विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार तुला राजु कुलकर्णी आठवतो? सही >>. हो. Happy तो फास्टेट होता तेंव्हा. भरपूर हाईप होती, पण .. असो.

गावस्कर पोस्टला अनुमोदन. इथे सचिनलाही लोकं स्वार्थीच म्हणतात त्यामुळे ओके.

ब्रॅन्डन आउट झाला !

बांग्लाच्या कप्तानवर धोणीचा खूप प्रभाव आहे. Happy सही जाळे लावले होते.

मुकुंद + १०० मोदक. Happy

अ‍ॅटीट्युड म्हणजे एकदा आम्ही नाही खेळत जा!! असे म्हणुन खेळपट्टी सोडुन निघुन गेला होता गावस्कर. Happy

बाग्ला इथून हरली तरी ज्या जिगरीने ते खेळले त्याला हॅट्स ऑफ !!

विशेषतः सुरूवातीला बॉल स्विंग होत असताना त्यानी जो संयम दाखवला तो वाखाणण्याजोगा होता .
एकदा तो पिरियड खेळून काढला की ५४ मीच्या बाउंड्रीज म्हणजे पर्वणीच Happy

क्रिकेट मधे इतिहासा पेक्षा या क्षणी तुमची टीम कशी खेळतेय हे जास्ती महत्वाच असत हे यातून दिसत .

न्यूझी- ६ डाउन!!!!
क्वार्टरफायनला लंका येणार की काय!!

आपल्याला बहुतेक श्रीलंका बरोबर खेळावे लागणार
बांग्ला जिंकण्याच्या जवळ आहे.
जर जिंकले तर ३र्‍या स्थानावर आणि श्रीलंका सरळ खाली ४थ्या स्थानावर

मुकुंदची गावसकरबद्दलची पोस्ट मस्तच.. गावसकर फक्त इंग्लंडलाच नाही तर इतर वेळीही जो कोणी भारताच्या विरोधात उगाचच बोलतो तेव्हा त्यांची बरोबर घेतो. तरीपण तो स्वार्थी असेल तर असू दे बाबा.. Happy

गो बांग्ला..

संपली मॅच.. व्हिटोरी आणि साऊदीनी सिक्स मारल्या दोन..

वेल प्लेड बांग्ला... आता पर्यंतची टफेस्ट मॅच फॉर न्यूझीलंड

ओहोहो, हार्टब्रेक..
एक सणसणीत फास्ट किंवा एकदम चतुर स्पिनर कमी पडला बांग्लाकडे.
चेस करताना ही न्यूझी टीम ढेपाळते आहे.

शाकिब ने ४४ ओव्हर नंतर रकिबला का गोलंदाजी दिली नाही हेच कोडे आहे. किमान राँची आउट झाल्यावर तरी द्यायला हवे होते. २ ओव्हर त्याच्या बाकी होत्या आणि शाकिबचे ३ या पाच ओव्हर त्याने काढल्या असत्या तर सहज जिंकले असते. न्युझीलंड स्पिनर्स विरुध्द व्यवस्थित खेळत नाही. याचा फायदा जसा पावरप्ले मधे उचलला तसा शेवटच्या ६ ओव्हर्स मधे उचलायला हवा होता. मुख्य स्पिनर्सना देण्याऐवजी पार्टटाईम गोलंदाज वापरले

मुकुंद,

गावसकर च्या खेळाला स्वार्थी नाही म्हट्लं मी. त्याच्या खेळाविषयी आदरच आहे (त्याच्या खेळाला कुणाच्या सर्टिफिकेट ची गरज नाही. लक्ख प्रकाश आहे त्याचा). त्याच्या खेळाव्यतिरिक्त वागण्याविषयी / सोयिस्कर बोलण्याविषयी मी माझं मत मांडलय. त्याची एकमेव एकदिवसीय सेंच्युरी ८५ चेंडूत आहे, १९८७ च्या वर्ल्ड-कप मधे.

गांगुली ने जे लॉर्ड्स वर केलं ते फ्लिंटॉफ ने, मुंबईत, भारतीय संघाविरुद्ध मॅच जिंकल्यावर जो शर्ट काढला, त्याचं प्रत्युत्तर होतं, त्याचा कॅनव्हास मोठा होता, त्यात गावसकर सारखा वैय्यक्तिक अपमानाचा बदला घेण्याचा भाग नव्हता. त्याशिवाय त्याने, ते परत परत उकरून काढत, संधी मिळेल तिथे नांगी मारत नाही राहिला.

त्याशिवाय त्याने, ते परत परत उकरून काढत, संधी मिळेल तिथे नांगी मारत नाही राहिला. >> Doesnt it make him more like them (British) Happy

मला गावस्करचा खेळ तर अतिशय ऊच्च प्रतीचा वाटतोच पण त्याचं समालोचन, समोरच्याला बोअर न करता त्यात व्यवस्थित पेरलेले टेक्निकल डीटेल्स आणि ईतर बोलणं अतिशय ऑथोरिटी व जेन्यूईन कन्सर्न ने भारलेलं आणि बॅलन्स्ड वाटतं.

तुम्ही नोट केलं असल्यास गावस्कर समलोचनास करीत असल्यास रिकगनाईज्ड बॅट्स्मन आऊट झाल्यानंतर तो त्या बॅट्समच्या आऊट होतांनाच्या शॉट सिलेक्शनचे, लेग/हेड/शोल्डर मुवमेंट, फॉलो थ्रूचे एक दोन वाक्यातच एवढे पटकन अ‍ॅनालिस्सिस करतो की प्रत्येक शॉटसाठी लागणार्‍या पुस्तकात लिहिलेल्या प्रीरिक्विझिटस त्याच्या डोक्यात किती फिट्टं आहेत हे जाणवतेच.

गावसकर च्या खेळाविषयी, त्याच्या टेक्निकल ज्ञानाविषयी मी आदरच व्यक्त केला आहे.

बाकीच्या गोष्टी ह्या वैय्यक्तिक मतं आहेत,

एकच मिनिट! फलंदाज व समालोचक म्हणून तो महान आहेच. हे मान्य केलेले आहे हे मान्य झाल्यावर पुढील चर्चेत राम आहे.

आज रात्री न यु एस च्या ?
होउन जाउ दे इंडीया, वन मोअर व्हिक्टरी :).
अता बांग्लाशीही खेळायला मजा येणारे !

Pages