निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख फोटो, सुरेख प्रस्तावना!
नवीनवर्षाच्या शुभेच्छा!
हा गप्पांचा गुलमोहोर सदा बहरत राहो!

अगदी सुयोग्य शब्दातली प्रस्तावना अन रंगोत्फुल्ल मनमोहक नैसर्गिक गुढी … नववर्षाची प्रसन्न सुरुवात...
'रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं.">>> किती सुन्दर लिहीलय .हे पुस्तक वाचलच पाहिजे.

आज मी एक सुन्दर झाडान्ची कविता काव्य विभागात टाकली आहे सर्व निगप्रेमीनी ती वाचावी अशी विनन्ती
निसर्गप्रेमीना नवर्षाच्या पालवत्या शुभेच्छा...
http://www.maayboli.com/node/53188

जागू, शशांक आणि सायली, तिघांच्याही वेगवेगळ्या रुपातल्या गुढ्या आवडल्या.

सर्वांचे अभिनंदन.
आज नगरजवळच्या करंजी (खायची नव्हे) काही पॉलीहाउसेस आणि शेती पहाण्याचा योग आला. अहाहा.
वेळ मिळाला की लिवते आन फुटू बी ड्कवते.

सर्वांचे मनापासून आभार ....

सध्या पुढील अंगणात (कुंडीतला) मोगरा टपोरलाय अन मागील दारी चक्क रातराणी (ही देखील कुंडीतलीच) बहरलीये ... फोटो यथावकाश टाकेन ... Happy

२५ वा भाग हि एक केवळ संख्या झाली.. जागूसकट सगळ्यांचा उत्साह, आणि या गप्पांचा ताजेपणा पहिल्या भागा इतकाच आहे आणि तो तसाच राहणारही आहे.

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.
>>>> वा शशांकजी अगदी उमलत्या फुलासारखी सुंदर प्रस्तावना,___/\__ मस्त.
( गो.नि.दांच्या लेखनाचा मी पंखा आहे)

निसर्गाच्या सर्व लेकरांचे अभिनंदन Happy

२५ वा भाग हि एक केवळ संख्या झाली.. जागूसकट सगळ्यांचा उत्साह, आणि या गप्पांचा ताजेपणा पहिल्या भागा इतकाच आहे आणि तो तसाच राहणारही आहे. >>>>> अग्दी अग्दी ... Happy

निसर्गाच्या सर्व लेकरांचे अभिनंदन >>>>> निसर्गाची लेकरे हे अतिशय, अतिशय आवडले ... Happy

नि.ग.चा नवीन भाग आला पण...:)
प्रस्तावना फारच सुंदर .
कुंची फार आवडली.

Pages