निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक, दिनेश च्या लेखांच्या लिंक्स इकडे दिल्यास, फार छान केलंस..

दिनेश ने आत्मीयतेने लिहिलेलं वर्णन पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटणारे आहे..

सगळ्यांचे फोटो सुंदर..

घराजवळच्या काही गुलमोहरावर एक-दोन फुलं यायला लागली आहेत. isn't it a little early? >>>>> माझेही असेच निरिक्षण आहे की, गुलमोहोर पूर्ण फुलला कि पाऊस पडतो. पण यावर्षी वर्षभर कुठल्या ना कुठल्या गुलमोहोरावर दोन-चार दोन-चार फुले पाहिली. तसा पाउसही परत परत येत राहीला आणि वातावरणही कधी कधी ढगाळ राहिले. जसे आज आहे, कांदिवली, मुंबई येथे.

या वरील फोटोत जे दिसतात ते रेड व्हिस्कर्ड बुलबुल... माझ्या लहानपण, तरुणपण जेव्हा आठवतो तेव्हा हे बुलबुल शहरात फारसे दिसत नसत, पण सध्या मात्र खूप दिसतात... >>>>> अगदी बरोबर. आता पक्षांनीही शहरांना आपलेसे केलेले दिसते. त्यांच्यात वाढही दिसते. सध्या माझ्या घ्रराच्या परिसरात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी "fantail fly catcher" ची संख्या आणि धीटाई वाढलेली दिसते.

>>> वातावरणही कधी कधी ढगाळ राहिले. जसे आज आहे, कांदिवली, मुंबई येथे. >>> दहिसरला सुद्धा आज धुकट वातावरण आहे. मला शंका आहे १-२ वर्षापूर्वी जसे दुबईच्या वादळातली वाळू हवेने वाहत आलेली तशीच गेल्या आठवड्यातल्या वादळाची वाळू असावी.

रेड व्हिस्कर्ड बुलबुल अजून मी मुंबईत नाही पाहिला. पण रोझी स्टर्लिंग बघून मला आश्चर्य आणि आनंद वाटला! Happy

वरती सोनमोहोरचा उल्लेख केला आहे. हा बहावा का? कुणी फोटो टाका न!
दिनेशच्या लिंक साठी दिनेश आणि शशांक दोघांना धन्यवाद. मस्त माहिती.

एम आय डी सी परिसरात परत जायला मिळाले तर सोनमोहोराचे फोटो काढेन. सोसायटीतले थोडेच फुललेत. बहरले नाहीयेत.

नगरमध्ये धुळीचे वादळ अशी बातमी वाचली टीव्हीवर.

सुप्र निगकर्स........
अग्गोबाई अन्जू इथे काही नाही पोचलं. तसं छुपं धुळीचं वादळ रोजच घोंघावत असतं इथे. सकाळी फर्निचर पुसलं तर संध्याकाळी बोटं उठतात.
या सीझनचा मोगरा फुलला. मस्त टपोरी फुलं आहेत.

,'परत आयपॅड आणि वायफायचं भांडण झालंय. अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!!! काय हा त्रास..

मुंबई त अजून उन्हाळा नीट सुरु ही नाही झालाय पण पाण्याची चणचण चालू झालीये ऑलरेडी.. Sad

बाथरूम्स मधे भरलेल्या बादल्या पाहून अस्वस्थतेचे चे महापूर आलेत.. Uhoh Angry

कान्ट हेल्प कंपेअरिंग... , यू नो विथ विच कंट्री!!! Happy

वीज ,पाण्या ची कमी , वीक ऑर नो वाय् फाय , पुअर मेंटेंनन्स च्या लिफ्ट्स , ड्रेनेज प्रॉब्लेम्स , रस्त्यावरचे खड्डे ,

खड्ड्यातून साठलेले कुठेतरी फुटलेल्या मु पा च्या नळातले/ गटारातले पाणी, रस्त्यांच्या कडेला जागोजागी

पडलेला फुलांचा कचरा, हंसल आणी ग्रेटल च्या गोष्टी सारखे सरळ कोणत्या

तरी देवळा च्या दारात घेऊन जाणारे रस्ताभर विखुरलेले प्रसादाचे असंख्य रिकामे द्रोण , फुटके किंवा नो फुटपाथ...

ऊप्स!!! कैसे कहूँ.. बॉम्बे मेरी जान!!!!! कॅन नॉट!!!!

... Sad Sad

मुंबई चे शांघाय.. अ बिग पुअर जोक!!!

सॉर्री फॉर द आऊटबर्स्ट!!!!!!!

सगळ्यान्ची माहीती मस्त.

घराजवळच्या काही गुलमोहरावर एक-दोन फुलं यायला लागली आहेत. isn't it a little early? > असे का म्हणता? गुलमोहर सगळीकडेच बहरला आहे. आमच्या चुनभट्टीत तर सगळीकडे मस्त बहरला आहे इन्फॅक्ट एका गल्लीचेच नाव गुलमोहर गल्ली आहे ...

चेंबूर मधे पण सगळीकडे गुलमोहर बहरला आहे.

जागुतै- खंड्या मस्तच

माझ्या रोजच्या वाटेवर करंजाचे एक झाड आहे.
त्याच्या खालुन जाताना जर सांडलेले कुरमुरे दिसले कि समजावे करंज फुललाय.
त्याच्या फुलांचा सडा अगदी कुरमुर्यांसारखाच दिसतो.

20130428_1103451_0.jpg

मुंबई चे शांघाय.. अ बिग पुअर जोक!!!

सॉर्री फॉर द आऊटबर्स्ट!!!!!!! >>>>>>> इट्स ओ के - परिस्थिती बदलण्यापेक्षा मनस्थिती बदलणे आवश्यक आहे ना ?? Happy Wink (फिलॉसॉफी मूड)

माझ्या रोजच्या वाटेवर करंजाचे एक झाड आहे.
त्याच्या खालुन जाताना जर सांडलेले कुरमुरे दिसले कि समजावे करंज फुललाय.
त्याच्या फुलांचा सडा अगदी कुरमुर्यांसारखाच दिसतो. >>>>>>> पर्फेक्ट वर्णन ....

आणि ह्याची पानं पण मस्त तुकतुकीत दिसतात ह्या दिवसात. >>>>> हे देखील नेमके वर्णन - एकूणात सर्व चैत्रपालवीच तुकतुकीत, झळाळती दिसते .... Happy

अंजू थांकु..

शशांक.. परिस्थिती/ मनस्थिती . हम्म्म्म्म!!! Happy अरे इकडे आल्यावर मनस्थिती ला सारखंच फिलॉसॉफी मूड

मधेच ठेवावं लागतं.. नैतर कठीणै.. Wink जस्ट कभीकभार. आयेमवोक्के नाऊ Happy

कुरमुर्‍याचं झाड... पर्र्फेक्ट सिमिली.. Happy Happy

निग वर येऊन नेहमीच फ्रेश आणी प्रसन्न वाटतं..

शशांकजी धन्यवाद!!! दिनेशजीन्ची लिन्क अतिसुंदर आहे. खुप अनमोल माहितीचा खजाना सापड्ला ...

ऊप्स!!! कैसे कहूँ.. बॉम्बे मेरी जान!!!!! कॅन नॉट!!!!>>>>>>>>>> येस्स वर्षू आय कॅन इमॅजिन!
शशांक इथेही या पिवळ्या फुलांची झाडं आहेत. ही कोणती फुलं?

तरी भारतातल्या इतर शहरांपेक्षा मुंबई जरा बरी म्हणायला हवी निदान थोडी शिस्त, ट्राफिक नियम जरातरी पाळले जातात.

>>>>जमिनीवर या फुलांचे अक्षरशः सडे पडलेले असतात >>>> copper pod.

>>>> चेंबूर मधे पण सगळीकडे गुलमोहर बहरला आहे. >>>> मी एप्रिल अखेर, मे, जून असा गुलमोहराचा काळ समजते. त्या दृष्टीने जरा लवकर. पण फार नाही. Happy

ग्रामीण भागात करंज्याच्या बिया गोळा करून त्या विकणे हा एक उद्योग आहे. याचे तेल फार उग्र वासाचे असते. दिवा बत्तीला वापरता येते. ते अंगाला चोळले तर डास चावत नाहीत.. पण त्याचा वास एवढा उग्र असतो, कि झोपणे अशक्य होते.

या झाडाची आणखी एक गंम्मत म्हणजे याच्या खोडावर एनेग्रेव्ह केलेली नावे, काही महिन्यांबी एम्बॉस केल्यासारखी दिसतात.

>>>>जमिनीवर या फुलांचे अक्षरशः सडे पडलेले असतात >>>> copper pod. --- येस्स - पेल्टोफोरम .... Happy

हे काये ???

P1010802.jpg

ते स्वर्णमोहाराचे फुल बंद वहीत ठेवले तरी त्याचा रंग तसाच रहातो. ग्रीटिंग कार्ड साठी पण ती फुले उपयोगी पडतात .
हे फुल करन्ज्याचे का ?

ईनमीन तीन >> तुम्ही दाखवलेल्या झाडाला आम्ही करंजीच झाड म्हणतो .. काते मैत नै . माझ्या घरी पन आहे हे झाड .. नेहेमी हिरव राहण्यासाठी फेमस.. खासकरुन विदर्भाकडे जिथ पानगळणारी झाडे असतात तिथ उन्हाळ्यात हे झाड बघ्ण म्हणजे डोळ्यांना सुख Happy

शशांक, करंज्याचं फुल खूप सुंदर. किती इवलसं असतं ते पण फोटो किती छान आलाय. तो कोनफळी रंग सुंदर टिपलाय.

https://ssl.panoramio.com/user/1582303

https://ssl.panoramio.com/photo_explorer#view=photo&position=149&with_ph...

कृपया या लिंकवर जगभरातले जे अफलातून फोटो (पॅनोरेमिक व्ह्यू) टाकलेले आहेत ते पहा - केवळ ग्रेट - शब्दातीत...

तुम्ही दाखवलेल्या झाडाला आम्ही करंजीच झाड म्हणतो .. काते मैत नै >>>
टीना, याची फळं / शेंगा करंजीच्या आकाराच्याच असतात.
हल्ली याच्या बियांचं तेल बायोडीझेल तयार करण्यासाठी वापरताहेत.

Pages