विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

११११

आज लंका - बांग्लादेश आणि अफगाण - स्कॉटलंड

अफगाण - स्कॉटलंड मॅच चांगली होईल अशी अपेक्षा. बहुतेक अफगाण जिंकतील.

स्कॉटलंड फार काही खास नाहीये, पण अफगाणला सामना बनवता येत नाही, जिंकता येत नाही, पॅचेसमध्ये चांगले खेळतात पण तितक्याच सहजपणे सामन्यावरची पकड ढिली करतात. म्हणून उद्या मी स्कॉटलंडवर पैसे लावणार आहे ..

श्रीलंका-बांग्लादेश सामन्यावर माझे जास्त लक्ष लागलेय .. याआधी जेव्हा या दोन संघात सामने व्हायचे तेव्हा कधीच मला बांग्लादेश श्रीलंकेला धक्का देईल असे वाटायचे नाही, एकवेळ ते भारत-पाकला हरवतील पण श्रीलंकेसमोर त्यांची डाळ शिजणार नाही असेच वाटायचे.. त्यातही खास करून श्रीलंकन गोलंदाजांसमोर ते तग धरू शकणार नाहीत असे वाटायचे ..

पण पहिल्यांदा मला श्रीलंकेचा हा संघ बांग्लादेशकडून मार खाऊ शकतो असे वाटतेय.. अर्थात हे असे वाटले तरी श्रीलंकेलाच जास्त चान्स आहेत. कारण बांग्लादेशही गेल्या काही काळात फार काही चांगला खेळ करत नाहीये, उलट ती टीम सुद्धा गंडलीच आहे, एका लेव्हलच्या पुढे प्रगती होऊ न शकल्याने फ्रस्ट्रेट झालीय असे काहीसे वाटतेय..

पण तरीही उद्या या सामन्याची उत्सुकता आहे.. दोन्ही संघ एकमेकांना इज्जत देत खेळणार उद्या हे नक्की..

फुल्ल धमाल चालूय अफगाणचा सामना... शनिवारी गुरुवारी खेळून गेला.. सर्वांचे लक्ष ऋन्मेऽऽषवाणी खरी होतेय की खोटी याकडे लागलेय..

भारतात आता १४० + वाले आहेत की कित्येक. शामी अन यादव तर टीम मध्येही आहेत. १५० वाला पण आहे. येत्या ५-७ वर्षात आपल्याकडे अजून चांगला १४०+ वाल्यांच्या बेंच असेल.

केदार.. अफगाणिस्तान - स्कॉटलंड फॉलो करतो आहेस का? व्हॉट अ मॅच... आयला ह्या नॉन टेस्ट प्लेयिंग टीमच्या मॅचेसच जास्त भारी घडतायेत.. लागोपाठ दुसरी मॅच अशी होते आहे..

या लिंबूटिंबूंच्या आपापसातल्या मॅचेस बरेचदा टफच होतात.. दोघेही एकाच लेव्हलचे असतात.. जेव्हा एखादी लिंबू टिम इतर टिंबू टिमना बरेपैकी फरकाने सातत्याने हरवायला लागली की समजायचे ती आता लिंबू टिम राहीली नाहीये ..

....उदाहरणच द्यायचं झालं तर - टायगर ३० फुटर इगल पट लिलया सिंक करु शकतो पण आमची ३ फुटर बर्डी पट करताना पण फाटते... इति राज...

राज.. हे बहुतेक २००९ च्या आधीच्या टायगर बद्दल लिहीले असावेस..:) जोक्स अपार्ट.. कोणे एके काळी एखाद्या खेळाचा निर्विवाद सम्राट असलेल्या खेळाडुचा.. असा गर्तेत गेल्यासारखा..इतक्या शिघ्रगतीने र्‍हास झाल्याचे उदाहरण माझ्या तरी स्मरणात नाही.. व्हॉट अ शेम! लुक्स लाइक हिज करिअर इज ओव्हर! टायगरला एकदा तरी मास्टर्स जिंकताना बघायला ऑगस्टाला जायचे माझे एक स्वप्न होते.. ते आता स्वप्नच राहणार रे..:(

आणी या विकेंड्च्या सामन्यांच्या वेळा उसगावकरांसाठी फारच त्रासदायक आहेत.ऑस्ट्रेलिया-न्युझिलंड शुक्रवारी संध्याकाळी सातला(सेंट्रल टाइम) व भारत्-यु ए इ शनिवारी पहाटे १ वाजता( सेंट्रल टाइम) .. म्हणजे शुक्रवारी लवकर झोपुन आपल्या मॅचला उठु म्हटले तर पहीली मस्त मॅच हुकेल.. म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी ७ पासुन.. शनिवारी सकाळी ८ पर्यंत क्रिकेटचा एक मॅरॅथॉन डोस होणार बहुतेक.. Happy

वॉव! मलिंगा स्पेशल.. कसली दांडी उडवली.. होप हे नविन महागडे स्टंप अनब्रेकेबल असावेत.. नाहीतर मलिंगा फॉर्ममधे आला तर ज्या रेटने तो दांड्या उडवतो त्या रेटने आय सी सी ला श्रिलंका मॅचला बराच भुर्दंड बसायचा..

टायगरच्या बाबतीत मला पण असंच वाटल मुकुंद.

असो. ३३२ केला की लंकेने. संगा व दिलशान भारी आहेतच. तो महिला नावाचा पुरुष पण लै भारी.

>>टायगरच्या बाबतीत मला पण असंच वाटल मुकुंद. <<
किप द फेथ गाइज (बान जोवी स्टाइल - यु नो योर गान्ना लिव थ्रु द रेन...) Happy

हे वर्ष क्रिटिकल आहे टायगर साठी - मेक ऑर ब्रेक सिचुएशन...

उद्या आफ्रिका-वेस्टईंडिज सिडनीला!
भारतीय प्रमाणवेळ सकाळचे नऊ ..

९८ टक्के भारतीय क्रिकेटप्रेमींना वेस्टईंडीज जिंकावी असे उगाचच वाटत असणार हे नक्की!

मी सुद्धा त्याला अपवाद नाही.

त्या दिवशी गेलने झिम्बाब्वेच्या कमी पेस असलेल्या गोलंदाजीचा तर समाचार घेतला, पण उद्या खेळला तर मी त्याच्या ढेंगाखालून जाईल.

लेट्स सी ! शुभरात्री !

रीया | 26 February, 2015 - 02:04
मी आधी पोस्ट कुणी टाकली ते बघितलं पsssssटकन डोळा मारा
>>
Happy काsssय ??

शेनवरीनी गुरवारी काटा काढला म्हणायचा स्कॉटलंडचा? Lol शपूरनी शेपूट उडवली आणि शेवटीही उपयोगाला आला.

आज मला नाही वाटत अफ्रिका जिंकू देइल इंडिजला. गेल,ब्रावो चालले खुपच त्या दिवशी सारखे तर गोष्ट वेगळी पण अफ्रिकेची बॉलिंग खरच चांगली आहे. आपण खुप मोठं काम केलय अफ्रिकेशी जिंकून. क्वार्टर्सला जागाच नक्की केली अफ्रिकेशी जिंकून असं म्हंटलं तरी चालेल.

काय महाबोअरिंग खेळतायेत साउथाफ्रिकन्स, टेस्ट क्रिकेटच्या वर्तांड स्लो !
लवकर आउट होउदे ही टिम (टूर्नामेन्ट मधून.)

Amen!

थांबो थांबो.. त्यांना इतक्यात बाहेर काढू नका... ते कोणाला तरी नक्की बाहेर काढतील.. अजून पूर्ण २१ ओव्हर्स बाकी आहेत.. आणि त्यांचे धडाकेबाज प्लेअर यायचे आहेत. ३०० नक्की होणार..

Pages