न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्की ग्रिल "पेटवणार" आहेत ना ? मी वेज कबाब आणेन. शोनु आणि तिचे ग्रिल मास्टर पण काय तरी ग्रिल करणार आहेत ना ?

<<अडमा, जर्नल स्क्वेअरला पटेलकडे देसी आईस्क्रिम मिळेल. तू जर्सी सिटीतून येणार ना?>>
मला वाटते आईसक्रीम मीच आणावे. एक मँगो नि मिळाल्यास कसाटा, किंवा केशर पिस्ता. पण मस्तानि मिळत नाही. म्हणजे थंड राहील.

झक्की, हो वाचले. (स्वतःही करणार नाहीत आणि लोकांनाही सांगतात पाठवू नका!)

शाकाहारी- रुनि, लालू, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी (१), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१), अमृता(२), नयनीश(४+१), सचिन(१), विकु(१), बो-विश, अजय.

मांसाहारी- नयनीश , सिंडी (१)

लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)

उपवास--

मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, मराठवाडी चिकन, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव, पावभाजी. मँगो शेक/मँगो लस्सी, मुलांसाठी पास्ता, आईसक्रीम, स्वीट्स (विनय आणणार), कढी, काकडीची कोशिंबीर, कणसं, पानं, साबुदाण्याची खिचडी (कोण आणतंय Happy ) .

ए.वे.ए.ठि. तारीख : ९ ऑगस्ट
वेळः सकाळी ११ पासुन पुढे
स्थळ : झक्कींचे घर (११४ रायटर रोड, सक्कासुन्ना, न्यू जर्सी)
114 Righter Rd,
Succasunna, NJ 07876

शोनुबाईनं लै लै दिसांपुर्वी येक पोश्ट टाक्लं व्हतं तवा ती म्हन्ली त्ये म्या हिथं लिव्लं..बाकी मला काय बी ठाव न्हायी.

म्हण्जे?स्टिलचे डबे आणताय उरलेला मांसाहार भरुन न्यायला? मला वाटलं झीपलॉक वर भागेल तुमचं. Wink

मला वाटते आईसक्रीम मीच आणावे. >>>>> बरं.. मग मी काय आणावे ते सांगा... ग्रील करायचं असेल तर मृ ची ती चॉकलेट भरलेली केळी करू.. ती भारी वाट्ये आयड्या..

अडमा, जर्नल स्क्वेअरला पटेलकडे देसी आईस्क्रिम मिळेल. तू जर्सी सिटीतून येणार ना?

>>>

म्हणजे तोच ना भारतीयानी जाऊन घाण केलेला 'सोलापूर बाजार'?

अनिलभाई (शा. मां ) (१) नक्की आहेत.

कुणितरी सांगितले म्हणून कढीची व्यवस्था मी केली! कधी कधी सा. खि. ला कढी लागते म्हणे! आता नको असेल तर दुसरे काहीतरी सुचवा. पुलाव आहेच.

भांडी, पाणी भरपूर आहेत. वाढण्यासाठी खोSल, पसरट, बेताचा खोल, लहान, मोठा इ. सर्व प्रकारचे सामान मिळेल.

कुणि लाडू आणणार असतील तर हातोड्या पण आहेत, चांगल्या स्टील हँडलच्या. लागली तर लहान मोठी अश्या करवती पण आहेत. (फक्त लहान मुलांच्या हाती जाऊ देऊ नका यातले काही.)
Wink
पण काटे चमच्याने भागणार असेल तर बरेच.

ग्रिल आहे. ग्रिलवर हॉट डॉग, हवे असल्यास मासे (कुठचे, मला फक्त सामन, कॅटफिश व फिले असलेले मासे आणणे जमेल) कणसे व चिकन. शक्यतो बीफ टाळावे.
शोनू ला विपु मधे लिहून बघतो.

टॅक्स जसं सगळे १४ एप्रिलला रात्री करतात ना, तसंच झक्कींनी दिलेल्या डेडलाईनच्या दिवशी पब्लिक ठरवतंय मी काय आणणार, तू काय आणणार, वगैरे... Proud

लाडवाक्का येणार नाहीत, तर लाडूची जबाबदारी कोण उचलणार? Wink
झक्की, पुण्यात सा.खि. बरोबर काकडीची कोशिंबीर देतात काही ठिकाणी.

शोनूंची विपु कशी करायची? जमले नाही. ज्या कुणाला जमते ते कृपया करतील का?

<<पुण्यात सा.खि. बरोबर काकडीची कोशिंबीर देतात काही ठिकाणी.>>

या वाक्यात काही विशिष्ठ शब्दांवर अधोरेखन, ठळक असे काही करायचे राहिले आहे का? म्हणजे त्याप्रमाणे अर्थ लावता येईल.

पुण्यात सा.खि. बरोबर काकडीची कोशिंबीर देतात काही ठिकाणी.

>>>
म्हणजे उर्वरित ठिकाणी तीही देत नाहीत हे आलंच ओघाने नाही का बोवाजी? Proud

जरा गृहपाठ असू द्यावा म्हणून हा बाफ पहिल्यापासून चाळला? काही अशीच वरवरची निरिक्षणे
१)मागच्यावेळी आलेले पण वरच्या यादीत नसलेले संदीप चित्रे, प्राजक्ता, लक्ष्मीकांत,शोनू,माणूस,मृण्मयी.
२)कॅराओके ट्रॅक्स मागच्यावेळी वापरले होते ना (बहूतेक)? मग यावेळी तांब्यानी सुचवलेल्या काही जुन्या गाण्यांचे ट्रॅक्स नव्याने ऐकण्याचा अनुभव देता/घेता येईल.
३)मागच्या वेळची तीन बडी धेंडं (कोणती?) यावेळीही येणार आहेत ना?
४)भमेवाला/ली/ले आणि लाडवाक्का (कोण?) पण येणार ना?
५)२००६ मध्ये बाराचे तीन एवेएठि झाले होते. यावेळचं बारातलं हे १० वं आणि झक्कींच्या घरचं दुसरं एवेएठि असेल.

अरे बो-विश
असे प्रश्न सांगायचे नाहीत, भाई करतात तसे करायचे, गेल्या गेल्या डायरेक्ट हातातच प्रश्नपत्रिका. आणि विजेत्यास मायबो-लिकर Proud

गाणी म्हणताना यावेळी नीट माहिती काढून म्हणा.. 'दिन ढल जाये..' ने निद्रानाश व्हायचा. Proud

'दिन ढल जाये..' ने निद्रानाश व्हायचा. >>
Lol मुद्दामच म्हटलं होतं मी ते गाणं... तुम्ही खाऊन झाल्यानंतर सगळे पेंगत होता त्या दिवशी...

लालू, यावेळी लोकं खूप आहेत... माझ्याकडून एकट्याने होणार नाही... ड्युएट म्हणणार का माझ्याबरोबर? Proud

लय भारी बो विश!!! Proud

भ.मे. वाली कोण हे अजूनही गुलद्स्त्यात आहे बहुतेक! तसे सगळ्यांचे आपापले गेस आहेत जे ते एकमेकांच्यात चर्चा करताना बोलून दाखवतात, पण इकडे नाही Proud

लाडवाक्का येणार नाहीयेत.. आद्य लाडवाक्कांसाठी २००७ मधल्या ए वे ए ठी (जुन्या हितगूजवर) बद्दल वाचावे लागेल. तेच ते "कार्यख्रम" वालं Proud

संदीपचं काय?? तो का येणार नाहीये?

Pages