विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर.. काय सांगता येत नाही.. मोमेंटम,कॉन्फिडन्स अँड् ग्रेट फॅन सपोर्ट डझ लॉट्स ऑफ वंडर्स इन स्पोर्ट्स.. आणी या तिन्ही गोष्टी सध्या आपल्या बाजुने आहेत.आपल्या संघावर विश्वास ठेवा!..:)

टॉकिंग अबाउट कॉन्फिडंस..वैद्यबुवा आपण तोच संघ ठेवल्याचा तोटा असा होउ शकतो की आश्विनसारख्या बोलरचा ज्याचा आत्मविश्वास मस्त झाला होता त्याला आजच्यासारख्या मिनिंगलेस सामन्यामधे जी त्याची पिटाइ होत आहे त्याने तडा जाउ शकतो. परत बाद फेरीत बाकीच्या फेरीत त्याला कसे खेळायचे याची ब्लु प्रिंट झिंबाब्वेच्या बॅट्समनच्या आजच्या बॅटींगमुळे बाकीच्या संघांना मिळु शकते..:(

जडेजा बोलिंगमधे आज परत फेल..:(

काय मस्त फलंदाजी व शतक टेलरचे.. वेल प्लेड!

"Brendon Taylor or McCullum?">>> क्रिकइन्फो!!

ऑस्सम बॅटिंग.. मच्युअर अँड वेल बॅलन्स्ड,पेशन्स अ‍ॅज वेल अ‍ॅज अ‍ॅग्रेशन.
ईट्स शेम टू सी यू गोईंग ब्रॅन्डन..

Zim विरुद्ध wide आणि No ची परंपरा आजही कायम ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत.

धोणीचा दुसरा बॉलिंग चेंज जरा चुकल्यासारखा वाटला, फार लवकर स्पीनर्स काढले. लहान ग्राऊंडवर स्पीनर्स ना मागे ठेवायची रिस्क होती पण टेलर आणि विल्यम्सला अजून चार ओवर्स सीमर्सला खेळावं लागलं असतं तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं.
बघूया आता बाकी धुरंधर काय करतात ते.

मला नाही वाटत अवघड आहे कारण आपल्याकडे बॅटिंग पावर आहे. आज रोहितला पुन्हा एकदा चान्स आहे. अगदी ४० धावा झाल्या तरी पहिल्या १० ओव्हर फक्त टिकून खेळावे. मग धुता येईल. ग्राउंड छोटे आहे.

Amen !

2 Down Sad

हा नेहमी क्रीझच्या बाहेर उभा राहतो. त्यामुळे त्याला टप्पाही चांगला मिळतो आणि वेळ पडली तर बॅकफूटवर जायला स्कोपही भरपूर मिळतो.

रहाणे आताशा नं ४ लाच खेळतो. तो रैना त्या नंबर वर फेल्युअर आहे. मोठ्या गाजावाजेने प्रोजेक्ट रैना सुरू केला होता, पण तो फेल गेला.

ह्म्म्म्म्म्म्म

आज लुंगी डान्स करता येइना!

चला वर्क इट आउट बॉईज, वर्क इट आउट.

Sad
मारुन घेतला स्टंप वर.

आता खरी परिक्षा आहे. संकटकाल!
मुंडी खाली अन एकेक दोन दोन येवुन द्या सध्या!!

पुढे येऊन फोर मारली! Lol ग्रेट!

अगदी ४०-४२ ओवर पर्यंत २०० झाले तरी चालतील.

गुड सिच्युएशन टू प्रॅक्टीस . रैना जरा व्हल्नरेबल वाटतोय. धोणीची चिंता नाही.

आपल्या स्पीनचे वाभाडे निघाले अन त्यांच्या विल्यम्स अन रझा मस्त टाकतोय.

पार क्वार्टरस पर्यंत येऊ पर्यंत रोहित शर्मा चालला नाही हे फारच निराशाजनक आहे. फुक्ट एक जागा अडून राहिलीये.
जडेजाचे पण तेच.

छक्के!aha.gif

रायुडु ला येऊ द्या शर्मा किंवा जडेजा एवेजी पुढच्या मॅच ला.

१०० चेंडू उरलेले असतांना १५० मारता येतात. आता १०८ मध्ये १४७ हवेत. मामला खूप अवघड नसावा. मैदानही छोटे आहे.
-गा.पै.

Pages