न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> १९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
आता त्यात १९ (अ) : वेबमास्टर येणार असतील तर मी येत नाही. मायबोलीवर इतकी वर्ष अत्यंत उ. पां. बोलल्यामुळे मला आता त्यांची भिती वाटते. Proud

सचिन, तबला नाहीये. पण पाठी बर्‍याच आहेत!
<<अत्यंत उ. पां. बोलल्यामुळे मला आता त्यांची भिती वाटते. >> त्यांची भीति उ. पा. मुळे नसते, पण फारच कविता नि प्रकाशचित्रे टाकणार्‍यांवर इतर कुणी रागावले असल्यास सांगता येत नाही.

शाकाहारी- अनिलभाई (१), रुनि (१), लालू (१), अडम (१), पन्ना(२), विनय(२) सिन्डी (१), विजय (१), मैत्रेयी (२),सायोनारा (१), अमृता(२), नयनीश(४), सचिन(१), विकु(१), बो-विश (१), अजय (१)

मांसाहारी- नयनीश (१) , सिंडी (१)

लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)

उपवास--

मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, मराठवाडी चिकन, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव, पावभाजी. मँगो शेक/मँगो लस्सी, मुलांसाठी पास्ता, आईसक्रीम, स्वीट्स (विनय आणणार), कढी, काकडीची कोशिंबीर, कणसं, पानं, साबुदाण्याची खिचडी (कोण आणतंय), पायनॅपल चंक्स .

ए.वे.ए.ठि. तारीख : ९ ऑगस्ट
वेळः सकाळी ११ पासुन पुढे
स्थळ : झक्कींचे घर (११४ रायटर रोड, सक्कासुन्ना, न्यू जर्सी)
114 Righter Rd,
Succasunna, NJ 07876

एकूण :
मोठी माणसं : शाकाहारी - २३, मांसाहारी - २
लहान मुलं : ७

>>>>> मोठ्या माणसांत धरलेच नाही
मराठीत आदीमानवान्ना "मोठी माणसे" असे कधीपासून म्हणायला लागले? Wink
(हा खर तर हुडासाठी होता, मी पळवला)

झक्की बघतो बर का तुमच घर! Happy
९ तारखेला आभाळातून (गुगलथ्रू) मी बघतच असेन तुम्हा सर्वान्ना अशी कल्पना करा!
(नुस्ती कल्पनाच करा, नाहीतर आभाळाकडे बघत तर्पण कराल चुकून! Proud )

झक्की आणि सौ. झक्कींना मोठ्या माणसांत धरलेच नाही>> त्यांनी लिहीलय का ते घरी असतील म्हणून Proud

LT, विनय फोटो काढणार आहेत. त्यांना घराच्या फोटोंची पण स्पेशल ऑर्डर देऊन टाका.

गुड आयडिया पन्ना, अजुन एक पण विनयना सान्गतो
झक्की जिथे बसुन आपल्या त्या प्रसिद्ध अ नि अ आणि उ नि पां प्रतिक्रिया लिहितात ती जागा, ती खुर्ची/स्टुल/टेबल, तो कॉम्प्युटर...... अशाचा फोटो पण हवा Happy

<<झक्की जिथे बसुन आपल्या त्या प्रसिद्ध अ नि अ आणि उ नि पां प्रतिक्रिया लिहितात ती जागा, >>
मला नाही वाटत ते जमेल. ती जागा इतकी पसरलेली असते!
आता जरा ए. वे. ए. ठि. झाल्यावर थोडीशी जागा स्वच्छ करून एक फोटो काढून पाठवीन सगळ्यांना.

पन्ना, धन्यवाद.
नयनीश, तुमच्या आई वडीलांचा उपवास आहे का? आणि कुणाचा उपवास आहे? कुणि लिहीलेच नाही!
शोनूंच्या विचारपूस मधे विचारले त्यांचा काय बेत आहे, पण उत्तर नाही! कुणाकडे त्यांचा फोन नं असल्यास विचाराल का? धन्यवाद.

खरे तर त्यांची ती सुप्रसिद्ध हिरवी खुर्ची , जिच्यात बसून ते एम बी एच्या अभ्यासाला करतात, तीही एकदा बघून तिचाही फोटो टाकाच बुवा?(किंवा बोवा)

बोवाजी माझ्या वनभोजन कवितेचं काय झालं?

झक्की मला का धन्यवाद देतायत?

उपवास कोणाचाच दिसत नाहीये. मग ती सा. खिचडी खरच हवीये का?
नाहीतरी दूसर्‍या दिवशी पित्त/पिक्त होतं त्याने.. आणि त्यातून औषधं द्यायला अश्विनी ही येणार नाहीये. Wink

झक्की, येताना काही गेम्स आणायचे आहेत का? मी उनो आणतेय. पत्ते हवे असतील तर ते पण आणू शकते.

पन्ना माबोच्या गप्पांमधुन आणि खाण्यातुन तुला वेळ मिळणार आहे का खेळायला Wink
आणि सा.खि. पित्त होण्याइतकी नाही खायची कै, थोडीच खायची.

साबु. खिचडीला उपवासच कशाला पाहिजे? ती स्वतंत्र डिश म्हणूनही चविष्ट आणि आवडती आहेच. पित्त झाले तरी अन्टीडोट घेता येईल ना ? आता घुशी होतात म्हणून घरच बांधायचे कशाला असे करून कसे चालेल? एरेव्हीही उपासाच्या दुसर्‍या दिवशी पित्त होतंच ना? मग कशाला खायची ती सा. खि. उपासाला? आणि मग मुदलात तो उपासच कशाला धरायचा?

आणि सा.खि. पित्त होण्याइतकी नाही खायची कै, थोडीच खायची.
>>>

थोडी(च) हा शब्द सापेक्ष आहे. त्याची कोणतीही आन्तर राष्ट्रीय व्याख्या नाही आहे .
बोवाजी नाही का आपण थोडी थोडी घेऊ या म्हणत.?
(लीला काय वर्णूं त्या....)

मला खेळायला नाही.. ते दोन बेबी सिटर्स आहेत नं.. त्यांची सोय बघत होते Proud

घ्या, मी सा.खि नको म्हटले म्हणून तिकडे ती लालू मला वाईट्टं टोचून बोलतेय Proud
तिला सांगीतलय मी की एवढी खायची इच्छा असेल तर MT करेल की ब्रेकफास्टला Wink आणि केल्यासरशी थोडी घेऊन येईल झक्कींच्या घरी Proud

हुडा, प्वाईंटमे दम है!!

त्या सिंड्रेलाला मांसाहारींमध्ये का टाकलंय? कालपर्यंत तरी शाकाहारींमध्ये होतं तिचं नाव...
का तिथे येऊन ती लोकांचं डोकं खाणार म्हणून टाकलंय ? Proud

सिंडी घरी बनवत नाही म्हणुन मांसाहारासाठी कधीही तयार असलेला एक मेंबर आहे ना.. अस मागे कधीतरी ऐकलेल.. हो कि नाही ग??

मग उपवासवाले कुणि नाहीत असे धरायचे का?

हूडा, त्यापेक्षा तुम्हीच करा ती खिचडी नि पाठवून द्या! वेळ आहे अजून.

एखादा पदार्थ राहिला तरी काळजी करू नये. भारतीय नसले तरी शॉपराईट जवळच आहे.

सा खि बॉस्टनहुन येणार आहे ना ? आता खाल्ली तर अश्विनीच्याच हातची सा खि खाऊ.

सँटीबरोबर कोण येणार आहे ? तो जीपीएस काकुंचं ऐकत नाही आणि रस्ता चुकतो. त्याच्यावर जरा लक्ष ठेवा.

मी बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, मराठवाडी चिकन, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव, पावभाजी. मँगो शेक/मँगो लस्सी, मुलांसाठी पास्ता, आईसक्रीम, स्वीट्स (विनय आणणार), कढी, काकडीची कोशिंबीर, कणसं, पानं, साबुदाण्याची खिचडी (कोण आणतंय), पायनॅपल चंक्स ह्या व्यतिरिक्त काहीही खाणार नाही. काळजी नसावी Happy

नक्की कोण कोण काय काय आणतय ते कळण्यासाठी....

बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, मराठवाडी चिकन - लालू
भेळेचं सामान, पायनॅपल चंक्स -- पन्ना
पाणी पुरी कि वेज कबाब?? - सिंडी
वेज पुलाव-- नयनीश
पावभाजी, मुलांसाठी पास्ता-- सायो
मँगो शेक/मँगो लस्सी -- रूनी
आईसक्रीम --अडम
स्वीट्स --विनय
कणसं -- सचिन
पानं-- बो विश
कढी, काकडीची कोशिंबीर-- ??
सा.खि -- ??

मी राहिलेच की, बर पण माझ्या किचन चा ताबा त्या दिवशी लालू घेणार आहे!! Happy त्यामुळे मी बहुतेक काहीतरी रेडीमेड स्नॅक्स/ स्वीट्स वगैरे आणेन.

लोक काही नीट वाचत नाहीत.

बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, मराठवाडी चिकन - लालू
भेळेचं सामान, पायनॅपल चंक्स -- पन्ना
पाणी (पुरीचे) आणि वेज कबाब - सिंडी
अडम- पापुच्या पुर्‍या
वेज पुलाव-- नयनीश
पावभाजी, मुलांसाठी पास्ता-- सायो
मँगो शेक/मँगो लस्सी -- रूनी
आईसक्रीम -- झक्की हे झक्कीनीच आणले तर बरे असे तेच म्हणाले
स्वीट्स --विनय
कणसं -- सचिन
पानं-- बो विश
कढी, काकडीची कोशिंबीर-- झक्की
सा.खि --

MT, वर पन्नाने काहीतरी लिहिलंय बघ. Proud

म्हणजे लालू तू स्वतःच केलेले चिकन नंतर डब्यात घालून घरी नेणार का? Proud

आईसक्रीम -- झक्की ,हे झक्कीनीच आणले तर बरे असे तेच म्हणाले >> पण मग अडम काय आणणारे??

अडमा, माझ्यासाठी तू जर्सी सिटीतलं पटेलकडचं देसी आईस्क्रिम आण रे थोडसं. Proud

अमृता ठरलं का काय आणायचं?? काही नाही तर एशिया ग्रोसर्स कडून दीपचे पंजाबी समोसे आण. आपण झक्कींकडे बेक करू ते. Happy

लालू Lol

रुने, ती माझासाठी आणतेय ते चिकन Proud

पण मग अडम काय आणणारे?? >>>>> मला सांगा काय आणायचं ते... आणि कुठे मिळेल ते पण.. म्हणजे कुठलं देशी दुकान वगैरे.. आणि किती ते पण... म्हणजे मी आणेन..
नाहितर मी आधी म्हंटलं तसं झक्कींच्या घरी चहा करेन सगळ्यांसाठी.. अर्थात झक्कींनी सामान आणि भांडी दिली तर..

अरे देवा नाय रे बाबा माझी साखि काही हातखंडा प्रकारात नाहिये !! >>>> तू पार्ल्यात फोटो टाकलायस ना.. ते पदार्थ बरे दिसलायत.. तेच बनव गटग साठी पण. Happy

Pages