न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा किरण? आहे का ओळख?
बर आता कुठे आहेस बाबा तू? देशात की बाहेर कुठेतरी?

काऊण्ट डाऊन सुरु होतोय, सुमारे पन्नास तास शिल्लक हेत! उद्या शनिवारी सुट्टी, त्यामुळे जे काय पोस्टायचे ते आजच पोस्टून घ्या!

सशल, अनुमोदन!
मागे झक्की पुण्यात भेटले होते तेव्हा म्हणाले होते, या आलात तिकडे की एकदा घरी!
मी खुर्चीवरुन पडायच्या बेतात होतो.........
आयला अमेरिकेला जायच म्हणजे काय बॉम्बेसेन्ट्रलवरुन यस्टी पकडून कोकणात राजापुरला जाण्यासारख वाटल का?
असो,
यदाकदाचित, मराठि साहित्य सम्मेलनासारखेच, मायबोलीकरान्चे अधिवेशन न्युजर्सीत भरवायचे ठरले भविष्यात, तर येऊ ही तिकडे! Happy

ओ नयनिश, ऐनवेळी जागे झालेल्यांसाठी वेगळा स्टाक ठेवा बुवा. आम्ही आधी आर्डरी दिलेल्या हाईत !! आम्ही तर सुईच्या अग्रावर मावेल इतका पण कुण्णाला देणार नाही आमच्यातला Proud

वाटे ? हायला आम्ही आधी सांगितले होते आणायला, आता त्यात वाटे नै हां करायचे Wink

<<आम्ही आधी आर्डरी दिलेल्या हाईत !! >>
गेल्या बी एम एम च्या अनुभवावरून, असे आधी ऑर्डर, जास्ती पैसे वगैरे प्रकार केले तरी हक्काची गोष्ट मिळेलच असे नाही.

लिंबूटिंबू, आजकाल बरेच लोक असेच पटकन देशातून येतात, परत परत.

नयनीश, आधी मसाला कसला आहे ते सांग नी माझं नाव अ‍ॅड कर त्यात Wink
आधीपासून ऑर्डरी दिलेल्यांना जर कमी पडला तर मागाहून ऑर्डरी दिलेली लोकं आपल्यातल्या देणार नाहीत, अगदी सुईच्या अग्रावर मावेल इतकाही नाही. Proud

मसाला कसलाहि असला तरी मला नको. चुकुन मिळाला तर, जे जे लोक सुया नि प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन येतील, त्यांना सुईच्या अग्रावर मावेल तेव्हढा देण्यात येईल.

सर्व बागराज्य जीटीजीकरांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.
खा, प्या, गा, नाचा.. मज्जा करा!! Happy

माझ्याकडून सप्रेम भेट म्हणून विविध ट्रक्सभरून पाठवत आहे. स्वीकार करावा. कृपया.

हा घ्या चहाचा ट्रक..
chahaachaa truck.jpg

कॉफीवालेही असतीलच ना..
coffeechaa truck.jpg

भरपूर आईस्क्रीम खा..
icecreamchaa truck.jpg

ज्युस प्या..
juicechaa truck.jpg

ज्युस नकोवाल्यांना कोल्ड्रिंक्स..
cold driks chaa truck.jpg

बीअरचा ट्रक तर पायजेच.. (झक्कींकडे लक्ष ठेवा हां. हुडाला खाद्य उगाच.)
beerchaa truck.jpg

पिल्लू मायबोलीकरांना टॉय ट्रक्स.. (बियरच्या ट्रकजवळ झक्की जास्त घोटाळले, तर त्यानंतर इकडे येतील. सांभाळा..)
toy trucks.jpg

नाहीतर इकडे तरी येतील सर्कसच्या ट्रकजवळ.. धम्माल मनोरंजन बघा..
circus truck.jpg

धमाल करता करता पांढर्‍या शाईच्या ट्रकची गरज भासेलच..
paandharyaa shaaichaa truck.jpg

विचारप्रवर्तक चर्चा जास्त झाली, तर हा अग्निशामक ट्रक लागेलच. तो जवळ ठेवा(च)..
agnishaamak truck.jpg

तर मंडळी, धमाल करा. वृत्तांत पण लिहा. सर्वांना पुन्हा शुभेच्छा.. Happy

काय भर्भरुन बोल्येत लोक.
मसाले किंवा कुठलेहि तत्सम खाण्याचे पदार्थ कुणीही कुणासाठीही आणणार असेल तर मला त्यात वाटा हवाच Wink

मी आणेन तेव्हा जे सुचेल आणि जमेल ते. Wink

माझा नवरा कस वाट चुकला आज इकडची.. (परवा अगदी कुणी ओळखणार नाही अस व्हायला नको म्हणुन आलास कि काय?? )

चला मी आता डायरेक्ट परवाच भेटेन. आज घरी शिफ्ट होतोय.

सर्वांना ग ट ग च्या शुभेच्छा!! ठरलेले सगळे लोक येवोत आणि ठरलेलं खाणं आणोत ही प्रार्थना...:)

नयनीश, माझी ऑर्डर आधीची होती. विसरू नकोस. अजयबरोबर पाठवून दे.
(* खिचडी नाही आणली तरी मसाला आणेल तो *) Happy

माझा नवरा कस वाट चुकला आज इकडची.. <<< परिक्षेच्या आदल्या दिवशी देवळात जातात ना लोक .. तसा प्रकार... Happy

नयनीश, मी मसाल्याची ऑर्डर आधीच नोंदवलेली होती. मसाला हवाय नक्की. चिकन फार भारी होतं त्या मसाल्याने असं शोनूने सांगीतलय. त्यामुळे माझ्या मसाल्यात कोणीही शेअर मागू नकात Proud

'साजिरा टरकवाले' बरेच टरकं हायेत कि वो तुमच्याकडे.. ती लालू बस शोदत हिंडतिया.. तिला द्या एक टरकं.. Proud

नयनीश, नाही रे.... पुढे मागे कधी लग्न झालं तर उपयोगी पडेल.. आजकाल मुलींना स्वयंपाक येत नाही असं ऐकून आहे.. Proud

सायो, अगं त्याला दगडू तेली मसालाच म्हणतात, शोनु जास्त सांगु शकेल त्या बद्दल पण मला वाटतं काळा मसाला आहे.
आम्ही स्वतः तो मसाला घरी वापरत नाही. माझी आजी मसाला बनवते. तोच भारतात आणी इथे ही वापरतो.

तो दगड फोडुन फोडुन आता त्या दगडाच पिठ व्हायची वेळ आली. Lol
मला यायला थोडा उशिर होइल. कदाचीत आमचे ४ मेम्बर येण्याची शक्यता आहे.
पोहे आणले तर चालतिल का उपासाला.

झक्की, आई बाबांचा उपवास वगैरे नाहीये.
अरे अक्कांनो, दगडू तेली मसाल्याचे किती वाटे करु? सिंड्रेला, सायो, पन्ना, मै, रुनी, लालु, अमृता(?), शोनु(?). विनय तुमच्या सौं करता पण एक पॅकेट आणतो. आजुन कोणी राहिलं असेल तर सांगा. तसा मी सगळाच मसाला घेऊन येइन, ऐन वेळी पण पाकीट तयार करता येइल.

<<
नयनीश,
माझ्या साठी एक पाकिट आहे का एक्स्ट्रॉ ?
तिथे कोणा कडे द्यायच ते सांगते असेल तर Happy

आंब्याचा शिरा आणते <<< हे मी आंब्याच्या शिरा वाचले.. आणि विचार करतोय 'आंब्याला कुठे शिरा असतात...' Wink

सोडे घातलेले पोहे किंवा कुठलाही तत्सम पदार्थ कोणीही आणणार असेल तर मला त्यातला वाटा हवाय.

कांदे पोहे चालतील. सोडे घातलेले नकोत.
पन्ना, वाटा हवाय म्हणजे स्टीलचा डबा वाला वाटा? Wink

Pages