विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टी२० जिंकुन देखील काहीच फरक पडलेला नाही आहे त्यामुळे काही उपयोग वाटत नाही
>>
फरक नक्की कश्याबाबत आणि काय अपेक्षित होता?

या स्पर्धेच्या आधी झालेल्या तिरंगी सामन्याच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकले होते ना... नंतर दुखापतग्रस्त झाला.. सांगायचा मुद्दा हा की तो वर्ल्डक्लास अ‍ॅटेकसमोर या खेळपट्ट्यांवर खेळू शकतो.

द. आफ्रिकेला श्रीलंका खाणार. श्रीलंकेला न्यूझीलंड. न्यूझीलंड डार्क हॉर्स आहे यंदाचा. आणि तो चांगलाही खेळतो आहे. शिवाय त्याने एकदा ऑसीजना हरवले आहे. माझ्या मते न्यूझीलंड कप घेणार.

भारताला सर्वाधिक चान्सेस आहेत असे वाटत आहे:

प्रोव्हायडेडः

१. पाकिस्तान परत भेटायला नको
२. टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजीच घ्यायला हवी, मैदान कोणतेही असो!
३. 'मी संघात का आहे' हे जडेजाने फक्त तीन वेळा सिद्ध करावे.
४. टॉस हरलो तर धोनीने जडेजाच्यानंतर फलंदाजीस यावे
५. श्रीलंका हरावी.

ह्या वेळी मॅचेस चुरशीच्या झाल्यात त्यामुळे आजिबात अंदाज लावता येत नाहीये कोण जिंकेल ह्याचा. आपली टीम जिंकली पाहिजे हे वाटत असतच पण सरतेशेवटी प्रेक्षकांना उत्तम क्रिकेट बघायला मिळेल ह्यातच सगळं आलं.

आपल्या टीमचे वर काही लोकांनी लिहिले आहेत ते वीक पॉईंट्स आहेतच. रोहित शर्मा, जाडेजा. माझं तर मत आहे रायुडु ला संधी द्यावी!
दोन बॅट्समन अगदीच निकामी म्हणजे फारच प्रेशर येइल जर समोरची टीम एकदम अव्वल खेळत असेल तर. नाही म्ह्ंटलं तरी इंडिज आणि झिंबाब्वे विरुद्ध आपल्याला त्यांनी केलेला गल्थानपणा उपयोगी पडला खुपच नाहीतर आपला बंटा ढार व्हायची खुप दाट शक्यता होती. एक अफ्रिकेशीच मॅच अशी होती जिथे खरच आपल्या इनिंग्सला नावं ठेवायला आजिबात जागा नव्हती! आणि म्हणूनच मला आशा आहे की आपण जि़ंकू कप!

मैदानं निवडायची काय प्रोसेस आहे ते नक्की माहित नाही पण मला वाटतं यजमान लोकं फास्ट पीचेस निवडतील क्वार्टर्स आणि पुढच्या मॅचेस करता. आपले तिन्ही सीमर्स जर नीट वेताळ लाईन लावून टाकायला लागले तर कोणाचंही काम अवघड करतील! आपल्या बॅट्समनांना सवय आहे पेस खेळायची त्यामुळे तिथे फर भिती नाही. अश्विनचाही खुप फायदा होईल रिस्पॉन्सिव पिचेस वर. त्याला ब्रेक थ्रु मिळवायलाच काढायला पाहिजे. तगड्या टीमांसमोर जाडेजा, शर्मा, रायनाला काढूच नये खरं तर ऑप्श्न म्हणून सुद्धा अनलेस पीच खुपच स्लो असेल अन फक्त स्पिन चालत असेल तर.

>>>आपले तिन्ही सीमर्स जर नीट वेताळ लाईन लावून टाकायला लागले तर कोणाचंही काम अवघड करतील! आपल्या बॅट्समनांना सवय आहे पेस खेळायची त्यामुळे तिथे फर भिती नाही. अश्विनचाही खुप फायदा होईल रिस्पॉन्सिव पिचेस वर. त्याला ब्रेक थ्रु मिळवायलाच काढायला पाहिजे<<<

अक्षरशः

इथे २००० पोस्टी झाल्या, नवीन धागा काढा..

बादफेरीचे ७ सामने भारत फायनलपर्यंत पोचला तर दिड-दोन हजार पोस्टी खेचतील..

जर सेमीला भारत-पाक भिडले तर तोच सामना हजार पोस्टी एकहाती खेचेन..

पाकिस्तान सेमीफायनलला आला तर सगळे रागलोभ विसरून खत्तरनाक झुंज द्यावी आणि मिळेल त्य रिझल्टला 'सर आँखोंपर' मानावे ऋन्मेष!

सामान्य माणूस सामान्य माणसावर प्रेमच करतो. राजकारणी पोळ्या भाजून घेतात!

त्यांचा संघ चांगला नाही आहे हे खरे आहे, पण जो त्याक्षणी चांगला खेळतो तो त्याक्षणी राजा असतो. Happy

आणि मिळेल त्य रिझल्टला 'सर आँखोंपर' मानावे ऋन्मेष!
>>>
डोण्ट वरी बेफि, मी टीव्ही फोडणार्‍यातील नाही. Wink

रुन्मेशा जर सेमीला भारत-पाक नाही भिडले तर मायबोलीवर १०० दिवस एक ही नवा धागा काढणार नाही अशी पैज लावतोस का? Biggrin

फारच बुवा ऋन्मेषने धागा काढण्याबाबत हरकती आहेत! दस्तुरखुद्द प्रशासनाला नाही आहेत त्या Proud

नो नो!!!! स्पष्टीकरण - त्याने धागे काढायला माझी काहीच हरकत नाही.
फक्त पैशाने पैज मी लावत नाही म्हणून अशी करंसी Happy

सीमंतिनी,

तुम्ही लावू पाहात असलेली पैज मुळातच धोरणाविरुद्ध आहे Happy

जमल्यास पैज बदलावीत अशी नम्र विनंती Happy

ऋन्मेश,

तुम्ही हवे तितके धागे काढा, पण भारत जिंकणार नसेलच तर त्या क्षणी अधिक चांगला खेळणारा संघ जिंकावा इतकेच. Happy

एक पोलच काढावात असे मला वाटते. Happy

सीमंतिनी, आपण ते विनोदाने बोललात हे माहीत आहे. Happy
...

असो, तर या जगात (मायबोलीवर असेही वाचू शकता) ४ प्रकारचे लोक आहेत.

१) ज्यांना वाटते मी धागा काढावा.
२) ज्यांना वाटते मी धागा काढावा पण ते तसे सांगायला संकोचतात.
३) ज्यांना वाटते मी धागा काढावा पण तसे स्पष्ट न सांगता आडून मला एकेक विषय सुचवत असतात.
४) ज्यांना वाटते मी धागा काढावा म्हणून मुद्दाम मला उकसवायला तू धागा काढू नको असे बोलतात.

जेव्हा पाचवा प्रकार अस्तित्वात येईल तेव्हा मी मायबोली सोडून निघून जाईन. Wink

५) ज्यांना वाटते कि तू धागा काढू नये, पण तसे सांगितले तर तू धागा काढशीलच म्हणून तुला धागा काढ असे सांगतात (नि धाग्याचा गुंता करतात) Lol

हे उगाच कुणीतरी सोडलेले पिल्लू आहे. खरेतर जास्त पानं होतात म्हणून मास्तुरेने पहिले हे केले. नंतर लोकांनी बहुतेक सर्व धाग्यावर हे रिपिट केले.

पराग ने बहूतेक पडत्या फळाची आज्ञा घेत टेनिसप्रमाणे क्रिकेटच्या बाफची Adm नावाने फ्रॅचाईझी घेऊन माबोवरचे स्पोर्ट्स चॅनल स्पॉन्सरर बनण्याचा घाट घाताअ आहे बहूतेक. Wink

Adm नावाने फ्रॅचाईझी घेऊन माबोवरचे स्पोर्ट्स चॅनल स्पॉन्सरर बनण्याचा घाट घाताअ आहे बहूतेक >> Lol नि लोक उगाच ह्रुणम्याला पिळत असतात Wink

ए गपा ! Proud

मागे अ‍ॅडमिननी सांगितलं होतं की २०००च्या वर पोस्टी झाल्या की नवा धागा काढावा.. (रिस्पॉन्स टाईम वाढतो कि लोड जास्त होतो असं काहीतरी). त्यामुळे मिवापु, चिकवा, सिरीयलींचे धागे, माकचु, युसायुसां, निग वगैरे धागे पण २००० पोस्टींनंतर नवीन निघतात.. गेल्या वर्ल्डकपला पण मीच ३ धागे काढले होते (२००० पोस्टी ओलांडल्यानंतर.. :P)

चमन, तुला टेनिस धाग्यांची इतकी आठवण येते तर येत जा की तिथे.. किती दिवस रुसुन बसणार आहेस ? धागेही काढ हवेतर.. Proud

असामी, मस्त पोस्ट.. (जडेजावाली)

मनातले लिहायला एक कागदाचा कपटाही नसणार्‍या कवींच्या तुलनेत दोन दोन धागे लाभलेले येथील लेखक अधिक समृद्ध आहेत. Happy

हलके घ्या कृपया Happy

Pages