सलमान खान वरील आरोप सिद्ध.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53

सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...

न्याययंत्रणेचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रवी केंजळे तुमचं ही कठिण आहे. दारू प्या हो, पण घरात प्या,
नंतर रथसारथ्य करून लोकांचे जीव घेऊ नका म्हणजे मिळवलं.>>>>>>>>>>>>अहो दक्षिणा मी घरातच पितो ,आनि पिउन गाडी चालवत नाही.पिल्यानंतर माझा astronaut मोड ऑन असतो.

ओके नाऊ माय टर्न.

@बी,
आक्षेप, त्या शब्दाला नाही आहे.
त्या पोस्टमधील वर्णनाला आहे.
ते कोणत्या आरोपीने गुन्हा करताना काय केले याचे डीटेल वर्णन काढुन टाका. बाकी ठिक आहे.

त्या सर्चमध्ये हा माझा धागा आहे. तो कधी वाचला आहेत का कश्याबद्दल आहे ते?>>

नाही वाचला आणि तुमच्या ढिगभर धांग्याची इथे मी चर्चाही केलेली नाही. मी सुद्धा योनी हा शब्द तो हवाच होता म्हणून वापरलेला आहे. इथे आपाण इतके कन्झरवेटीव आहोत का की असा शब्द वापरला म्हणून चल ती पोस्ट उडव संपादीत कर अशा सुचना द्यायच्या. मी इतका नॅरो माईन्डेड नाही.

आलिया भट >>>
"आपल्या जवळची व्यक्तीला चूक असतानाही शिक्षा झाल्यावर फार दु:ख होते. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यासाठी उभे आहोत. " Rofl

सॉरी बी पण तु अती करतो आहेस. तुला काळं किंवा पांढरंच कळतं का फक्त? Angry
आम्ही इतके मागासलेले नाहि आहोत निव्वळ एका शब्दाला विरोध करायला. तुझी पोस्ट अस्थायी आहे शिवाय त्यात नको इतकं वर्णन आहे जे या घडीला गरजेचं नाही.

कमाल आहे खरेच लोकांना दारु बिरु न पिता एक नशा चढलेली असते. काय काय लिहितात त्यांनाच त्यांचे कळत नाही. जणू सबंध मायबोलिवर हा वा अशा प्रकारचे शब्द नाहीतच.>>
बी आक्षेप शब्दाला नाही.. त्या डिटेलिंगला आहे.
आणि तुम्ही ज्याप्रकारे भावना न समजण्याचं नाटक करताय ते अतिशय चीड आणणार आहे.

बी, तुम्ही महान आहात!

५ वर्षे हा भयंकर लहान कालावधी आहे.
सलमान वरच्या कोर्टात जाणार. त्याची शिक्षा कमी होणार नाही पण तो संजय दत्त सारखी रॉयल शिक्षा भोगणार.
शिक्षा कशी संपली ते आपल्याला कळनारही नाही कारण या ५ वर्शात तो सतत चर्चेत रहाणार
(पब्लिसिटी - मग ती कशीही होवो... अंतिम सत्य असतं अशा लोकांबाबत)
तो बाहेर आल्या आल्या त्याला १ सिनेमा मिळणार जो कदाचित त्याच्याच आयुष्यावर आधारित असेल. आणि मग तो सिनेमाही करोडो रुपये जमा करणार आणि हे साहेब पुन्हा संतपदाला पोहचणार!

हे माझे आराखडे!

आपण सतत भारतीय न्यायव्यवस्थेच्या नावाने ओरडतोय.. अर्थातच त्यांची चुक आहेच पण त्या बाबत इथल्या कित्येक मुर्ख फॅन्सचीही तितकीच चुक आहे.
अशा लोकांना डोक्यावर आपण घेतो म्हणून मिडिया फूटेज देते आणि म्हणुनच या असल्या शिक्षांनी त्यांना काहीच फरक पदत नाही.

दोष आम आदमीचाच आहे (पार्टी नव्हे. आपण सारे).
प्रत्येक बाबतीत.

*टायपोज सुधारले)

खरे तर ह्या सो कॉल्ड सेलिब्रीटींना सामान्य नागरीकांपेक्षा दुप्पट शिक्षा द्यायला पाहीजे. इथे तर १० वर्षाच्या ऐवजी ५ वर्षच दिली.

काय भिषण न्यायव्यवस्था आहे Sad

आता हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्ट मधे केस चालतील आणि सलमान तुरुंगाचे तोंड पण न बघता १०० व्या वर्षी मरेल.

शिक्षा झाली हे योग्यच झाले पण त्याला ती भोगावी लागेल याची शक्यता फार कमी आहे.
हा १३ वर्षाचा काळ गेला, त्यात त्याच्या वतीने किती तारखा मागितल्या गेल्या, ती माहिती बाहेर आली का ?
आपण गुन्हा केलाय याची त्याला पूर्ण कल्पना होती, म्हणूनच तो लग्न करायचे टाळत होता ( भावी बायकोला मला भेटायला तुरुंगात यावे लागेल, असे तोच म्हणाला होता. ) केसचे कामकाज नीट चालू नये यासाठी त्याने किती आटापिटा केला, ते कुणाच्याही लक्षात येईल.

या काळात, दुसरा एखादा गुन्हेगार असता तर कच्चा कैदी म्हणून तुरुंगातच राहिला असता. याने बक्कळ पैसा कमावला व त्यातून किंचीत रकमेचा दानधर्म केला.

अजून काळवीट हत्या खटल्याचा निकाल लागायचा आहे ना ?

>>>> अर्थातच त्यांची चुक आहेच पण त्या बाबत इथल्या कित्येक मुर्ख फॅन्सचीही तितकीच चुक आहे. <<<<
नक्कीच.
पण माझ्या मते, केवळ "फॅन्स" आहेत म्हणून सलमानच्या "रक्षणासाठी " उभारलेत असे नाही, तर सलमानचे समर्थन/संरक्षण करु पहाणारे, स्वतःही कधीना कधी अथवा नेहेमीच "दारू पिउन गाडी चालविलेले/चालविणारे" असतात व आज जे सलमानच्या वाट्याला आलय, ते कदाचित उद्या आपल्याही वाट्याला आले तर काय, म्हणून मग आत्ताच सलमानच्या संरक्षण/समर्थनाच्या निमित्तानेच झुंडीने "गांधीगिरी करीत" भारतीय कायदाव्यवस्थेलाच वाटाण्याच्या अक्षता लावता आल्या तर बघाव्यात हा अशांचा सूप्त हेतू असू शकतो.

या निमित्ताने "मिडिया, वेगवेगळी चॅनेल्स, वृत्तपत्रे, इत्यादिक कोणत्या बाजुने झुकतात, कोणत्या विधानांना जास्त प्रसिद्धि देतात हे बघणे औत्सुक्याचे राहील. (अर्थात फार वेगळे होणार नाहीच, जे संजयदत्त बाबत झाले तसेच होईल. खाल्ल्या मीठाला जागणे हा सज्जनांचा तसेच दुर्जनांचाही धर्म अस्तो - इति हभप लिम्ब्याम्हाराज)

अरे देवा ! विषय काय अन चर्चा कुठे
एक माणसाने दुसर्या माणसाचा जीव घेतला, त्याचा मुलभूत हक्क हिरावून घेतला आणि त्याला शिक्षा मिळाली.
ह्यात दुमत का असावे

चूक आणि गुन्हा ह्या गोष्टी वेगवेगळ्या असतात

टोचा अनुमोदन.

अरे त्या माधुरीला कशाला मध्ये घसीटता रे/ ओढता रे?:राग: घसीटाराम हलवाई कुठले!

दोन पोरे झाली तिला. काही दिवसानी ती पण सिनेमात येतील नाहीतर लग्नाचे होतील. वात्रट लोक्स कुठले.

काऊ Lol Rofl

ह्याला शिक्षा झाली तरी संजय दत्त सारखा २ दिवस आत आणि २ महिने बाहेर असं झालं तर ?
आज त्याच्या जागी माझा नातलग असता तर मी हेच केले असते.>>>
आणि मेलेल्या माणसाच्या जागी असता तर ? आई , वडील , भाऊ , बहिण , स्वतःचा नवरा , मुलगा , मुलगी इत्यादी पैकी कोणीतरी ? काय लोक झालेत आज काल

नीधप, >>>+११११

लॉअर कोर्टाने दिलेला निर्णय आहे हा. १-२ दिवस जेल मधे राहून बेल मिळवेल आणि बाहेर येईल. परत हायकोर्टात तारीख पडेपर्यंत आणि तिथलं वर्डिक्ट येई स्तोवर 'य' वर्षे जातील. त्याचे फॅन असा नाहीतर हितशत्रू असा, कायद्याच्या तरतुदींप्रमाणे आलेला निकाल आहे हा, त्यात इमोशनल होण्याचं काहीच कारण नाही. चॅरीटी करतो, चांगला माणूस आहे, ही शिक्षेत सवलत मिळण्यासाठी पुरेशी रादर असंबंधच कारणं आहेत.
अजून एक बाब यानिमित्ताने आज पहायला मिळाली. नेपाळी जनतेने थोबडवल्या नंतरही आपल्या मिडीयाचा माठपणा दिसून आला. आजचा निकाल हा एक राष्ट्रीय प्रश्न असल्याच्या थाटात, सगळेजण अपडेट्स देत होते. सलमान घरातून निघाला, कोर्टात पोचला, निर्णय ऐकताच त्याच्या आणि बहिणींच्या डोळ्यात अश्रू आले. आईची तब्येत बिघडली (यावर नंतर स्पष्टीकरण ही दिलं की आईची तब्येत बिघडली नव्हतीच मुळात !) काय नि काय !

टाइम्स नाउ वर जी काही मुक्ताफळे (सलमान विषयी) चालु आहेत ते पाहुन खरच भारतीय मिडिया ला नेपाळ मधुनच नाही तर भारतातुनही हाकलायला पाहिजे.

१) हा प्रश्न दारु मुळे सलमान वाईट असे म्हणणार्‍यां साठी
काल कुठल्या तरी मराठी बातमी चॅनेल वर एक बातमी ऐकली-
दारुच्या नशेत एका बापाने (?) अपल्याच दिड वर्षे वयाच्या मुलाला तापत्या तव्यावर उभे केले. त्या बाळाचे तळपाय वाईट भाजले होते.
हि घटना लक्षात ठेवावी अशी नाहिये त्यामुळे जास्त माहिती नाहि.
आता इथे पण फ़क्त दारुच वाईट का?

२) बी हा प्रश्न तुम्हाला-
मिनक्षी शेषाद्री, रुशी कपुर आणि सनी चा चित्रपट दामिनी आठवत असेलच.
'ढाई किलो का हाथ...' हा आणि अस संवाद लक्षात असेल पण जेंव्हा तो अमरिष पुरी दामिनी ला XXत्कार नक्की कसा झाला? कोण कुठे कसे होते इ इ घाणेरडे प्रश्न विचारत होता तेंव्हा चे मिनाक्षी चे संवाद आठवतात का?
XXत्कार म्हणजे काय हे माहित आहे मग त्याचे वर्णन काय करायचे?
बी तुम्ही जो शब्द-वर्णन वापरले आहे ते योग्या आणि अचुक 'शब्द' आहेत. पण ते वापरवेत कि नाही याचे तारतम्य हवे ना?
या मुळे समस्त स्त्रि वर्ग़ाला दुखवता आहात. आणि म्हणुन ते शब्द मागे घ्या

Pages