न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पन्ना, एकदम चोक्कस.
वरच्या लिस्टमध्ये विजय आहेत ते कोण? विकु का? नी ते काय आणताहेत?
सॉफ्ट ड्रिंक्स कोण आणणार आहे?

शाकाहारी- अनिलभाई (१), रुनि (१), लालू (१), अडम (१), पन्ना(२), विनय(२) सिन्डी (१), विजय (१), मैत्रेयी (२),सायोनारा (१), अमृता(२), नयनीश(४), सचिन(१), विकु(१), बो-विश (१), अजय (१)

मांसाहारी- नयनीश (१) , सिंडी (१)

लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)

उपवास--

मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, मराठवाडी चिकन, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव, पावभाजी. मँगो शेक/मँगो लस्सी, मुलांसाठी पास्ता, आईसक्रीम, स्वीट्स (विनय आणणार), कढी, काकडीची कोशिंबीर, कणसं, पानं, साबुदाण्याची खिचडी (कोण आणतंय), पायनॅपल चंक्स .

ए.वे.ए.ठि. तारीख : ९ ऑगस्ट
वेळः सकाळी ११ पासुन पुढे
स्थळ : झक्कींचे घर (११४ रायटर रोड, सक्कासुन्ना, न्यू जर्सी)
114 Righter Rd,
Succasunna, NJ 07876

कोण कोण काय काय आणतंय हे कळण्यासाठी:
बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, मराठवाडी चिकन - लालू
भेळेचं सामान, पायनॅपल चंक्स -- पन्ना
पाणी (पुरीचे) आणि वेज कबाब - सिंडी
अडम- पापुच्या पुर्‍या
वेज पुलाव-- नयनीश
पावभाजी, मुलांसाठी पास्ता-- सायो
मँगो शेक/मँगो लस्सी -- रूनी
आईसक्रीम -- झक्की हे झक्कीनीच आणले तर बरे असे तेच म्हणाले
स्वीट्स --विनय
कणसं -- सचिन
पानं-- बो विश
कढी, काकडीची कोशिंबीर-- झक्की
विजय-- ?
अमृता---?
सा.खि -- ?
चहाचं सामान---?

मेनूत एक सारखं 'भेळेचं सामान' का लिहिता? मुरमुरे, शेव, फरसाण, कांदे, बटाटे, टोमॅटो वगैरे खाऊन वर चटण्या पिणार असल्यासारखं वाटतंय! Proud

मृ, ती लिस्ट काय काय आणणार ह्याची आहे नं..
मी डायरेक्ट भेळ करून नेते.. चालेल का सगळ्यांना? Proud

हो ग पन्ना, भेळ करुनच घेऊ. म्हणजे भूक लागली तर गाडीत मिक्स करायच्या फंदात नको पडायला.;)

सिंडी च्या इथे चांगल्या मिळत नाहित त्यामूळे मी आणेन... दुकानाचा पत्ता सँटी ला सांगा.. आणि किती पाकिटं आणायची ते मला सांगा... Happy

मला बॅचलर मंडळींच्या हातचं काहीही गोड लागतं. Wink तेव्हा सँटी, अडम, बो विश वगैरे मंडळींना काहीही जेवण करुन आम्हांला खाऊ घालायचं स्वातंत्र्य आहे Proud

असे कुठले स्पेशल देसि आइसक्रीम पाहिजे? काही नाव ब्रँड सांगितलत तर मी पण बघेन आमच्याकडे मिळते का ते. तेव्हढ्यासाठी बिचार्‍या अडमांना नको त्रास द्यायला. त्यांना चहा करायचा आहेच. नि आता कॉफीची पण फर्माईश आहेच.

माझ्या डोळ्यासमोर अडम म्हणजे 'येथे अमृततुल्य चहा मिळेल' दुकानातला मळकट अर्धी चड्डी घातलेला, उघड्या अंगाचा, खांद्यावर चड्डीहून कळकट ओला पंचा घेतलेला, डोक्यावर, एके काळी पांढरी असलेली गांधी टोपी घातलेला, गरीब बिचारा मुलगा उभा आहे, असे दिसते!

बा अडमा, रागावू नकोस. तसे मी तुम्हाला पुण्यात पाहिले आहेच. तेंव्हाच मी विचारले होते, की ते रुबाबदार, उच्च विद्याविभूषित दिसणारे, लेटेस्ट फॅशनचे कपडे घातलेले तरुण गृहस्थ कोण? तेंव्हा तुमचे नाव मला चिनूक्ष यांनी सांगितले.

मळकट अर्धी चड्डी घातलेला, उघड्या अंगाचा, खांद्यावर चड्डीहून कळकट ओला पंचा घेतलेला, डोक्यावर, एके काळी पांढरी असलेली गांधी टोपी घातलेला, गरीब बिचारा मुलगा उभा आहे, असे दिसते! >>>:हहगलो: Rofl

ह्या वर्णनावरुन आठवलं. एकदा मावस भावाने सांगितलं होतं की त्यांच्या मेसमधल्या आचार्‍याचा कळकट्ट पंचा/टॉवेल बासुंदी करताना त्यात पडला. त्याने तो बासुंदीतच घट्ट पिळला नी बाजूला ठेवला. ऐकून ढवळून आलं पोटात.

सायो ती फक्त ष्टोरी आहे. मी देखील माझ्या नातेवाईकांना सांगीतलेली होती, त्यात खर काही नाही.
हां आचारी महाशय नाकाला शेंबुड आला तर ते हाताने काढून भिरकावून देत, अंगठा व तर्जनी ढुंगनावर कुठेतरी पुसतात ती गोष्ट निराळी. Happy

बा रा मिडवेस्टात असले असते तर मी ही आलो असतो. Happy

बा रा मिडवेस्टात असले असते तर मी ही आलो असतो. >>

माझा विमान खर्च कोणी करु शकलं असतं तर मी ही (जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात) आले असते .. :p

ते रुबाबदार, उच्च विद्याविभूषित दिसणारे, लेटेस्ट फॅशनचे कपडे घातलेले तरुण गृहस्थ कोण? >>>> Lol Lol

झक्की, तुम्ही करताय ती कढी आणि कोशिंबीर कशाबरोबर खायची? त्यापेक्षा तुम्ही सोलकढी करा.. Happy

एक नम्र सूचना: कुणीहि खांद्यावर स्वच्छ किंवा कळकट्ट पंचा ठेवून येऊ नये. किंवा चुट्ट्याची विडी पण घेऊन येऊ नये. कुठल्याहि पदार्थात त्या गोष्टी चांगल्या लागत नाहीत. आणल्यास त्या गोष्टी ताबडतोब ग्रिलवर टाकून जाळून टाकण्यात येतील. आमचे घर म्हणजे मेस नव्हे.

सचिन, करायला सांगितले की करावे, खाणार कशाबरोबर अशा चौकश्या करू नये. विनयना कळले तर ते अस्सल कोकणातली म्हण ऐकवतील!! हे माहित असल्याने आम्ही जास्त चौकश्या न करता करणार!

मागे एकदा माझं नी मृचं पार्ल्यात बोलणं झालं होतं की गटगला गेल्याबद्दल कुणी प्राडा, गुची देणार असेल तर आम्ही सातासमुद्रापारही जायला तयार आहोत. तेव्हा विचार करा.

रुबाबदार, उच्च विद्याविभूषित दिसणारे, लेटेस्ट फॅशनचे कपडे घातलेले तरुण गृहस्थ >>> झक्की तुम्ही त्याच्या ऑर्कुटवरील फोटो बद्दल बोलत आहात. तो बहुधा जानरावाचा फोटो आहे Wink

पोचलो बाबा एकदाचा बातमिफलकावर. कित्त्त्त्त्त्ती वर्षांनी आल्यासारखे वाटतेय इथे!! माझ login अजुन चालु आहे व्वा व्वा!

माझ्या डोळ्यासमोर अडम म्हणजे 'येथे अमृततुल्य चहा मिळेल' दुकानातला मळकट अर्धी चड्डी घातलेला, उघड्या अंगाचा, खांद्यावर चड्डीहून कळकट ओला पंचा घेतलेला, डोक्यावर, एके काळी पांढरी असलेली गांधी टोपी घातलेला, गरीब बिचारा मुलगा उभा आहे, असे दिसते!


>>
किती कल्पनादारिद्र्य असावे म्हणतो मी एखाद्या माणसाचे...?

झक्की, आई बाबांचा उपवास वगैरे नाहीये.
अरे अक्कांनो, दगडू तेली मसाल्याचे किती वाटे करु? सिंड्रेला, सायो, पन्ना, मै, रुनी, लालु, अमृता(?), शोनु(?). विनय तुमच्या सौं करता पण एक पॅकेट आणतो. आजुन कोणी राहिलं असेल तर सांगा. तसा मी सगळाच मसाला घेऊन येइन, ऐन वेळी पण पाकीट तयार करता येइल.

Pages