विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता आपल्या दोन्ही मॅचेस लागोपाठच्या बुधवारी - रात्री ११ ला सुरु Sad झोपेची अन दुसर्‍या दिवशी वर्क डे ची वाट लागणार . पाक काय कमाल करतायत ऑस्ट्रेलियाविरुद्ध बघू आता Happy

विश्वचषक आपण फायनलला जाउन हरलो तरी चालेल, पण मला एकाच विश्वचषकात भारताने पाकिस्तानला दोनदा मात दिलेले बघायचेय.. यासाठी मी कितीही पैसे मोजायला तयार आहे..

ऋन्मेष , पैसे मोजून काय होणार , कोणाला पैसे वाटल्याने अपण दोनदा जिंकणार Proud
जो निकाल लागाय्चाय तोच लागणार... पाकला आता सूर गवसलाय , शोएब नी जखमी केलेले डेंजर शेर कशला हवेत उगीच
शिकारीला, कांगारुची शिकार परवडली त्यापेक्षा !

मरे हुए को फिरसे मारने मे क्या मझा! सगळ्या पॉसिबल देशांना हरवून शानसे जिंकावा कप!

बाकी रुन्मेशा, इंटरनेट वर परत स्ट्रीम कर भारत-पाक मॅच आणि सोड ते झाड! उगीच त्रस्त समंधासारखा देशाला नको लावू टांगणीला परत Happy Wink

मस्त पण आता भारत बंगला बांगला बॉइजला कमी लेखु नका.

मी दुसर्‍या मॅचपासुन रोहीत ही विक लिंक आहे ओरडतोय पण कुणीच ऐकेना. परत एकदा फेल. रोहीत व जडेजा या दोन विक लिंक आहेत. बाकी ऑल इज वेल. आता फक्त अवे बाय ३ मॅचेस!! कमॉन बॉइज!! Happy

ऑस्ट्रेलिआ आणि न्युझीलंड यांनी स्पर्धेच्या ढाच्याबद्दल बरीच तक्रार केली होती त्यांना या देशातुन त्यादेशात सतत प्रवास करावा लागत होता. बहुदा याच करीता सेमी फायनल्सच्या जागा आणि टीम बदल ऐनवेळेला केले.

आता क्वार्टर मॅच जिंकल्यावर ऑस्ट्रेलिया / पाकिस्तान यांच्यापैकी एकाबरोबर लढत द्यावी लागेल.

सेमीफायनलला पोचलो तर ऑस्ट्रेलिया समोर असलेली बरी वाटत आहे. पाकिस्तान आले तर अतिशय जिद्दीने खेळतील ह्यावेळी!

रोहित शर्मा व जडेजा ह्यांनी चमक न दाखवणे हा धोनीच्या खेळीतील एक भाग वाटू लागला आहे. बहुधा बाद फेरी हे दोघे गाजवणार!

मुकुंद हे ह्या धाग्यावरील अशोक मामा झालेले आहेत. सर्वांना पंखाखाली घेऊन चर्चा स्टीअर करत विश्वचषकाच्या फायनलकडे संथ गतीने जात आहेत ते!

योर्कर गोलंदाजी साठी प्रसिद्ध असलेला लसिथ मलिंगा चा जलवा शांतच आहे पण ऑस. चा मिशेल strac खतरनाक योर्कर सोडत आहे , त्याच्या एकूण विकेट्स पैकी (या स्पर्धेतील ) बर्या पैकी विकेट्स बोल्ड काढून घेतल्या आहेत त्याने ते हि योर्कर .

कांदापोहे, जडेजा धोनीचा लाडका आहे आणि रोहीत माझा.. त्यामुळे हे दोघे असणारच..
ऑस्ट्रेलिया सेमीला आली तर त्यांना मात द्यायला रोहित सारख्या मोठी इनिंग खेळू शकणार्या मॅचविनरवर जुगार खेळणे काही वाईट नाही.. युवराजसारखा प्लेअर देखील अश्याच एका सामन्यासाठी संघात हवा होता..

ऑस्ट्रेलियाबरोबरचा सामना या विश्वचषकातील सर्वात अवघड सामना आहे हे नाकबूल करण्यात अर्थ नाही..

तरी पण इन्शाल्लाह पाकिस्ताननेच ऑस्ट्रेलियाचा काटा काढावा, आपण पाकिस्तानसमोर मोअर दॅन फेव्हरेट ठरू.. डिवचलेला वाघ वगैरे काही नाहीयेत ते..

अर्थात हे मी आपल्याला सोपे जाईल म्हणून नाही बोलत आहे कारण मला तर बांग्लादेशही क्वार्टरला बोअर वाटत आहे..

पाकिस्तान ऐवजी कुठला दुसरा संघ असता तर मला भारत-ऑस्ट्रेलिया थरार बघायलाच आवडला असता.. मात्र पाकिस्तानशी विश्वचषकातील सामना कधीही पहिली पसंती..

कारण तो दिवस आमच्याइथे एखाद्या सण समारंभासारखा साजरा होतो.. दर विकेटला फटाके फुटतात.. आणि जिंकल्यावर मिरवणूक गुलाल ढोल ताशे नाचो.. हि धमाल ऑस्ट्रेलियाच्या सामन्याला व्हायचा प्रश्नच नाही.. पाकिस्तानचा सामना म्हणजे क्रिकेटच्या पलीकडे आहे, ज्याला क्रिकेट कळत नाही, आवडत नाही असेही त्या जल्लोषात सामील असतात.. हि मजा आता विश्वचषक रंगात आल्यावर सेमीफायनला मोठ्या स्केलवर अनुभवायची आहे म्हणून पाकिस्तानच हवी.. बस्स!

ऑस्ट्रेलिया त्यांच्याच देशात पाकिस्तानकडून हारणे कठीण आहे.. पाकिस्तानची बॅटींग प्रचंड व्हलनरेबल आहे.. आणि ऑसीजची बॉलिंग तुफान फॉर्म मध्ये आहे.. न्यूझीलंड विरुद्ध केवळ धावा कमी होत्या म्हणून हारले .. वीस एक धावा जरी जास्त असत्या तरी जिंकले असते.. तेव्हा काही चमत्कार झालाच तर पाकिस्तान जिंकू शकेल..

पाकिस्तानची बॉलिंग डेथ ओव्हर्स मधे प्रचंड सुधारली आहे. अश्या वेळी जर ऑस्ट्रेलियाचा वॉर्नर आणि मॅक्सवेल स्थिरावले असतील तर ते बघायला मजा येईल. सध्या मॅक्सवेल आणि फ्लुकनर जबरदस्त फॉर्मात आहे.
४० ओव्हर नंतर जर मॅक्सवेलला लवकर आउट केले तर पाकिस्तानाचा चांस आहे.

रोहीतला गृहित बहुदा बांग्लादेश धरणार नाही. ते निव्वळ विराट आणि रैनाच्याच मागे लागतील.
इथेच चुक होण्याची शक्यता बांग्लादेशाकडुन आहे. धवन करीता स्पिनर्सने ओपन करतील. आणि तेच रोहितच्या पाथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे.

पाकिस्तानशी जिंकलेल्या सामन्याच्या हायलाईट्स बघण्यातच समाधान मानणे हा भारतीय क्रिकेट संघाचा अपमान झाला! णिषेध!! Happy

तेव्हा काही चमत्कार झालाच तर पाकिस्तान जिंकू शकेल..
>>>
तो देश चमत्कारांसाठीच प्रसिद्ध आहे.
ऑस्ट्रेलियन भूमीवर झालेला एकमेव विश्वचषक त्यांच्या खात्यात आहे.
एका अर्थी भारताच्या जोडीने ते सुद्धा डिफेन्डींग चॅप्मियन आहेत Happy

मनीष, आपलं काय ठरलं होतं? इग्नोअर करायचं/ पोस्टी ओलांडायच्या... हो की नाही???
मग तू का हसला बे??

>> पाकिस्तानची बॅटींग प्रचंड व्हलनरेबल आहे.. आणि ऑसीजची बॉलिंग तुफान फॉर्म मध्ये आहे..
अगदी बरोबर. सेमीत आपल्याला ऑसीच भेटणार. सध्याची आपली बॅटिंग बघता, नशीब आपल्या बाजूने असेल तरच फायनलला जाऊ.

भारताने प्रथम, व पाक व श्रीलंका यानी विश्वचषक जिंकला तेंव्हा ते तीनही संघ स्पर्धेतील 'डार्क हॉर्स'च होते, हें लक्षात घेवून ह्या स्पर्धेतील पुढच्या सर्व सामन्यांचा आनंद कोणताही पूर्वग्रह न ठेवतां किंवा कोणतेही अनुमान न बांधतां खुल्या दिलाने मनमुराद लुटावा हें उत्तम ! हॅपी व्ह्यूविंग ! भारताला शुभेच्छा देणं याला अर्थात पर्याय नाहींच !!
[ स्पर्धेचे 'ब्रँड अँम्बेसॅडर' असलेले साहेब कुठं दिसत नाहीं कसे ? मुख्यमंत्र्याना टोलविरोधी पत्र लिहून झाल्याने आतां दिसतील कदाचित !! Wink ]

मला वैयक्तिक न्युझीलंडने जिंकावा असे वाटते. जर भारताला चांस मिळाला नाही तर. अन्यथा पहिली पसंद भारतच

<< मला वैयक्तिक न्युझीलंडने जिंकावा असे वाटते.>> वैयक्तीकच म्हटलं तर मला प्रथम भारत, नंतर द.आफ्रिका.

ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सोडून कुणीही जिंकला तरी चालेल. यजमान देशांनीच जिंकायचा पायंडा पडू नये असे मनोमन वाटते (भारत अपवाद Wink )
तसेच ईथले, एशिया, अफ्रिकेतील हवामानापेक्षा भयंकर वेगळे हवामान, बाऊंसी पीचेस, प्रचंड मोठे ग्राऊंडस आणि मुख्यतः ह्या हवामानाला सरावलेले यजमान संघ, स्टार्क/ बोल्ट सारखे कत्तलबाज बोलर्स, मॅक्सवेल/वॉर्नर आणि मॅक्युलम्/टेलर सारखे रनमशिन्स, एवढ्या अ‍ॅडवर्सरिज मधून जो जिंकेल तोच माझ्यासाठी खरा वर्ल्ड चँपियन Happy

आता माझे :-

अर्थातच मेरा भारत महान फर्स्ट चॉईस

खालोखाल

वेस्टईंडिज (मला यांच्याबद्दल खूपच सहानुभुती आहे)

पाक (मी क्रिकेट आणि पारंपारीक शत्रुत्व वेगळे ठेवतो)

बांग्लादेश (लिंबू असल्याने असे झालेच तर धमाल उडेल)

आफ्रिका (बिचारे आहेत म्हणून जिंकावे वाटते पण यांच्या हरण्यावरही हसायला येते)

न्यूझीलंड (ना प्रेम ना द्वेष)

लंका (चिडका संघ आहे हा, मला नाही आवडत फारसा)

ऑस्ट्रेलिया (हा तर सर्वात शेवटचा पर्याय, यांच्या एवढाच नावडता ईंग्लंड आधीच बाहेर पडलाय.)

वेस्टईंडिज (मला यांच्याबद्दल खूपच सहानुभुती आहे) >>> टी२० जिंकुन देखील काहीच फरक पडलेला नाही आहे त्यामुळे काही उपयोग वाटत नाही

माझा अंदाजः 'नो'हीट शर्मा बांगलादेश विरुद्ध एक ट्रेडमार्क मोठी खेळी करणार आणी परत एकदा 'टॅलेंटेड' हायबरनेशन मधे जाणार. जडेजा विषयी बोलायचं झालं, तर.... एक मिनीट मौन पाळून, पुढच्या विषयाकडे वळू. जडेजा च्या मोठ्या ईनिंग्ज एप्रिल मधे (आयपीएल) असणार आहेत.

पाक आता खूप स्ट्राँग आहेत. त्यांना आता हरवणं अवघड आहे. ऑस्ट्रेलिया ने हरवलं तर ठीक, नाहीतर ते फायनल पर्यंत जातील.

Pages