विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष,

कल्पनेत जगण्यात काय अर्थ आहे? Happy

स्पार्टाकस,

युवराजने २०११ चा विश्वचषक एकहाती खेचलेला आहे.

ह्यावर्षी त्याला तीसमध्येही घेतले नाही हे जरा दुर्दैवी वाटले, विशेषतः त्याने आय पी एल च्या दोन सामन्यात मॅच विनिंग खेळी साकारूनही!

इतकाच विषय!

बाकी सर्वांच्याच क्रिकेटप्रेमाबद्दल आदर आहे Happy

युवराजने २०११ चा विश्वचषक एकहाती खेचलेला आहे
>>>>>

अजिबात नाही!
युवराज कन्सिस्टंट होता आणि जवळपास प्रत्येक मॅचमध्ये त्याने पाचव्या बॉलरची भूमिका समर्थपणे केली, पण त्याने वर्ल्डकप एकहाती खेचला ही अतिशयोक्ती झाली.

मला आठवते की ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि त्या आधीच्या दोन सामन्यांत त्याची फलंदाजी टर्निंग पॉईंट होती.

मला हेही आठवते की फायनलमध्ये गंभीर ९५ वर असताना (जसे धोनीचे बोलणे मध्येच स्पष्ट ऐकू येते असा वर उल्लेख झालेला आहे आणि त्या प्रसंगाचा उल्लेख मी आधीही केला आहे) धोनीने गंभीरला पीचच्या मध्ये विचारले की 'मॅन ऑफ द मॅच बनेगा क्या'! पुढच्या एक दोन बॉलमध्ये गंभीर बाद झाला. धोनीच्या बहुधा ९१ धावा होत्या.

त्या फायनलमध्ये बहु८धा युवराजच्या फक्त २१ धावा होत्या आणि त्या सामन्यात फलंदाजीचा क्रमही बदललेला होता. Happy

फलंदाज म्हणूनही नाही बेफिकीर Happy
निव्वळ फलंदाजीचाच विचार केला तर सचिनच्या ५०० रन्स होत्या युवराजच्या ३०० च्या तुलनेत!

अर्थात युवराजला मॅन ऑफ द सिरीज मिळालं कारण ही डिझर्व्हड इट! परंतु तो वन मॅन शो मात्रं नव्हता.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची हाफ सेंच्युरी महत्वाची होती, पण त्याच मॅचमध्ये सुरवातीला सचिन आणि गंभीर खेळून गेले होते. दोघांच्याही हाफ सेंच्युरी होत्या.

पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनलला तर बॅट्समन म्हणून तो पहिल्या बॉलवरच गेला होता. वहाब रियाझने यॉर्करवर उडवला होता.

फायनलला त्याला चान्सच उशीरा मिळाला. तो पर्यंत धोनी पूर्ण सेटल होता.

>>>सेमीफायनलला तर बॅट्सममन म्हणून तो पहिल्या बॉलवरच गेला होता.<<<

विच टूर्नामेंट यू आर टॉकिंग अबाऊट स्पार्टाकस?

२०११ वर्ल्ड कप बेफिकीर.

युवराज सिंग - बोल्ड वहाब रियाझ ० (१ बॉल) - सेमीफायनल, मोहाली.

बॉलिंग मध्ये त्याने असद शफीक आणि युनुस खानची विकेट घेतली होती.

कॅन एनीवन प्लीज गिव्ह युवराजेस स्कोअर्स सिन्स द क्वार्टर फायनल्स इन २०११ वर्ल्ड कप?

>>युवराज सिंग - बोल्ड वहाब रियाझ ० (१ बॉल) - सेमीफायनल, मोहाली.<<<

माझा विश्वास बसत नाही. बहुधा मी कंप्लीटली गेलेलो आहे. Lol

सॉरी स्पार्टाकस, आय अर्ग्यूड विथ यू!

तुम्ही जे म्हणत आहात ते सत्य असावे.

माफ करा. Happy

ओह धनि, धन्यवाद!

स्पार्टाकस, व्हेरी व्हेरी सॉरी! Lol

मला वाटले की त्याने सगळे महत्वाचे सामने एकहाती जिंकून दिले, फलंदाजी करून.

क्षमस्व Happy

त्या वर्ल्डकपमधली युवराजची बेस्ट इनिंग्ज अर्थात क्वार्टरफायनलमधली होती!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेस करताना ७०+ रन्स बाकी होत्या आणि धोणीसह ५ बॅट्समन आऊट झाले होते. केवळ रैनाच बाकी होता. युवराज-रैनाने ते ७०+ रन्स आरामात काढले होते.

विशेष म्हणजे त्यानी त्या प्रत्येक मॅच मध्ये २-२ विकेट काढल्या आहेत! ( क्वार्टर, सेमी आणि फायनल)

येस

तुम्हा सर्वांचे बरोबर आहे. Happy

ती एक मॅच सोडून मात्र युवराज खेळला. पण माझ्या म्हणण्याला पुष्टी देता येत नाही. आय अ‍ॅग्री. Happy

विशेष म्हणजे त्यानी प्रत्येक मॅच मध्ये २-२ विकेट काढल्या आहेत
>>>>

आणि त्यादेखिल महत्वाच्या वेळी!

क्वार्टर फायनलला हॅडीन आणि मायकेल क्लार्क
सेमी फायनलला असद शफीक आणि युनुस खान
फायनलला संगकारा आणि समरवीरा (युवराजने धोणीला रिव्ह्यू करायला लावला होता)!

च्यायला अजून असं का वाटतंय की फायनलच्या आधीच्या तीन मॅचेस युवराजमुळे जिंकलो? Proud

सॉरी, आय कान्ट रिलाय ऑन माय मेमरी एनी मोर Happy

सॉरी स्पार्टाकस, धनि, असामी अ‍ॅन्ड अदर्स, हू हॅड टू स्पेन्ड टाईम ऑन मी फॉर द इर्रिलेव्हन्ट थिंग्ज! Happy

२०११ नंतर पूर्णपणे अदृष्यं झालेला प्राणी म्हणजे मुनाफ पटेल. >> मी मागे एक article दिले होते मूळ क्रिकेटच्या बाफावर ते बघ. सुंदर आहे नि मुनफ बद्दल आदर वगैरे वाटावा एव्हढा down to earth आहे तो.

युवराज कन्सिस्टंट होता आणि जवळपास प्रत्येक मॅचमध्ये त्याने पाचव्या बॉलरची भूमिका समर्थपणे केली, पण त्याने वर्ल्डकप एकहाती खेचला ही अतिशयोक्ती झाली.>> तो आजारी असताना त्याने हे केले होते हे विशेष होते. पण तरीही त्याच्या form ची वाट बघत यंदाचा संघ निवडावा असे मलाही वाटले नाही. त्याच्या जागी जे खेळले ते तेच काम समर्थपणे करत होते/आहेत. नि hopefully वर्ल्ड कपमधे करतील Happy

आजच्या आयर्लंड आणि यूएई मॅचबद्द्ल काय वाटतं? >> आयर्लंड ने enough matches जिंकून चौथे यावे नि मग Autralia ला हरवावे Wink

================
अवांतर : ते वरचे उप्परनिर्दिष्ट अ‍ॅडमिन त्यांना आठवत असेल कि नाही माहित नाही पण कैफ नि युवीची ती जबरदस्त भागीदारी त्यांनी मला फोनवर मधे मधे updates देत ऐकवली होती (मी नायगरा ला कॅनडा साईडला असल्यामूळे data plan बंद केला होता) नि मग आपण जिंकलो तेंव्हा स्काय टॉवर वर जाऊन celebrate केले होते. आठवतय का रे ? Happy

अरे पुरे ना आता !! पोचल्या तुमच्या भावना !!! स्पार्टा, एकदा म्हणून टाका बरं माफ केलं म्हणून Proud

आजच्या मॅचचं काय होणार ते सांगा..

आयर्लंड ने enough matches जिंकून चौथे यावे नि मग Autralia ला हरवावे >>> आमेन!!! Happy

आपण २८ ला युएईसोबत खेळतोय ना? गेला अजून एक शनिवार फुकट.

Pages