अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कबीर., त्यांनी गाय मारली म्हणून तुम्ही वासरु मारलच पाहिजे का ? मग चर्चेचा सूर बदलून निव्वळ चिखलफेक सुरु होते . बघा पटल तर ..

<१. हजारे आणि अर्थात त्यांच्या सहकार्‍यांची सुरुवातीपासुन भुमिका होती - राजकिय पक्ष स्थापन न करता बाहेरुन सरकारवर दबाव टाकायचा; अँड केजरीवाल साइन्ड अप फॉर दॅट. पुढे अर्थात आप स्थापुन त्यांनी कोलांटी उडी मारलीच...
२. दिल्लीत सरकार उभारणीत काँग्रेसचा पाठींबा घेणार नाहि अशी विश्वामित्री प्रतिज्ञा केली परंतु मेनकारुपी सत्ता हातची निसटत आहे हे जाणवताच वनास्टँ करुन काँगेसवर केलेले भ्रष्टाचारांचे आरोप/चॉकशा बासनात गुंडाळल्या...>>

अगदी बरोबर. दिल्लीतील मतदाराने यावर काय द्यायचा तो निर्णय दिलेला आहे. आपली एखादी कृती चूक होती किंवा आधीच्या कृतीतून योग्य ते निष्पन्न झालेले नाही हे कबूल करून नंतर वेगळी भूमिका घेणे वेगळे आणि विरोधी पक्षातून सत्तेत येताच आधी ज्या गोष्टींना कडाडून विरोध केला (उदा : भूमीग्रहणाआधी कोणत्याही प्रकल्पासाठी ७०,८० टक्के नव्हे तर १०० टक्के पूर्वसहमती हवी, सो.इ.अ‍ॅ, कोणत्याही परिस्थितीत हवाच हवा असे म्हणणे आणि नंतर गुपचुप वटहुकुम काढणे, आधीच्या कायद्याला हा शेतकरीविरोधी व उद्योगांच्या सोयीचा आहे, शेतकी मंत्रालयाने नव्हे तर उद्योगमंत्रालयाने केला आहे असे म्हणणे आणि मग त्यावर विकासाच्या नावाने वरवंटा फिरवणे, यादी न संपणारी आहे आणि याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण नसणे याला कोलांट्या उड्या, विश्वामित्री पवित्रा इ.इ. म्हणतात.पीडीपी बद्दल बोलत नाही. Wink )

बाय द वे तुम्ही अजून २०१३ आणि २०१४ सालांतच अडकलात. आता २०१५ साल सुरू झाले. तुमचे ते दुसरे पिछले साठ -सत्तर आणि हजारों सालों में उलझे हुए हैं /वर्तमानात या म्हणावं.

बजेटच्या निराशेवरून लक्ष हटवायला 'आपमध्ये अंतर्गत बेबनाव' ह्या बातमीपेक्षा दुसरं चांगलं निमित्त कोणतं ? >> Come on Budget is not that bad and except Delhi other India is not much interested in AAP & Kejriwal. Pl don't become Kejriwal Bhakt like Namo Bhakt Happy

भरत +१

<< Come on Budget is not that bad and except Delhi other India is not much interested in AAP & Kejriwal. Pl don't become Kejriwal Bhakt like Namo Bhakt>>

मंदार,
एक सामान्य (स्वार्थी?) नागरिक ह्या नात्याने बजेट मला वरकरणी तरी आवडलेलं नाही. पण अर्थशास्त्राची विद्यार्थी नसल्याने त्यातील खाचाखोचा किंवा 'व्हिजनरी निर्णय' कळलेले नाहीत. उलट-सुलट विचार वाचून समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे. आणि ह्याच्याशी मी मोदी-विरोधक किंवा आप-समर्थक असण्याचा काहीही संबंध नाही.

ठळक केलेल्या वाक्याशी असहमत. देश सोडा आख्खं जग बघत आहे दिल्लीत आपचं काय चालू आहे त्याकडे.
(Who all smirked?:फिदी:)
एक छोटासा नमुना म्हणून हा ताजा व्हिडिओ बघा. आपने व्हीआयपी कल्चरविरुद्ध जी मोहीम चालवली आहे त्याची चर्चा इतर देशांमध्येसुद्धा सुरू आहे.
India: Anti-corruption party vows to end Delhi's 'VIP culture'

असो. आणि भक्तीबद्दल म्हणाल तर जेव्हा केजरीवाल आपच्या कोअर आयडिऑलॉजीच्या विरुद्ध वागतील/बोलतील तेव्हा निषेध नाही केला तरच ती अंधभक्ती. (मिडियाने सांगून नव्हे, त्यांच्या बोलण्या-वागण्यातून. मिडियाला लोकांची पत्रे चोरून वाचायची वाईट्ट सवय आहे)
फॉर नाऊ, ही डिझर्वस अ‍ॅन अप्लॉड अ‍ॅण्ड सपोर्ट. आफ्टरॉल, मतदानाची शाई निघून जायच्या आत पोल-प्रॉमिसेस पूर्ण करणारे नेते फार कमी आहेत.

>>बाय द वे तुम्ही अजून २०१३ आणि २०१४ सालांतच अडकलात. <<
अहो त्यांची कारकिर्दच मर्यादित आहे. आणि आता सत्तेवर येऊन थोडेच दिवस झालेले आहेत तेंव्हा त्यांना थोडा वेळ द्या. खात्री आहे, आपणा सर्वांना ते (कोलांट्या उड्या न मारुन) निराश करणार नाहित... Happy

योगेंद्र यादव आणि प्रशांत भुषण यांचे मुद्दे मला व्हॅलिड वाटतात. आप = केजरीवाल असंच समिकरण रहाणार असेल तर आप पक्षाला जास्त भवितव्य नाही.
पण योगेंद्र यादवा आणि प्रशांत भुषण यांनी लिहिलेली आणि त्यांच्यावर आरोप करणारी पत्र बाहेर मिडियापर्यंत पोचणं पण योग्य वाटत नाही. आपापसातले जे काही मतभेद आहेत ते मतभेद /भांडणं सगळं आत करा की.

आप = केजरीवाल असंच समिकरण रहाणार असेल तर आप आणि भाजपा-काँग्रेस-राकाँ-सपा ई.ई. यात फरक काय राहिला (कम्युनिष्ट वगळता सगळ्याच पार्ट्या)

तेच तर. म्हणून तर म्हटलं की मग काही भवितव्य नाही त्यांना. वेगळा पक्ष म्हणून लोक त्यांच्याकडे बघत आहेत, म्हणूनच कित्येकांनी त्यांना मतं दिली, सपोर्ट केला. बरेच जण आप चे मेंबर सुद्धा त्यांच्या वेगळेपणामूळेच झाले.

तसं काहीही नाहिये. उगाच गोंधळ घालू नाका. मिर्ची म्हणाल्यात ना, बजेटवरून लक्ष हटवण्यासाठी मीडीया करत असलेली नाटकं आहेत ही सर्व.

अख्ख्या फायनान्शिअल, बिझनेस, स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट इत्यादि सर्व मीडीयानं मिळून केलेली साजिश आहे.

डियाला लोकांची पत्रे चोरून वाचायची वाईट्ट सवय आहे) >> आँ काहीतरीच. अहो ही पत्रे पारदर्शकता म्हणून आपने डकवायला हवीत वेबसाईटवर.

एकीकडे अंतर्गत लोकपाल आहे म्हणायचे, पण कोणी ( ते पण नन आदर देन प्रशांत भुषण आणि योगेंद्र यादव) दोन जागा का हव्यात हे विचारले की अकेभक्तांनी त्यांना हाकलून द्यायचे अन त्यामुळे आता प्रशांत भूषण पण सटकले आहेत.

http://www.ndtv.com/india-news/in-first-interview-prashant-bhushan-on-ri...

खूपच मोठी यादी आहे. ते पण ऑलमोस्ट सेंकड इन कमांडची आणि आता आपचे इतर नेते म्हणत आहेत की भूषण पिता-पुत्र आणि यादव ही कॉन्स्पिरसी करत आहेत.

केजरीवाल हेकेखोर आहेत. आपबद्दलचा utopia - सो सॅड ! मी पण कधीकाळी थोडाफार शिकार झालो होतोच म्हणा !!

अल्पना +१
<<आप = केजरीवाल असंच समिकरण रहाणार असेल तर आप आणि भाजपा-काँग्रेस-राकाँ-सपा ई.ई. यात फरक काय राहिला (कम्युनिष्ट वगळता सगळ्याच पार्ट्या)>> +१

<<मिर्ची म्हणाल्यात ना, बजेटवरून लक्ष हटवण्यासाठी मीडीया करत असलेली नाटकं आहेत ही सर्व.>>

आधी गंमतीत म्हणाले होते. बट नाऊ आय स्टॅण्ड बाय दॅट स्टेटमेंट. मिडिया यशस्वी झाला आहे त्यात. तिकडे मुफ्ती काय मुक्ताफळं उधळत आहेत त्यावर चर्चा करायच्या ऐवजी आपला इतकं महत्व द्यायचं काहीच कारण नाहीये.

यादव आणि प्रशांत भूषणला हाकलून द्या असं जे म्हणत आहेत त्यांनाच खरंतर बाहेरचा रस्ता दाखवायला हवा.

केदार,
मी आधीपासूनच अके/योया/प्रभू ह्या किंवा इतर कुठल्याही लोकांना समर्थन देत नाही, त्यांनी उचललेल्या मुद्द्यांना समर्थन देत आहे. ते करत असलेल्या बदलाचं महत्व त्यांच्या अंतर्गत भांडणामुळे कमी होत नाही.

अरे वा! इतके दिवस हाच मीडीया आपकडे मुद्दाम लक्ष देत नाही असं तुम्ही म्हणाला होतात ना? मग आता लक्ष देत आहे तर का देत आहे???
मुफ्तीवर पण मीडीयामधे बरीच् चर्चा चालू आहे- आय होप तुम्ही ती वाचली असेलच.. बजेटची चर्चा फायनान्शिअल बिझनेस मीडीयामध्ये व्यवस्थित चालू आहेच. अजून महिनाभर या मीडीया मध्ये (पिंक पेपर्स) मध्ये चालू राहीलच.

असो!! ज्याची भिती होती तेच घडत आहे, आणि दुर्दैवानं इतक्या लवकर घडत आहे. केजरीवालपेक्षाही मला योगेंद्र यादव हा माणूस कायम सेन्सिबल आणि कार्यक्षम वाटला आहे, म्हणूनच आपचा फेस केजरीवाल हे कधीच आवडलं नाही. केजरीवालपेक्षा आय स्टॅण्ड बाय योगेंद्र यादव.

<<अरे वा! इतके दिवस हाच मीडीया आपकडे मुद्दाम लक्ष देत नाही असं तुम्ही म्हणाला होतात ना?>> Uhoh
हे कधी म्हणाले मी?
आपमध्ये कुणी शिंकलं तरी आधी मिडियालाच कळतं. फक्त दिल्ली डायलॉग आणि मोहल्ला सभा दिसत नाहीत.

केदार,
मी आधीपासूनच अके/योया/प्रभू ह्या किंवा इतर कुठल्याही लोकांना समर्थन देत नाही, >>

काय सांगता? इतक्यात यु टर्न? अहो ह्याच पानावर ब्लड शुगर ३०० असूनही काम करत आहेत अशी तुमची पोस्ट आहे हो.
मी आप बद्दलची पोस्ट लिहिली तर तुम्ही बजेट मध्ये काही भेटलं नाही म्हणून आपला पकडले का असे ही लिहिले आहे हो.

अके भक्त असण्याचे हे लक्षण नाही का? असो. Happy

बायदवे अके हा अत्यंत हेकेखोर माणूस आहे हे मी पहिल्यापासून लिहित आहे. तो नुसताच हेकेखोर नाही तर बालिश पण आहे. असो आय डोन्ट वाँट टू बॅश हिम.

आपचे चे काही होईल ते पाहवे झालं !

<<अके भक्त असण्याचे हे लक्षण नाही का? असो.>>

आधीच्या धाग्यावर खूपदा मी प्रशांत भूषणचं कौतुक केलंय . हे प्र भू भक्त असल्याचं लक्षण आहे का?? Uhoh
कैच्याकै.

<<बायदवे अके हा अत्यंत हेकेखोर माणूस आहे हे मी पहिल्यापासून लिहित आहे. तो नुसताच हेकेखोर नाही तर बालिश पण आहे. असो आय डोन्ट वाँट टू बॅश हिम.>>

प्लीज डोण्ट अझ्यूम सर ! Happy

मिर्ची, तुम्ही इतरांना नमोभक्त म्हणून हिणवत राहिल्या आहात. इतर नेत्यांना अझ्युम करत राहिल्या आहात, त्याचं काय? की ते बरोबरच आहे आणि आता तुमच्याकडे तेच येऊ पाहिलं तर ते चूक? कित्येकदा तुम्ही कुठूनतरी गोळा केलेली चित्र, एकतर्फी बातम्या टाकून दुसरया नेत्यांना खाली दाखवायची संधी सोडली नाहिये. इलेक्शन संपल्यावरही प्रचार मोडमधच आहात. खरंतर 300 शुगरचं ज्या शब्दांत कौतुक केलं होतं ते वाचून हसू आलं होतं कारण आजपर्यंतचे सगळेच नेते दिवसरात्रं काम करत आलेत. त्यांनीही प्रकृतीची पर्वा केली नसेल ना? राज्यकारभार डिमांडिंग असतोच. असो.

<<मिर्ची, तुम्ही इतरांना नमोभक्त म्हणून हिणवत राहिल्या आहात. इतर नेत्यांना अझ्युम करत राहिल्या आहात, त्याचं काय? की ते बरोबरच आहे आणि आता तुमच्याकडे तेच येऊ पाहिलं तर ते चूक? कित्येकदा तुम्ही कुठूनतरी गोळा केलेली चित्र, एकतर्फी बातम्या टाकून दुसरया नेत्यांना खाली दाखवायची संधी सोडली नाहिये. >>

अश्विनी,
मोदी खोटं बोलतात हे मी अझ्यूम करून म्हटलं नव्हतं/म्हणत नाही. ते कसं खोटं बोलतात ह्यासाठी मी त्यांचेच स्वतःचे व्हिडिओ लिंक्स दिल्या होत्या, सरकारी आकडे दिले होते.
अके अत्यंत हेकेखोर आणि बालिश माणूस आहे ह्या केदार ह्यांच्या वाक्यासाठी काय दाखले आहेत? हे त्यांचं अझम्प्शन नाहीये? आणि असू दे तसं असेल तर. त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी आपला फुकट सल्ला दिला.
कारण Assume चा अर्बन डिक्शनरीमधला अर्थ पटण्याजोगा आहे.:फिदी:

मी एकतर्फी बातम्या टाकल्या तर त्या खोडून टाकणार्‍या बातम्या टाकायला दुसर्‍या नेत्यांच्या समर्थकांना कोणी अडवलं आहे? टाकू शकत नाहीत कारण त्यांच्या नेत्यांनी घेतलेले युटर्न्सच इतके जबरी आहेत की गप्पच बसावं लागतं. ही पण माझीच चूक म्हणता?
आपने असे युटर्न्स घेतलेले दिसले की लगेच सांगा हे मी मागेच म्हटलंय.

त्यांच्या अंतर्गत भांडणाला कसं मिटवायचं ते बघतील.
"दूध मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे तो लाहोर भी छिन लेंगे..." असल्या टिनपाट वल्गना करून पीडीपीशी युती करण्याचे, सज्जद लोनला मंत्री बनवण्याचे प्रताप केले तर तुमच्याआधी मी विरोध करीन. तुम्ही विरोध केल्याचं दिसलं नाही कुठे. की तुम्हाला चालते ही हिपोक्रेसी?

<<खरंतर 300 शुगरचं ज्या शब्दांत कौतुक केलं होतं ते वाचून हसू आलं होतं कारण आजपर्यंतचे सगळेच नेते दिवसरात्रं काम करत आलेत. >>

असंच हसू आम्हाला पंप्र कसे वेळेवर कामावर जातात आणि त्यांनी कसे सगळ्या कर्मचार्‍यांना वक्त्तशीरपणाचे आदेश काढलेत ह्याची स्तुती वाचताना आलं होतं. जणू त्याआधी लोक कामच करत नव्हते. तेव्हा ते असोच.
अर्थात ती मोदीसमर्थकांची चूक नाही. पंप्रंनी नंतर समर्थकांना कौतुकाची संधीच दिली नाही. Wink

हेकेखोर आणि बालिश माणूस आहे ह्या केदार ह्यांच्या वाक्यासाठी काय दाखले आहेत? >>. लोल माझी काही दिवसांपूर्वीची पोस्ट पाहा. त्यात मंगळवारच्या PAC ला मी येणारच नाही, मला हे पटत नाही असा एक SMS त्यांनी पाठवला. आणि बुधवारी जी मिटिंग झाली त्यात ते होते पण यादवांना निमंत्रणच दिले नाही.

ह्यात बालिशपणा नाही तर काय? समोरासमोर कन्फंट करायला काय जात होते. भूषण तर म्हणाले की त्यांच्यात आणि अके मध्ये कम्युनिकेशन कुठल्याही स्तरावर नाही. ह्याला बालिशपणाच नाही तर हेकेखोरपणा आणि ओव्हरऑल मूर्खपणा म्हणतात.

नमोंच्या विरुद्ध दिल्ली फियास्कोनंतर वाराणसीहून निवडणूक लढवताना ते कशाकशाचा आव आणत होते ते तुम्ही इतक्यात विसरलात वाटतं.

आधी बेदी, शाजीया आणि आता भूषण आणि यादव म्हणत आहेत की ते कुणाचं ऐकत नाहीत, एकाधिकार चालू आहे, ट्रान्सपरंसी नाही. हयात मी अझ्युम करण्याचे काय आहे? ती मी वर दिलेली लिंक वाचा, त्यांचे मुद्दे लक्षात येतील, अजूनही वाचली नसेल तर. तसेच तुम्ही लिंक खूप देता, गेल्या चार दिवसातील यादवांवरच्या न्युज वाचा. त्यात ते समस प्रकरण आहे. (अजून वाचले नसेल तर) मग तुम्हाला मी अझ्युम करतोय असे वाटणार नाही.

आता तुम्हाला बेदी नी शाजिया नको आहेत कारण ते बाहेर पडून भाजपात गेले. उद्या यादव आणि भूषण ह्यांना जर चुकून काढले ( ती आपची चुकी ठरेल) तर तुम्ही ह्या दोघांनाही नावे ठेवाल असे वाटते. इनफॅक्ट बेदी नी शाजिया ह्याच कारणामुळे गेले आहेत. अ‍ॅटोक्रॅटिक लिडर !

त्या अण्णांना पण तुम्ही नावे ठेवली. (आता किती लोकं आली म्हणून ) अण्णा नसले असते तर कोण केजरीवाल? असा प्रश्न आला असता. ही युज्ड अण्णा !!

अ‍ॅटोक्रॅटिकच लिडर हवा तर नमो अके पेक्षा कितीतरी उजवे आहेत.

असो तुम्ही नाव घेऊन लिहिताय म्हणून पोस्ट लिहिली.

<<त्यात मंगळवारच्या PAC ला मी येणारच नाही, मला हे पटत नाही असा एक SMS त्यांनी पाठवला. आणि बुधवारी जी मिटिंग झाली त्यात ते होते पण यादवांना निमंत्रणच दिले नाही. >>

पण यादव तर काही वेगळंच सांगत आहेत. आत्ताच रवीशकुमारने घेतलेली त्यांची मुलाखत पाहिली. ते म्हणत आहेत, "अरविंदने राजीनामा पाठवला. सगळ्यांनी 'इस्तिफे का सवाल ही नहीं उठता' म्हणून राजीनाम्याचा विरोध केला. मग फॉर्मल वोटिंग झालं. त्यात 'अरविंदच पक्षाध्यक्ष म्हणून हवे आहेत' ह्यासाठी मी आणि प्रशांतने पण हात वर केला"

अरे यार, मग प्रॉब्लेम आहे कुठे??

रंगबदलू बेदी-शाजियाचं मला काही सांगू नका. प्रशांत भूषणची मुलाखत आत्ता पहाणार आहे. मी लिखित बातम्यांवर फार विश्वास ठेवत नाही. कोणाविषयीच्याच. मोदींचे सुद्धा व्हिडिओ पाहते.(नको असले तरी :डोमा:)

<<अ‍ॅटोक्रॅटिकच लिडर हवा तर नमो अके पेक्षा कितीतरी उजवे आहेत.>>

१००००००% असहमत. कारण मला लोकांशी खोटं बोलणारा नेता आवडत नाही.

<<त्या अण्णांना पण तुम्ही नावे ठेवली. (आता किती लोकं आली म्हणून ) >> Uhoh हे कधी झालं?

"आप"लाची वाद "आप"णासी....
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Deeply-hurt-and-pained-ove...

एवढ्या लवकर हे घडेल असे वाटले नव्हते. अश्याने लोकांच्या मनामध्ये नकारात्मक संदेश जाण्याची शक्यता आहे.

अरे यार, मग प्रॉब्लेम आहे कुठे?? >>. लोल बहुदा मिडिया प्रॉब्लेम क्रिएट करतोय. !!

शाजियाचं मला काही सांगू नका. >> हो ना आणि बेदींचे पण ! ती लोकं वाईट कारण ती भाजपात गेली.

तसेही यादवांनी कच खाऊन काल भूषण पासून दुर जाऊन अकेच मुख्य लिडर म्हणाले आहेत. उद्याच्या मिटिंग मध्ये दिलजमाई होऊन गळाभेटी होणारच. फारतर भूषण बळी ठरतील. बायदवे तुमच्या पार्टीच्या लोकपालाचे पत्र आणि इतर काही मिडीया मध्ये उपलब्ध आहेत. पण ती लिखित आहेत आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही असे आधीच सांगीतले पण तरी ...

. (आता किती लोकं आली म्हणून ) >> अ ओ, आता काय करायचं हे कधी झालं? >> अण्णांच्या आंदोलनात , अके मुख्यमंत्री झाल्यावर भेटायला गेले तेंव्हाच्या पोस्टी. बाकी तुम्हालाही माझ्यासारखे अण्णांना वापरले असे वाटत असेल तर गुड, वि बोथ आर ऑन राइट ट्रॅक. Wink

<<ती लोकं वाईट कारण ती भाजपात गेली.>>

भाजपात गेली म्हणून वाईट ह्यापेक्षा ज्यासाठी त्यांनी स्वतः आवाज उठवला त्याच्या विरुद्ध वागणार्‍या पार्टीत गेली. सो दे लॉस्ट द क्रेडिबिलिटी.

<<तसेही यादवांनी कच खाऊन काल भूषण पासून दुर जाऊन अकेच मुख्य लिडर म्हणाले आहेत. उद्याच्या मिटिंग मध्ये दिलजमाई होऊन गळाभेटी होणारच. फारतर भूषण बळी ठरतील. बायदवे तुमच्या पार्टीच्या लोकपालाचे पत्र आणि इतर काही पत्र उपलब्ध आहेत. पण ती लिखित आहेत आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही असे आधीच सांगीतले पण तरी ... >>

केदार,
वाचली मी ती पत्रे. काहीच आक्षेपार्ह नाहीये त्यांच्यात. भूषण आणि यादव ह्यांनी प्रश्न मांडणं हे चूक नाहीच. अकेनी राजीनामा देणंही चूक नाही. एक व्यक्ती एक पोस्ट असं असताना त्यांनी राजीनामा दिला हे योग्यच केलं.
ज्या व्यक्तीने ही पत्रं लीक केली ती व्यक्ती माझ्यादृष्टीने सगळ्यांत मोठ्ठी गुन्हेगार आहे. तिला शोधून काढायला पाहिजे आणि कारवाई करायला पाहिजे. मग ती व्यक्ती कोणीही असो.

Pages