विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी>> +१ सुंदर पोस्ट.

controlling the pace of the game हा मुद्दा NFL follow करणार्‍यांना चटकन लक्षात येईल >> अगदी बरोबर म्ह्णालास. ज्या प्रमाणे बॉल रन करून आणि पास न देता एखादा क्वार्टर बॅक भरपूर मोठा टाईम खातो आणि पेस कंट्रोल करतो.

खेळाडुंवरच्या प्रेशरच्या बाबतीत ऋऽऽन्मेष शी सहमत. खेळात प्रेशर हे प्रेशर अस्तं, इंटर्नॅशनल लेवल म्हणुन गल्ली क्रिकेटच्या टेन किंवा १०० टाइम्स जास्त असं काहि नसतं. अर्थात हे कसलेल्या खेळाडुंसाठी; त्यांना शिकवलेलं असते कि असले विचार (ज्यामुळे त्यांची एकाग्रता दुबळी होउ शकते) कसे शटडाउन करायचे -सॉर्ट ऑफ नॉइज कँसलिंग. आपल्या सारख्या सामान्य माणसांना त्यात प्रचंड फरक वाटतो.

उदाहरणच द्यायचं झालं तर - टायगर ३० फुटर इगल पट लिलया सिंक करु शकतो पण आमची ३ फुटर बर्डी पट करताना पण फाटते... Happy

बेफी युवी २०११ नंतर त्याच्या आजारपणामूळे नि मग त्यामूळे जो break घेतला गेला त्यानंतर परत आल्यावर तो पूर्वीचा प्लेयर राहिला नाहि, तरिही T-20 World Cup मधे तो संघात होता नि आपण फायनल हरण्यामधे त्याचा मोठा वाटा होता. त्यानंतर त्याची संघातली जागा गेली. गेल्या IPL मधेही RCB कडून त्याने फारसे काहि केले नाही नि त्या नंतरच्या रणजी सुरू व्हायच्या आधी होणार्‍या domestic स्पर्धांमधे त्याला फारसा सूर गवसला नव्हता. विश्वचषकासाठी टिम बनवण्याची प्रक्रिया तोवर सुरू झाली होती. त्यामूळे त्याला रणजीमधे गवसलेला सूर फार उशिरा लागला असे म्हणता येईल. परत त्याच्या जागेवर जे आले होते त्यांनी वाईट कामगिरी केली नसल्यामूळे ते बाहेर जाणे कठीण होते. यंदाच्या IPL मधे त्याने जबरदस्त (नुस्ता चांगला पुरणार नाही, तिथे त्याला प्रचंड स्पर्धा आहे) खेळ केला तर तो परत येउही शकेल. IPL च्या कामगिरीवर आपल्या संघातली निवडी drastically बदलतात. (बरोबर कि चूक हा मुद्दा अलहिदा)

गंभीर ची केस interesting आहे. त्याच्या bad form नंतरही गेल्या IPL मधे तो मस्त खेळला होता. कदाचित त्याचाच परीणाम म्हणून England लाही गेला नि टेस्ट खेळला (Which is not surprising for us where we pick up test players based on ODI and T-20 performances). तिथे फेल गेल्यावर त्याची एकून fielding level बघता पूढे वर्णी लागणे कठीणच होते. १-२ वर्षांपूर्वी धोनीला तो कप्तानपदासाठि त्याचा प्रतिस्पर्धी वाटला असता पण गेल्या १-२ वर्षांमधे तीही शक्यता कठीण आहे. गंभीर एकंदर जेव्हढेच offer करतो ते बघता त्याची वर्णी लागणे पुढेही कठीण आहे.

>>>गंभीर ची केस interesting आहे. त्याच्या bad form नंतरही गेल्या IPL मधे तो मस्त खेळला होता.<<<

मलाही त्याच स्पर्धेतील युवराजच्या शेवटच्या एक दोन खेळी आठवल्या असामी, मॅचविनिंग इनिंग्ज होत्या त्या!

त्याचे क्षेत्ररक्षणही बरेच आहे.

अर्थात, इतकेच म्हणायचे होते की निदान 'फायनल तीस' मध्ये तरी तो हवा होता. सोळामध्ये नसेलही!

बहुधा तो एकंदरच जड जात असावा संघाला. जो विश्वचषक आपण २०११ मध्ये जिंकला त्यात त्याचा वाटा किमान ऐंशी टक्के होता राव!

आणि त्यावेळचे तीन चार जण तरी आजही संघात असावेत.

२०११ चा वर्ल्ड कप आपण जिंकला त्यात युवराज ऑलराऊंडर म्हणून निश्चितच चमकला, पण तो वन मॅन शो मात्रं नव्हता. त्याच वर्ल्डकपमध्ये सचिन जबरदस्तं फॉर्ममध्ये होता. त्याने ५०० च्या वर रन्स केल्या होत्या. क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल दोन्हीला खेळला. त्याच्याइतकेच सेहवाग आणि गंभीरही चांगल्या फॉर्ममध्ये होते. सचिन-गंभीरने दक्षिण आफ्रीकेची अक्षरशः लांडगेतोड केली होती. झहीर खानने २० विकेट्स काढल्या होत. मुनाफ पटेल तर अनसंग हिरोच होता! युवराज रन्स आणि विकेट्समुळे मॅन ऑफ द सिरीज ठरला.

स्पार्टाकस,

माझ्यासमोर कोणतीही स्टॅटिस्टिक्स सध्या नाहीत. Happy

पण मला जे आठवते ते असे की सचिन फारच फ्लॉप गेला होता आणि युवराज फारच हिट्ट ठरला होता.

सहसा माझी आठवण मला दगा देत नाही. सचिन फार ग्रेट फॉर्ममध्ये असलेला विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता, जेव्हा आपल्यासमोर समथिंग लाईक २७० प्लसचे टारगेट होते आणि साहेब बेजबाबदार फटका मारून कॅच आऊट झाले होते. त्या आधीच्या सर्व मॅचेसमध्ये साहेबांनी एकहाती विजय मिळवून दिला होता. बहुधा इसवीसन २००३!

Happy

२०११ चा वर्ल्ड कप आपण जिंकला त्यात युवराज ऑलराऊंडर म्हणून निश्चितच चमकला, पण तो वन मॅन शो मात्रं नव्हता. >> +१. मीवर लिहिलेले तसे pace control करत choke hold ह्या प्रकारासाठी युवी perfect होता नि धोनीने त्याला तसा वापरला. त्याने knowkc out rounds मधे मोक्याच्या वेळी मस्त बॅटींग केली and he deserved to be man of tournament. पण बाकीच्यांचे contribution पण जबरदस्त दणदणीत होते (अगदी सेहवाग च्या पहिल्या बॉल ला फोर मारून टोन सेट करण्यापासून गंभीरच्या फायनल मधल्या खेळी पर्यंत नि मुनफ नि झहीर च्या बॉलिंगपर्यंत). युवराजच्या बलबुत्यावर जिंकलेला कप म्हणत असाल तर २०११ पेक्षा २००७ वाला T-20 मधे त्याचे श्रेय अधिक होते असे मला वाटते.

आणि त्यावेळचे तीन चार जण तरी आजही संघात असावेत. >> नाही फक्त धोनी नि रैनाच आहे.

पण मला जे आठवते ते असे की सचिन फारच फ्लॉप गेला होता >> नाही हो, फक्त फायनल मधे फ्लॉप गेला होता. तो दुसरा (बहुधा ) highest run getter होता २०११ मधे.

बेफिकीर २७० नाही ३६० वगैरे टार्गेट होते. थॅण्क्स टू पाँटींग..
आणि बेजबाबदार नाही तर प्रेशर बोलू शकतो वा आपले बेड्लक..

बेफिकीर,

२०११ च्या वर्ल्ड कपमध्ये सचिन फॉर्मातच होता.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रीकेविरुद्ध सेंचुरी आणि क्वार्टर फायनल आणि सेमी-फायनलला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध हाफ सेंचुरी होत्या त्याच्या.

३००३ च्या वर्ल्डकपमध्ये तर तो जवळपास वन मॅन शो होता. (अपवाद गांगुलीच्या २ सेंचुरी, दोन्ही केनियाविरिद्ध)

आणि त्यावेळचे तीन चार जण तरी आजही संघात असावेत. >> नाही फक्त धोनी नि रैनाच आहे. >>>> कोहली ??

असामी, चांगल्या पोस्टी.

गंभीर फायनलमध्ये मस्त खेळला होता.. ३ रन कमी पडल्या.. नाहीतर फायनलमधल्या खेळीसाठी जास्त कौतूक त्याच्या वाट्याला आलं असतं. Happy

>>>आणि बेजबाबदार नाही तर प्रेशर बोलू शकतो वा आपले बेड्लक..<<<

प्रेशर? आणि तेंडुलकरवर? ज्याने शंभर शतके ठोकली आहेत त्याच्यावर?

बॅडलक? फक्त त्याच नेमक्या सामन्यात?

मला हेच म्हणायचे आहे. अगदी ऐन वेळ असते तेव्हा इतर देशातील लोक टिच्चून रेप्युटेशनला साजेसे खेळतात. अपवादही ढिगाने असतील, पण मग सचिनला त्या ढिगात जाऊ द्यायचेच नाही असा स्टँड आपण का घेतो?

ओके, तुम्हाला सगळ्यांना एक सवाल Proud

निव्वळ सचिन असण्यामुळे आपण जिंकलेला विश्वचषक कोणता? नसला तर का नाही?

कपिल किंवा युवराजमुळे (ऑफकोर्स इतरांच्या साथीने, पण सिंहाचा वाटा ह्या दोघांचा) जिंकलेला विश्वचषक मला आठवतो राव! Happy

२००७ वाला T-20 मधे त्याचे श्रेय अधिक होते असे मला वाटते.>> त्यात पण इंग्लैंड विरूद्ध 6 षटकार मारले तेच पण त्या आधीच आपण150 रन्स पुर्ण केले होते ते सगळ्यांनाच वाटा होता

>>>३००३ च्या वर्ल्डकपमध्ये तर तो जवळपास वन मॅन शो होता. (अपवाद गांगुलीच्या २ सेंचुरी, दोन्ही केनियाविरिद्ध)<<<

सहमत (हजार वर्षे कमी करून, २००३)

पण तो कप आपण कुठे जिंकलो?

युवराज ज्यात खेळला तो कप आपण जिंकलो.

निव्वळ सचिन असण्यामुळे आपण जिंकलेला विश्वचषक कोणता? नसला तर का नाही? >>>>> प्लीज हा टॉपिक चर्चेला नको !!! अतिवेळा चोथा झालेला आहे.

आणि सचिन नेहमीच वर्ल्डकप मध्ये धावांची टाकसाळ उघडायचा.. २०११ मध्येही बर्याच धाव आहेत.. आफ्रिकेविरुद्ध वेगवान शतक आणि मग आपली लाईन लागणे.. पाकिस्तान बरोबर सेमीला रडतखडत का होईना ८५ धावा होत्याच.. १९९६ ला भारतातही त्याच्याच सर्वाधिक धावा होत्या, पण मालिकावीर जयसुर्या होता.. १९९९ ला देखील शतके होतीच. वडीलांच्या निधनानंतर परत येऊन झळकावलेले शतक तेव्हाचेच.. तेव्हा तसे झाले नसते तर आपण झिम्बाब्वे शी हरलो नसतो आणि कदाचित पुढे गेलो असतो..

निव्वळ सचिन असण्यामुळे आपण जिंकलेला विश्वचषक कोणता?
>>>>

२०११ ची सेमी-फायनल!
कारण पाकिस्तानविरुद्ध त्याने ८५ रन्स केल्या नसत्या तर आपण २६० पर्यंत पोहोचलोच नसतो.

>>>धोनी, कोहली, रैना आणि अश्विन.<<<

धन्यवाद स्पार्टाकस!

करेक्ट यूअरसेल्फ असामी Happy

(सहसा माझी आठवण मला दगा देत नाही Proud )

युवराजची पूर्वपुण्याई खूप थोर, पण करंट फॉर्म पाहता त्याला ड्रॉप केल्याचं आश्चर्य वाटलं नाही.
आतापर्यंत तरी त्याची कमतरता जाणवलेली नाही!

पण तो कप आपण कुठे जिंकलो?
युवराज ज्यात खेळला तो कप आपण जिंकलो.
>>>>>

त्या कपमध्ये आपण फक्त ऑस्ट्रेलियाशी हरलो..(दोन वेळा) तो कप भारतात नसून आफ्रिकेत होता.. मला स्वताला तरी तो परफॉर्मन्स २०११ पेक्षा सरस वाटतो.. आजही वाटते की तेव्हा पहिली बेटींग घेतली असती दादाने तर निकाल वेगळा असता.. बहुतेक पहिल्या सामन्यात आपण ऑस्ट्रेलियाशी पहिली फलंदाजी घेऊन दणदणीत हरल्याने तसे केले नसावे वा खेळपट्टीचा अंदाज चुकला असावा.. पण ती ऑस्ट्रेलियाची टीमही भारीच होती, .. २०११ ला मायदेशात मला आपणच फेव्हरेट वाटत होतो प्रत्येक सामन्यात.

स्पा >> +१

तो खूप उशीरा फॉर्मात आला. आणि येईल येईल म्हणून ३० मधली जागा अडवून ठेवण्यात काहीच हशील नाही.

२०११ नंतर पूर्णपणे अदृष्यं झालेला प्राणी म्हणजे मुनाफ पटेल.
त्या वर्ल्डकपमध्ये पियुष चावलालापण मटका लागला होता!

रच्याकने,
पुढच्या वर्ल्डकपमध्ये आताचे अनेक प्लेयर्स नसतील सगळ्याच देशांतले.

ऑस्ट्रेलिया - वॉटसन, क्लार्क, मिचेल जॉन्सन
न्यूझीलंड - मॅक्कलम
साऊथ आफ्रीका - बहुतेक अमला, इमरान ताहीर, मॉर्ने मॉर्केल, कदाचित जेपी डुमिनी
वेस्ट इंडीज - गेल, सॅम्युएल्स, सॅमी, रामदिन
इंग्लंड - अँडरसन, बेल
पाकिस्तान - कोणीही नसू शकेल. कदाचित मिसबाह असू शकेल Lol
श्रीलंका - जयवर्धने, संगकारा, दिलशान, कुलशेखरा, मलिंगा, हेरथ
भारत - धोनी

Pages