विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॉलिंग.

चमुच्चिबाबा आला ब्याटिंगला. Lol

गेला, तो ही गेला.

भन्नाट लाईन लेंत टाकून राहिलेत शमी आणि यादव जोडगोळी! लटकला की गेलाच! एकदम वेताळ बॉलिंग आहे.

Buva,
tumchya phrases chi ek dictionary keli pahije kharach world cup bb varche shabd ek se ek bhari ahet !!
Tochan, vetaL Lol

हो पण ओव्हर मधले दोन बॉल दोघेही लेग स्टम्प वर टाकत आहेत. झिम आहेत म्हणून चालतय नाही तर ते ४ गेले असते कारण ७-२ फिल्ड आहे. लाईन वरचा कंट्रोल यादवचा तरी सुटतोय. पण तेच जर ऑफ स्टम्प वर बॉल असेल तर ते सगळे बॉल ब्युटी मध्ये मोडत आहेत. १४५ ला विकेट काढली. अमेझिंग.

बाय द वे ब्रॅन्डन टेलर खूप चांगला बॅटसमन आहे. असं दिसतंय की ब्रॅन्डन आणि टेलर असे नाव किंवा आडनाव असेल ते परफॉर्म करत आहेत. Happy

आलो.. आलो मी पण आलो...

फेरफटका.. भावना पोहोचल्या.

वैद्यबुवा..तेच लिहायला आलो.. आला आणी गेला सुद्धा! Happy आज बोलींग खरच जबरी टाकत आहेत.

आपला संघ तोच ठेवला आहे. मला वाटत बरोबर आहे.. जर बदल केलेल्या खेळाडुला परत संधी देणार नसाल तर उगाच एका सामन्यासाठी बदल करुन उपयोग झाला नसता.. त्यापेक्षा त्याच ११ खेळाडुंचे अजुन "जेलींग" व्हावे असा बहुदा विचार असावा.

डिज्जे Happy

मुकुंद, मलाही वाटतं बरं केलं. मोमेंटम राहतो. एकही मॅच सोडलेली नाही ह्या गॄप नी. जाऊन्द्या पुढे अशीच गाडी. Happy

तटि(वन्ली फॉर डिज्जे): तो जडेजा तुला रणदीप हुड्डा सारखा नाही वाटत का कधी कधी?
Proud

गेली! और एक!

(वन्ली फॉर डिज्जे): तो जडेजा तुला रणदीप हुड्डा सारखा नाही वाटत का कधी कधी? >>

अरे बुव्या रणदीप हुडा चांगला दिसतो रे. Lol

बोल्ट आणि स्टार्क सारखी धार काही वाटत नाहीये, यादव आणि शमी मधूनच त्यांची लाईन सोडत असल्यामुळे .
मला वाटतं ह्या कंडिशन्स मध्ये एखादा लेफ्ट आर्म सीमर एकदम लीथल ठरला असता.

शपूरला बोलवावा का? Proud

आयला, मला हे जडेजा, शर्मा वगैरेची बॉलिंग ठीकच वाटते राव. दे आर नो अश्विन! आयर्लंडच्या वेळी कसा स्पीन अटॅक सुरु केला होता तसा इतर टीम विरुद्ध नाही चालायचा.

बेफि़कीर.. मग आता लगे हात बोलुन टाका.. भारत वर्ल्ड कप यंदा जिंकणारच..:)

हायझेनबर्ग.. झहिर गेल्यानंतर आपल्याकडे लेफ्ट आर्म सिमर आहे अस मला वाटत नाही. डॉमॅस्टिक सर्किट मधे आहे का तसा कोणी? (इर्फान पठाणचे काय चालले आहे?). बट यु आर राइट.. ऑस्ट्रेलिया,(२)न्युझिलंड(२) व पाकिस्तानकडे(२) तसे दोन दोन बोलर्स आहेत.त्यामुळे त्यांच्या बोलिंग अ‍ॅटॅक मधे विविधता आली आहे.

धोनीने कॅच सोडला....:(

डिज्जे Lol असच काहीतरी अपेक्षित होतं मला तुझ्याकडून.

सोडला अजून एक! Sad

मी झोपावं म्हणतो. ४ पर्यंत उठलो तरी चालेल पण कही भरोसा नाही म्याच मारलेली वगैरे असायची आपण. Proud

गॉटा लाईक टू दिस गाय विल्यम्स. कसल्या शॉटस मारल्या त्यानी. अश्विन अन जडेजा परेशान झाले आहेत.

मुकुंद, नेहरा सारख्या कायम रडत खडत फिटनेस टेस्ट पास होणार्‍या प्लेअरने आयपील मध्ये मार खाऊन स्वतःची कायमचीच वाट लावून घेतली.

आज जाडेजा आणि अश्विनने बहूतेक 'वेंकटपथी राजू' च्या स्ट्रॅटेजीने खेळायचे ठरवलेले दिसते आहे.. पहिल्या सहा ओवर्समध्ये बॅट्समन राजूला मार मारून थकला की बळ संपल्यामुळे बाँड्री लाईनवर कॅच आऊट होणार आणि राजूला विकेट मिळणार. एखादा तरी शक्तिपात झालेला बकरा मिळायचाच राजूला. Wink

अश्विन अजून एक विकेट काढणार असे दिसतंय

मुकुंद - अवघड आहे. बांग्लाला हरवू आप्ण पण से फा ला सांगता नाही येत.

झिंबाब्वेचे असले म्हणून काय झाले टेलर आणि विल्यम्स दोघेही अनुभवी, ईन फॉर्म आणि क्लास बॅट्समन आहेत.
बाकींच्यासार्खे ते पण स्वस्तात कटतीलच असे नाही. दोघांनी मिळून ७०० धावा कुट्ल्या आहेत या स्पर्धेत. दोघेही पहिल्या सहा मोस्ट रन गेटर्स मध्ये आहेत. बॉलर्सची परीक्षा पाहिली जातीये ते चांगलच आहे. बॉलर्सना अडचणीतून मार्ग काढायची वेळ येते आहे तेही पुढच्या तयारीच्या दृष्टीने जरूरी आहे.

Pages