला मोठी की माणूस? शेवटी कला
कला मोठी की माणूस? शेवटी कला माणसाने निर्माण केलीय म्हणून माणूस मोठा. जर तो कलाकार चुकीचा वागत असेल तर त्याच्या कलेला कशाला डोक्यावर घ्यायचे? शिक्षा भोगली की मग त्याच्या कलेला अर्थ.
एखादा गुन्हेगार कलाकार असेल
एखादा गुन्हेगार कलाकार असेल यापेक्षा एखादा कलागार गुन्हेगार आहे असा का नाही विचार करत लोकं?.
@सलमानचे समर्थन करणारे सगळेच, तुमचा एखादा भाऊ/मुलगा फुटपाथवरून चालतांना अशा कलाकाराच्या गाडीखाली आला असता तर तुम्ही त्याला कलाकार म्हणून सुट दिली असती ? सॉरी पण इथले प्रतिसाद वाचून लिहील्याशिवाय रहावले नाही.
वैद्य आणि साधना, माझा तो
वैद्य आणि साधना,
माझा तो प्रतिसाद कृपया असा वाचावातः
'जगात असे काही देश आहेत जेथे गुन्हेगाराला हे सिद्ध करावे लागते की तो निरपराध आहे, आपल्याकडे शासनाला हे सिद्ध करावे लागते की तो गुन्हेगार आहे'
(बाकी 'आत टाकणे' वगैरे केवळ शाब्दिक तपशील हे शाब्दिक म्हणूनच ट्रीट करावेत).
बी मीसुद्धा शिक्षा
बी मीसुद्धा शिक्षा होण्याबद्द्ल बोलतच नहिये. सर्वसामान्य माणसाच्या हातून गुन्हा घडला तर समाज त्याच्यावर बहिष्कार टाकेल मग कलाकाराला वेगळी वागणूक का बरे मिळावी???
ओके. मग ठीके. पण त्यांनी काही
ओके. मग ठीके. पण त्यांनी काही फायदा? शासनाला तो जे पुरावे मांडतोय निरपराध असण्याचे त्याला प्रतिउत्तर म्हणून द्यावेच लागत असतील न पुरावे? That is as good as state proving him guilty.
बी मीसुद्धा शिक्षा
बी मीसुद्धा शिक्षा होण्याबद्द्ल बोलतच नहिये. सर्वसामान्य माणसाच्या हातून गुन्हा घडला तर समाज त्याच्यावर बहिष्कार टाकेल मग कलाकाराला वेगळी वागणूक का बरे मिळावी???
>> हे असे होते कारण कलेवरचे प्रेम, कलाकारावरचे प्रेम, त्याच्याविषयीची ओढ, आकर्षण, उत्सुक्ता, मनोरजंन, गॉसिप, -- आपल्यापैकी अनेकांना ह्यातले काहीना काही लागू होते म्हणून आपण सलमान खान आत्तापर्यंत पाहिला असेल.
>>> हे असे होते कारण कलेवरचे
>>> हे असे होते कारण कलेवरचे प्रेम, कलाकारावरचे प्रेम, त्याच्याविषयीची ओढ, आकर्षण, उत्सुक्ता, मनोरजंन, गॉसिप, -- आपल्यापैकी अनेकांना ह्यातले काहीना काही लागू होते म्हणून आपण सलमान खान आत्तापर्यंत पाहिला असेल.<<<
अहो पण असे होणे प्राप्त परिस्थितीत चुकीचे आहे हे तर मान्य आहे की नाही?
अहो पण असे होणे प्राप्त
अहो पण असे होणे प्राप्त परिस्थितीत चुकीचे आहे हे तर मान्य आहे की नाही?>> मला माहिती नाही. माझे विचार ह्याबद्दल खूप संभ्रमात आहे. खरे अर मला असे विषय खूप नाजूक वाटतात आणि मी तरी न्यायनिवाडा करु शकणार नाही. सो सॉरी. पण ह्याबद्द्ल चार लोकांचे विचार वाचून ऐकून आपले विचार अधिकाधिक स्पष्ट होत जातात म्हणून मी इथे ब्रेक न घेता लिहिले आहे.
सलमान प्रकरणावरुन सुचलेलं
सलमान प्रकरणावरुन सुचलेलं काही.
[ब्लॉग लेख] आता पुरे झाली एन्टरटेनमेन्ट
बी, एका सेलेब्रिटीने दारूच्या
बी,
एका सेलेब्रिटीने दारूच्या नशेत वाहन चालवून फूटपाथवर झोपलेल्या गरीब माणसांना बेदरकारपणे मारले, तेरा वर्षे शिक्षेपासून मुक्तता मिळवली, ख्याती मिळवत राहिला, पैसे मिळवत राहिला आणि तेरा वर्षांनि शिक्षा जाहीर झाल्यावर जामीनही जाहीर झाला.
अश्या वेळी त्याच्याकडे कलाकार म्हणून पाहावे असे / अश्या अर्थाचे / ह्याबाबत इतर काही दृष्टिकोन असणे योग्य आहे का अश्या अर्थाचे, विचार तुमच्या मनात कसे येत आहेत?
तुमच्यातील सलमानला क्षणात लागू होणारी ही सहृदयता त्या मेलेल्या गरिबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना का लागू होत नाही?
तुमच्यातील सलमानला क्षणात
तुमच्यातील सलमानला क्षणात लागू होणारी ही सहृदयता त्या मेलेल्या गरिबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना का लागू होत नाही ?>>>>>>>>ते सेलेब्रिटी किन्वा कलाकार थोडेच आहेत.
तुमच्यातील सलमानला क्षणात
तुमच्यातील सलमानला क्षणात लागू होणारी ही सहृदयता त्या मेलेल्या गरिबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना का लागू होत नाही ? >>>> +१
एका सेलेब्रिटीने दारूच्या
एका सेलेब्रिटीने दारूच्या नशेत वाहन चालवून फूटपाथवर झोपलेल्या गरीब माणसांना बेदरकारपणे मारले, तेरा वर्षे शिक्षेपासून मुक्तता मिळवली, ख्याती मिळवत राहिला, पैसे मिळवत राहिला आणि तेरा वर्षांनि शिक्षा जाहीर झाल्यावर जामीनही जाहीर झाला.
अश्या वेळी त्याच्याकडे कलाकार म्हणून पाहावे असे / अश्या अर्थाचे / ह्याबाबत इतर काही दृष्टिकोन असणे योग्य आहे का अश्या अर्थाचे, विचार तुमच्या मनात कसे येत आहेत?
>> फक्त सलमान खानच्या केसबद्दल बोलायचे झाले तर त्याने चुक सावरायला हवी होती. लवकर त्या व्यक्तीला इस्पितळात न्यायला हवे होते. स्वतःची चुक मान्य करायची होती. कुटुंबीयांना आर्थिक मदत करायचे असते. कुठे तरी त्याने आपली चुक घडली हे व्यक्त करायचे असते. पण त्याने असे न करता पळवाट शोधली हे मला आवडलेले नाही.
ज्यावेळी आपल्या हातून खूप मोठ गुन्हा घडतो त्यावेळी बहुतेक आपले खच्चीकरण होत असावे. आपला विल पॉवर शून्य होत असावा. म्हणून बहुतेक गुन्हेगार मग ते कितीही चांगले का असोतना ते पळ काढतात. आणि जीवाची भिती, बदनामीचे भय, कायद्याचे भय, समाजाचे भय, कुटुंबियांची का़ळजी हे कुणाला नसते!!!
तुमच्यातील सलमानला क्षणात
तुमच्यातील सलमानला क्षणात लागू होणारी ही सहृदयता त्या मेलेल्या गरिबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना का लागू होत नाही?>>> exactly. कारण ते मेलेले कळवळा येणार्यांचे कुणीच नाहित ना. ना सेलिब्रीटी आहेत.
ईथे सर्व सामान्यांच्या आयुष्याहून मौल्यवान तर स्टारडम आहे.
कला आणि ती कला सादर करणारी
कला आणि ती कला सादर करणारी व्यक्ती हे दोन वेगळे पैलू आहेत. आणि आपण त्यांची नेहमी गल्लत करत असतो. त्याला कलाकार म्हणून द्यायची दाद जरूर द्यावी पण पडद्याबाहेर तो फक्त एक तुमच्या आमच्यासारखी व्यक्ती आहे हे कुणीच विसरू नये. पडद्यावरचा हिरो हा पडद्याबाहेर पण हिरो आहे असं समजलं की सर्व घोळ होतात. ते होऊ देता कामा नये. थोडक्यात त्याच्या कलेवर सुद्धा प्रेम करा, पण तेव्हाच त्याच्या गुन्ह्यासाठी त्याला योग्य ती शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न किंवा दुजोरा हेच तुमच्या आमच्या संयमितपणाचं लक्षण आहे. उगिच प्रसिद्ध कलाकार आहे म्हणून त्याला शिक्षा कमी व्हावी या युक्तिवादात अजिबात अर्थ नाही.
दक्षिणा >> +१११११
दक्षिणा >> +१११११
आणि जर सलमानच्या सिनेमात
आणि जर सलमानच्या सिनेमात माधुरी असेल आणि तिचा नाच पहायचा असेल तर सलमान आहे म्हणून तो सिनेमा न बघणे हे कितपत योग्य वा अयोग्य आहे. सिनेमा तर अशी कला आहे की ज्यात अनेक कलाकार असतात. त्यामुळे सलमानचे नवीन सिनेमे पाहायचे नाही हे ठरवता येणे खूप अवघड आहे.
इथे एक अवांतर करतो: मला एकदा हळद घ्यायची होती आणि दुकानात फक्त पाकिस्तानी हळद होती. मी ती घेतली नाही कारण हळद पाकची होती. एकदा अनु म्हणाली शान ची हळद सर्वात बेस्ट. ही तिच हळद जी मी घेतली नाही. मी त्यादिवशी खूप विचारमग्न होतो.
दक्षिणा +१००
दक्षिणा +१००
मायबोलीवर घसरगुन्डी पण सहज
मायबोलीवर घसरगुन्डी पण सहज खेळता येते हे आत्ताच, आजच एका व्यक्तीच्या गोन्धळी प्रतीसादामुळे समजले. पण घसरगुन्डी खेळता तर येतेच आणी पुनः प्रत्ययाचा आनन्द पण घेता येतो.
आणि जर सलमानच्या सिनेमात
आणि जर सलमानच्या सिनेमात माधुरी असेल आणि तिचा नाच पहायचा असेल तर सलमान आहे म्हणून तो सिनेमा न बघणे हे कितपत योग्य वा अयोग्य आहे. >>
सीडी घ्या आणि माधुरीचा नाच पहा फक्त. किंवा ज्यात सलमान नसेल त्या सिनेमातला तिचा नाच पहा.
सिनेमा तर अशी कला आहे की ज्यात अनेक कलाकार असतात. त्यामुळे सलमानचे नवीन सिनेमे पाहायचे नाही हे ठरवता येणे खूप अवघड आहे.
इथे एक अवांतर करतो: मला एकदा हळद घ्यायची होती आणि दुकानात फक्त पाकिस्तानी हळद होती. मी ती घेतली नाही कारण हळद पाकची होती. एकदा अनु म्हणाली शान ची हळद सर्वात बेस्ट. ही तिच हळद जी मी घेतली नाही. मी त्यादिवशी खूप विचारमग्न होतो.>>
अभिनंदन. अतिशय सूज्ञ निर्णय. ते एकच दुकान होत का हो?
Pages