न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो, सर्वांचे आभार. तुमच्याशिवाय हा कार्यक्रम इतका चांगला पार पडलाच नसता! अहो, शब्दशः! मायबोलीवरचे एकाहून एक दिग्गज आमच्या घरी, नि तेहि काम करताहेत!

आलेल्या सर्व लोकांनी भरपूर काम केले, नि मी उगाचच इकडे तिकडे भटकत बसलो. बिचार्‍या लोकांनी खूप काम केले हो.

पूर्वी मला लाजच वाटली असती, आपल्या घरी बोलवायचे नि इतक्या थोर लोकांना कामाला लावायचे! पण वयोमानानुसार हे लाजणे वगैरे विसरायला झाले आहे! तरी क्षमस्व.

किती ते पदार्थ खायला! पार्ल्याचे बा. फ. चार दिवस नुसते त्या पदार्थांच्या यादीनेच भरतील. मी नावे लिहीणार होतो, पण मला नक्की नावे माहित नाहीत, फक्त खायला उत्तम हे कळले.

नि खुद्द अ‍ॅडमिन आमच्या घरी सॉफ्ट ड्रिंक्स घेऊन आलेले!
पाSSर बॉस्टनहून! ६०० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावरून! भारतातल्या लोकांनी लक्षात ठेवावे की अ‍ॅडमिन यांची माझ्याशी चांगलीच मैत्री आहे! तेंव्हा माझ्या बद्दल लिहीताना जपून.

तसे माझी मुलगी शिल्पा, नि जावई रिच यांनी पण कालपासून खूप मदत केली. बरे तर बरे आमचा जावई अमेरिकन आहे. भारतातला असता तर सासुरवाडीला येऊन नुसता बसला असता आरामात आम्हालाच हुकूम सोडत.

सौ. चे काय विचारता! ती नसती तर स्वैपाकघर कुठे आहे, मायक्रो वेव्ह कुठे आहे, , साधा ओव्हन कुठे आहे, हे सगळे या कामसू बायकांना कोण दाखवणार, मी?? शिवाय तिनेही बरीच मदत केली हो घरात.

तर एकंदरीत मी तर खूष! उद्यापासून माझा एम बी ए. चा अभ्यास पुनः सुरू!

Lol
झक्की, तुमची खुमासदार प्रतिक्रिया यायलाच हवी, त्याशिवाय झालेल्या गटगला काय मजा?
बरं, पदार्थ बघून नी खाऊन मंडळींची खात्री पटली असेलच की पार्ल्याक्वा नुसत्या चटकमटक मेन्यूच्या गप्पा मारत नाहीत तर करतात सुद्धा Wink

सायो तुझा निषेध.. !!!
आधी हाताला चटके देत देत ती कणसं भाजली.. रूनी सग्ळयांना ती वाटत असताना proactively आत जाऊन लिंबू आणि मीठ आणून सगळ्यांना दिलं... मला उरत का नाही अशी परिस्थिती झाल्यावर जे हाताला लागेल ते कणिस खाऊन घेतलं.. गॉसिप करत बसलेल्या माबोकरणींची पोरंटोरं ग्रिल च्या आसपास फिरकू नयेत ह्या कडे लक्ष दिलं... नंतर ते सिंडी चे कबाब भाजले.. ते नीट भाजले जात नाहित बघून त्यातले पनीर चे तुकडे वेगळ करून भाजले.. सगळयांना आग्राहाने वाटले.. ( त्यादरम्यान MT चा शिरा संपतो का काय ह्याची काळजी होतीच...! ) त्याचा शेवटचा घाणा प्यॅक करून सौ. झक्कींना दिला... आणि तरी ग्रिल बद्दल आभार फक्त श्री. शोनूंचे ???????? Sad

बारा ए वे ए ठी एकदम दणक्यात, उत्साहात आणि अनेक सरप्रायझेस सहीत पार पडलं!!!! मोठ्ठं सरप्राईज - अश्विनी अन तिची खिचडी Proud , झक्कींच्या लग्नाचा ३९ वा वाढदिवस आणि वेबमास्तरांच येणं. (सिंडीने माझ्या थ्रू सगळ्यांना शेंडी लावायचा प्रयत्न केला होता.. जो फसला Proud )

सगळ्यांना भेटून खूपच मजा आली!!! असं वाटलच नाही की पहिल्यांदा भेटतोय!!

मेन्यू तर सहीच होता.. अक्षरशः हे खाऊ की ते असं झालं होतं! शेवटी झीपलॉक भरून आणल्या ते वेगळचं Proud वादा केल्याप्रमाणे लालूचं चिकन डब्यात भरून आणलयं Proud

नयनीश, तुझ्या आई-बाबांचे आभार दगडू तेली मसाला आणल्याबद्दल. सौ. झक्कींचे पण स्पेशल आभार, अगत्यशिलतेबद्द्ल आणि आमचा आचरट्पणा सहन केल्याबद्दल! विनयचे उ.उ.विनोद मस्त रंगले! विशिष्ट शहरावरचे जोक्स मस्त होते!! Proud

सगळ्यात हायलाईट होतं ते अखंड गॉसिप!! अगदी नोड नं देऊन, ड्यु. आयच्या सगळ्या शक्यता एकमेकांशी पडताळून, विशिष्ट बीबीं, खास लेख, रंगीबेरंगी, कविता, प्रकाशचित्रे, कथा, प्रवास वर्णन... काय काय म्हणून नाही सोडलं Proud

जीटीजी बकी बेश्टच... प्रचंड खाणं झालं... !!!!! मेन्यू बाकी झकास सगळ्यांचे.. !!!!
लालू चे बटाटे वडे आणि MT चा आंबा शिरा rocks !!!!!! बाकीचा मेन्यू डिटेल मधे लिहितो नंतर...

सगळे जण गेल्यानंतर मी, सँटी आणि विशाल ह्यांना झक्कींनी आईस्क्रिम खायचा आग्रहं केला... पण आम्ही त्या ऐवजी चहा घेऊ असं सांगितलं... सौ. झक्कींनी सगळ्यांसाठी एकदम कडक चहा केला आणि आम्ही तो टेरेस मधे झक्कींकडून त्यांचा खास शैलीत वेगवेगळे किस्से ऐकत प्यायला... त्यामूळे सौ.झक्कींचे विषेश आभार... Happy

धमाल्ल्ल!!!! मजा आली. श्री व सौ झक्कींच्या कृपेनी ए वे ए ठी एकदम फक्कड पार पडला.
सरवात आधी, श्री व सौ झक्कींना लग्नाच्या वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा !!
अरे त्या खाण्याच्या पदार्थांचा पुर आला होता!!!! ह्या व्यतिरिक्त आजुन बरीच हायलाईट्स होती.
बु प्रा किंग विजय कुलकर्णींचं दर्शन. कृष्णाकाठच्या वांग्यांची भाजी काही त्यांनी आणली नाही पण सायोच्या पोराला त्यांनी बुप्रा चा असला मंतर मारला, तो यकदम खुर्चीवर संता सारखा बसला. मला त्याचेच काय तर विकुंचे पण पाय धरावे से वाटत होते. थोडा राग ही आला, माझ्या पोराला त्यांनी मंतर मारायच्या आत त्यांना त्यांच्या बायकोचा बुलावा आला आणी त्यांनी आम्हाला राम राम ठोकला. आता जरा पत्ता कळवा, घरीच येतो. मंतर तरी शिकवा किंवा ह्या पोराला तुमच्या कडे ठेवुन घ्या.
उभ्या उभ्या विनोदाचा कार्यक्रम नेहमी सारखाच झक्कास झाला, तो शेवटचा नागपुरी " काय भंजुस लोक एत बे...." वाल्या विनोदाला मी Rofl . विनयंनी आणलेली रसमलाई पण लै भारी होती हे ही नमुद करीन.
आडम दर्शन(माझ्या करता) हा ही येक हायलाईट. श्री शोनुंबरोबर त्यानीही ग्रीलींग ची जवाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. आधी तो फक्त काम न करता नुसतं तसं दाखवण्याचा सदाशिव पेठी कावा करत असल्याचीही वार्ता उठली होती पण मी स्वतः त्याची छाननी करुन तसं नसल्याचं खात्रीनी सांगतो. ह्याच बरोबर आडमाची वाग्द्त्त इव सुद्धा पन्नाच्या (?) मोबाईल मध्ये बघायला मिळाली. अगदी लक्षमी नारायाणाचा जोडा शोभत होता (लग्न आजुन होऊ घातलं असलं तरीही). एकंदरित आडमानी पार पाडलेल्या कामांची यादी (नुकतीच) पाहता तो एकदम तय्यार "नवरा मटेरियल" असल्याचा दावा पण मी करीन. आडम आणी इव्ह यांचा संसार छानच वाटत्य्यं वाटतय.
ह्या उपर, ओवरकास्ट कंडिशन्स (गुलकंदी वातावरण) असल्यामुळे एकदा दोनदा आडम हरवल्या सारखा सुद्धा वाटला. देव करो आणी आडम, इव्ह यांचं लग्न लवकरच होवो आणी जगराहाटी चालु रहावी.
अजय यांच्या उपस्थिती हा सुद्धा एक मेजर हायलाईट. इकडच्या तिकडच्या गोष्टी करता तेही काही काळ नगर(माझं आजोळ) मध्ये राहुन गेलेत असं कळलं. ह्याच्या मुळे माबो वर थोडी डिप्लोमॅटीक इम्युनीटी मिळेल की काय ह्या विचारानी सुखावतच घरी आलो.
झक्कींचा "मदनबाण.." उखाणा पण सालीड झाला.
गेल्या गेल्या लालुनी केलेले बटाटे वडे खायला मिळाले, मस्तच झाले होते. त्या नंतर पन्नाची भेळ, सायोचा पास्ता, अश्विनी ची साबुदाणा खिचडी खालली. हे सगळं खाऊन पोटात असला "काला" किंवा मोंदण का काय म्हणतात ते झाल्याचं जाणवलं.
सिंड्रेला ने केलेले पनीर टिक्का पण आवडले. बाकी आजुन काही खायची ताकद उरली नाही. उद्या पॅक करुन आणलेल्या पिशव्या उघडतो मग सांगिन कसे झाले होते ते.
एकंदरित कार्यक्रम जोरात झाला. बो-विश (विशाल) ची पण भेट झाली, तो बिचारा बाकी सगळ्या खंद्या माबो करांसमोर फारच शांत वाटला, त्याला जरा ट्रेनिंग द्यावं लागेल. बाकी त्यानी जाता जाता सगळ्यांची तोंड रंगवायची (पानानी हो..) काम मस्त केलं. तसच सरते शेवटी सँटी(सचिन)ची पुढच्या एक आठवड्याची शिदोरी कोणी तरी ट्रॅश म्हणुन फेकायला निघालं तेव्हा मात्र एकच गोंधळ उडाला. सचिन झक्कींच्या घराच्या एका टोकाला (हो घराची दोन्ही टोकं पाव मैल अंतरा वर तरी आहेत) आवराआवर करत असताना देखील शिताफीने धावत आला आणी ऐन वेळी "अहो ती माझी पिशवी आहे.." असा शंख केला त्या मुळे स्वतःवरच होऊ घातलेल्या मोठ्या आपत्तीतनं त्यानं स्वतःलाच वाचवलं.

आडम दर्शन(माझ्या करता) हा ही येक हायलाईट >>> का रे?? अडम दर्शनाला एवढा उत्सूक होतास का? का? Proud

ह्याच बरोबर आडमाची वाग्द्त्त इव सुद्धा पन्नाच्या (?) मोबाईल मध्ये बघायला मिळाली>>> Rofl अरे माझ्या नाय.. त्याचाच होता तो..
कठीण आहे.. गुलाबी वातावरणात अडम हरवल्यासारखा वाटणं ठीके.. पण तुझं काय ? Proud
(तरी बरं बायको, आई बाबा सगळे होते बरोबर )

त्या भेळेचा उल्लेख केलायस तिकडे माझं नाव घाल Proud

फोटो कुठायेत?
(की इथे पण फक्त जीटीजीला आलेल्यान्ना फोटो दाखवणार? )
असो
मी जन्ग जन्ग पछाडून बघितल, ब्रॉडब्याण्ड लाईन आली, इन्टरनेट कनेक्शन आल, पण चालूच होईना! Sad काल रात्री साडेबारापर्यन्त जागुन प्रयत्न केला पण जमल नाही झक्कीन्च घर आभाळातून टेहळायच
बेटर लक नेक्स्ट टाईम

जाऊदेग मनुस्विनी,
अग तिकडच्या लोकान्चा देखिल असाच उद्देश असणार की नुस्ती वर्णने वाचून लोक जळावित अन पुढच्या वेळेस (तरी) माझ्यासारख्याने पुण्याहून थेट झक्कीन्च्या घरी ल्यान्डीन्ग करावे जीटीजीसाठी Wink Proud
त्यान्चा तसाच हेतू असेल, तर तो सफल होतोय असे म्हणावे का?

मी आत्ता एक तासाभरापूर्वी पोचलो घरी. जीटीजी मस्त झाला. खरंच फार मजा आली. एवढे लोक होते की मला तर तिथे गेल्यावर आपल्या गेल्या दिवाळी अंकाच्या ओळी आठवल्या..

पक्ष्यांमध्ये मयुरू, वृक्षांमध्ये कल्पतरू
जीटीजींमध्ये मानू थोरू , बाराजीटीजी सी || Proud

पदार्थांचा पूर होता खरंच... अर्धे पदार्थ तर मी लोकांच्या हातात बघून, 'अरे, हे कुठून घेतलं!!' असं विचारुन जाऊन खाल्ले. ती मॅन्गो लस्सी तर मला कशीबशी मिळाली नशीबाने. सिंड्रेला, मैत्रेयी यांनी आणलेले पदार्थ त्यांनी स्वत:च आधी खायला सुरूवात केली. मग कुठे त्या पदार्थांचा पत्ता लागला आम्हाला... Proud नयनीशचा पुलाव मी आत्ता घरी आल्यावर खाल्ला. मला एकदम आवडला. सौ. ना आवर्जून कळव रे, नयनीश. Happy
सायो, पावभाजी एकदम मस्त. पास्ता उद्याच्या डब्यात. Happy लालूचा बटाटेवडा रॉक्स !!

विनयनी 'उभ्या उभ्या विनोद' मस्त केला. विकु, विशाल, अडम आणि आपले अ‍ॅड्मिन अजय हे नवीन लोक भेटले. ते अजय तिकडे शांतपणे खात बसले होते तर सिंड्रेलाचं सुरू तिकडे की ती विचारपूस अशी करा, ह्या सुधारणा करा, त्या सुधारणा करा... कसंबसं अ‍ॅड्मिननी हो-नाही वगैरे करत सुटका करून घेतली त्यांची. सिंड्रेलाचा दुर्गावतार बघून अश्विनी एकदम प्रभावित झाली आणि तिला कुठल्यातरी नाटकात मुख्य भूमिका वगैरे देणार आहे म्हणे... Proud

आल्या आल्या इतक्या लोकांनी रुनीला 'अगं, बारीक झालीस की तू!' असं म्हटलं की आनंदाने तिच्या अंगावर मूठभर मांस चढून ते कमी झालेलं वजन पुन्हा वाढलं. Proud मात्र श्री. शोनूंनी ग्रिलचे काम एकहाती केले. त्यांना धन्यवाद. त्या अडमला बसून बसून कंटाळा आला होता म्हणून जाऊन उभा राहिला तिथे शेजारी.. आणि आता श्रेय लाटायचा प्रयत्न करतोय..

तुम्ही सगळे लोक गेल्यावर झक्कींनी मी, अडम आणि विशाल यांना वर बोलावून मस्त चहा वगैरे केला. आणि मग त्यांच्या नोकरीतल्या गोष्टींपासून सुरूवात करून पुढे भारतातील भ्रष्टाचार, क्रिकेट, लता मंगेशकर, गांधी-नेहरू, काश्मीर, पाकिस्तान अशा विषयांना स्पर्श करत करत अमेरिकेच्या आर्थिक आघाडीपर्यंतचं बरंच काय काय आम्हाला सांगितलं. नंतर आम्ही त्यांना म्हणालो की, अहो भगवद्गीता राहिलीच! त्याविषयी पुढच्या जीटीजीला बोलतो म्हणाले.

परतीच्या वाटेवर मी, अडम आणि विशाल यांनी पुष्कळ गॉसिप केले. पन्नाने अडमला बजावून पाठवले होते की परत येताना मला त्याने मुलगी पटवण्याचे रहस्य शिकवावे. अडमने नुसतेच सांगितले नाही तर प्रवासभर त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले हो. त्याचे रहस्य - अखंड बडबड !! Proud

नंतर मी विशालच्या घरी गेलो. तिथे त्याच्या घरासमोरचा बोर्ड वॉक दाखवला त्याने. तिथे आम्ही बराचवेळ गप्पा मारत बसलो.

तिकडे जीटीजीच्या ठिकाणी गॉसिप ऐकून ऐकून डोकं भंजाळलं माझं. मग मी इशान, अद्वय, हर्ष, शौनक या बच्चेकंपनीशी खेळलो. एकदम बरं वाटलं मला. एकदा तर तो शोनूचा मुलगा डायरेक्ट झक्कींच्या घरात घुसून दुसर्‍या मजल्यावरच्या गॅलरी सदृश जागेत गेला. झक्कींच्या घरात जाऊ शकलेला तो एकमेव होता आज बहुतेक. Proud

शोनूने नेहमीप्रमाणे पुस्तकं आणली होती माझ्यासाठी. रुनीनेसुध्दा यावेळी मी न मागता मागे कधीतरी मागितली होती म्हणून आठवणीने पुस्तकं आणली होती. त्यांचेपण आभार. झक्कींनी तिथे मोफत पुस्तकवाटपाचा कार्यक्रम केला. त्यातली एक मी घेऊन आलो.

शेवटी सगळे गेल्यावर झक्कींच्या सुपुत्री आणि जावई यांनी सगळी टेबलं खुर्च्या घड्या घालून, गाडीच्या डिकीत भरून, गाडी योग्य जागी पार्क करून दिली. ते तिथं कामं करतायेत आणि आम्ही आणि झक्की तिथे गप्पा मारत उभे होतो. नंतर आम्हाला लाज वाटली आणि मग आम्ही त्यांना थोडी मदत केली. त्यांचे खरोखर आभार.

अशाप्रकारे बा रा जीटीजी संपन्न झाला. सर्वांना Happy आणि Light 1

अडमा, कुणीतरी म्हणालं तू त्या ग्रिलिंग जवळ नुसतीच लुडबूड करतोयस. खरं- खोटं काय माहित नाय.. पण असो, तुझे पण आभार Proud

नयनीश, माझ्या लेकावर विकुंनी केलेल्या बुप्राचा इफेक्ट फक्त झक्कींच्या घरापुरताच असणार होता काय? Wink
सगळ्यांचेच छोटे वृत्तांत सहीच.

सगळ्यांनीच आणलेली खादाडी इतकी प्रचंड होती की मी भाताचा कोणताच प्रकार खाऊन पाहू शकले नाही. सॉरी, नयनीश आणि विकु. अनुल्लेखच झाला जरा त्यांचा.
लालूचे ब.व खरंच अफलातून होते. ह्या पुढच्या प्रत्येक गटगला तिने काय आणावं? हा प्रश्न सुटलेलाय.
मै चा आंब्याचा रस घालून शिरा पण मस्तच. रुनीची लस्सी, सौ.झक्कींची कढी, अश्विनीची साखि सगळंच मस्त. फक्त त्या साखि बरोबर काकडीची कोशिंबीर तेवढी घ्यायची राहिली. पन्नाची भेळ, रसमलाई, माझी स्वतःची पावभाजी, पास्ता हे खायला पोटात जागाच शिल्लक राहिली नाही.
अ‍ॅडमिननी आणलेली सॉफ्ट ड्रिंक्सनी ह्या सगळ्या खादाडीला बहार आणली. Proud

नयनिश पुलाव मस्त बर का :). अन विकुंचा पुलिहोरा पण छान. घरी येऊनच चव बघितली दोन्हीची!!
लालू , रुनि आदल्या दिवशीपासून आल्यामुळे अशक्य धमाल आली ! माझा मुलगा मला म्हणाला, आय कान्ट बिलिव्ह एनिबडी कॅन टॉक फॉर होल २४ अवर्स नॉन्स्टॉप !! Happy
बर ते अडम अन नयनिश चं काय सेटींग आहे? नयनिश च्या ३ प्यारा च्या व्रुत्तांतात फक्त अडमावर पूर्ण एक मोठा पॅरॅग्राफ ??:फिदी:
अडमा तुला कुणाला 'दाखवण्यासाठी' तुझ्या ग्रिल , बालसंगोपन इ. इ. कौशल्याचे कौतुक हवं होतं तर आधी सांगायचं ना, योग्य मोबदला घेऊन सगळ्यांनी लिहायला नाही म्हटलं नसतं, Biggrin

"पुलाव" प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! आई ला कळवतो. मसाल्या बद्दल "नो प्रॉबलेम" मला आता दगडू तेली मसाला इथे निर्यात करण्याची नवीन कल्पना सुचली आहे.
ए अरे, सेटींग वगैरे काही नाही हां. आपला कंपु "सत्येन कप्पु.." अर्र्र्र चुकलच आपला कंपु "सत्य कंपु". जे दिसलं ते लिहीलं.
आणी नाही लिहीलं तर केलेल्या कामांची लिष्ट इथे लावण्यात येइल याचा मला अंदाज होता. काय बॉ तुम्ही आक्का लोक पण ना! सम्मते नई....... Wink

हो हो, पोचलो. साडेसहाला निघालो मैत्रेयीकडून. टर्नपाईकवर वाटेत पाऊस, स्टॉर्म लागले आणि बाल्टिमोरच्या आधी ट्रॅफिक! त्यामुळे पावणे अकरा झाले.
धन्यवाद. मजा आली. मस्त मेनू बद्दल सर्वांचे आभार. सा. खि बद्दल अश्विनीचे विशेष आभार. Wink बटाटेवडे आवडीने खाल्ल्याबद्दल सर्वांचे आभार. मसाल्याबद्दल नयनीश आणि कुटुंबियांचे आभार. आम्हाला घरात व किचनमध्ये घुसू दिल्याबद्दल मैत्रेयीचे आभार. श्री व सौ झक्कींचे आभार!

आम्हाला येताना चांगलाच पाऊस लागला! पण पोचलो वेळेत. रात्री तोंड उघडायची पण इच्छा नव्हती इतकं खाणं झालं होतं.
लालूचे ब.व. अल्टीमेट! नवर्‍याला खूपच आवडले.. म्हणाला तरी ४ खाल्ले Proud
चिकनच्या नादाने रात्री हर्ष जेवला पोट्भर!! तिकडे सचिनशी खेळण्याच्या नादात खाण्याकडे लक्षच नव्हतं त्याच..

विनयची रसमलई, रूनीची मँगो लस्सी, MTचा आंब्याचा शिरा (जो खाउन भारावलेल्या अडमने DJ शी कमी भांडायचं प्रॉमिस केलय :P), भाईंचे पोहे , नयनीशचा पूलाव (हे दोन पदार्थ आज नवर्‍याने डब्यात नेलेत.), भेळ, सिंडीचे वेज कबाब आणि पाणी पूरी, अश्विनीची सा.खि., झक्कींनी केलेली कढी अन कोशिंबीर, वे.मा. अजयनी आणलेले स्पेशल चिप्स अन सॉफ्ट ड्रिंक्स, सचिन ची कणसं आणि हे सगळं खाल्ल्यानंतर आवश्यक असलेलं पान(बो-विश) ...

तरी सायोची पावभाजी (जिची चव मी घरीच घेतली होती) अन पास्ता, विकूंचा पुलिहोरा हे खायचं राहीलच..

आज जेवायला लालूचं चिकन!!!

भाईंचे पोहे? ते कुठे होते? मी पाहिलेच नाहीत. Uhoh
नाही म्हणता म्हणता तरी बरंच खाल्लंस की पन्ना Proud
सिंडीच्या पापुचा नी बो विशच्या पानाचा अनुल्लेखच झाला माझ्याकडून. त्याबद्दल क्षमस्व.

वा. भरपूर मज्जा केलेली दिसतेय. Happy
मिनी वॄत्तांत छान आहेत सगळ्यांचे.
खादाडीचे फोटोज टाका नक्की. (खादडण्यातून वेळ काढून कोणी फोटो काढले असतील तर)

Pages