विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनि + १.
गतविश्वविजेते म्हणून दडपण+अपेक्षा डोक्यावर घेऊन कर्णधारपद मिरवणं आणि निभावणं सोपं नाहीच.

आणि धनि, जिथे वर्ल्डकप स्ट्रॅटेजीची तुलना गल्ली क्रिकेट स्ट्रॅटेजीशी केली जाते तिथे कशाला उगाच स्पष्टीकरण देत बसताय?

धोनी नेहमीच जाडेजाला विशेषतः भारतात फलंदाजांना जखडून ठेवण्यासाठी वापरतो. Australia मधेही तसे करायला जमले म्हणून त्याने कौतुक केले असावे असे मला वाटले. तसेच जाडेजा फार दिवसांनी खेळतोय त्यामूळे तोही अँगल असावा. >>>>> ओके. मला फक्त बाकीच्यांनी 'साथ दिली' म्हणणं खटकलं होतं.. खरतर बॉलिंग अ‍ॅटॅक सध्या शामी लिड करतो आहे असं म्हणायलाही हरकत नाही..

परवाच्या मॅचमधे जडेजाला भले विकेट मिळाल्या नसल्या तरी एका बाजुने रन रोखणयाचे काम त्याने नक्कीच केले. त्या प्रेशरमधे व दुसर्‍या बाजुने चालु असलेल्या गोलंदाजी व अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे ते प्रेशर आणखी वाढुन विकेट गेल्या. हा कदाचीत गेमप्लॅन असेल त्यामुळे त्याचे कौतुक करणे स्वाभावीक आहे. अर्थात काही विशिष्ठ लोकांची आपल्या संघामधे कायमच चलती असते. रोहीत शर्माला आता बदली माणुन शोधायची गरज आहे खरच.

धनि राग नसावा पण कोणीही कर्णधार अशी आपली स्ट्रॅटेजी लेख लिहत (स्वता वा इतरांमार्फत) सांगत नसतो. लेख म्हणाल तर ते पेड किंवा ठराविक विचारधारेचे समर्थन करणारे वा एखाद्याच्या मुद्दाम फेवरमध्ये लिहिलेलेही असतात. त्यामुळे मी ते प्रमाण मानत नाही. माझा मूळ मुद्दा हाच आहे की संघनिवडीत राजकारण असावे आणि धोनी हा कर्णधार असल्याने तो त्यात इच्छेने वा अनिच्छेने गुंतला असेल. आयपीएल नावाची किड पसरलीय त्यात जे मध्ये चेन्नईवर चौकशीचे वादळ घोंघावत होते ते पुढे कुठे दाबले गेले समजलेच नाही. धोनीने कसोटी मालिकेच्या मध्येच तडकाफडकी कर्णधारपद का सोडले हे देखील अजून गुलदस्त्यातच आहे. यात रवी शास्त्री काय भुमिका निभावतोय याची कोणाला कल्पना नसल्याने अमुक एखादी स्ट्रॅटेजी धोनीची आहे, अमुक एखाद्या निर्णयामागे तो आहे, असेही आताशा ठामपणे बोलता येत नाही. त्यामुळे ऑफ फिल्ड खेळाबद्दलची चर्चा आपण केली तर ती कितीही अभ्यास करा नेहमी हवेत तीर मारतच असणार ..

एकुण जडेजा महान क्रिकेटर आहे हे समजू लागले आहे.

सर्वांचे आभार! आता विषय बदलूयात का?

धोनी स्वतः महान खेळाडू व महान कप्तान आहे ह्यात कोणाचेच दुमत नसावे.

युवराजला संधी द्यायला हवी होती ह्याच्याशी आपण पण सहमत आहे राव! कोणाला काढून वगैरे असे नाही म्हणायचे, पण त्याला एखाददोन मॅचेसमध्ये तरी खेळवायला पाहिजे होते राव!

अ‍ॅटॅक सध्या शामी लिड करतो आहे असं म्हणायलाही हरकत नाही... पराग.. नुसती हरकत नाही तर म्हटलच पाहीजे.. निदान पहिल्या २ सामन्यानंतर तरी..

त्याने असाच फॉर्म महिनाभर टिकवला पाहीजे. आश्विनही मस्तच बोलिंग टाकत आहे की.. ३ ओव्हर्स मेडन टाकल्या त्याने पाकिस्तानविरुद्ध व परवाही ३ विकेट्स काढल्या..

मोहीत इज अ प्लेझंट सर्प्राइज सो फार.. आता उमेश यादवने त्याच्या प्रत्येक ओव्हरमधे (४ बॉल चांगले पण )२ बॉल लेग स्टंपवर गिफ्ट द्यायचे जरा आवरले तर ४० ओव्हर्स कव्हर झाल्या.. मग जडेजाने विकेट न घेउन नुसते डार्ट बॉल जरी टाकले तरी चालण्यासारखे आहे.

कांदापोहे.. नाही रे.. रोहीत शर्मा इतका वाइट नाही .. त्याच्या बॅटिंगमधे एक लेझी एलीगन्स आहे.. क्रिकेट मधला प्रत्येक शॉट त्याच्याकडे आहे.. लॉफ्टेड शॉट्स तर तो किती लिलयेने मारतो.. पण मधेच त्याचे कॉन्सन्ट्रेशन क्षणाकरता (तसे सगळ्याच खेळांडुचे होते .. पण तुलनेने याचे जास्त वेळा होते) विचलित होते व तो विकेट गमावुन बसतो. मागच्या मॅचमधे तो घसरुन रन आउट झाला व पाकिस्तान बरोबर बॉल जरा जास्त उसळला.. पण म्हणुन त्याला आता काढुन टाकणे बरोबर नाही.. तुम्ही जर खेळाडुच्या डोक्यावर प्रत्येक मॅचला टांगती तलवार ठेवली तर ते योग्य नाही.

तो जर बाद फेरीच्या मॅचमधे जर टिकला तर वॉच आउट वर्ल्ड! आता जरी तो फ्लॉप जात असला तरी होपफुली लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजेस वर्क्स इन हिज फेव्हर अँड इन नॉक आउट स्टेजेस ही सिझल्स! खर म्हणजे पहिल्या दोन्ही मॅचेस रोहित फ्लॉप जाउनही आपण सहज जिंकल्या दॅट इज व्हेरी एनकरेजिंग...

आणि मला वाटत जडेजाच्याच बाबतीत नाही तर एकंदरीत धोनीला त्याच्या चेन्नाइ सुपरकिंग प्लेयर्स बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे.. आपल्या भारताच्या टीममधे त्याचे ५ प्लेयर्स आहेत्(धोनी,रैना,जडेजा,मोहीत व आश्विन!). त्यांच्यामधली केमिस्ट्री अनडिनायेबल आहे. व गेल्या ६-७ वर्षात त्यांनी अनेक कप एकत्र जिंकले आहेत... धोनीला माहीत आहे त्यांना कस हँडल करायचे ते. ही फिल्स कंफर्टॅबल विथ देम इन द टीम्. अ‍ॅज लाँग अ‍ॅज दे प्रोड्युस द डिझायर्ड रिझल्ट्स फॉर द टीम..आय डोंट हॅव्ह अ प्रॉबलेम विथ दॅट.

मुकुंदा.. रोहित शर्मा बद्दल +१

धोनीच्या लाडक्या टिम मधले खेळाडू खटकणे साहाजिकच आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, जर त्याचे लाडके खेळाडू डावलून इतरांचा भरणा केला आणि त्यांनी त्यात राजकारण सुरु केले तर भारतीय टिमची अवस्था पाकिस्तान सारखीच होईल. म्हणुन जो पर्यंत हे लाडके काँबिनेशन जिंकून देत आहे तो पर्यंत खेळाची मजा घ्यावी.

रोहीत करता मी पण आशावादी आहेच. पण तरी तो न खेळल्याने एक जे प्रेशर यायला हवे आहे ते येत नाहीये. त्याचा तो एलेगन्स वगैरे ठिक आहे पण सातत्य हवे ना?

क्रिकईन्फोच्या सौजन्याने... गेल स्टॉर्म हॅज बिन इश्युड! स्पेक्टेटर्स.. टेक द नेसेसरी कव्हर! Happy

अबबबब.. ५ वाइड्? एका ओव्हरमधे? बोलर कसला भेदरला आहे गेलच्या ऑन्स्लॉटमुळे..

मंजु.. नशीब.. आजोबा.. पणजोबा पर्यंत नाही गेलीस..:)

झिम एका ठराविक वेळेपर्यंत व्यवस्थित खेळत होते... अचानकच गंडले.. गेल आणि सॅम्युअल्सनी मस्त भागीदारी केली..

बोलर कसला भेदरला आहे गेलच्या ऑन्स्लॉटमुळे>>
१३१ बॉलमधे १७१ म्हणजे गेलचा ऑन्स्लॉट म्हणजे फारच कमीपणाचे वाटतंय गेलसाठी. Proud चिडला ना तो. मी लिहीपर्यंत १८९ झाला सुद्धा.

आयला.. बघतय का कोणी? रोहीतचा वर्ल्ड रेकॉर्ड ई़ज इन सिरीयस डेंजर... ऋन्मेश .. आपली टिका गेलला जबरी झोंबली रे बाबा! Happy

पिपल .. यु आर मिसिंग सम सिरिअस स्लॉगिंग हिअर..

ख्रिस गेल... अबब... तोडी नाक्खो, फोडी नाक्ख्यो, भुक्को करी नाक्खो.. त्याला फॉर्म गवसणं ही बाकी सगळ्या टीम्स साठी धोक्याची घंटा आहे.

Chris Gayle scoring pattern
0-50: 51 balls
51-100: 54 balls
101-150: 22 balls
151-200: 12 balls

Pages