करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
बघणार.
बघणार.
अमित मिश्रा हा धोनीला आवडत
अमित मिश्रा हा धोनीला आवडत नाही का? चांगला आहे गोलंदाज.
सेहवाग व युवराज हे दोहे तरी
सेहवाग व युवराज हे दोहे तरी हवेत .
सचिन तर हवाच.... निदान
सचिन तर हवाच.... निदान प्रशिक्षक म्हणून तरी हवाच हवा...
१९९१-९२ नंतर सचिन शिवाय क्रिकेट विश्र्व-चषक बघण्यात काय मजा?
(बाद्वे, ह्या आमच्या "काउ"ला पण संघात घ्यायला हवे. डॉ.आहेत ते.भरपूर देश पण फिरलेले आहेत.म्हणजे त्यांच्याकडे पासपोर्ट पण असेलच.माबोचे प्रतिनिधी म्हणून मी तरी "काउं"ना अनुमोदन देईन.....)
मला वाटतं निवडलेल्या संभाव्य
मला वाटतं निवडलेल्या संभाव्य ३० खेळाडूंतूनच अंतिम संघ निवडला जावा. याव्यतिरिक्त सध्याच्या ऑसी दौर्यात कुणी भलतीच अफलातून केली तरच त्याचा समावेश होवूं शकतो. सचिन, सेहवाग, युवराज, भज्जी.... हे आतां प्रेरणा होवूं शकतात, प्लेयर नाहीं, हें त्यांच्याबद्दल नितांत आदर असूनही माझं मत [ कदाचित त्यांचं स्वतःचंही हेंच मत असावं !
] .
सेहवाग व युवराज हे दोहे तरी
सेहवाग व युवराज हे दोहे तरी हवेत . <<<<<<<<<< हे अजून तरी प्लेयरच आहेत आणि त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे .
<< हे अजून तरी प्लेयरच आहेत
<< हे अजून तरी प्लेयरच आहेत >> नक्कीच पण येत्या विश्वचष़क संघात ते असावेत का, याबद्दल मात्र मीं साशंक आहे; खूप प्रतिभावान, अतिशय 'फिट', चपळ व फॉर्मात असलेले , शिवाय,अगदींच अननुभवी नसलेले, नविन खेळाडू उपलब्ध असताना, त्याना वगळून कारकिर्दीच्या नि:संशय उतारावर असलेले खेळाडू घ्यावे का, हा खरा प्रश्न आहे. माझं उत्तर, नाहीं; पण वेगळं उत्तर असूं शकतं व तें अचूकही असूं शकतं.
तिशय 'फिट', चपळ व फॉर्मात
तिशय 'फिट', चपळ व फॉर्मात असलेले , <<<<<< युवराज हा सर्वात चांगल्या क्षेत्र रक्षक (फिल्डर ) पैकीच एक आहे आणि सेहवाग म्हणाल तर तो फिट असतोच फक्त फिल्डिंग थोडी कमी आहे पण फलंदाजीत सरस आहे .
संभाव्य ३० वगैरे काही नाही,
संभाव्य ३० वगैरे काही नाही, संघात शेवटी धोनीचे लाडकेच येणार आहेत..
<< ... संघात शेवटी धोनीचे
<< ... संघात शेवटी धोनीचे लाडकेच येणार आहेत..>> कोणाच्याही कोंबड्यानीं उजाडल्याशीं कारण !!!
हे वाक्य उजाडल्यावर मारायचे
हे वाक्य उजाडल्यावर मारायचे असते.
आणि तरीही याच्याशी असहमत, कारण हे वशिलेबाजीचे समर्थन नाही होऊ शकत, जो डिजर्व्ह करतो तोच संघात हवा..
अर्थात भारतीय संघात वशिलेबाजी चालते अन पुर्वापार चालत आली आहे हे माझे मत आहे, पण तसे काही नाही आहे असे आपले मत असू शकते
भारतीय संघात वशिलेबाजी
भारतीय संघात वशिलेबाजी चालते<<<<<<< असे असते तर रोहन गावस्कर आज संघाचा कप्तान असता .
असे असते तर रोहन गावस्कर आज
असे असते तर रोहन गावस्कर आज संघाचा कप्तान असता .
>>>
ते तेव्हाच होऊ शकले असते जेव्हा श्री सुनिल गावस्कर यांची खूप चालली असती, पण त्यांचे तर बरेच पंगे आहेत, तरीही रोहन गावस्कर संघात खेळून झालाय हे हि नसे थोडके, अन्यथा त्याच्यापेक्षा दहापट चांगले खेळाडूंना कधीही ईंडिया कॅप घालता आली नाहीये.
<< हे वाक्य उजाडल्यावर
<< हे वाक्य उजाडल्यावर मारायचे असते >> तसंच असेल तर अंतिम संघ निवडल्यावरच सबळ कारणं देवून मगच << ... संघात शेवटी धोनीचे लाडकेच येणार आहेत..>> हा आरोप करायचा ना ! केवळ अंदाजच बांधून म्हणायचं तर धोनीच्या नेतृत्वाखालीं आतांपर्यंत उजाडलेलं आपण पाहिलंयच !!
@ भाउ नमसकर आणि विश्या... एक
@ भाउ नमसकर आणि विश्या...
एक नंबर...
बाकी सांगायचे तर भारतातले बरेचसे अधिकार ऋन्मेssष, काउ इत्यादी जाणकार मंडळींनाच द्यायला पाहिजेत, असे माझे मत आहे. किंबहूना भारताचे पंतप्रधानपद आणि राष्ट्रपतीपद ह्या दोघांकडेच द्यायला पाहिजे असे माझे मत आहे.
बाकी सांगायचे तर भारतातले
बाकी सांगायचे तर भारतातले बरेचसे अधिकात ऋन्मेssष, काउ इत्यादी जाणकार मंडळींनाच द्यायला पाहिजेत, असे माझे मत आहे. किंबहूना भारताचे पंतप्रधानपद आणि राष्ट्रपतीपद ह्या दोघांकडेच द्यायला पाहिजे असे माझे मत आहे.
--> :प :प
अरे कुणी बघताय की नाही आपला
अरे कुणी बघताय की नाही आपला पहिला सराव सामना ?
ऑसीजनी चिंधड्या केल्या आपल्या बॉलिंगच्या
..बॅटींगच्या देखील !
..बॅटींगच्या देखील !
world cup साठी espn वर
world cup साठी espn वर मायबोलीची fantasy league उघडली आहे
लीगनेम: maayboli
पासवर्ड: maayboli
जॉइन करा
सराव सामना पाहुन मला वाटते
सराव सामना पाहुन मला वाटते झिंबाबे, स्कॉट्लॅड, यु ए इ फक्त आपल्याला टफ फाइट देवु शकते.
मला वाटते,.... ऑस्ट्रेलिया
मला वाटते,....
ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेला हा संघ बापजन्मात हरवू शकणार नाही, त्यामुळे ते बादफेरीत समोर आले की आव्हान समाप्त.
ईंग्लंड आणि न्यूझीलंडला हरवायला खेळ बराच उंचवून नशीबाची साथ मागावी लागेल, त्यामुळे बादफेरीत हे समोर येतील तेव्हाही पुढे जाण कठीणच.
पाक-श्रीलंका-वेस्टैंडिज हे आपल्या तोडीचे वाटतात वा झिम्बा-बाग्ला चुकून पुढे आलेच तर यांनाही आपण नमवू शकतो.
तर क्वार्टरमध्ये पाक-लंका-विंडीज यापैकी एखादा संघ,
सेमीला न्यूझी वा ईंग्लंड
आणि फायनलला ऑसी वा आफ्रि असे चढत्या क्रमाने भेटत गेले तर बरे होईल.
किंवा इतर सामन्यांत दुबळ्या संघांनी बलाढ्य संघांचा काटा काढून आपला मार्ग मोकळा केला तर बरा होईल.
स्वबळावर आपण एव्हरेज संघांच्या जरा खालीच आहोत, त्या त्या दिवशीला कसा खेळ उंचावतो यावर सारे अवलंबून..
काही असो, आता सारे नकारात्मक विचार सारून ईंडियाल्ला फुल्ल्ल सपोर्ट द्यायचा हेच आपले काम !!!!!
वुई वोन्ट गिव्ह ईट बॅक
अमेरिकेत कोणी ती मुकुंद ने
अमेरिकेत कोणी ती मुकुंद ने दिलेली लिन्क ट्राय करून पाहिली का ? चालतेय का ?
हो सध्या तरी चालते फुडच काहि
हो सध्या तरी चालते फुडच काहि माहिति नाहि.
www.crictime.com
मैत्रेयि.. हो मस्त चालते..
मैत्रेयि.. हो मस्त चालते.. सध्या कंप्युटर वेब ब्राउजरवरच.. पण १२ तारखेनंतर टॅब्लेट व स्मार्टफोनवर पण
ऋन्मेष.....(डॉलर साइन कशी काढायची बुआ? :() अरे आपल्या टिमने गेली चार महिने सगळ्या जगाला गाफिल ठेवले आहे. आपली टीम त्यांची भेदकता ऐन वर्ल्ड कपला दाखवुन सगळ्या जगाला चकमा देणार आहे... आत्ताच कशाला आपला सगळा डाव उघडा करायचा? (गेल्या चार महिन्यात एकही विजय न बघुन व त्यांची कशी पिस निघतायत हे बघुन असे मला वाटते :)) जरा वर्ल्ड कप सुरु होउद्यात! मग कसे बघ आपले खेळाडु वाघासारखे खेळतील..
ऋयाम नै ऋन्मेऽऽष
ऋयाम नै ऋन्मेऽऽष
क्षमस्व .. चुकीची दुरुस्ती
क्षमस्व .. चुकीची दुरुस्ती (जमेल तेव्हढी
) केली आहे बघ..
क्षमस्व वगैरे नको हो बस्स
क्षमस्व वगैरे नको हो बस्स निदर्शनास आणून दिले, ते डॉलर साईन नसून आ आ आ सूर आहे. तो कुठून येतो ते आपले टॉप सीक्रेट आहे
असो, आशा करूया भारताच्या चांगल्या खेळाची, अन्यथा हा दिड महिना जड जाईल फार...
नाही रे.. नावाची चुक करणे
नाही रे.. नावाची चुक करणे खरतर अक्षम्य आहे..
अरेच्या.. खरच की ती डॉलर साइन नाही की .. अमेरिकेत कित्येक दशके राहील्यामुळे सगळीकडे डॉलरच बघीतल्यासारखे वाटते..
पण तु म्हणतोस ते खरय..
सध्या आपली टिम एकदम कन्फ्युज व विस्कळित वाटते.. कोणालाच आपला रोल काय आहे हे माहीत नाही असे मॅच बघताना वाटते... अगदी कालच्या प्रॅक्टिस मॅच मधे पण किती दडपण आल्यासारखे खेळत होते! ऑस्ट्रेलिया त्याउलट खुप कन्व्हिक्शन ने खेळत होते.. वॉर्नर आणी मॅक्सवेल असेच खेळले तर ऑस्ट्रेलिया ला हरवणे कठीण दिसतय या वेळेला..
पण हेही तितकच खर की ते भारतिय बोलर्ससमोर खेळत होते.. चार महिने ऑस्ट्रेलियात राहुन सुद्धा कुठल्या लाइन व लेंग्थ वर बोलिंग करायची याबाबत ते अजुनही क्ल्युलेस वाटतायत.. क्रिकेटच्या बॉलने खेळण्या ऐवजी खुपच पेंट बॉल किंवा सॉकर बॉल खेळण्यात वेळ घालवत असावेत बहुतेक..:(
मला वाटत आपल्या संघाने २-३ आठवड्यासाठी भारतात परत यायला पाहीजे होते.. चार महिने घरापासुन दुर.. फारच झाले बहुतेक.. तिथल्या कंडिशन्सचा सराव व्हावा हा हेतु असावा पण तो अंगलट आल्यासारखा वाटतोय.. ४ महिने विजयाशिवाय.. त्यामुळे संघाचे नितिधैर्य खचल्यासारखे वाटत आहे.. जरा घरी जाउन आले असते तर परत ताजेतवाने होउन आले असते असे मला वाटते..
भारतात एकूणच वर्ल्ड कप
भारतात एकूणच वर्ल्ड कप लोकप्रिय झाल्यापासून हा पहिलाच असेल ज्याची अजूनही फारशी हवा दिसत नाही - आख्ख्या कप मधली सर्वात जास्त वाट पाहिली जाणारी - भारत-पाक मॅच एका आठवड्यात असूनही. किंबहुना यावेळेस भारत-पाक ही सर्वात इंटरेस्टिंग गेम नसेलही कदाचित. कारण दोघेही फार विशेष नाहीत.
टीव्हीवर जोरदार मार्केटिंग चालू आहे पण काहीतरी मिसिंग आहे. हा सचिन नसल्याचा परिणाम, की सचिन सारखा दुसरा कोणीही 'आयकॉन' अजून निर्माण न झाल्याचा (विराट कोहली अजून 'तेवढा' मोठा झाला नाही), की मागच्या ३-४ महिन्यांतील दयनीय कामगिरी मुळे अजिबात अपेक्षा नसल्याचा, माहीत नाही. लोकांच्या गप्पांमधे फारसा विषय निघत नाही, आणि निघाला तरी 'यावेळेस काही चान्स नाही' असाच सूर दिसतो.
भारताने यापूर्वीही अजिबात अपेक्षा नसताना प्रचंड कामगिरी केलेली आहे - १९८३ व १९८५ दोन्ही वेळची उदाहरणे आहेत. होपफुली यावेळेसही काहीतरी अचानक पेटून करतील. तेवढा एक युवी घुसवा म्हणावं संघात.
इथल्या पेपर्समधल्या 'बिझिनेस' सेक्शन्स मधे असेही वाचले, की सगळे जाहिरातींचे स्लॉट्स अजूनही विकले गेलेले नाहीत (भारत-पाक, व फायनल वगैरे सोडून इतर मॅचेस चे). नंतर लगेच आयपीएल आहे, व मार्केटिंग वाल्यांच्या दृष्टीने आयपीएल जास्त 'सेफ' झालेले आहे, कारण लोकांचे स्पर्धा पाहणे कोणत्याही एका टीमच्या परफॉर्मन्स वर अवलंबून नसते.
ऽऽऽऽऽऽऽऽ कसलं सिक्रेट
ऽऽऽऽऽऽऽऽ कसलं सिक्रेट ऋन्मेऽऽष... बहुतेकांना माहिती आहे ते कसे करायचे ते.. मुकुंद अ लिहा आणि त्याच्यापुढे टिल्डा लिहा..
Pages