Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53
सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...
न्याययंत्रणेचे अभिनंदन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्याच्या चित्रपटावर बहिष्कार
त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकला तर इतर कलाकार , तंत्रज्ञ यानी उपाशी मरायचे का ?
>>
ईतर कलाकार व तंत्रज्ञांचे पेमेंट झाले असेल ना आधीच, मला नक्की आयडीया नाही, प्रकाश पाडा.
निर्मात्याचे नुकसान होऊ शकते, पण सलमानच्या चित्रपटांचा धंदा एवढा असतो की नुकसान न होता फायदा कमी होईल म्हणावे लागेल. पण तरी यातून संदेश तर जाईल.
उलट , मोठ्या कलाकारांचेच पैसे
उलट , मोठ्या कलाकारांचेच पैसे आधी मिळतात .
लहान लोक उधारीवरच असतात.
नीधप म्याडम सांगु शकतील.
त्याला कमी शिक्षा व्हावी हे
त्याला कमी शिक्षा व्हावी हे अपिल करणे हास्यास्प्द तर आहेच पण न्याय्व्यवस्थेचा अपमान करणारे सुद्धा आहे. +११११११११११
>>>>>>>
याला बरेच जण सहमती दर्शवत आहेत,
पण कमी शिक्षेचे अपील, दयेचा अर्ज याची तरतूद कायद्यात आहेच ना.
नेमका अपमान कसा होतोय न्यायव्यवस्थेचा, सलमानचे चाहते रस्त्यावर उतरून बंद करत नाहीयेत.
मला फार वाईट वाटते आहे कारण
मला फार वाईट वाटते आहे कारण सलमान आपल्यासारखाच नॉर्मल आहे>>>
आम्ही सलमान सारखे अब्नोर्मल नाही आहोत . आमच्या घशात आपोआप दारू जात नाही . ती आम्ही पिली तरच जाते आणि एका प्रमाणाच्या बाहेर गेली तरच नशा चढते .
त्यामानाने सल्मानने एकाही साक्षीदाराला धमकावल्याचा वगैरे प्रकार केला नाही>>>
त्याने direct साक्षीदाराला ढगात पोचवण्याचा प्रकार केला .
आजपर्यंत त्याने चॅरीटीवर 42 कोटी रुपये खर्च केले आहेत >>>
आभाळातून पडले का हे पैसे ? आपणच तिकीट काढून सिनेमा बघितल्याचे पैसे आहेत न हे .त्यापेक्षा फुटपाथवर झोपणार्या सगळ्या लोकांना घरात जागा दिली तर म्हणता येईल हो बाबा खरच काहीतरी केलय
ईतक्या सह्र्दयी माणसांना शीक्षा देन्यात आपल्या न्यायव्यवस्था मात्र आघाडीवर् असतात.>>>
जोक ऑफ दि डीकेड
आणि हो हे लोक रस्त्यावर झोपले नवते . फुटपाथवर झोपले होते . सल्ल्या ची गाडी रस्ता सोडून फुटपाथवर गेली होती
रस्त्यावर उतरून बंद केल्यावरच
रस्त्यावर उतरून बंद केल्यावरच न्यायव्यवस्थेचा अपमान होतो? लवकर मोठा हो रे बाळ ऋन्म्या.
एक्झॅक्टली !! नशेत.. वाईट
एक्झॅक्टली !!
नशेत..
वाईट खरी दारू आहे..
पण ते कित्येक जण पितातच ना..
सरकारही त्यावर बंदी आणतेय का?
आहे कोणाच्यात हिंमत या बेसिक कारणाविरुद्ध आवाज उठवायची?
>>>>>>>
बर्याच आधिच्या ऋन्मेष यान्च्या ह्या प्रतिसादावर त्याना ठार वेडे अ संवेदन्शिल मुर्ख पात्र, अशा अनेक पदव्या द्यायची इछा होत आहे..
ज्याना सलमान ना हम आपके.. हम साथ साथ बघुन दया वाटते त्यांनी विचार केला आहे का की त्या सिनेमामधे तो किती चांगला दाखवला आहे.. अगदी भिकारी ई. ना बघितल्यावर रडणारा जगाचा विचार करणारा .. आपल्या मनात पण तो तसाच आहे असे वाटत राहते .. पण खरतर तो त्याच शुटिंग दरम्यान हरिणांना मारत होता .. तो खरा तसाच आहे .. स्क्रिन इमेज वर जाउन उपयोग नाही..
पण आज त्याच्या पाठीराख्यांचा फार राग येत आहे..
हा धागा कॉमेडी झाला आहे. फेबू
हा धागा कॉमेडी झाला आहे. फेबू वरही काहिंच्या अकलेचे तारे चमकत आहेत.
म्हणत आहेत, रेपिस्ट मोकाट सुटले आहेत, आणि आमचा भाई जेलमधे जातॉ म्हणजे कॉय? :हताश झालेली बाहुली: अरे माठांनो, होईल ना रेपिस्ट्ना पण सजा ......१३ वर्षांनी...१४ वर्षान्नी, काय त्यात? चल्ता हय
ॠ, तुझं तुणतुणं चालू ठेव हां बाळ!! आम्ही करतो दुर्लक्ष
कपालबडवती आपण नाय करणार, माझं कपाळ बाष्कळ मुक्ताफळांपेक्षा मौल्यवान आहे 
निधप +१ सर्व मुद्द्यांना!
सलमानच्या शिनेमात तो एकटाच
सलमानच्या शिनेमात तो एकटाच असतो का ?>> सगळीकडे त्याचाच वावर असतो, हे सर्वजण जाणतात.
त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकला तर इतर कलाकार, तंत्रज्ञ यानी उपाशी मरायचे का ?>>> जस काही सलमानच यांना पोसतो. इंडस्ट्री मध्ये ढिगाने Production houses आहेत, जे दरवर्षी शेकड्याने फिल्म्स बनवतात. फक्त सलमानच्याच जिवावर हे कलाकार, तंत्रज्ञ लोक जगत नाहीत.
आता राहिला सलमानच्या ज्या फिल्म्स वर आधीच पैसे लागले आहेत त्याबद्दल, तर जो निर्माता सलमानला घेऊन फिल्म बनवत असेल तो कोणी सडक छाप नसणार(नसतोच), त्याच्याकडेही बक्कळ पैसा असनार.
आता फिल्म असोसियेशन, कलाकार व तंत्रज्ञ यांना फिल्म असोसियेशनचे एक कार्ड देते ज्यानुसार तुम्ही फिल्म असोसियेशनचे मेबर असून तुम्ही तंत्रज्ञ म्ह्णून काम करण्यास पात्र ठरता.
तर शक्यतो अशी मोठी production houses अश्याच तंत्रज्ञ लोकांना घेतात की ज्यांच्याकडे फिल्म असोसियेशनची कार्डे आहेत. त्यामुळे त्या श्रीमंत निर्मात्याकडून कलाकार व तंत्रज्ञ यांना फुल ना फुलाची पाकळी नक्कीच मिळेल.
पण खरच जर बहिष्कार टाकला, तर त्यामुळे सलमानची(आणि त्याच्या सारख्या इतरांची) रग उतरेल, इतर कलाकारांना त्यातून धडा मिळेल तसेच भारतीय प्रेक्षक अभिरुची संपन्न आणि प्रगल्भ झाले असा समज(तरी) निर्माण होईल,
प्रशू, हे कुणाला समजावताय?
प्रशू, हे कुणाला समजावताय?
लोल, थोडा उशिराच प्रतिसाद
लोल,
थोडा उशिराच प्रतिसाद पडला, असो... तसही कोणाला समजाउन काहीच उपयोग नाही. पण काउ आणि ॠ चे प्रतिसाद वाचून राहवल नाही म्हणुन. 
माझ मी स्वतः ठरवल आहे..
माझ मी स्वतः ठरवल आहे.. सलमानचा दबंग खुप बघितला होता एकमेव चित्रपट थिएटर मधे ..
आता इथुन पुढे एकही नाही बघणार.. तो अगदी छोट्या भुमिकेत असेल तरीही नाही..
रवी केंजळे, >> सगळ्या
रवी केंजळे,
>> सगळ्या अल्कोहोलवर का खटला भरावा???????,मी सांगतो ,इथेनॉलवर खटला भरा.
इथेनॉलवर खटला कशाला? कित्येक मोटारींमध्ये इथेनॉल भरतात. मोटारींना कुठे नशा चढते? चूक सलमानचीच आहे.
आ.न.,
-गा.पै.
_आनंदी_ तुमचं अभिनंदन. मी
_आनंदी_ तुमचं अभिनंदन. मी असल्या लोकांचे सिनेमे बघणं केव्हाच सोडून दिलेलं आहे. किमान माझे पैसे तरी यांच्या खिशात नको.
गेल्या बारा वर्षात कुठलाच
गेल्या बारा वर्षात कुठलाच चित्रपट टॉकीजवर बघीतलेला नाहीये. त्यामुळे किती पैसे वाचलेत याचा हिशेब करावा लागेल. बाय द वे, काल प्रतीसादान्च्या गारा डोक्यावर टणाटण आपटल्या, आज रीपरीप आहे.:फिदी:
रश्मी मी संजय दत्त आणि
रश्मी
मी संजय दत्त आणि शाहरुखचे चित्रपट टीव्हीवर लागले तरीही बघत नाही. आणि सलमानचे वेडेवाकडे हावभाव (अभिनय?) बघण्याचा त्रास मी करून घेत नाही.
<<बाय द वे, काल
<<बाय द वे, काल प्रतीसादान्च्या गारा डोक्यावर टणाटण आपटल्या, आज रीपरीप आहे.फिदीफिदी>>>
( जामीन २ दिवसान्चा आहे)
बरोबर
पण उद्या परत गारपिट होणार
सलमानच्या हातातून "जर" अपघात
सलमानच्या हातातून "जर" अपघात "चूकून" झाला असता तर एक वेळ वाटले असते.
पण त्याने एकाच डावात बरेच गुन्हे केले.
१) गाडी स्पीड च्या बाहेर चालवणे , त्यामुळे कंट्रोल करु शकता न येणे.
२) गाडी दारूच्या अंमलाखाली चालवणे
३) आपण गुन्हा केलाय हे माहित असूनही, कोर्टाची दिशाभूल करणारे पुरावे दाखवत बसणे.
आता लोकं म्हणताहेत, सेलीब्रीटी आहे म्हणून उगाच खेचलय बिचार्याला. पण का नाही? हा सेलीब्रीटी लोकांच्या प्रेमाखातरच झालाय. इतकी जरी कदर असती समाजाने दिलेल्या दर्जाची तर एक जबाबदारी असते. किमान दारू न पिण्याची. कारण सामान्य माणसापासून ते उच्चभ्रु ह्यांना हा तरी नियम पाळायलाच पाहिजे.
आता कितीही चांगली कर्मे केली तरी एका निरपराध माणासाची हत्या आपल्या बेफीकीर स्वभावाने होणे चुकीचेच आहे.
सामान्य माणूस तरी घाबरून कबूल केला असता पकडल्या गेल्याबरोबर. अथवा कबूल करावा लागला असता.
मग एका 'दर्जाची' किंमत समजा वा काय ते, ती द्यावीच लागणार बेजबाबदारीने वागल्याचे. इथे तर पैशाचा माजही नाकारता येत नाहीच. सुटु आपण पैसा चारून हा जो माज असतो ना श्रीमंताचा(सर्व बेदरकार पद्धतीने वाढलेल्यांचा आणि त्यात पैसा सुद्धा असलेल्यांचा) तो हि अंगास येतो कधी कधी.
आणि त्या कधी कधी हा "आतापुरता" बकरा बनलाय.
नाहितर असे इतर बरेच श्रीमंत माजोरे बैल (इथे बकरा म्हणत नाहीये) सुटतातच.
बाकी, त्याच्यासाठी प्रार्थना वगैरे निव्वळ जोक आहे. तो सलमान असो वा कोणीही; माजोरीपणा दाखवून, असा प्रकारचा कायदेभंग (जिथे एक हत्या, आणि चार जखमी) करणार्यास माफी मागणे विनोद आहे.
तळटीपः सर्व बैल व बकरे प्राण्यांची माफी मागून. बिचार्या त्या प्राण्यांचा अवमान होतोय ह्याची जाणीव आहे. पण हा माझा दोष नसून मराठी भाषेत वापरल्या जाणार्या "उपमेचा" आहे.
अच्छा माझा एक (बालिश) प्रश्न
अच्छा माझा एक (बालिश) प्रश्न आहे, या असल्या सेलेब्स ना तुरुंगात नॉर्मल Treatment मिळते का त्यांच्यासाठी काही V.I.P सोय असते.
म्हणजे सलमान अथवा संजय इतर कैद्यांप्रमाणे, त्या टिपिकल तुरुंगीय ड्रेस मध्ये, त्या फुटकळ ताटलीत ते बेचव अन्न(सिनेमात पाहिल्याप्रमाणे) खात असतील का?
या सगळ्यामध्ये हास्यास्पद
या सगळ्यामध्ये हास्यास्पद प्रकार म्हणजे काही महाभाग सलमानच्या सुटकेसाठी (आता शिक्षा कमी होण्यासाठी) प्रार्थना करत आहेत.
>>>
लॉजिकली हे हास्यास्पद वाटले तरी प्रॅक्टीकली काही गैर नाही.
उदाहरणार्थ आपल्यापैकी कोणाच्या मुलाच्या हातून अॅक्सिडंट झाला तर आपण त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी अशीच प्रार्थना करणार ना.>>स ह म त.
आपल्यापैकी कुणीच तुरुंग आतून
आपल्यापैकी कुणीच तुरुंग आतून बघितलेला नाही (नसावा) तेव्हा आत नक्की काय चालतं हे सांगणं कठीण आहे. पण ड्रेस कुठलाही असला तरी ट्रीटमेन्ट विआयपी मिळत असावी. झोपताना कासवछाप, पंखा वगैरे.
उदाहरणार्थ आपल्यापैकी
उदाहरणार्थ आपल्यापैकी कोणाच्या मुलाच्या हातून अॅक्सिडंट झाला तर आपण त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी अशीच प्रार्थना करणार ना.>>स ह म त
>>
आणि गाडीखाली चिरडला गेलेला तुमचा मुलगा असेल तर मात्र गुन्हेगाराला जास्तीतजास्त शिक्षा व्हावी असा प्रयत्न. बरोबर ना? सहमत का?
सलमानसाठी प्रार्थना
सलमानसाठी प्रार्थना करणार्यांना एक ऑफर "तुम्ही २ दिवस जेल मध्ये जा आणि सलमानची एक दिवस सजा कमी करा "
>>रिलायन्स बाळाचा गुन्हा
>>रिलायन्स बाळाचा गुन्हा ड्रायव्हरने घेतला ना अंगावर. सलमानपेक्षा फार स्मूथ निघाले ते लोक. एकही विटनेस पुढे येऊ दिला नाही>><<
आणि हेच लोकं हॉस्पिटलं काढून आम्ही कमी दरात रुग्ण सेवा करतो अशी जाहिरात करतात.
आपल्यापैकी कुणीच तुरुंग आतून
आपल्यापैकी कुणीच तुरुंग आतून बघितलेला नाही (नसावा) >>>

झोपताना कासवछाप, पंखा वगैरे. >>>
फारच विषयांतर झाले....
फारच विषयांतर झाले....
एव्हढे सगळे प्रतिसाद वाचले
एव्हढे सगळे प्रतिसाद वाचले नाहीत, पण कुणी इथे अॅड्मिरल नंदा यांच्या मुलाच्या केसचा उल्लेख केलाय का? त्याचे वडील नेवीत खूपच मोठ्या स्थानावर होते आणि निवृत्तीनंतर एक बडे आर्म्स डीलर बनले होते. यांचा मुलगा दिल्लीत टग्या म्हणूनच प्रसिद्ध होता आणि आपल्या नवीन टोयोटा गाडीत मित्रांच्या टोळक्यासह मध्यरात्री भरधाव फिरताना याने आठ जणांना उडवले होते. पहिले काही दिवस सनसनाटी निर्माण झाल्यावर ती केस अल्लाद पेपरांतून अदृश्य झाली. त्याला सजाही झटपट आणि कमी मिळाली असे म्हणतात.
गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे हे खरे, पण कायद्यापुढे सगळेच सारखे असावेत.
सेलेब्रिटीच्या केसमध्ये सनसनाटी बातम्या मिळतात म्हणून केस लावून धरली जाते, वर्तमानपत्रांतून जिवंत राहाते, केस लावून धरणार्यांना (याचिकावाले इ.) जरा जास्तच शूरत्व, वीरत्व इ. मिळते असे कधीकधी वाटून जाते.
सलमानला खरी शिक्षा आपण
सलमानला खरी शिक्षा आपण त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकून देऊ शकलो असतो,
मात्र ते आपल्याला देशद्रोही संजय दत्तबाबतही जमले नाही >>> ह्याबद्दल तुम्हाला अनुमोदन ऋन्मेष.
ज्या न्यायव्यवस्थेला १३ वर्ष
ज्या न्यायव्यवस्थेला १३ वर्ष न्याय द्यायला लागली त्याच न्यायव्यवस्थेकडून ३ तासात जामिन मिळवला गेला.
काय गंमत आहे ना ?
जगात असे काही देश आहेत जेथे
जगात असे काही देश आहेत जेथे गुन्हेगाराला प्रथम 'आत' टाकण्यात येते आणि तो निर्दोष आहे हे त्यानंतर सिद्ध करत बसण्याचा प्रयत्न करणे ही त्या गुन्हेगाराची जबाबदारी असते.
आपल्याकडे उलटे आहे. आपण त्याला आत का टाकत आहोत हे सिद्ध करण्याच्या कालावधीत त्याला बाहेर ठेवतो.
खरे तर आपल्याकडील न्याययंत्रणा आणि कायद्याची अंमलबजावणी ह्यात काही चर्चा करण्यासारखे आहे तरी का?
संजय दत्त झाला, सलमान झाला, तो सैफ अली खान झाला! हे लोक आत गेले काय आणि बाहेर आले काय!
आपली न्याययंत्रणा योग्य काम करते की नाही हे पाहण्यासाठी आता एक नवीन न्याययंत्रणा निर्माण करायला हवी.
पण जर एखादा गुन्हेगार कलाकार
पण जर एखादा गुन्हेगार कलाकार असेल तर तर त्याच्या कलेसाठी आपण त्याला बघितले, त्यालावाखाणले तर त्यात चुक की बरोबर? मला योग्य उत्तर सापडत नाही. ह्याबाबत मी जरा संभ्रमात आहे पण थोडे असे वाटते आहे की गुन्हेगार व्यक्तीच्या कलेकडे रसिक नजरेने बघावे. त्या कलेचा अपमान करु नये. तिची उपेक्षा करु नये. तुमचे मत काय?
Pages