Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53
सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...
न्याययंत्रणेचे अभिनंदन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरच भारतीय मिडिया ला नेपाळ
खरच भारतीय मिडिया ला नेपाळ मधुनच नाही तर भारतातुनही हाकलायला पाहिजे.
>>>
अगदी. फारच बालीश आहेत मिडियावाले
व्यसनांची चीड येऊन काय
व्यसनांची चीड येऊन काय उपयोग....
ती व्यसने करणार्यांची चीड आली तर उपयोग..
>>>
मी कुठल्याही व्यसनी माणसाबद्दल चीड नाही तर सहानुभूतीची भावना बाळगतो. किंबहुना त्यापेक्षा जास्त सहानुभुती त्याच्या जवळच्या लोकांबद्दल वाटते.
खरच भारतीय मिडिया ला नेपाळ
खरच भारतीय मिडिया ला नेपाळ मधुनच नाही तर
भारतातुनही हाकलायला पाहिजे.
>>>नाही हो, मिडीयात देखणेपनाच्या जोरावर शिरलेल्या बिंडोक बाया व फिमेल न्युजरीडर बाहेर् काढल्या तर मीडीया सुधारेल
ए ऋ बस्स रे
ए ऋ बस्स रे
>>>खरच भारतीय मिडिया ला नेपाळ
>>>खरच भारतीय मिडिया ला नेपाळ मधुनच नाही तर भारतातुनही हाकलायला पाहिजे<<<
मुळात भारतातूनच हाकलायला हवे आहे. मग नेपाळमध्ये जातीलच कसे?
१) हा प्रश्न दारु मुळे सलमान
१) हा प्रश्न दारु मुळे सलमान वाईट असे म्हणणार्यां साठी
काल कुठल्या तरी मराठी बातमी चॅनेल वर एक बातमी ऐकली-
दारुच्या नशेत एका बापाने (?) अपल्याच दिड वर्षे वयाच्या मुलाला तापत्या तव्यावर उभे केले. त्या बाळाचे तळपाय वाईट भाजले होते.
हि घटना लक्षात ठेवावी अशी नाहिये त्यामुळे जास्त माहिती नाहि.
आता इथे पण फ़क्त दारुच वाईट का?
>>
धन्यवाद,
आपण हा माझाच मुद्दा विस्तृत करणारी बातमी सांगितली.
बघा विचार करून, काय वाट लावते ही दारू..
>>>बघा विचार करून, काय वाट
>>>बघा विचार करून, काय वाट लावते ही दारू..<<<
ऋन्मेष,
तुमचे म्हणणे 'नेमके' काय आहे?
(No subject)
तुमचे म्हणणे 'नेमके' काय
तुमचे म्हणणे 'नेमके' काय आहे?>>
त्याचे म्हणणे बहुतेक असे असावे:
संसारा उध्वस्त करे दारू
म्हणून म्हणतो संसारच नका करू
बापरे भरपूर चर्चा झालेली
बापरे भरपूर चर्चा झालेली दिसते!!!
निर्णयाबद्दल न्यायालयाचे अभिनंदन. आता शिक्षा होऊ देत म्हणजे झालं!! सेलिब्रिटीनी काहीही केलं तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका होतेच असे निदान थोडेदिवस तरी वाटणार नाही.
मी तर म्हणतो रवींद्र
मी तर म्हणतो रवींद्र पाटीलच्या मृत्यूला अप्रत्यक्ष कारणीभूत सलमानच आहे त्याबद्दल हि सलमानला शिक्षा झाली पाहिजे.....
ऋन्मेष, तुमचे म्हणणे 'नेमके'
ऋन्मेष,
तुमचे म्हणणे 'नेमके' काय आहे?
>>
मला या सेलिब्रेटीला शिक्षा झाली, अन न्यायालयाचे अभिनंदन करा वगैरेमध्ये जराही फुशारक्या मारण्यासारखे काही वाटत नाही,
सलमान नुसता पैसेवाला असता आणि सेलिब्रेटी नसता तर उलट पैश्याची ताकद वापरून सुटलाही असता,
पण पॉप्युलर सेलेब असल्याने त्याची केस चर्चेत राहिली इतकेच, अन मग निकाल लावावाच लागला.
या देशात मोठमोठे उद्योगपती सरकारच्या खांद्याला खांदा लावून भ्रष्टाचार करत आहेत, ते असो वा नेते असो, भले भ्रष्टाचार भ्र्ष्टाचार असा आपण कितीही आरडाओरडा करो, कोणालाही शिक्षा होत नाही.
त्यामुळे काही भन्नाट घडलेय जे आता सर्वच बड्या हस्तींना वचक राहील या भ्रमात मी नाहीये.
तरी जो न्यायनिवाडा झालाय त्यासाठी न्यायववस्थेचे अभिनंदन मात्र मी करतोय. आणि सलमान/सेल्ब्रेटी हा विषय माझ्यासाठी तिथेच संपला.
त्या पुढे मी दारू पिऊन गाडी चालवणे या गुन्ह्याबद्दल मांडलेली मते आहेत, त्याचा सलमानशी काहीही संबंध नाही.
आणि अजून एक सहजच आण उगाचच सांगतो मी सलमानचा नाही तर शाहरूखचा चाहता आहे ज्याचे सलमानशी पटत नाही.
ओके. तुमची ही मते बरीचशी
ओके.
तुमची ही मते बरीचशी पटण्यासारखीच आहेत. असे असताना ह्या चर्चेवर तुमचे काही विरोधक का निर्माण झाले काही लक्षात येत नाही. असो.
बेसिकली सलमानला शिक्षा होऊ नये वगैरे असे तुमचे मत नाही आहे हे स्तुत्यच आहे. धन्यवाद.
या बया! मग हा धागा कामुन
या बया! मग हा धागा कामुन कहाडला?
http://www.maayboli.com/node/53326
रश्मी, प्ल्च! काय गं तू! आता
रश्मी, प्ल्च! काय गं तू!
आता काय करेल तो बिचारा
रीया, आता खरच 'ऋ'ला ब्रेक
रीया, आता खरच 'ऋ'ला ब्रेक द्यायलाच हवा.
रश्मी, सट्यॅक्! मस्त!!!
रश्मी, सट्यॅक्! मस्त!!!
काही प्रतिक्रिया खरचं
काही प्रतिक्रिया खरचं ताळतंत्र सोडणार्या आहेत
Aaj Tak
14 mins ·
हाईकोर्ट ने दी जमानत तो कुछ ऐसे मुस्कुराए 'भाईजान'...
Aaj Tak
8 mins ·
BREAKING NEWS: मुंबई: सलमान ने अपनी मां को कहा, 'मैं घर आ रहा हूं'
Aaj Tak
26 mins ·
सलमान और पेरिस हिल्टन की पार्टी केमिस्ट्री
Aaj Tak
36 mins ·
सलमान ने इस गरीब बुजुर्ग विधवा की मदद की थी...बनवा रहे थे इस महिला का टूटा हुआ घर...देखिए क्या है इस महिला की प्रतिक्रिया.
Aaj Tak
56 mins ·
अगर आप सलमान खान के फैन हैं तो उनकी माफी के लिए क्या दलील देंगे?
आप अपनी राय www,ichowk.in पर दें.
Zee 24 Taas
21 mins ·
कोर्टाचा ऑर्डर घेऊन सलमानची बहिण अलविरा धावली... आणि...
Zee 24 Taas
44 mins ·
सलमानची आई झाली बेशुद्ध... सलमान कोर्टात आईला काय म्हणाला....
वाचा सविस्तर बातमी
Swapnil Raut सलमान खान ला होणारी शिक्षा ही कमी करा
हाच तो सलमान खान जो गाईला आई मानतो...हिंदू धर्माला प्रथम प्राधान्य देतो घरी सर्व कार्यक्रम हिंदू धर्मानुसार करतो..घरी गणपती बसवितो..Being Human ही संस्था चालू करुन भारतातील सर्व अनाथ व गरीब मुलांना मदत करतो..हाच आहे असाच आहे सलमान खान..
प्ल्च हेच म्हणत होते मी. हे
प्ल्च
हेच म्हणत होते मी.
हे थांबायला हवं सगळं
एक हिरो म्हणुन सलमान मला
एक हिरो म्हणुन सलमान मला आवडतो. मी फॅन आहे त्याची पण त्याने केला तो गुन्हा आहे आणि गुन्ह्यासाठी शिक्षा होणं योग्यच आहे.
तरीही इथे काही प्रतिसाद आकसातुन लिहिल्यासारखे वाटले. अगदीच सल्मानला शिक्षा कधी होतेय अशी वाटच बघत होते अशा टाइपच्या काही प्रतिक्रिया वाटल्या. असो.
आणि तसेच त्याची शिक्षा कमी व्हावी. दारु दोषी वैगेरे बालिशपणा करणारे लोक पण कमालच.
आणि काही प्रतिसाद तर निव्वळ मनोरंजन करण्याकरता लिहिलेले असतात. खुप हसले मी. निव्वळ बालिशपणा.
>>न्याययंत्रणेचे अभिनंदन.
>>न्याययंत्रणेचे अभिनंदन. <<
नॉट सो फास्ट. पुरु राजकुमार, आकाश अंबानी इ. ना गजाआड करायला हिच यंत्रणा तोकडी का पडतेय?
उत्तर सोप्पं आहे - किमत चुकानेकि हैसियत रखते हो तो सब बिकाऊ है...
aplyapaiki kuni hi
aplyapaiki kuni hi pratyakshyat to manus mhanun kasa ahe he janat nahi,, karan kontahi kalakar aso va samany manus tyala tyachya vyatirikt ajun konich to manatun kasa ahe he sangu shakat nahi,, ekhada ruksh vyakti manatun mavu madhal asu shakto ani ekhada tondat sakhar ghevun firnara, krur papi asu shakto.. mi salman chi fan nahiye.. pan to mala avdat nahi ase hi mhanat nahi mi,, tyala kiti shiksha jhali kiti shikshecha to patr ahe yachyashi majh kahi ghen den nahi.. tyala tyachya gunhyachi janiv ahe mala avdhach samadhan ahe... nyayalayala je yogy vatle te tyanni kel... ani jar tyachya gunhyavar avdhich charcha hot asel tar ek mudda asa hi ahe ki bhartat lokanvar futpath var jopnyachi vel yeyi parent sarkar nyay vyavastha... etar bakichya saunstha... ghode vikun jhoplelech astat na..
ऋन्मेष भौंचा चपलेने हाणा .पण
ऋन्मेष भौंचा
चपलेने हाणा .पण मलाच सायेब म्हणा अशी गत झालीये.
सतत गोसिप करत राहून उलट्या सुलट्या कोलांट्या मारून लक्ष वेधत राहणे .
योग्य वेळी सावरला नाही तर तो मनोविकार ठरू शकतो
सलमान हाही माणूस आहे,
सलमान हाही माणूस आहे, आपल्यासारखाच.. त्याने दारू प्यायली आाणि त्या नशेतच गाडी चालवली. त्यानंतर झालेल्या अपघातात निरपराधांना जीव गमवावा लागला आणि त्यांना वाचवायचं सोडून तो तिथनं पळून गेला, त्याने चूक केली आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. जशी इतर कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला मिळाली असती.
तो सेलिब्रिटी आहे म्हणून इतके वर्ष हे प्रकरण चालतयं, हे खर तर त्याचंच दुर्दैव.. सरळपणे गुन्हा कबूल करून शिक्षा भोगायला तयार झाला असता तर तो आत्तापर्यंत जेलमधून शिक्षा भोगून बाहेरही आला असता. आत्ताही त्याने असंच करावं अस मला वाटतं. उर्वरित आयुष्य तरी शांतपणे जगता येईल. किती काळ असा शिक्षेपासून लांब पळणार तो ? उलट आयुष्यभर ती भीतीची टांगती तलवार लटकण्यापेक्षा एकदाच शिक्षा भोगलेली चांगली... त्याला जस्टीफाय करणं आणि त्याची कीव करणं यातून त्याचच नुकसान होणार आहे.
बेफिकीर, गैरसमज.. दारूला
बेफिकीर,
गैरसमज.. दारूला नावे ठेवणे म्हणजे ऋन्मेष सलमानला वाचवायचा प्रयत्न करतोय असा गैरसमज..
याउपर दारूला नावे ठेवल्यास काही जण त्या विरोधात उतरतात हा आजवरचा सगळीकडचा अनुभव.. अगदी ऑफिसातल्या चर्चेतही यावरून माझी कित्येकांशी खडाजंगी होते..
तसेच मला हा विषय या घटनेशी अवांतरही वाटत नाही.
कारण तसेही धागा एका ओळीच्या बातमीचा आहे, इथे त्यासंबंधित सर्व बाबीची चर्चा करायला हरकत नसावी ..
रश्मी यांनी वर ज्या माझ्या धाग्याची लिंक दिली ती खरे तर आता मीच देणार होतो..
@ रश्मीताई, काही लोकांना तो धागा समजला, काही जणांना नाही.... इतकेच म्हणेन
बाकी हल्ली मला लोकांच्या संवेदनशीलतेचे फार कौतुक वाटते.. आताच व्हॉटसप चेक केले.. एकूण एक ग्रूपवर माधुरी के दोन्हो साजन जेल मे आणि तत्सम विनोदी मेसेजचा खच पडलाय नुसता..
शाहीर, >> सतत गोसिप करत राहून
शाहीर,
>> सतत गोसिप करत राहून उलट्या सुलट्या कोलांट्या मारून लक्ष वेधत राहणे .
>> योग्य वेळी सावरला नाही तर तो मनोविकार ठरू शकतो
सहमत!
आ.न.,
-गा.पै.
जय@, >> मी तर म्हणतो रवींद्र
जय@,
>> मी तर म्हणतो रवींद्र पाटीलच्या मृत्यूला अप्रत्यक्ष कारणीभूत सलमानच आहे त्याबद्दल हि सलमानला
>> शिक्षा झाली पाहिजे.....
खरंय. सलमान सोबत चित्रपटसृष्टीतील इतर बडी धेंडंही अडकतील. रवींद्र पाटलांच्या शोकांतिकेत सिनेनिर्माते वगैरे मंडळींचा निश्चित हात असणार.
आ.न.,
-गा.पै.
मीनाक्षी आपला भितीची टांगती
मीनाक्षी आपला भितीची टांगती तलवारचा मुद्दा पटला.. आजवर सलमान ती एक शिक्षाच भोगत होता.. अर्थात आपल्याच कर्माने..
अवांतर
मला यावरून माझे अपेंडीक्सचे ऑपरेशन आठवले.. दीड दोन वर्ष घाबरून गोळ्या आणि पेनकिलरवर जगत, त्रास सहन करत होतो..
एकदा कमालीचे दुखायला लागले आणि त्या भरात ओरडलो की करून टाका एकदाचे ऑपरेशन.. चौथ्या तासाला मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो आणि पाचव्या तासाला बाहेर.. आता उर्वरीत आयुष्यात पुन्हा तो अपेंडीक्स कधी माझ्या वाट्याला जाणार नाही..
हो पण सलमान खानचा १५००करोड
हो पण सलमान खानचा १५००करोड रुपयांचा त्रास होता.
या कालावधीत त्याने अभिनय केलेल्या चित्रपटांचा व्यवसाय १५०० करोड रुपयांपेक्षा जास्त आहे.
असा त्रास जर कोणी भोगणार असेल तर.. !!
सलमान पुर्व आयुष्यात फार
सलमान पुर्व आयुष्यात फार ब्रॅट/मनमानी असा होता हे त्यानेच सान्गितलय, कॅसोनावा इमेज, अतिशय गुड लुक्स (टाइम्स मोस्ट डि़झायरेबल मधे येण्याईतके) त्यात स्टारपदाचा ऑरा यात त्या चुका घडल्यात, (म्हणजे त्या क्ष्यम ठरत नाही)
आत्ताची त्याची गुड बुक्स इमेज त्याने चुकातुन शिकत्,/जाणीवपुर्वक बदलली असावी, सत्य माहित असायला आपण कूणिच त्याच्या इतके जवळचे नाही..
त्याची आत्ताची इमेज काहिही असो त्याने गुन्हा केला आहे आणि हे पुराव्याने कोर्टात सिद्ध झालेले आहे त्यामुळे इतर भारतीय नागरिकाला या गुन्ह्यात जी जास्तित जास्त शिक्षा दिली जाइल तिच त्यालाही लागु व्हावी..
त्याला कमी शिक्षा व्हावी हे अपिल करणे हास्यास्प्द तर आहेच पण न्याय्व्यवस्थेचा अपमान करणारे सुद्धा आहे.
दारु वैगरे मुद्दे विषय भरकटावयला ठिक आहेत पण अजुन दारुच्या बाटलि वर खटला चालल्याचे एकिवात नाही
Pages