विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुवा :), खरय !
दुसर्या टिम वर दबाव टाकणारी , करेक्ट वेळी करेक्ट अ‍ॅटीट्युड दाखवणारी , रनिंग बिट्वीन द विकेट्स भारी असणारी आपली टिम पहाताना भारी वाटतं !
लहानपणी २ विकेट पडल्या कि अख्खी मधली फळी कापली गेली , बांगडा खाऊन आजारी पडून वाकडं तोंड करत हारताना पहाणारा वेंगसरकर , लॅक ऑफ टिम स्पिरिट , बॅड फिल्डींग, लेझी रनिंग बिट्वीन द विकेट्स , पहिल्याच बॉल ला आउट होणारा मनिंदर सिंग , रडत जाणारा कांबळी अशा सीन्स ची जास्तं सवय होती !
अ‍ॅटीट्युड वाइज गंगुच्या वर्ल्ड ़कप पासून चित्रं बदलायला लागलं :), लहानपणी जी टिम पहायचो त्यात आणि अत्तामधे जमिन आस्मानाचा फरक आहे .

गियर्स चेंज केले पाहिजेत आता.. हा पॉवरप्ले वाया घालवून उपयोग नाही. फिलँडरला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळं द आफ्रिकेला ड्युमिनी आणि पार्नेलला पूर्ण बोलिंग द्यावीच लागेल त्याचा फायदा उठवला पाहिजे.

व्हॉट अ टायमिंग बाय रहाणे.

वैद्यबुवा.. मुकुंद जय हो नको.. अजिंक्य जय हो म्हण... कस्ल्या २ फोर्स मारल्या... जबरी हाणल्या..:)

डिजे, अगदी !! मस्त वाटते अ‍ॅटिट्यूड बघून आता!!
स्टेडियम मधे खतरा माहोल आहे राव!! Happy
जबर्‍या ६!!!!!

साउथ अफ्रिकेच्या बैलाला.........हो ssssss
मॉर्केल च्या बैलाला.....

Six !

हो लॅग आहे पण तू जी लिंक दिली तिथे एक अ‍ॅड मधेच थांबून आहे. कुठेच ती अ‍ॅड कोल्ज करता येत नाही. फक्त पाय दिसत आहेत सगळ्यांचे Sad

दीपांजली.. खरय.. आइशप्पथ... कसली सिक्स मारली धवनने.. अशी सिक्स १९७९ वर्ल्ड कप फायनलला विव्ह रिचर्ड्सने मारली होती... शेवटच्या बॉलला

वत्सला .. यु लकी गर्ल!

Pages