Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53
सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...
न्याययंत्रणेचे अभिनंदन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जेव्हढा गुन्हा तेव्हढी
जेव्हढा गुन्हा तेव्हढी शिक्षा
कमी शिक्षा व्हवयास गुन्हा ही कमी पाहिजे.
कोर्ट काहि त्याच वैरी नाहि.
उलट सलमान 13वर्ष डाव खेलला.
.
.
अजुन दारुच्या बाटलि वर खटला
अजुन दारुच्या बाटलि वर खटला चालल्याचे एकिवात नाही
>>>>>>>
बाटलीचा काय दोष? खटला भरायचाच असेल तर तिच्यातल्या दारूवर भरायला हवा ना ..
असो, यातला उपरोध सोडा पण सलमानला खरी शिक्षा आपण त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकून देऊ शकलो असतो,
मात्र ते आपल्याला देशद्रोही संजय दत्तबाबतही जमले नाही.
प्राजक्ता >> १००% अनुमोदन.
प्राजक्ता >> १००% अनुमोदन. उत्तम पोस्ट ...
बाटलीचा काय दोष? खटला भरायचाच
बाटलीचा काय दोष? खटला भरायचाच असेल तर तिच्यातल्या दारूवर भरायला हवा ना .. >> दारूचा काय दोष? खटला भरायचाच असेल तर तिच्यातल्या अल्कोहोलवर भरायला हवा ना ..
दारूचा काय दोष? खटला भरायचाच
दारूचा काय दोष? खटला भरायचाच असेल तर तिच्यातल्या अल्कोहोलवर भरायला हवा ना ..
>> अल्कोहोलचा काय दोष? खटला भरायचाच असेल तर त्याच्यातल्या रासायनिक मूलद्रव्यांवर भरायला हवा ना ..
सगळ्या अल्कोहोलवर का खटला
सगळ्या अल्कोहोलवर का खटला भरावा???????,मी सांगतो ,इथेनॉलवर खटला भरा.
इथेनॉल हाजीर हो!!!!!!!
इथेनॉल हाजीर हो!!!!!!!
ईथेनॉलवर का बुवा...त्याने
ईथेनॉलवर का बुवा...त्याने कोणता ब्रँड घेतला होता माहित आहे का?
बरं ते जाऊदे....लग्न न होऊ शकल्याने नैराश्यामुळे दारूचा सहारा घेत होता असे वाचले. लग्न संस्थेवर आणि समाजाने लग्न कधी करणार असे सारखे विचारत प्रेशर आणल्यामुळे समाजावरच खटला का भरू नये?
हायझेनबर्ग परफेक्ट! बी आणि
हायझेनबर्ग
परफेक्ट!
बी आणि ऋ!! देवाला तुमच्यावर अन तुम्हाला आमच्यावर दया येवो.
Satya paristhiti ahe hi pan
Satya paristhiti ahe hi pan
दारूचा काय दोष? खटला भरायचाच
दारूचा काय दोष? खटला भरायचाच असेल तर तिच्यातल्या अल्कोहोलवर भरायला हवा ना ..
>>>>>>>>
एक्झॅक्टली हायझेनबर्ग एक्झ्क्टली !!
हेच तर मी म्हणतोय,..
मी दारू पिणे या व्यसनावर टिका करताच लोकांनी त्याचा विपर्यास करत दारूच्या बाटलीवर खटला वगैरे पर्यंत पोहोचले.
हो ना राव...लोकं पण कसला
हो ना राव...लोकं पण कसला विपर्यास करतील काय म्हणतील काही सांगता येत नाही, खासकरून मायबोलीवर.
मी तर तुमच्या ह्या खालच्या वाक्याशीही सहमत आहे>>>
असो, यातला उपरोध सोडा पण सलमानला खरी शिक्षा आपण त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकून देऊ शकलो असतो.
तुमचे हे फारच ट्फ लव झाले. एकच जण अपघातात बळी पडला असतांना सलमानच्या सगळ्या आगामी चित्रपटांवर बहिष्कार टाकणे किती न्याय्य आहे. माझ्यामते एका चित्रपटावर बहिष्कार टाकणे पुरेसे आहे. जे जखमी झाले आहेत त्यांच्याबद्दल सहानुभूती म्हणून फारफार तर सलमानच्या ऊत्पादनांच्या जाहिरातींवर आठवडाभर बहिष्कार टाकावा ..झाले.
माझ्यामते एका चित्रपटावर
माझ्यामते एका चित्रपटावर बहिष्कार टाकणे पुरेसे आहे.
>>>>>>
हो अॅक्चुअली!
एकावर बहिष्कार टाकला असता तरी घाबरून कोणत्या निर्मात्याने त्याला पुढच्या चित्रपटात घेतले नसते.
आणि इमेज अशी झाल्यावर जाहिराती बंदच झाल्या असतात.
या बी बी वर इतकी चर्चा होते
या बी बी वर इतकी चर्चा होते हेच हास्यास्पद आहे.
(No subject)
एकावर बहिष्कार टाकला असता तरी
एकावर बहिष्कार टाकला असता तरी घाबरून कोणत्या निर्मात्याने त्याला पुढच्या चित्रपटात घेतले नसते.
आणि इमेज अशी झाल्यावर जाहिराती बंदच झाल्या असतात. >> +१००० खरंय अगदी.
मी तर त्याही पुढे जाऊन असे म्हणेन की बहिष्कार म्हणजे सिनेमा बंद पाडणे, पोस्टर वगैरे फाडणे असे न करता सगळ्यांनी सलमानच्या सिनेमाचे तिकिट काढतांना मृदू स्वरात तीन वेळा 'बहिष्कार बहिष्कार बहिष्कार' असे म्हणत डाव्या हाताच्या करंगळीला काळ्या रंगाची फीत बांधून (मुलींनी डाव्या करंगळीचे नख काळ्या नेलपेंटने रंगवले तर तेही बहिष्कार म्हणून ग्राह्य धरले जाईल) सिनेमा बघणे हीच त्याच्यासाठी कडक आणि पुरेशी शिक्षा होईल.
काही काही पोस्ट्स अगदी धन्य
काही काही पोस्ट्स अगदी धन्य आहेत
नीरजाच्या सगळ्या पोस्ट्स ना + १, टु द पॉइंट !
सलमान खान एक एंटरटेनर म्हणून आवडतो आणि बालपणीचा क्रश , पण त्याच्या गुन्ह्यांना अजिबात माफी मिळु नये , या पेक्षा जास्तं कठोर शिक्षा मिळायला हवी होती असे मनापासून वाटले!
वाह हायझेनबर्ग, मस्त टोला
वाह हायझेनबर्ग, मस्त टोला हाणलात. भारतीय मानसिकतेला.
आम्ही चित्रपटवेडे लोक असे सहजी बहिष्कार म्हणून एखाद्याचे चित्रपट बघणे नाही सोडू शकत. अगदीच जर कोणत्या राजकीय पक्षाने स्वताच्या स्वार्थासाठी आपल्या भावना भडकावल्या तरच बहिष्कार टाकतो. मग पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये घ्या असे म्हणणार्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकतो, एखाद्या सत्यमेव जयते म्हणणार्याच्या चित्रपटांवर टाकतो, पण बॉम्बस्फोटाच्या कटात सामील असलेल्याच्या चित्रपटांवर नाही ..
असो, ते सारे विषय इथे नको.
पण जर इथे दारूवरच बहिष्कार टाकला तर पुढे भविष्यात अशी दुसरी घटना घडायची आपण टाळू शकणार नाही का.. पण अर्थात, हे देखील जमेल का.. , का यातही काळी फित बांधून मद्यप्राशन करून मृतात्मांना श्रद्धांजली द्यायची.
मी टीव्हीवरच्या न्युज चॅनेल्स
मी टीव्हीवरच्या न्युज चॅनेल्स बघणे केव्हाच सोडुन दिलय. मिडीया आचरट आहे.
सलमान वगैरे खानांचे सिनेमे थेटरमधे जाउन बघणे फार पूर्वीच सोडले आहे.
या अख्ख्या बाफावर ऋन्मेष ला
या अख्ख्या बाफावर ऋन्मेष ला काय म्हणायचे आहे तेच मला कळले नाही.:अओ: कळणार नाही, आणी आता कळण्याची ईच्छा पण उरली नाही. अर्थात, त्याला स्वतःला तरी कळले का हाच मोठा प्रश्न आहे.
त्याची आत्ताची इमेज काहिही
त्याची आत्ताची इमेज काहिही असो त्याने गुन्हा केला आहे आणि हे पुराव्याने कोर्टात सिद्ध झालेले आहे त्यामुळे इतर भारतीय नागरिकाला या गुन्ह्यात जी जास्तित जास्त शिक्षा दिली जाइल तिच त्यालाही लागु व्हावी..
त्याला कमी शिक्षा व्हावी हे अपिल करणे हास्यास्प्द तर आहेच पण न्याय्व्यवस्थेचा अपमान करणारे सुद्धा आहे. +११११११११११
बाकी सलमानला शिक्षा झाली तरी त्यातला निम्म्याहून जास्त वेळ "अचानक आजारपण येणं", "बरं न वाटणं" यामुळे बाहेरच जाणारे हे नक्की
काल फेबु ट्विट वर जे अंधानुकरण चाललेलं, सिस्टिमलाच दोष देणं ते बघता कीव यायला लागलीये लोकांच्या मुर्खपणाची.
नीरजाच्या सगळ्या पोस्ट्स ना + १, टु द पॉइंट ! +११११११११
अरे देवा
अरे देवा !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
झक्या, परमेश्वराचा धावा
झक्या, परमेश्वराचा धावा वारंवार करावा लागणारे आता
सलमानचा अंगरक्षक असलेल्या
सलमानचा अंगरक्षक असलेल्या रविन्द्र पाटील यांची झालेली वाताहत खालच्या लिंक वर वाचता येईलः-
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/If-your-heart-...
आता तरी लोकांनी लवकर शहाणे
आता तरी लोकांनी लवकर शहाणे होऊन या उथळ आणि खोट्या लोकांना डोक्यावर चढवूण ठेवणे बंद करावे.
http://www.mtalky.com/v/w.asp
http://www.mtalky.com/v/w.aspx?v=ZeeNews&i=152947
वरील लिंकमधे झी चे निरगुडकर माजी पोलीस संचालकांशी बोलताहेत. ते देखील पोलीसांनी या केस संदर्भात केलेल्या कामाचे गोडवे गात आहेत. पण "रवींद्र पाटील की विटनेस होता तर त्याला पोलीस संरक्षण का दिले नाही? त्याला पोलीस दलातून काढून का टाकले? हे प्रश्न विचारायची निरगुडकरांची हिंमत का झाली नसेल बरं?
बॉलीवुड आणि बुद्धी ह्या दोन
बॉलीवुड आणि बुद्धी ह्या दोन गोष्टींचा तसा फारसा सबंध नाही, पण काल फारच लो लेवल गाठली सगळ्या बॉलीवुड्यांनी, ह्याचा कळस होता अभिजीत भट्टाचार्य.
सलमानच्या शिनेमात तो एकटाच
सलमानच्या शिनेमात तो एकटाच असतो का ?
त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकला तर इतर कलाकार , तंत्रज्ञ यानी उपाशी मरायचे का ?
रिलान्सबाळाने अपघात केला म्हणुन रिलायन्स चा माल वापरु नका . असे कुणी बोल्ले नाही.
बॉलीवुड आणि बुद्धी ह्या दोन
बॉलीवुड आणि बुद्धी ह्या दोन गोष्टींचा तसा फारसा सबंध नाही, पण काल फारच लो लेवल गाठली सगळ्या बॉलीवुड्यांनी, ह्याचा कळस होता अभिजीत भट्टाचार्य.
>>>>>
हो त्याची वक्तव्ये / मुक्ताफळे व्हॉट्सपवर फिरत होती.
बॉलीवूड हा बिजनेस आहे ज्यात टॅलेंट नसले तरी प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी काहीबाही करावे लागते, काल त्याने तेच केले. याउपर सलमान ईंडस्ट्रीमधील कित्येकांचा गॉडफादर असल्याने त्याची चापलूसी करून काही कामही मिळू शकते.
Pages