निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनीमोहोर वाढदिवसाच्या शुभेच्छा .. उशीराने का होईना ..
तुम्ही टाकलेल्या फुलांचा फोटो सुंदरच..

नलीनी >> घाणेरी अगदी बरोबर.. टाकल्यावर नाव आठवल.. आणि पाठोपाठ कुलु यांच्या स्वित्झर्लंड लेखमालीकेत सुध्दा वाचण्यात आल .. कम्माले न तिथ हि फुलं म्हणजे Happy

पुरंदरे शशांक तुमची बाग पन छानच .. मागाहुन कौतुक करतेय पण छान प्रस्तावना दिलीत Happy

जिप्सी तुम्ही मनीमोहोर यांना भेट दिलेल कोलाज पन आवडल..

सायली .. एवढे सारे कॄष्णकमळ .. वेल आहे का तुझ्याकडे ? ( माबोवाली नै कै , कृष्णकमळाची म्हणतेय Lol )..

सायली, बुचाची फुले आणि कृष्ण्कमळं दोन्ही माझ्या वाढदिवसासाठी ! धन्स ग खूप माझी आवड लक्षात ठेवल्याबद्दल.

टीना, शुभेच्छांबद्द्ल धन्स.

भारतात पुर्वीपासून हि निळी कृष्णकमळे दिसतात पण यातल्या पांढर्‍या, लाल, जांभळ्या जाती फारच कमी दिसतात आपल्याकडे. याची फुले जास्त भरीव असतात पण सुगंध मात्र नसतो.
मुंबईच्या हवेतही हा वेल छान वाढतो.

हे मा ताई Happy
टिना माझ्या क डे वेल आहे... पN कुंडीत अsल्यामेळे दिव्साला एक दोन फुलं मिळ्तात तree मlaa खुप आनंद होतो...
हा जुना फोटो आहे.. ंमैत्रीणी च्या बागेतली फुलं. .
दा तुम्ही कुठे होतात इ त के दिवस? धा गा खूप संथ झाला होता

ही घrची अ बो ली..... कुंडीतलीच .
Photo3294.jpg

आमच्या कंपनीच्या परिसरातही खूप झाडे आणि सहाजिकच खूप पक्षीही आहेत - आज सकाळीच हे दिसले होते ..
(काचेतून -गॉगल ग्लास -घेतलेले फोटो Happy )

b_2.jpgbl.jpg

या वरील फोटोत जे दिसतात ते रेड व्हिस्कर्ड बुलबुल... माझ्या लहानपण, तरुणपण जेव्हा आठवतो तेव्हा हे बुलबुल शहरात फारसे दिसत नसत, पण सध्या मात्र खूप दिसतात... यांचा आवाज (शीळ) रेड व्हेन्टेड पेक्षा जास्त गोड वाटतो ... Happy
(रेड व्हेन्टेड जरा कर्कश्श वाटतो.. )

सुभाषिणी धन्यवाद.

सगळ्यांचे फोटो माहिती नेहमीप्रमाणेच सुंदर.

हल्ली आमच्या मागच्या आवारातील करंजाच्या झाडावर हा खंड्या नेहमी सकाळी असतो.

सगळी प्रकाशचित्रे मस्त आहेत. खंद्या खासच!
सध्या सगळीकडे पिंपळ महोत्सव साजरा होत आहे. पोपटी कोवळी पाने उन्हात खूप सुंदर वाटतात. पर्जन्य वृक्षालासुद्धा नवीन पालवी आली आहे पण त्याचा जरा गर्द हिरवा रंग आहे.
घराजवळच्या काही गुलमोहरावर एक-दोन फुलं यायला लागली आहेत. isn't it a little early?

वॉव वॉव सर्व फोटो मस्त, मस्त, मस्त.

आज डोंबिवली एम आय डी सी परिसरात (रेसिडेंशीयल) फिरत होतो. त्या एरियात सोनमोहोराची खूप झाडे आहेत. मस्त बहरली होती आणि फुलांचा सडापण सुरेख गालीच्यासारखा पसरला होता.

अगदी आहाहा वाटलं. Happy

आमच्या सोसायटीत पण आहेत सोनमोहोर. ते पण बहरले आहेत. गुलमोहोर पण आहे तो बहरेल पुढच्या महिन्यात.

नव्या भागातले सर्व प्र. चित्रे आवडली बहरलेला कढीपत्ता छानच त्याच्यावर आता लालचुटुक चेरीजसारखी फळे डोकावतील बुलबुल साठी ती मस्त दावत असेल.एकाच वेळी इतकी कृष्णकमळे तोडलेली बघून ...........हम्म्म जाउदेत.
फोटोतल. टोपीवाल पाव्हन, रेड व्हिस्कर्ड बुलबुल.. पण लय भारी . khandya देखील....

http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/125602.html?1178502036

http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/93440.html

या दोन्ही लिंक्स सर्वांनी जरुर पहाव्या - दिनेशदांनी (बहुतेक दिनेशदाच असणार हे, कारण इतक्या नजाकतीने दुसरे कोण लिहिणार !! ) काय सुरेख वर्णन केले आहे विविध झाडांचे - आणि नुसते झाडाचे रुक्ष वर्णन नाही तर त्या झाडाचे, पानांचे, फुलांचे, फळांचे गुणविशेष इतक्या सौंदर्य दृष्टीने वर्णन केले आहेत की वाचताना आपण अग्दी तल्लीन होऊन जातो .... या शिवाय त्याचे औषधी गुणधर्मही सांगितले आहेत ...
हे सर्व काही उत्कृष्ट फोटोंसह असल्याने आपण जेव्हा केव्हा प्रत्यक्ष हे झाड (पाने, फुले, फळे) पाहू तेव्हा हे सगळे वर्णन आठवणारच आपल्याला ...

बुलबुल आणि खंड्या दोन्ही मस्त ..
मी ज्यांच्या घरी राहते त्यांच्याकडला आंबा मस्त दिसतोय. फक्त खाली खालीच आंबे लागलेय त्याला आणि ते सर्वच्या सर्व माझ्या गॅलरीत Wink . दोन दिवसांपुर्वी ताई जिजू आणि भाची आलेली तेव्हा माझ्या भाचीनं एक तोडला, असा राग आला मला..म्हटल आपल्याघरच अस कुणी न विचारता तोडला तर कस वाटत आपल्याला. मी तर शब्दास्त्र घेऊन च धावते आणि वर एक खुंखार लुक पण देते.
पान , फळ , फुल काहिही असो कुणी न विचारता तोडल तर खुप जिव्हारी लागत मला .. १ २ दिवसांनी प्रचि टाकते नक्की . . Happy

खंड्या मstch.... जागु कीत्ती दिवसांनी आलीस...
श शांक जी खjaanaa च दिला तुम्ही ..
दा खुप छान छान फुलंदिसताय्त.... आ त्ता फ क्त प्र. ची. बghte...
साव का श वाचते ...
सोन मोहर कsaa अsतो...
ई तर क ला म धे रांगोळी ब घ णे...

शशांक जी धन्स. दिनेशदांची लिंक सुंदर आहे. काय मस्त लिहीलयं . वाचताना गुंग झाले होते त्यात.

जागु खंड्या मस्त टिपलायस. आणि शशांक जी तुम्ही बुलबुल ही.

अंजू, सोनमोहोराचा फोटो टाक ना बघायला मजा येईल.

Pages