विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झिंबाब्वे टीमनी अफ्रिकेलाही लोळवले होते. दुमिनी आणि मिलर खेळले नसते किंवा एखादी विकेट पडली असती दोघांपैकी एकाची तर झिंबाब्वे त्यांना भारी पडले असते.

पाकने मोईन खानला घरी बोलावले.

फिलॅन्डर पुढच्या मॅचला ही नसणार आहे. विंडीजने सा अ ला ठोकावे अशी माझी इच्छा आहे. Happy

नाही हो बुवा, तो आपल्याविरुद्ध कधी चालत नाही फारसा. धोणी अण्णा त्याला व्यवस्थित सापळ्यात पकडतील.

पराग, लेख लिहायला मुहूर्त नाही आणि त्याहून जास्त सत्य म्हणजे आता गेली काही वर्षं प्रत्यक्ष काम करत नसल्यानं "अर्थकारणाशी" टचपण जास्त राहिलेला नाही. तरी आयपीएल वर कधीतरी लिहिणार आहे.

आणी "स्टेक्स" म्हनजे केवळ पैसा नव्हे रे. इंटरनॅशनल मॅचेसमध्ये खेळताना जे एक वेगळंच प्रेशर असतं त्याबद्दल लिहिलंय.

गेलची आजची खेळी म्हणजे केवळ हायलाईट्स बघतोय असं वाटत होतं.

मौका मौकाची युएईवाली अ‍ॅड बघितली का? कसलं भन्नाट केलंय हे कॅम्पेन...

मला वाटते यू ए ई, आयर्लंड आणि झिंबाब्वे अश्या मॅचेस आता असल्याने विंडीजच्या मॅचमध्ये गेल चालला तरी विशेष बिघडणार नाही.

२६ नाही ७३ रन्स ने हारले<<<

७३ म्हंटले तरी काय झाले? म्हणजे ३०० केल्याच की त्यांनी?

आता ओ डी आय चा बेंचमार्कच साडे तीनशे होईल.

एक समजत नाही. टी-ट्वेन्टीमुळे जर फलंदाजांना हे समजले असेल की वाट्टेल त्या वेगात धावा करता येतात तर ते ओ डी आय मुळे आधीच का नाही समजले? उगाच आपले वर्षानुवर्षे दोनशे आणि अडीचशेच्या स्कोअरला लय भारी समजत चालले होते जग!

ह्या पुढच्या मॅचेसमध्ये बहुधा जडेजा सरस कामगिरी करेल. संघ लहानसहान आहेत म्हणून नव्हे, इमानदारीत त्याला ते सिद्ध करावे लागेल. संधी दिली गेली पाहिजे पण!

मुकुंद, नंदिनी >> +१ Lol

पराग>> आम्ही सुद्धा आय पी एल वरच्या लेखाची वाट पाहतो आहे!

बुवा>> +१ फॉर रोहित!

उगाच आपले वर्षानुवर्षे दोनशे आणि अडीचशेच्या स्कोअरला लय भारी समजत चालले होते जग!>>>> अहो ती सायकल असते (सायकल म्हणजे राहाटी अशा काहीशा अर्थाने). फारएण्ड नी एकदा खुप छान लिहिलं होतं ह्या बद्दल. ती आमची वाहत्या बाफं वर चर्चा झाली होती त्यामुळे आता तो मजकूर मिळणे शक्य नाही.
तेव्हाच्या वातावरणात २५० हा स्कोअर मोठाच होता. एकंदर डायनॅमिकच वेगळं होतं. आता टि २० मुळे जसं पबलिक वनडेत बॅट मोकळ्या सोडतय तसं पुर्वी वन्डे आल्यावर टेस्ट मध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटलेच होते. तिथेही लोकं जास्त रन, कमी वेळात करु लागले आधी पेक्षा. Happy

बॉलर्ची खरच वाट आहे! ह्या सगळ्यामुळे अशी भिती वाटते की चांगले बॉलर्स निर्माणच होणार नाहीत कारण नवीन पिढीला इच्छाच होणार नाही बॉलर बनावं अशी स्वप्नं बघायची एकंदर बॅट्समनना मिळणारं महत्व बघून.
युवी ला १६ कोट रुपये देऊन घेतलाय. खरं झहिरलाही घेतलाय पण त्याची बोली किती आहे ते माहित नाही पण बरीच कमी असावी.

कारण नवीन पिढीला इच्छाच होणार नाही बॉलर बनावं अशी स्वप्नं बघायची<<< प्लस वन!

आणि कदाचित नंतर बोलर्सचाच तुटवडा भासल्यामुळे त्या डिपार्टमेंटमध्ये गर्दी उडेल.

अंगात बॅटींगचे स्किल नसेल आणि बॉलिंगचेच असेल तर मग पर्यायच उरत नाही..
अल रौंडर्सना डिमान्ड आहेच सदानकदा, पण ते ही ठरवून कोणी होऊ शकत नाही..

एक आपला सचिन होता जो वेगवान गोलंदाज बनायची इच्छा बाळगत होता, एक त्यानंतरच्या आजपर्यंतच्या पिढ्या आहेत ज्या सचिन बनायची इच्छा बाळगतात..

एक आपला सचिन होता जो वेगवान गोलंदाज बनायची इच्छा बाळगत होता, एक त्यानंतरच्या आजपर्यंतच्या पिढ्या आहेत ज्या सचिन बनायची इच्छा बाळगतात..<<<+१

आज खूप आनंद झाला जेव्हा ख्रिस गेल खालोखाल हायेस्ट दहा स्कोअरर्समध्ये 'अजूनही' ('अजूनही') १९८३ सालची कपिलची १७५ ची इनिंग समाविष्ट असल्याचे आढळले. ३२ वर्षे!

हल्लीच्या काळाचे बोलायचे झाल्यास ईरफान पठाण आलेला तेव्हा त्याने एक क्रेझ केलेली .. ती नंतर कुठेच कोणाबाबत बघायला मिळाली नाही,. त्यानेही निराश केले याचा फटका बसलाच ..

आज खूप आनंद झाला जेव्हा ख्रिस गेल खालोखाल हायेस्ट दहा स्कोअरर्समध्ये 'अजूनही' ('अजूनही') १९८३ सालची कपिलची १७५ ची इनिंग समाविष्ट असल्याचे आढळले. ३२ वर्षे!
>>>>>>>
आकड्यांच्या पलीकडे वॅल्यू ऑफ इनिंग्ज ठरवले तर तिचा नंबर फार वर निघून जाईल, आणि ३२० वर्षांनीही कदाचित हायेस्ट टेन मध्ये असेल..

त्याची ती १७५ ची खेळी आणि 'आयझॅक व्हिव्हिअन अलेक्झांडर रिचर्ड्स' (:-)) चा घेतलेला कॅच ह्या दोन घटनांमुळे आण इ मोहिंदर अमरनाथच्या फसव्या लाजवाब कौशल्यामुळे आपण विश्वचषक जिंकू शकतो हे आपल्याला प्रथमच समजले. (अर्थात, नथिंग टेकिंग अवे फ्रॉम अदर ऑल राऊंडर्स)

मुकुंदा धोनी बद्दल लिहिले आहे ते एकदम चपखल आहे. त्यात भर टाकून मी असे म्हणेन (जे मी त्याच्या मुलाखतींमधे वाचले आहे) ते म्हणजे he likes to control pace of the inning. त्याच्या मते तसे करून game control करता येतो नि बॅटस्मन वर दबाव टाकून विकेट घेता येणे शक्य आहे. (हे जरी रॉकेट सायन्स नसले तरी ते ज्या पटीने limited overs मधे नि विशेषतः भारतामधे धोनीला जमलेय - त्याच्या कडे असलेल्या limited balling resources मधे ते कौतुकास्पद आहे- अर्थात हे लिमिटेड क्रिकेट्मधे करणे शक्य होते कारण बॉलिंग बरोबर रन रेट तुमच्या मदतीला असतो. टेस्ट्मधे strike baller नसणे ह्या एका मुद्द्यावर ह्या strategy ची दाणादाण उडू शकते.) controlling the pace of the game हा मुद्दा NFL follow करणार्‍यांना चटकन लक्षात येईल (मुकुंदा does this ring the bell ? Wink ) हे करण्यासाठी हव्या त्या fielding प्रमाणेच बॉलिंग करणारे बॉलर्स हवेत नि त्यांना backup करू शकतील असे fielders. धोनी has always been vocal about the need of better fielding unit (ह्या आधीचा big-4 चा शेवटचा aus दौरा आठवा नि त्यातले धोनीचे कमेटंस) रैना, जडेजा ला पसंती मिळण्याचे हेही एक कारण आहे. CSK कडून खेळतानाही तो ह्याच strategy वर चालतो त्यामूळे तिथले core unit त्याला पुढेही हवेसे वाटणे साहजिक आहे. (खर तर रैना च्या ODI साईड असण्यावर शंका घेणे मला विचित्र वाटते. त्या ज्या क्रमांकावर खेळतो तिथे ज्या strike rate ने खेळणे अपेक्षित आहे तसा अजून कोण आहे आपल्याकडे ? त्याचे डावखुरे असणे नि fielding हा भाग बाजूला ठेवून तो ३-४ ऑफस्पिन च्या overs देउ शकतो हा निव्वळ bonus आहे.) कप्तान म्हणून हरण्या-जिंकण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे असे म्हटल्यावर त्याला comfortable वाटेल नि त्याच्या strategy ला पूरक असा संघ निवडणे साहजिक होतेय. fast baller allrounder हवा असे तो २-३ वर्षे म्हणतोय नि इरफान वगळल्यावर (जो सध्या तरी viable पर्याय नाही) बिन्नी हा 'वासरात लंगडी गाय शहाणी' असा प्रकार मिळतोय.

विष्वचषकाचा संघ नि त्यासाठी ३० निवडताना सेहवाग, गंभीर, भज्जी, झहीर नि युवी ह्यांना वगळून निवड समितीने सरळ सरळ भविष्यासाठी टीम बिल्ड करतोय असा संदेश दिला आहे. माझ्या मते आपल्या देशात जिथे व्यक्तीपूजेचे अवास्तव स्तोम माजवले जाते नि भूतकाळातल्या दैदिप्यमान कारकिर्दीमधे रमण्याची सवय असलेल्या ठिकाणी हि एक मोठी bold step आहे.

रोहितच्या lazy elagance बद्दल मी बहुधा होल्डींग किंवा चॅपेल च्या commentary मधे ऐकले होते कि लारा, सचिन, मार्क वॉ सारखीच रोहितची ball च्या trajectory बद्दल judgement call घेण्याची क्षमता इतरांपेक्षा फास्ट होते त्यामूळे तो अधिक चटकन हव्या तो पोझिशनमधे पोहोचू शकतो त्यामूळे त्याचे शॉट्स तसे वाटतात. अर्थात त्याचे टेक्निक हे मार्क वॉ च्या जवळपास जाणारे वाटते त्यामूळे बहुधा त्याची कारकीर्द त्याच मार्गी जाईल असे दिसतेय.

असामी, चांगली पोस्ट.

डावखुर्‍या वरुन आठवलं. धवन-कोहली, धवन-रहाणे, धवन-शर्मा हे कॉम्नो फार फार भारी प्रूव होऊ शकतात. बॉलरची जाम तारंबळ उडते आणि इथेच खरा कस लागतो चांगल्या बॉलरचा. इन फॉर्म असलेले एक राईटी आणि एक लेफ्टी बॅट्समन संभाळणे म्हणजे तोंडच्या गप्पा नोहे!

>>>विष्वचषकाचा संघ नि त्यासाठी ३० निवडताना सेहवाग, गंभीर, भज्जी, झहीर नि युवी ह्यांना वगळून निवड समितीने सरळ सरळ भविष्यासाठी टीम बिल्ड करतोय असा संदेश दिला आहे. माझ्या मते आपल्या देशात जिथे व्यक्तीपूजेचे अवास्तव स्तोम माजवले जाते नि भूतकाळातल्या दैदिप्यमान कारकिर्दीमधे रमण्याची सवय असलेल्या ठिकाणी हि एक मोठी bold step आहे.<<<

मस्त!

युवराजने परफॉर्म केलेले होते म्हणून तसे म्हणालो.

खरे तर गंभीरनेही गेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये उत्तम खेळी केली होती. तेव्हा तर सचिन आणि सेहवागही असावेत.

पण बोल्ड स्टेप केव्हातरी घ्यायलाच हवी. सहमत.

अश्वम नैवं , गजम नैवं , व्याघ्रां नैवच नैव . अजापुत्रं बळी दधातू , देवो दुर्बल घातकः

Pages