निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजू,
टोपलीत आहेत ती मोहाची फुलं आहेत होय! मी शेवटच्या फोटोत शोधत होते. ती वाळवायला ठेवली आहेत का? मी पहिल्यांदाच पाहाते आहे. हा मोठ्या पानांचा मोहा असावा.
मी जो मोहा पाहिला आहे त्याची पाने निमुळती होती. आणि फुले अगदी छोटी. आपल्याकडे / दक्षिणेकडे हा निमुळत्या पानांचा मोहा जास्त आढळतो.

सागरगोटयाचे फुल मीही प्रथमच बघितले.मी अगदी लहान होते तेव्हा आमच्या बागेत त्याचे झुडूप होते व त्याला सागरगोटे येत असत,पण त्याची फुले पाहिल्याचे स्मरत नाही.कदाचित तेव्हा त्यात रस नसावा.

टेंटू माहित असूनही पाहिला मात्र नव्हता. त्यामुळे छान वाटले. धन्यवाद उजू!

मोहाची फुलेही छान मंजुताई.

हम्म मोहाची फुले फक्त फोटोत पाहिली आहेत पण साधनाताई आणि जिप्स्याने मोहाचे झाड दाखवले होते राणीच्या बागेत.
सर्वांचे प्रचि सुंदर Happy

याचे नाव काय आहे? >>> सरिवा - हे बहुतेक Duranta erecta असावे .... (गोल्डन ड्युरांटा) - कृपया गुगलून कन्फर्म करणार का ???

शशांकजी, बहुधा तेच असावे. त्याबरोबर फुलेही असतात असे म्हटले आहे,ती मात्र नव्हती.नाहीतर ओळखणे सोपे झाले असते. धन्यवाद

नेटवर या नावाने जे झाड दिसतेय ते आपण गणपतित शोभेसाठी ज्याची केशरी फळे वापरतो आणि ज्याला फिक्कट जांभळी फुले येतात ते आहे. त्याचे छोटे झुडूप असते. हे झाड मोठे दिसतेय.

गोल्डन ड्युरांटा हे वीस फुटापर्यंत उंच वाढू शकते (विकीपीडिया). पाने आणि फळे यावरुन तरी हे गोल्डन ड्युरांटाच वाटते आहे........

वा ! सुरेख माहिती मिळतेय!
दिनेशदा, मोहाची फुले म्हटल्यावर मला तुमचीच कथा आठवली. Happy

चर्चगेटला योगक्षेम इमारतीबाहेर हे गोल्डन ड्युरांटा पाहिलंय. तेव्हा नाव माहित नव्हते. उंची साधारण ५-६ फुट. पण त्या झाडाला इतक्या मोठ्या प्रमाणावर फळे नसतात. फुले आणि फळे दोन्ही साधारण नखाएवढी. घोसासारखी फुले आणि फळे सुंदर दिसतात.

प्रस्तावना, माहिती, प्रचि सगळेच सुरेख आणि मस्त आहे.

शशांक, जागू, सायली तुम्हा सर्वांच्या बागेला भेट द्यायला नक्की आवडेल.

Duranta erecta - याला जांभळी सुरेख फुले येतात व वर दिसतात तशी छोटी फळेही पण ....
The leaves and berries of the plant are toxic, and are confirmed to have killed children, dogs and cats. However, songbirds eat the fruit without ill effects. (विकीपीडियावरुन साभार ....)

खूप संत्री आली आहेत एका शेतातून.त्याचं सरबत करून ठेवलं आहे. त्यात प्रेझर्वेटिव घालावं का? काय घालावं आणि किती प्रमाणात? प्लीज सांगा.

मारूती चित्तमपल्लींच्या पुस्तकात मोहाच वर्णन खूपदा वाचलय आजपर्यंत अन दां ची कथा पण.
राणीच्या बागेत झाड पण पाह्यलय. फूल नाही.

सागरगोट्याची जाळी असते. म्हणजे मी जाळ्याच बघितल्या आहेत. लहानपणी शाळेत जायच्या वाटेवर एक ग्राऊंड - ओपन सरकारी जागा होती. अजूनही आहे ते ग्राऊंड नशिबाने. फक्त त्याला आता कंपाऊंड घातलेय भिंतीचे. तर तिथे खूप जाळ्या होत्या सागरगोट्याच्या. आम्हा मूलांना सागरगोटे गोळा करण्यासाठी लवकर निघाव लागे घरून. सागरगोट्याला काटे असतात खूप, त्यामुळे हातापायावर ओरखडे आल्याशिवाय सागरगोटे मिळायचे नाहीत कधीच. तरी पण आम्ही त्या काट्यांची पर्वा न करता वाकून त्या जाळ्यांमध्ये शिरून सागरगोट्याच्या शेंगा गोळा करत असू. मग बाहेर येऊन त्या शेंगा ( त्याही फर काटेरी असतात) दगडाने फोडून सागरगोटे काढत असू. हाताची बोट चांगलीच जायबंदी होत ह्या सार्‍या उद्योगात. पण खेळायला, सागरगोटे जमिनीवर घासून दुसर्‍यांना चटके द्यायला फार मजा यायची, सो तो त्रास सहन करायचो आम्ही.
इति सागरगोटे पुराण समाप्त.

लिंबू, मोसंबी, संत्री, कढिपत्ता (कढीलिंब), कुंती (कामिनी) सगळे एका कुळातले .....
Rutaceae

सागरगोट्याचे चटके..स्स्स्स्स्स्स..... आठवले आठवले...

इस्पेशली सागरगोट्या खेळताना हरणारा खेळाडू चिडून समोरील खेळाडूवर उट्टं काढताना वापरायचाच..

कारण हरणार्‍याला भयंकर चिडवण्याची प्रथाच होती नं... Proud

म स्त गppa फो टो...
कामिनी काय हे कीत्ती दिव स गायब होतीस...
मी इ त र कला विभागात आज एक रांगोळी टाकली आहे.
़ज म ल्यास ब घ णे...

उजू लिंबाची कळी काय फ्रेश आहे!
शशांक हे फूल मंदारासारखे दिसतय. नाहीये मंदार.

फुलांनी डवरलेला कढिलिंब".........

मिसला होता मी हा धागा वाचता वाचता ..
सुंदर लिहिलय आणि कित्ती वेगवेगळी फुलं बापरे बाप .. सगळचं प्रसन्न वाटतय.. मी पण माझ्या घरचे दारचे प्रचि डकवते थांबा.. शोधते पहिले कुठसा ठेवलेत ते ..

हा उलटा रावण .. हो आमच्याकड हेच म्हणतात.. कुणाला आणखी एखाद नाव माहिती असल्यास सांगणे ..

parasatali ful (1).JPG

हि माझी लाडकी अबोली :

parasatali ful (2).JPG

याच नाव नै माहिती Sad :

parasatali ful (3).JPG

गुलाब::

parasatali ful (4).JPG

इसका बी नाव नै पता : शो च झाड म्हणूया Proud

parasatali ful (5).jpgparasatali ful (6).jpg

आणि मे आय प्रेझेन्ट यु द मोस्ट प्रिशीयस झाड इन माय अंगण :

parasatali ful (7).JPG

तरी तो पूर्ण वाढलेला नव्हता.. (रंगावरुन आलचं असेल म्हणा लक्षात..मी आपली उगा उदो उदो करतेय पण खर सांगते चव त्याची.. आह ! तोंडाला पाणी सुटलं) तो हात माझा ..असाच कंपॅरिझन साठी ठेवला Lol .. मागच्या वर्षीचा फोटो आहे.. आत्ताचे अजुन वाढले नैत Sad

कढीपत्ता काय डवरला आहे! अ ग दी रांगोळी वाटतेय....
टिना स्वागत आहे तुझ. ... मस्तच आहे बाग तुझी..
त्या लाल फुलांना रुख्मीणी म्हणतात ब हुतेक....
आंबा खासच.. यवतमाळ वारी क रा वी च लागेलः).....
ऊजु लिंबाचे फोटो खुपच सhee. .

मानुषीताई कडीपत्ता कसला सॉलिड बहरलाय. श्रीरामपूरला आम्ही राहायचो त्या गल्लीत पण अशीच दोन कडीपत्याची खूप मोठी बहरलेली झाडे होती त्याची आठवण झाली.

टीना मस्त फोटो सगळे.

Pages