न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वे मा अजय Rofl कॉलेजमधे असताना आम्ही वेमा अन वेबा हे शॉर्टफॉर्म , वेडा माणूस , वेडी बाई याकरता वापरायचो त्याची आठ्वण झाली!
अडमने DJ शी कमी भांडायचं प्रॉमिस केलय >>> मी म्हटलं पण त्याला, की मी कुठे मागतिये तुला तसं प्रॉमिस, आम्हाला भांडण मग ते कुणाचं का असेना , पहायला खमंग च वाटतं! Proud

सायो,
अ‍ॅडमिनच्या विपुत कम्प्लेन करुन काय फायदा. वेमा च्या विपुत करायची ना कम्प्लेन.
बाकी छान खुपच मजा आली. कोणाला पोहे चुकले असतील तर घरी येवुन खावे ही नम्र विनंती.
फोटो मला ईमेल करा हो.. anilbhai@gmail.com वर

च्च, अहो पां. शा. मिळत नाही म्हणून.
नाहीतर (उघडपणे) कुणि अ‍ॅडमिन ना म्हणेल का वे. मा.?

झक्की,
तुमची एक वोडकाची छोटी बाटली चुकुन माझ्या हातात आली ती मी चुकुन एका घरी न्यायच्या बॅगेत टाकली. काल रात्री चुकुन पिवुन टाकली. Happy

चुकुन सांगुन टाकल...

कठीण आहेस मैत्रेयी Proud
मी म्हटलं पण त्याला, की मी कुठे मागतिये तुला तसं प्रॉमिस, आम्हाला भांडण मग ते कुणाचं का असेना , पहायला खमंग च वाटतं!>>>अग काळजी करू नकोस, तिकडे सारेगमच पर्व सुरू झालं की ह्यांच पण "पर्व" सुरू होणार Wink

अडम, DJ Light 1

अनिलभाई.... Lol Lol Lol
झक्कीनीपण "चुकून वाचल तर वाचतील" काळजी नसावी
(मोठी हाती लागू नये म्हणून बारकी हाताशी येईल अशी ठेवली असावी असा मला दाट सन्शय आहे)

च्च, अहो पां. शा. मिळत नाही >>>> झक्की, तुम्ही स्पेशल रीक्वेस्ट केली की नाही? अजून काय काय मागण्या मान्य झाल्यात? Proud

>> वेमा च्या विपुत करायची ना कम्प्लेन.

तशी सोय नाही. Proud

पांशा: अनुभवातून माणूस (आयडी नव्हे) शहाणा होतो. Proud

पन्ना, पांशा बरोबरच झक्कींनी लहान लहान मुलांना(ज्यांना जगाचा अनुभव नाही) मायबोलीवर सभासदत्व देऊ नये अशीही मागणी केली असावी. Proud

कठीण आहेस मैत्रेयी
मी म्हटलं पण त्याला, की मी कुठे मागतिये तुला तसं प्रॉमिस, आम्हाला भांडण मग ते कुणाचं का असेना , पहायला खमंग च वाटतं!>>>
अडम, DJ

<<<<
तरी MT अजुन हे नाही सांगितलं कि माझा आय डी वापरून तिनी पण वाहत्या भांडणात कितीदा भांडण मुद्दम उकरून काढली ते Wink Rofl

अग काळजी करू नकोस, तिकडे सारेगमच पर्व सुरू झालं की ह्यांच पण "पर्व" सुरू होणार
<<< नुसतं सारेगमप नाही, लिट्ल चँप्स येउ देत मग खरी रिअ‍ॅलिटी शो स्टाइल भांडणं दिसतील Proud

MTचा आंब्याचा शिरा (जो खाउन भारावलेल्या अडमने DJ शी कमी भांडायचं प्रॉमिस केलय )
<<< अरेरे, गेट वेल सुन अडम ! Biggrin

हा खिचडी वृत्तांत माझ्यावतीने:
ह्या गटगमधे सगळ्यात जास्त टीआरपी घेतला असेल तर तो साबुदाण्याची खिचडी आणि "त्यानिमीत्ताने" अश्विनीने Wink ह्या साखि आध्यायाची सुरुवात कुणीतरी ९ तारखेला चतुर्थी आहे असे पोस्ट टाकल्याने झाली. मग चतुर्थीला साखि हवी, चतुर्थीला साखि हवीच, त्याबरोबर काको हवी, साखि कोण आणणार ?, साखि मी आणणार (इति अश्विनी), मग माझा नवरा फ्रान्सला जाणार, मी येणार नाही पण साखि येइल, मी शिट्टीकरांबरोबर अश्विनीची साखि घेऊन येइन, मी येण्याचा प्रयत्न करते पण साखि नक्की पाठवेन, तू आली नाही तरी चालेल पण साखि मात्र पाठव, अय्या आता काय खायचे आणि अनेक. आई गं, त्या साखिच्या निर्मात्याने सुद्धा कधी विचार केला नसेल इतके चर्वितचर्वण त्या साखिवरुन झाले. मग अजयचा मला फोन आला की ते आदल्यादिवशी मुक्कामाला येतील. झाले, आता साखिचे काय होणार असा मला प्रश्न पडला. तरी एकीकडे ते आल्यावर कोणकोणत्या माबोकरांच्या कागाळ्या सांगायच्या ह्याची यादी मी बनवायला घेतली. महत्वाच्या पोश्टींचे स्क्रीनशॉट्स त्यांना दाखवावे की नाही ह्याचा मात्र माझा शेवटपर्यंत निर्णय झाला नाही. गटगच्या अगदी आदल्या दिवशी अश्विनीचा फोन आला की ती सकाळी सहा वाजता निघुन माझ्या घरी येइल आणि मग सगळे बरोबर गटगला जाऊ. साखि आणणार असशील तरच ये असे मी तिला स्पष्टच सांगितले Proud ती पण आनंदाने हो म्हणाली. पुण्याची असल्याने तिला सवय असेल अशा बोलण्याची Proud परंतु तिचे आणि साखिचे येणे "सsssप्राइज" ठेवावे असे तिने मला सांगितले. इकडे विकुंनी गटग बाफवर पोस्ट टाकली की ते साखि आणतील. मग मी साबुदाणा भिजवला असे अहे उगीच ठोकुन दिले. सँटीला मात्र वेज कबाब, साखि आणि पाणीपुरी असे सगळे घेऊन मी फारच उशीरा पोचेल आणि त्याला लपाछपी वगैरे खेळ खेळायला एक सवंगडी (इशान) कमी पडेल ह्याची काळजी पडली होती. काळजीने ग्रस्त आवाजात त्याने फोन केला तेव्हा मी त्याची, माझ्या घरी आल्यावर अजय खिचडी करणार आहेत आणि मी फक्त साबुदाणा भिजत घालणार आहे अशी समजूत घातली. त्यावर त्याला अजूनच काळजी पडली की माझ्या स्वयंपाकघरात अजयना सर्व जिन्नस सापडुन खिचडी बनायला फारच वेळ लागेल. लहान मुलं कित्ती निरागस असतात नै Proud

ह्या पार्श्वभुमीवर शेवटी आमचं गटग सकाळी साडेनऊला सुरु झालं. नाष्ट्याची तयारी करत असताना फोन वाजला. बोलायला लागले तर एक फोनमधुन आणि एक दाराबाहेरुन असे अश्विनीचे दोन दोन आवाज यायला लागले. दार उघडले तर अश्विनी आणि अजय अगदी साडेनवाच्या ठोक्याला हजर Happy अजयनी चुकुन वरच्यांची बेल वाजवली. आमच्या शेजार्‍यांना रविवारी सकाळी असा त्रास दिल्याची शिक्षा त्यांना झक्कींच्या शेजार्‍यांनी दिली Proud कसे ते पूढे येइलच. अश्विनीमावशीने आणलेला खाऊ तातडीने आईच्या हातात देऊन इशानने गूड बॉय दिखाव्याचे उद्घाटन केले. आजकाल मायबोलीकर घरी आले तर त्यांना चहा विचारायची चोरी झाली आहे. शेवटी अश्विनी आणि अजय ह्यांना ग्लासभर पाणीच दिले.

सर्व आवरुन खिचडी अजयच्या गाडीतुन माझ्या गाडीत टाकल्याची १० वेळा खात्री करुन आम्ही एकदाचे निघालो. पन्नाला फोन केला तर तिने आधी अजय आले का असे विचारले. खरे तर तिला खिचडीचे काय झाले असे विचारायचे असणार. मग मी पण तिला अजय येणार नाहीत असे सांगितले. हा संवाद जसाच्या तसा इथे द्यायलाच हवा.
पन्ना, "हं काय गं निघालात का ?"
मी, "हो आत्ता निघतोच आहो"
पन्ना, "अजय आले का ?"
मी, "नाही आले. त्यांचा आत्ता फोन आला की ते येऊ शकत नाहीत. आम्ही त्यांचीच वाट बघत होतो नाहीतर केव्हाच निघालो असतो" खरे तर ही दोघे इतक्या लांबुन येऊनही अगदी वेळेत पोचली होती आणि मी मात्र ते आल्यावर कपड्यांना इस्त्री केली Sad
पन्ना, "का येणार नाहीयेत ? आणि मग खिचडीचे काय ?" आता मात्र विचारल्याशिवाय राहवले नसावे.
मी, "काही काम निघाले आहे म्हणे. मायबोलीचेच काम आहे म्हणाले मग काय म्हणणार ?"
पन्ना, "अश्विनीची खिचडी काही आपल्या नशीबात नाही. तरी मी मैत्रेयीला म्हणत होते नाष्ट्याला खिचडीच कर" इथे आम्ही दोघी उगीचच मोठ्याने हसलो.
मी, "हो ना, वि कु पण काल म्हणाले होते खिचडी आणतो. त्यांना तरी आणु द्यायला हवी होती. मी तर निघताना एक वाटी साबुदाणा भिजत घातलाय. मला आता साखि खायची म्हणजे खायची आहे"
पन्ना, "तुला इतकी आवडते का ?"
मी, "मग काय, नारळ घालुन कित्ती छान लागते" एव्हढ्या थापा मारल्यावर मात्र मला हसू आवरेना. मग खोकला आल्याचे नाटक करुन मी आवरते घेतले.

मग गाडीत मला आठवत असलेल्या, मला त्रास-बीस देणार्‍या सर्व मायबोलीकरांची नावे अजयना सांगितली. शिवाय हेमाशेपो देखील सांगितले. तेव्हा त्यांनी "मी अ‍ॅडमिन नाही" ह्याची मला आठवण करुन दिली आणि "तुझ्याशिवाय मायबोलीचे कसे होणार. तेव्हा कुणी कितीही त्रास दिला तरी माबो सोडुन जाऊ नको" असे म्हणाले. यंदाच्या गणेशोत्सव मंडळात कनेटिकटाचे भारीच वजन आहे असे देखील म्हणाले. मी आणि पन्ना अर्थातच ते "compliment" म्हणुन घेत आहोत Proud रस्त्यात इशानने मावशीबरोबर मराठी, हिंदी, इंग्रजी आणि त्याची स्वतःची झुलुहोनोलुलु अशा चार भाषांमधे गप्पा मारल्या. अश्विनी पण फार हुशार आहे हो, तिला इशान काय बोलतोय ते सर्व कळाले Wink मजल-दरमजल करत आम्ही झक्की राहतात त्या रस्त्यावर पोचलो. घरापुढे फुगे लावीन असे झक्कींनी सांगुन ठेवले होते. पण फुगे लावलेल्या घरासमोर तर ओपन हाउसची पाटी दिसली. याआधी येउन गेलेल्या माबोकरांच्या अनुभवावरुन वैतागुन सौ झक्कींनी घर बदलायचा निर्णय घेतलाय की काय अशी आम्हाला शंका आली. मात्र जवळच्याच एका फुगे नसलेल्या घरातुन प्रचंड कलकल ऐकु आली. मग आम्ही त्या घरासमोरच गाडी पार्क केली. अजयनी गाडीचे दार उघडले मात्र झक्कींच्या शेजार्‍यांचे कुत्रे धावत येऊन गाडीत घुसले आणि अजयना पार करुन मागे यायला लागले. झक्कींना विशिष्ठ शहराचा गूण लागुन ते लोकांना घरी बोलावुन अंगावर कुत्रे सोडतात की काय असे आम्हाला वाटले. तेव्हढ्यात कुत्र्याच्या मालकाने येउन आमची सुटका केली.

तिथे आत गेल्या गेल्या अश्विनीला बघुन, "खिचडी आली, खिचडी आली" चा गलका झाला. एखाद्या अनोळखी व्यक्तीला अश्विनीचेच नाव खिचडी आहे की काय असे वाटले असते Wink ह्यानंतर झक्कींच्या घरी काय काय केले, काय काय खाल्ले, काय काय चर्चिले ह्याचे वृत्तांत वर आलेच आहेत Happy खिचडी मात्र फारच चविष्ठ झाली होती. बरोबर बांधुन आणायला उरली नाही Happy

"गॉसिप continued"...
इतकी सगळी खादाडी झाल्यावर मंडळी झक्कींच्या ब्याकयार्डात विसावली आणि सगळीकडुन कसे "हवा हवा ए हवा खुशबु लुटादे..." चे सूर निनादायला लागले Proud मायबोलीवरील सर्व पापुलर विषय, आयड्या, विपू, बाफं ह्यांचा मनसोक्त परामर्ष झाल्यावरच सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

आभारप्रदर्शनः वर सर्वांनी सर्वांचे आभार मानले आहेतच त्याला अनुमोदन.

ता कः अ‍ॅडमाने अटलांटा बाफवर फक्त टिंग्या मारल्या, त्याने एकाही लहान मुलाला सांभाळले नाही.

बरोबर बांधुन आणायला उरली नाही <<<<
बघा, इथेही कोल्हापुरने बाजी मारली. सकाळी सकाळी तिकडे कॉफी नी खिचडीची पोस्ट आली होती.

>>>यंदाच्या गणेशोत्सव मंडळात कनेटिकटाचे भारीच वजन आहे असे देखील म्हणाले.
स्पष्ट नाही ना केलं वजनाचं? बरोबर, घाबरले असतील की तुम्ही अ‍ॅडमिनच्या विपुत तक्रारी कराल नी त्यांना समज मिळेल. म्हणून मोघमच बोलले असतील.तुम्ही खाऊन घ्या भाव. Proud

यंदाच्या गणेशोत्सव मंडळात कनेटिकटाचे भारीच वजन आहे असे देखील म्हणाले.>> तरीच ही आल्या आल्या मला म्हणाली की अजय तूला वजनदार म्हणाले Proud

हा घ्या माझा वृत्तान्त...
८ तारखेला लालू अन रुनि दुपारी माझ्याकडे येउन पोहोचल्या, अन मिनि ए वे ए ठि तिथेच सुरु झालं. वचा वचा करत वड्याचे सारण बनवलं, अन घरात तळण्या ऐवजी डेक वर भट्टी लावावी अशी एक आयडिया निघाली. एकदम लग्नाच्या बुंद्या तळतात तसला फ़ील आला पण एकूण डेकवरचा सेटप फ़ारसा सोयीचा न झाल्यामुळे परत किचन मधेच येऊन वडे तळायला घेतले. ंहणजे लालू तळत होती, अन आम्ही गोळे करून देत होतो Happy
येताना लालू चिकन घेऊन आली होती त्यामुळे रात्रीचा मेनु चिकन रस्स,मसुराची उसळ, पोळ्या, भात, अन टेस्ट ला आंब्याचा शिरा अन वडे!! साठेक वडे तळून झाल्यावर अन सगळे किचन क्लीनप वगैरे झाल्यावर सुद्धा गप्पांचा थकवा आला नव्हता! मग आम्ही तिघींनी एका खोलीत पथार्‍या टाकल्या अन रात्री १ पर्यन्त गप्पा कन्टिन्यू केल्या Happy
सकाळी उठल्या उठल्या चहा करताना त्याकडे बघत बसून वेळ घालवू नये या अडमाच्या सल्ल्यानुसार एकीकडे ब्रेकफ़ास्ट साठी इडल्या लावल्या उकडत, अन चटणी पण फ़िरवली मिक्सर मधे. तोवर एकूण पावसाळी हवा पाहून मुलांना अन नवर्‍याला बरोबर नेण्याचा बेत क्यान्सल करून टाकला. (माझा उत्साह त्यामुळे दुप्पट झाला !!)आता भेटी व्हायला १-२ तासच उरले होते तरी पब्लिक तिथे ए वे ए ठि बाफ़ वर, ऑर्कुटात, चॅट वर गप्पा मारत होते, मीपण तेवढ्यात पन्नाशी चॅट वर बोलून घेतलं अन मग आवरून निघालो.

झक्कींचं घर लय लांब जंगलात आहे हे परत एकदा जाणवलं !! रुनि ला त्याची कल्पना नसल्यामुळे वाटेत अनेक गावे लागत होती अन त्यात हिलसाइड अवेन्यू अन मेन स्ट्रीट पण अनेक वेळा दिसल्याने तिला दर वेळी वाटायचं, आलं झकींचं घर शेवटी जेव्हा खरा मेन स्ट्रीट आला तेव्हा आता वळावं की नको असा प्रश्न पडला कारण त्या रस्त्यावर हल्लीच्या मायबोलीच्या ट्रेन्ड नुसार फ़क्त रस्त्याचा आकडाच लिहिला होता नाव नव्हतं!! Happy शेवटी जीपिएस वाली बाई 'वळा आता' अशा अर्थाचं खेकसल्यवर वळलो झालं!
तर अशा रितीने झकींकडे पोहोचलो, अन आयुष्यात प्रथमच कुठल्यातरी पार्टीला सगळ्यात आधी अन वेळेवर पोहोचल्याचा अनुभव मी घेतला !!
झक्की त्यांच्या माबो इमेज ला न शोभेलसे ड्राइव्ह वे च्या बाहेर् स्वागताला उभे राहून या,या म्हणाले!! (काहींना अपेक्षा होती की घरासमोर डि टूर अशी पाटी अन बाण काढून भलत्याच घराला त्यांनी फ़ुगे बांधले असणार)
हळू हळू सगळे लोक येऊन पोहोचले. आश्विनीने अचानक साखि सह येऊन सर्प्राइज दिले. आजय आल्यामुळे लोक आपसूक जरा जपून गॉसिप करत होती! पण अजय ना माबोवरच्या नव्या सोयी, पांढरी शाई, वगैरे वरून पिडतही होती!
अडम पहिल्यांदा भेटत असला तरी भरपूर होमवर्क करून आला होता. बोविश पहिलटकराला शोभेलसा अगदी शांत होता मात्र. विकु हे एक तावातावाने बोलणारे आक्रमक व्यक्तिमत्त्व असतील (हुडासारखे!) असं वाटलं होतं पण ते अगदीच सौम्य चेहर्‍याचे अन सॉफ़्टस्पोकन ग्रुहस्थ निघाले!! तरी रुनिने त्यांना झक्की व इतरांशी बुप्रा, स्वाध्याय वगैरे विषयांवर जाहिर द्वंद्व करण्याचे आव्हान देउन वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी दाद दिली नाही Happy
पुस्तकांची देवाण घेवाण हा एक फ़ार सही उपक्रम माबोकरांनी चालू ठेवलाय. तो कार्यक्रम इथेही झाला. केव्हाही भेटी होणार असतील तर शोनू, लालू, आणि अनेक जण इथे विचारून ठेवतात कुणाला काही पुस्तकं हवीयत का, अन येताना सॅन्टाक्लॉजसारखी एक पुस्तकांची बॅग घेऊन येतात, की मग त्यांच्या भोवती कोंडाळं!! नन्तर वाचून झाली की पुस्तकं पोस्टाने परत करायची! कधी लिहायची वेळ आली नव्हती, पण आता आवर्जून लिहितेय, किती मस्त पद्धत आहे ही, कोण कुठले कधी न भेटणारे माबोकर, केवळ आयड्यांनी एकमेकाला ओळखणारे, तरी पुस्तके हक्कने मागणारे अन विश्वासाने आपली पुस्तकं देणारे माबोकर !!मायबोली रॉक्स..!!
यावेळी त्यात दगडू तेली मसाल्याची भर पडली होती. षोनूच्या एका रेसिपी मुळे तो मसाला फ़ेमस होतो काय अन नयनिशच्या आईबाबांच्या कृपेने कुठल्या कुठल्या स्टेट्स मधल्या ऑर्डरी येतात काय सगळीच मज्जा Happy
झक्कींनी व्यवस्था मात्र फ़ार चोख करून ठेवली होती हं. व्यवस्थित टेबलं अगदी विथ टेबल क्लॉथ्स, खुर्च्या, म्युझिक प्लेयर, त्यावर दर्दे डिस्को वगैरे झकींची फ़ेवरेट गाणी !!आम्हाला कळलंच हे झक्कींचं काम नसणार! मग त्यांच्या सौंनी सांगितलं त्यांच्या मुलीने अन जावयाने केलीयत सगळी काअमं. त्या दोघांची ओळख पण करून दिली त्यांनी. एकूण जावई 'रिच' असला तरी घरकामाला लाजत नव्हता हे पाहून समस्त पार्ल्याक्कांनी पसंतीची पावती दिली नसती तर नवल Happy
नन्तर कळलं झक्कींच्या लग्नाचा कितवातरी वाढदिवस आहे, कोणी म्हणे ३९ वा , पन्नासावी ऍनिवर्सरी असंही काही लोक म्हणाले!! पण झकींनी नक्की पत्ता लागू दिला नाही, 'आठवतेय तेव्हापासून कधीही किचनमधे गेलो तरी ती असतेच' असं म्हणाले पण मदनबाणाचा तो उखाणा भारी घेतला हं झक्कींनी!!
त्यावरून आठवलं, अडमाने मात्र उखाणा घेतला नाही नुस्तं नाव सांगून मोकळा झाला. ऊखाणा घेणे, फ़ोटो खिशात ठेवणे वगैरे ओल्ड फ़्याशन्ड झालं म्हणे !! पण फ़ोटो दाखवताना अचानक त्याचा 'थरकाप 'का झाला कळलं नाही!! Proud
नन्तर एक टेबल मांडून त्यापुढे सगळ्या खुर्च्या अर्धगोलाकार मांडण्यात आल्या. लोक येउन बसल्यावर टेबला जवळ सिंडी येऊन काही तरी वस्तु वगैरे मांडून तयारी करू लागताच ती जादूचे प्रयोग किंवा पपेट शो करणार आहेसं वाटून पोराटोरांनी पण गर्दी केली !!पण नन्तर कळळं की ती तिच्या व्हेज कबाबांची तयारी करत होती ( जे तिच्या दृष्टीने जादूच्या प्रयोगांहून फ़ार वेगळे नव्हते!! Happy )
तर खुर्च्यांची अरेन्जमेन्ट विनयच्या उ उ वि कार्यक्रमासाठी होती., ऍज युज्वल तो हिट झाला हे सांगायला नकोच! बाकी विनोदाचे डीटेल्स इथे लिहायला मनाई आहे!
एकूण अगदी किमान ब्रेक घेत लोक कन्टिन्युअसली खा खा अन बडबड करत होते.
नन्तर सौ झक्कींकडून पिशव्या घेऊन सगळ्यांनी हाताला लागेल तेवढे पदार्थ पॅक करून घेतले उद्यासाठी! सचिन ने तर इतकी मोठी पिशवी केली की कुणाला तरी ते ट्रॅश वाटून ती टाकली जाण्याची वेळ आली होती Lol
शेवटी फ़ोटोंचा कार्यक्रम झला. काही कारणाने अडमाला मी अन पन्ना फ़ोटोत नको होतो असं दिसलं, दोन्ही फ़ोटोमधे टायमर सेट करून पळत येऊन तो आम्हा दोघींना (!!) झाकून उभा राहिला. Happy
मग सगळ्यांचा निरोप घेऊन निघालो. निघेपर्यन्त अगदी गाडीत बसल्यावर पण ओरडून गप्पा सुरुच होत्या! येताना गाडीत रुनि मी अन लालू ने पुन्हा सगळ्याची उजळणी केली अन घरी येऊन चहा घेऊन लालू अन रुनि निघाल्या. ज़ाम शांत शांत वाटायला लागलं. पण जास्त वेळ नाही, कारण लग्गेच इकडे या बीबीवर ८-१० पोस्टी पडल्या पण होत्या!!
...अश्या रितीने टवाळक्या सुरुच राहिल्या......

सौ. झक्कींना मी विचारलं की तुम्ही का येत नाही माबोवर? नाहीतरी ओळख आहेच की बर्‍याचजणांशी. त्यावर त्या म्हणाल्या की दोघांपैकी एकच आहे तिथे तेच बरंय. नाहीतरी तिथे भांडणं होतील. Wink Proud

शेवटी फ़ोटोंचा कार्यक्रम झला. काही कारणाने अडमाला मी अन पन्ना फ़ोटोत नको होतो असं दिसलं, दोन्ही फ़ोटोमधे टायमर सेट करून पळत येऊन तो आम्हा दोघींना (!!) झाकून उभा राहिला.
>>
Lol ... हो.. दोघी खेकसल्याच त्याच्या अंगावर... बिचारा एकदम घाबरून परत फोटो काढायला गेला...

हो.. दोघी खेकसल्याच त्याच्या अंगावर >>>> अरे नुसत्या खेकसल्या नाही.. फटके पण बसले मला मागून.. ते त्या दोघींनीच मारले की संधी साधून सिंडी आणि नयनीश ने पण हात साफ करून घेतला ते मात्र पळापळीच्या नादात कळलं नाही.. Proud

सगळ्यांचे वृत्तांत मस्त एकदम.. !!
काही उरलच तर मी लिहिन नंतर.. Happy

च्यामारी, हूडा, तुझी आठवण निघाली होती रे...... वर सिद्ध होतय
बोम्बलायला माझा उद्धार कसा काय नाही झाला बोवा? (विचारग्रस्त चेहरा)

बाकी वृत्तान्त मस्तच हां! अगदी इथे पिम्परीचिन्चवडाच्या वेशीवर बसून देखिल हूरहुर लागत्ये!
काश, मी पण तिथे असतो........!
असो.
तुमचा एवेएठी भन्नाटच झालेला दिस्तोय Happy गुड Happy

आता मी एक ठरवतोच, पुढल्यावर्षी की नाही, तुम्हाला सगळ्ञान्ना लिम्बीच्या गावच आमन्त्रण देतो.......! Happy

>>मी पण. अजय आणि अश्विनी मागाहुन नितेशबरोबर येतील

मूळीच नाही, मी पण तुझ्याबरोबर येणार. Happy आपण आदल्या दिवशी लेडिज नाईट आऊट करूयात पुढच्या वेळी.

बाकी वरच्या सगळ्यांना अनुमोदन (सगळ्या गोष्टींसाठी).
आधी आभार अजयचे आणि सिंडीचे राईडसाठी. खरं तर सिंडीऐवजी नितेशचे म्हणायला पाहिजेत. पण तो काय इथे येऊन वाचणार नाही. तेंव्हा सिंडीचेच मानते. Happy

सिंडे, वृत्तांत झकास, पण एक डिटेल राहीला. काही काही लोक शेंगोळ्या कराव्या लागू नयेत म्हणून हात पण कापून घेतात. Proud
बाय द वे, उपमा सुरेख झाला होता.

सौ. झक्कींचे पण आभार. त्या एकावेळी दोन दोन मायक्रोवेव्ह लढवत होत्या आणि सर्व पदार्थ बरोबर गरम होत आहेत ना हे अगदी जातीने पाहात होत्या. कुणी कामचुकारपणा केला तर त्यांना परत करायला सांगत होत्या. Happy

बॉस्टनचे स्वतःचे मराठी मंडळ आहे ही बातमी श्री. व सौ. झक्कींना फारच धक्कादायक वाटली आणि न्यू इंग्लंडचा भाग सुधारतोय यावर त्यांचे एकमत झाले. Happy

बाकी जीटीजीचे सगळे डिटेल्स वरती आलेच आहेत.
सिंडीने तरी निघताना चहा विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्या आग्रहाला बळी न पडता लगेच निघाल्याने, वाटेत पाऊस, ट्रॅफिक लागले असूनही साडेनऊपर्यंत आम्ही घरी पोहोचलो.

हो ना अश्विनी येणार म्हणुन मी खास शिंगोळ्या करणार होते. बोटांना लागल्याने ते राहिलेच. पुढल्या वेळी नक्की. हवे तर बोट कापायची रिस्क नको म्हणुन मी ए वे ए ठि ला काही खाऊ आणणार नाही Proud

झक्कींकडे जाम म्हणजे जाम मजा आली. झक्की + कुटूंबीय रॉक्स. गटगला नेहमीचे यशस्वी प्रकार - गप्पा, गॉसिप, खाणपिण खूपच मजा आली.
खाण्यापिण्याचे एवढे प्रकार होते की त्यातले अर्धे चाखलेच नाहीत, पण त्या सगळ्यांचे सँपल घरी परत आठवणीने येतांना सोबत आणले. सगळेच पदार्थ जबरी!!
मी अगदी हावरटासारखी सगळ्यांकडून ढीगभर पुस्तकं घेतली म्हणुन मग येतांना वाटेत लालूने त्यातले पुस्तक काढून स्वतःकडे ठेवले. Happy
मैत्रेयीकडे पण आदल्या रात्री वडे करतांना एक स्पेशल मिनी जीटीजी आणि खमंग मेगा गॉसिप प्रकार झाला.
गटगला बर्‍याच जणांनी मला येवुन "महिन्यातली सर्वोत्तम कविता कशी निवडतात" असा भलताच प्रश्न का विचारला हे मला अजून झेपलेले नाही :फिदी:.

अश्विनीची उरलेली खिचडी मी भरुन आणली. Proud त्यामुळे बाकी कोणाला दिसली नसावी. दिलगीर आहे.
खिचडीची शाश्वती नसल्याने रुनीने शनिवारी सकाळी खिचडी करुन निघताना डब्यात बरोबर घेतली होती ती आम्ही मैत्रेयीकडे येताना वाटेतच संपवली. Proud

Pages