निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी,
कढिलिंब मस्त डवरलाय.फुले नव्हती पाहिली.

टीना,
त्या तिसर्‍या फुलाला पिटकुळी /अ‍ॅक्सोरा म्हणतात.

सायली, टीना मस्त आहेत फोटो.
मानुषी, कढीलिंब काय डवरलाय ना? आता त्याला द्राक्षाच्या घोसासारखी फळं धरतील बहुतेक.

टीना, तुम्ही ज्याला उलटा रावण म्हणता ती घाणेरी. त्याला कांगुण्या किंवा चांगुण्या पण म्हणतात. पिकलेल्या फळांचा गर खायचो आम्ही लहानपणी.
इतर फोटोही सुरेख आहेत.

शशांकजी , काय ग्रेट आहात तुम्ही. पण आम्ही करंटे !!! वाचतो आणि विसरुन जातो . ती इंग्लीश बोटॅनिकल नावं नाही बाई लक्षात रहात माझ्या. पण तुम्ही सांगता तेव्हा नक्कीच खूप छान वाटतं

अ श्विनी हेवा वाटतो तुझा . >>> सायली, खरचं आहे ग आपण पण एकदा सर्वानी भेटावं असं खूप वाटत्तयं ग.

हो हो.....नक्की भेटू....त्यासाठी एक गट्ग आमच्या नगरात करा बरं.
सुप्रभात!

हो हो.....नक्की भेटू....त्यासाठी एक गट्ग आमच्या नगरात करा बरं. >>>> जून -जुलैमधे ठरवा केव्हाही ... Happy
जरुर सगळे भेटूयात ... (सगळे पाककृती दिग्गज बाकीची काळजी घेतीलच.... Wink Happy )

ही घ्या अजून काही फुले - फॉम आवर वावर .... Happy Wink

१]

g.jpg

२]

j.jpg

३] बाग म्हटली की असे काही 'जीव'ही हवेतच की ... Happy Wink

ko.jpg

४]

la.jpg

५] भर उन्हाळ्यात मी याला कसेबसे जगवतोय आणि हे देखील जीवाच्या कराराने जगते आहे आणि फुलतही आहे..

z.jpg

शशांक, इथले अंगोलातले किडेही जायंट साईज असतात, ५ सेमी च्या पुढचे. केनयात, नैरोबी फ्लाय म्हणून एक किडा असतो. असतो तांदळाच्या आकाराचाच. चावतही नाही तो. पण त्याचा नुसता स्पर्श झाला तरी ४/५ दिवस डोळ्याजवळचा भाग लाल होतो आणि जळजळतो. ( मला मिळाला होता प्रसाद )

http://en.wikipedia.org/wiki/Nairobi_fly इथे बघा.

धन्यवाद सगळ्यांना. जिप्सी, फोटो ची कल्पना खूप आवडली.

तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा हेच सर्वात मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. !!

मी आमच्या सोसायटीत लावलेली बकुळ आणि बहावा ही झाडे आज सुमारे दहा वर्षे झाली तरी फुलत नाहीत. बकुळ उशीरा फुलतो हे माहीत आहे. पण बहावासुद्धा? आणि बहाव्याची पाने किडीमुळे सतत कुरतडलेली असतात. तशी किडलेली झाडेसुद्धा इतरत्र अनेकदा दिसतात पण ते झाड फुललेले असते. मग आमचेच झाड का फुलत नसावे? अनेक उपाय केले. आता आणखी काय करावे?

Pages