न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही यावसं वाटतय.. Sad पण इतक्या उशिरा अक्कल येऊन तिकिटं नाही मिळायची :(..

फेडी सध्या यु एस ओपन सिरीजसाठी यु एस मधेच आहे. बघ तुला राइड देतोय का ?

अरे सुप्रियाला तिची स्वतःची BMW Z4 आहे कि तिला कश्याला जेट बिट, गाडीनेच सुसाट येईल ती १ दिवसात हो न सुप्रिया. Happy

माझ्या बॉस चं आहे private jet पण तो महाकंजूस आहे.. Sad डिल्स बघत होते आत्ता..पण लै महाग..
BMW Z4 ची कल्पना वाईट नाही.. try करते Happy

मला दगडू तेली मसाला ( सध्या) नकोय. सोडे घातलेले पदार्थ खायला नी घरी न्यायलासुद्धा चालतील. सोडे नुसतेच दिले तरी चालतील.
सध्यातरी बहुतेक मी एकटीच येणारेय अन मी शाकाहारी / मांसाहारी सगळं खाणार.
कपकेक्स अन ते रंगवायचं सामान आणीन.
बीयर/ इतर रंपा आणू का ?

सुप्रिया, प्राइसलाइन पाहिलंस का ? चांगले डील्स मिळतील रेड आय फ्लाईट साठी

अगं बरिच ऑप्शन पाहिली .पण ७५० च्या खाली नाहीच.. शेवटी आम्ही माझ्या स्वताच्या आनंदासाठी घेतलेल्या BMW Z4 मधून फिनिक्स ला जातोय Happy

>> छ्या, ७५० म्हणजे टू मच..
गटग अ‍ॅटेंड करणार्‍यांनी वर्गणी काढली तर शक्य आहे ;).
तुम्ही सहमायबोलीकरीणीकरता एवढे नक्कीच कराल. (ऊं.व.शे.हा.) Happy

सुप्रिया, मज्जा करा. ए वे ए ठी मधून वेळात वेळ काढून आम्ही फोन करू तूला. Happy

मंडळी, हा धागा आणि "चित्रपट कसा वाटला" दोन्ही १००० प्रतिसादच्या जवळ आलेत.. त्वरा करा अन पटपट पोस्टा इकडे. आपला नंबर पहीला आला पाहीजे Wink

मग उलट अ‍ॅडमिननी पुढाकार घ्यायलाच हवा/घ्यायला हवाच. सौ. ओबामा नाही का ही, ती फंक्शन्स अटेंड करायला जात, ओबामाच्या प्रतिनिधी म्हणून. तसंच Proud

बरं, पुस्तकं कुठली हवी कोणाकोणाला ते कळवा लवकर!
झक्कींचा पत्ता देखील कुठल्यातरी बर्‍याच मागच्या पानावर गेलाय, तो परत इथे टाका कोणीतरी ...

येणार्‍या लोकांनी रस्ता चुकल्यास कुठे फोन करायचा ते एक दोन नंबर इथे लिहिले तर बरे.

ए.वे.ए.ठि. तारीख : ९ ऑगस्ट
वेळः सकाळी ११ पासुन पुढे
स्थळ : झक्कींचे घर (११४ रायटर रोड, सक्कासुन्ना, न्यू जर्सी)
114 Righter Rd,
Succasunna, NJ 07876

एकूण :
मोठी माणसं : शाकाहारी - २३, मांसाहारी - २
लहान मुलं : ७

लाँग लिव्ह झक्की
आपणास दीर्घायुष लाभो आणिअसे बरेच जीटीजी आपल्या 'परसाकडे' होवोत हीच शुभेच्छा.... Proud

मजा करा, आमची आठवण शिव्या देण्यासाठीका होईना पण काढा.....

आता इथे जास्त बडबड करु नका. तरी माझ्याकडुन कुठली पुस्तके/इतर हवी आहेत ते थोडक्यात सांगा Happy
मला एवढेच आठवते आहे- रुनी: गुढी, लालु: किंबहुना

मी साबूदाणा खिचडी आणेन.
उद्या सकाळपर्यंत दुसर्‍या कुणी सा खि निवडली तर मी पुलिहोरा ( मसालाभातासारखा असतो तो )
आणेन.

विकु, अरे आणा की साखि, आता कुणी निवडायचे राहिले नाहियेत Happy

बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, मराठवाडी चिकन - लालू
भेळेचं सामान, पायनॅपल चंक्स -- पन्ना
पाणी पुरी कि वेज कबाब?? - सिंडी
वेज पुलाव-- नयनीश
पावभाजी, मुलांसाठी पास्ता-- सायो
मँगो शेक/मँगो लस्सी -- रूनी
आईसक्रीम --अडम
स्वीट्स --विनय
कणसं -- सचिन
पानं-- बो विश
कढी, काकडीची कोशिंबीर-- ??झक्की ?
सा.खि -- विकु
आंब्याचा शिरा - मैत्रेयी
कपकेक्स - शोनू
पेये - अजय ?

तारीख : ९ ऑगस्ट
वेळः सकाळी ११ पासुन पुढे
स्थळ : झक्कींचे घर (११४ रायटर रोड, सक्कासुन्ना, न्यू जर्सी)
114 Righter Rd,
Succasunna, NJ 07876

एकूण :
मोठी माणसं : शाकाहारी - २३, मांसाहारी - २
लहान मुलं : ७

विकु, साखि नका आणु. मी साबुदाणा भिजवला आहे. तुम्ही पुलिहोरा आणा.

विकु, कृष्णाकाठच्या वांग्यांची भाजी नाही आणणार तुम्ही? Wink

काय एक एक लोक असतात. आत्ता मी ती कणसं आणायला गेलो होतो दुकानात. जरा जास्त कणसं हवी होती म्हणून तिथे एक खोकं मागितलं, आणि तिथली कणसं एक-एक गोळा करून त्या खोक्यात टाकत होतो.
तेवढ्यात एक अमेरिकन आज्जींनी मला विचारलं, "काय हो, सुट्टे कांदे कुठे मिळतील?" मी म्हटलं की, 'मला माहित नाही, मी इथे काम करत नाही.' मग चूक लक्षात येऊन आज्जी हसल्या आणि गेल्या.

एक दोन मिनिटांत एक माणूस थोडासा पळत आला आणि म्हणाला, " मेन्स रेस्ट रूम कुठे आहे?"
"मला माहित नाही", मी.
"तू इथे काम करत असून तुला माहित नाही?"
"अहो मी इथे काम करत नाही."
एवढ्यावर गप्प बसावं ना... नाही.
"मग एवढी कणसं खोक्यात का भरतोयस?"
"अहो मी विकत घेतोय ती!!!"
"एवढी??" असं विचारून माझ्याकडे संशयाने बघायला लागला.

मग मी हातातली कणसं टाकली आणि दोन सेकंद त्याच्याकडे बघत मनात म्हणालो, "लेका, तुला घाईची लागली आहे तर रेस्ट-रूम शोध ना... मी तेवढी कणसं एकटा खाईन, नाहीतर त्यांचं इथॅनॉल करून गाडीत टाकेन.. तुला काय करायचंय.."

मग गेला तो. झक्की म्हणतात तसं लेटेस्ट फॅशनचे कपडे घालून गेलो होतो बरं का.. तरी हे असं.. Proud

नुसते लेटेस्ट फ्याशनचे कपडे घालुन भागत नाही, त्यासाठी उच्चविद्याविभुषीत की काय तरुण गृहस्थ दिसावं लागतं Wink ह्या नावाचे एकजण आलेत म्हणे बारात, त्यांना घेऊन जायचे होते कणसं आणायला Proud

Pages