न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लालुचा एक वडा आधीच ब्यागेत भरुन ठेवला होता Proud वैद्यांनी मसाल्याची पिशवी टेबलवर ठेवल्याबरोब्बर अशा उड्या पडल्या. एक-दोघी जणींनी बहिणीला देते म्हणुन २-२ प्याकेटं घेतलेली मी पाहिलं Lol

अरे काय जी टी जी बाफं चा पार्ले केलाय अगदी. आता काल खाललं ना येवढं, आज चर्चा म्हणुन सुद्धा करु नका. Wink

>>नयनीशचा पुलाव?
हा कुठे होता? मला फक्त त्याची मसाल्याची पिशवीच दिसली. Happy
तसही मसाला आणल्यावर बाकी काही आणायची गरजच नव्हती.

कितीतरी पदार्थ चाखायचे राहून गेले हे आज कळतय. झक्कींची कढी आणि गव्हाची खिचडी, नयनीशचा पुलाव, विनयची रसमलई, सायोचा पास्ता आणि पावभाजी (जी डब्यात भरून आणली होती मात्र), सिंडीचं ग्रील्ड पनीर (हे पण आणलय) Happy इ. इ..

अरेरे, त्याही आमच्या हातात पडल्याच नाहीत. कुणाबरोबर पाठवलेल्यास त्यांनी गाडीतच फस्त केल्या असाव्यात. पुढच्या वेळी माझाबरोबर पाठव हो Proud

गव्हाची खिचडी होती, कुठे होती? मला दिसलीच नाही.
ओले खोबरे घातलेले गोड पोहे कोणी आणले होते एकदम मस्त झाले होते. नेहमीचे तिखट पोहे पण मस्तच. भाई तुम्हीच आणले होते का?

रुमाली वड्या, गव्हाची खिचडी, गोडं पोहे >> ह्या पदार्थांच दर्शन सुध्दा झालं नाही.

एक-दोघी जणींनी बहिणीला देते म्हणुन २-२ प्याकेटं घेतलेली मी पाहिलं >> MT, ही सिंडी बघ काय बोलते तूला Proud

कस्ला छान जीटीजी झालाय - वृत्तांत सगळेच वाचले -
दगडू तेली बाबत मैत्रेयीला अनुमोदक !

रुमाली वड्या, गव्हाची खिचडी, गोडं पोहे >> ह्या पदार्थांच दर्शन सुध्दा झालं नाही. >>>>> अगदी अगदी.. मला तर पुलीओग्रा पण नाही दिसला..
आणि शिवाय नयनिश चा पुलाव अगदी थोडा खाल्ला.. झक्कींचं आईस्क्रिम आणि गव्हाची खिचडी पोटातल्या जागे अभावी नाहीच खाता आली.. !!
तरी मी सांगत होतो डिनर पर्यंत थांबू म्हणून... तर सगळे निघूनच गेले... Uhoh
सगळ्यात शेवटचा पनिर चा घाणा मस्त भाजला गेलेला ग्रिल वर.. पण तेव्हड्यात पानं बाहेर आली.. मग पान खाल्ल्यावर कुठे पनिर खाणार म्हणून ती नाही खाल्ली... अश्विनी सारखे पिशवीत भरून घ्यायला हवे होते के पनिर कबाब.. Wink

अरे हो बो विश ला पेशल धन्यवाद, त्याच्यामुळे हजार एक वर्षांनी बनारसी पान खायला मिळाले. विशाल, पुढच्या जीटीजीला पण नक्की यायच बरका. Happy

विशाल,
धन्स रे, पानाबद्द्ल.
चला कोणालातरी पोहे आवडले. पोहत पोहत आलो म्हणुन आम्हाला उशिर झाला यायला. Happy

नन्तर वाचून झाली की पुस्तकं पोस्टाने परत करायची! कधी लिहायची वेळ आली नव्हती, पण आता आवर्जून लिहितेय, किती मस्त पद्धत आहे ही, कोण कुठले कधी न भेटणारे माबोकर, केवळ आयड्यांनी एकमेकाला ओळखणारे, तरी पुस्तके हक्कने मागणारे अन विश्वासाने आपली पुस्तकं देणारे माबोकर !!मायबोली रॉक्स..!!
>>>
अगदी सोळा आने सच. लै पुस्तक वाचले ह्या पद्धतीने.

फोटू कुठे आहेत.

भाई.. तिखट पोहे पण तुम्हीच आणलेले ना??? ते पण छान होते.. आणि हो त्यात काजू होते !!!
मी त्या पोह्यांमधले बरेच काजू माझ्या बोल मधे घेतले.. आणि बाहेर जाऊन कौतूक पण केलं की पोह्यांमधे काजू आहेत.. त्यावर मैत्रेयी ने काहितरी विशिष्ठ शहरी कमेंट्स केल्याचं आठवतय.. Wink

हो, आणि लालूचं मराठवाडी चिकन पण आणलय. ते आज रात्री डिनरला. Proud

खिचडीचं मोठ्ठ भांडं संपूर्ण रिकामं करून त्यात मावतील तितक्या गोष्टी भरून आणल्यात. नवरा बाहेरगावी गेल्याने, आता त्या मलाच संपवाव्या लागणार. Proud

भाई, गोडे पोहे मस्त झाले होते. दुसरे मी ट्रायच केले नाहीत.
पान्...अप्रतिम. कुठल्या दुकानातून आणले होतेस रे विशाल?

अश्विनीचे चटणी सँडविच पण राहिलेच सांगायचे. उपमा आणि सँडविच हा आमच्या मिनी गटगचा मेनु होता Happy रुमाली वड्या लपवून ठेवणार्‍याचा त्रिवार जाहीर निषेध !!!

सगळ्यांचे वृत्तांत खुमासदार!!

माझाही --

मागच्या वेळेस, फ्रेब्रूवारीत बारा ए वे ए ठी ला जायचं ठरत होतं पण मुलाच्या बास्केट्बॉलच्या प्रॅक्टीसमुळे रद्द झालं. तेव्हाच मी घरी दोघांना बजावून ठेवलं होतं की पूढच्या वेळेस आकाश-पाताळ जरी एक झालं तरी मी ए वे ए ठी ला जाणारच. Proud त्या नंतर दोनदा शिट्टी गटग झालं, त्यामुळे मुलाची आणि सचिनची चांगली गट्टी जमली होती. Happy

स्प्रिंग संपत आल्या आल्या बारा बाफ वर लोकांनी हळूहळू झक्कींना ए वे ए ठी कधी असं विचारून भंडावून सोडायला सुरवात केली. त्यात सुध्दा सुरवातीला ते "करू हो, कधीही करू, तुम्ही सांगा" अशी गुळमूळीत उत्तर देत होते. (तरी बरं, विशिष्ट गावासारखे "तुमच्याच घरी करू" असं नाही बोलले Proud ) हळूहळू लोकं भारताच्या ट्रिपा काढायला लागले. तसे मग सगळे जुलैमधे नको, ऑगस्ट मधे मी भारतात चाललेय असं करून त्यांना अजूनच बुचकळ्यात पाडत होते. Wink

शेवटी हो-नाही करता, दोन तीन तारखा बदलुन शेवटी ९ ऑगस्ट ही तारीख ठरली. मी लग्गेच माझी उपस्थिती नोंदवून टाकली. मग नेहमीप्रमाणे कोण कोण येणार, कोणाला जमणार नाही, त्याची नंबर सहीत कारणे, मेन्यू असे सगळे सोपास्कार चालू झाले.

हूडाने भरपुर शोधाशोध करून नेट वरूनच झक्कींचं घर शोधून काढलं अन त्यांच्याकडून खात्री करून घेतली. त्याचं अधून मधून समर्पक चित्र टाकणे, ए वे ए ठी उधळून लावायचे मिनी प्लॅन्स हे असलं चालू होतच.

ते बघून 'अनुल्लेख सम्राट' श्री. लिंबूटींबूंनाही मोह आवरला नाही. त्यांनीही इकडे येऊन ए वे ए ठीला शुभेच्छा दिल्या! ए वे ए ठीच्या आदल्या दिवशी 'ट्रान्सपोर्ट ट्रकवाले' श्री साजिरा ह्यांनी आपली सगळ्या प्रकारच्या ट्रक्सची लाईन उभी केली. त्यात मुख्यत: पांढर्‍या शाईची मोठ्ठी सोय केली त्यांनी!:P ए वे ए ठी निर्विघ्नपने पार पडु दे म्हणून बर्‍याच मायबोलीकरांनी जातीने इथे येऊन शुभेच्छा दिल्या होत्या, त्या सगळ्यांचे आभार. Happy

अश्विनी अन तिची खिचडी दोन्ही सारखं तळ्यात मळ्यात चालू होतं. अश्विनीने "मी नाही तर ए वे ए ठी पण नाही" असा विचार करुन मायबोलीकरांना फितवायचे प्रयत्न चालू केले, जे फसले. शेवटी तिलाच इकडे यावं लागल Proud

ए वे ए ठी रविवारी सकाळीच असल्याने शनिवारी सक्काळी सायोकडे जायचं ठरलं. सायोकडे १२.१५ ला पोचल्यापासून आमच्या दोघींचं अखंड गॉसिप चालू झालं! त्यात सिंडी, अडम ह्यांचे फोन चालू होतेच. फोन, चॅट, ऑर्कूट, आणि हा बाफ !! उत्सूकता नुसती वाढत होती. Happy

शनिवारी संध्याकाळी बाहेर जेवून आल्यावर दोघी कामाला लागलो. एकीकडे पावभाजीची तयारी, भेळेची तयारी आणि पास्त्याचा सॉस असं करत होतो. दोन्ही नवर्‍यांनी आमच्या बरोबर जागून पावभाजीच्या पावाला बटर लावून देणे, बटाटे सोलून चिरून देणे अशी कामं करून मदतीचा हातभार लावला!! रात्री १२ वाजत पण इकडे मिनी ए वे ए ठी चालू झाल्याच्या घोषणा पडतच होत्या!!

रविवारी सकाळी उठल्याबरोबर पोरांना पट्टी पढवल्याप्रमाणे त्यांनी पटापट आवरले. शोनू निघाली असा मेसेज आल्याबरोबर हलचालींना जोर चढला. तयार होता होता सचिन-अडमचा फोन आला कि ते टार्गेट मधे बो विशची वाट बघतायत. पाठोपाठ सिंडीचा फोन आणि वरील संवाद Proud तिची अपेक्षा होती की मी सगळ्यांना सांगेन आणि गॉसिपगर्ल म्हणून माझं नाव होइल. आणि मग ती माझी चुगली अ‍ॅडमीनच्या विपूत जाऊन करेल Proud

आवरुन सावरुन घरातून ११:१५ ला निघालो आणि १/२ तासात पोचलो. झक्कींनी फुगे घरासमोर न लावता रस्त्याच्या सुरवातीला लावले होते. गेलो तर झक्कींनी कारपाशी येऊन सामान उतरवायला मदत वगैरे केली. मी पन्ना हे कळल्यावर मग हिरा कुठाय अशी पण विचारणा केली Proud आत गेल्यावर समोर सचिन, एक ओळखीचा आवाजवाला लग्नाळू मुलगा अन एक शांत, सुस्वभावी मुलगा उभा असलेला दिसला. सचिनला तर ओळखत होतेच, शांत, सुस्वभावी मूलगा हा अडम असूच शकत नाही (;))त्यामुळे बाकीच्या दोघांनाही पटकन ओळखलं. बाजूलाच रूनी अन मैत्रेयी उभ्या होत्या. त्या दोघींनाही ओळखायला कष्ट पडले नाहीत. पाठोपाठ सिंडी, अजय, अश्विनी & साखि आलेच. नंतर शोनू विथ फॅमिली, नयनीश आणि कुटूंब, विनय आणि स.ध.चा, अनिलभाई फॅमिली, विकू (आयडि आणि प्रतिमा साठी पर्फेक्ट कँडिडेट) हे सगळे आले.

पुढे काय काय घडलं ते सगळं वर आलंच आहे.

विकूंनी दोन तीन वेळा मला 'पांढर्‍या शाईची सोय केली का?' असं काहीसं विचारलं, अन मी बुचकळ्यात पडले. एक तर मी अ‍ॅडमीन वाटले की काय त्यांना (:अओ:) किंवा मी इतकं आचरट बोलत होते की काय (;)) अशा दोन शंका अजुनही पिडतायत मला Proud

सगळ्यांचे सगळेच पदार्थ अप्रतिम झाले होते. MTचा मायबोलीचा दांडगा अभ्यास अन त्या बरोबर करावे लागणारे इतर सर्च वगैरेचे कष्ट बघून मन अगदी भारावून गेले!! Proud आता गणेशोत्सवात बिझी असताना माबोवर झालेले खमंग संवाद मिस होऊ नये म्हणून मी तिला आत्ताच रिक्वेस्ट करते की तिने योग्य वेळी वाहते बाफ, गुलमोहर, रंगीबेरंगी, विपू ह्या सगळ्यांचे स्क्रिनशॉट माझ्याकरता घेऊन ठेवावे. पूढच्या ए वे ए ठीला तिला त्याचा योग्य मोबदला मिळेल:P

वेबमास्तर एकदम सही आहेत!! सगळ्यांचं व्यवस्थित शंकानिरसन करत होते. गॉसिपही ऐकत होते!!! ड्यू. आय. नक्की कोणचा आहे हे ओळखता येऊ शकतो का ह्या प्रश्णाला उत्तर दिलय त्यांनी!!! (मी ते इकडे सांगणार नाहीये Wink )
पुस्तकं देणार्‍या घेणार्‍यांचे सगळ्यांचेच आभार! बाकीचं आभारप्रदर्शन केलय आधीच Proud

मला गोड पोहे मिळालेच नाहीत... मी तिखट पोहे तिथे खाल्ले नाहीत, पण सायोने बहुतेक मला पिशवीत भरून दिले आहेत. त्यामुळे मिळतील खायला. झक्की काकूंनी नंतर कढी पण दिली.

मला त्या रसमलईचा 'र' पण बघायला मिळाला नाही. सिंड्रेलाने खात नाही वगैरे म्हणत दोनचार उडवले बहुतेक...

पन्नाने भेळेसाठी केलेली तिखट चटणी मला सॉलिड आवडली होती.

पुढच्या वेळी आपण तिथे फलक लावून त्याच्यावर सगळा मेनू लिहूयात...

हजार एक वर्षांनी बनारसी पान खायला मिळाले.<<<<
बापरे, एवढी मोठी असूनही 'काकू' वाटत नव्हती हो. Proud
सचिन, रसमलाईचं दूध शिल्लक होतं निघायच्या वेळी. लावायचास ना डबा तोंडाला.
पन्ना, चांगला जमलाय वृत्तांत... ते मैत्रेयीचं लिहिलं आहेस त्यावरुन तू काय शिकलीस ते सांग बरं ..

पुढच्या वेळी आपण तिथे फलक लावून त्याच्यावर सगळा मेनू लिहूयात... >>>> हो रे.. त्यापेक्षा एखादा पदार्थ release झाला की त्याची व्यवस्थित घोषणा व्ह्यायला हवी... रूनी ने मँगो लस्सी नुसतीच बनवून ठेवून दिली.. मला वाटलं ती अजून होते आहे.. मग म्हणे नुसतेच फोटो काय काढतोयस पी की ती लस्सी.. Uhoh
आणि सगळ्यात हाईट म्हणजे MT चा शिरा... तो MT ने स्वत:च सगळ्यात आधी खायला घेतला.. पण त्यामूळे निदान कळलं तरी तो आलाय बाहेर हे.. Proud
रसमलाई मला दुरून दिसली.. मी तिथे पोचेपर्यंत फक्त दुधच उरले..

आपण एक बीबी काढुया का "पुढच्या जिटीजी त करता येण्याजोग्या सुधारणा" असा???
मग कोणीतरी लिहील तिथे "धन्यवाद, हे सगळं मंडळाला दाखवतो" आणि आणखिन कोणितरी लिहिल "अरे वा हे तर पुढच्या मिटींग ला प्रिंट आउट काढून घेऊन जाणरे" Proud

कसाबस घरी आलो. ब्राँकायटिस आणि न्युमोनियाने आडवा झालो. जास्त मायबोलीकर एकत्र आहे की असे का होते Sad

विनय Happy

अचानक काम निघाल्याने लवकरच निघावे लागले याची चुटपुट लागून राहिली आहे. सर्वांनी लिहिले आहेच तरीही काही हायलाइट्स.

१ भरघोस मिशा, रागीट चेहरा, हातात छडी, जाड चष्मा यापैकी काहीही नसलेले प्रेमळ वेबमास्तर.
२ कोणत्याही वधुपित्याच्या तोंडाला पाणी सुटावे अशी सद्गुणी, विनम्र, सुस्थापीत, कामसू, सालस अशी एक सोडून दोन मुले सचिन व बो विश. मी तर हळूच त्यांचे गोत्र विचारून घेतले.
३ कामचा देखावा करणारा आणी अधुन मधुन व्याकूळपणे मेघांकडे बघणारा आडम. ( दिवे घे रे बाबा )
४ बटाटेवड्यांचा एवढा मोठा ढीग आणी चव पाहून मी हळूच बायकोला फोन केला, चवदार बाटाटेवडे आणणार आहे म्हणून. पण निघताना बघतो तर ट्रे रिकामा !

वधुपित्यांच्या तोंडाला पाणी, कामाचा देखावा Lol अडम, बघ रे काय म्हणतात तुला
सचिन्,बो विश: मला ही सांगा रे हळूच तुमच्या जन्म तारखा. कोण असेल ओळखीत तर उडवून टाकू बार Proud
विकु, पुढच्या वेळेला शिकाल की एखादा पदार्थ आवडला की सुरवातीलाच पिशवीत भरुन टाकायचा. नंतर उरेल नी तुम्हांला मिळेल ह्याची हमी कोणी देऊ शकत नाही.

अडमा Lol अरे जेवण उघडून २ तास झाले तरी पाहिलं तर शिरा निम्मा पण संपला नव्हता म्हणून म्हटलं जाऊ दे झालं आपण तरी खावा!! Happy तर तुम्ही म्हणता तुम्ही पाहिलाच नाही !!
बादवे माझा तर विकुंवर संशय होता की साताठ वडे शिल्लक होते ते नन्तर अचानक गायब झाले त्यावरून !! Lol
विकु तुमचे हायलाइट वाचून लक्षात आले की तुम्ही वाटता तेवढे काही मनमिळाउ नसावेत Proud बरं वाटलं बै!
बाकी सद्गुणी, विनम्र वगैरे टॅग म्हणजे इथे बारात अन पार्ल्यात डिसक्वालिफाय होण्याची लक्षणं !! Proud

सद्गुणी, विनम्र, सुस्थापीत, कामसू, सालस >> हे बो-बिश च्या बाबतीत ठीके Wink तो पहिल्यांदा सगळ्यांना भेटत असल्याने तसाही तो शांत शांतच होता. कोणी गॉसिप वगैरे करायला लागलं की हळूच सटकायचा तिकडून Wink
अन त्या उलट सचिन अन अडम.. जिथे जिथे ४ टाळकी जमली होती अन हास्याचे फवारे उडत होते, तिकडे तिकडे पटकन धावत येत होते Proud

Pages