ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाज्या आणि फळ कायम भाजी मार्केट मधून जाऊन खरेदी केलेल्या कधीही चांगली अस वाटतय.. किमतीत जास्त फरक वाटत नाहीये. पण ताजे पणाबद्दल माहित नाही. आणि आपल्याला डिलिवरी घेण्यासाठी त्यांनी सागीतल्या वेळेत घरी थांबव लागताच.
त्यापेक्षा संध्याकाळी भाजी मार्केट मधून घेऊन येण चांगल अस वाटत. बर सारख जायला नको म्हणून एकदम आठवड्याच्या भाज्या एकाच वेळी पण घेऊन येऊ शकतोच
पण कपडे मात्र ऑन लाईन खरेदी खुप स्वस्त पडतात असा अनुभव. अर्थात हात लाऊन बघायला मिळत नाहीत पण तरीही आर्थिक फरक बराच असतो Happy

मला तर बिग बास्केट चांगली वाटली.
सुजा तु म्हणतेस ते ही बरोबर आहे.

पण आजकाल घरापासून बाजारात जाणे, येणे, अंतर, पेट्रोल, वेळ शक्ती Sad फार खर्च होते.
आमच्या सारखं ऑड टाईम टेबल असणार्‍यांसाठी संजीवनीच. रेट्स ही बरे आहेत अगदी अव्वाच्या सव्वा नाहीत. आणि घरबसल्या मिळत असेल तर हरकत नाही, ५-१० रूपये जास्तीचे गेले तरी काही वाटत नाही.

जाई, नक्कीच शेअर करा सगळ्या लिंकस.

अजून एक, HDFC च्या कार्ड्स करता मी वापरतो. नेट सेफ कार्ड म्हणून पर्याय आहे. त्यात तुमच्या क्रेडीट किंवा डेबिट कार्ड च्या आधारावर तुम्हाला हव्या त्या रकमेचे कार्ड बनते, जे २४ तासा पुरतेच आणि एकदाच वापरता येते. ज्यामुळे ते वापरण्यास अगदी सोपे आणि सोयीस्कर असते.

त्यापेक्षा संध्याकाळी भाजी मार्केट मधून घेऊन येण चांगल अस वाटत. बर सारख जायला नको म्हणून एकदम आठवड्याच्या भाज्या एकाच वेळी पण घेऊन येऊ शकतोच>> I have done that for 25 years. Now I simply dont care if it turns bad I dont use it. but 90% time veggies are ok. fruits are fine. at least with big basket. I don't have to date a potato to eat one.

अजून एक, HDFC च्या कार्ड्स करता मी वापरतो. नेट सेफ कार्ड म्हणून पर्याय आहे. त्यात तुमच्या क्रेडीट किंवा डेबिट कार्ड च्या आधारावर तुम्हाला हव्या त्या रकमेचे कार्ड बनते, जे २४ तासा पुरतेच आणि एकदाच वापरता येते. ज्यामुळे ते वापरण्यास अगदी सोपे आणि सोयीस्कर असते. --------
जरा सांगता हे कसे आहे. मला जरा भितीच असते

ऑफीसमधल्या मुलींकडून हे शिकले -

आपल्या जी वस्तू / बॅग / कपडे आवडले आहेत पण किंमत पटत नाहीये Wink , त्याला सेव्ह फॉर लेटर करून ठेवा / विश्लिस्ट / वॉचलिस्ट मधे टाका. त्यावर ऑफर आली की अ‍ॅलर्ट येतो.

एका मैत्रिणीला United Colours of Benetton ची एक पर्स ५००० काहीतरीची १८०० ला मिळाली.,मस्त मोठी आहे, भरपूर सामान मावणारी.

आत्ता पर्यंत अ‍ॅमेझॉन , फ्लिपकार्ट वरून काहीबाही मागवलं आहे, ऑफीसच्या पत्त्यावर आणि कॅश ऑन डिलिव्हरी. ऑफीसमधे रोज ह्या सगळ्या साईटवरून सामान येतं असतं त्यामुळे २-३ दिवसात वस्तू येतातं.

जरा सांगता हे कसे आहे. मला जरा भितीच असते >>

तुमच्याकडे जर विसा, मास्टर, रूपे या पैकी कुठलेही क्रेडीट अथवा डेबिट कार्ड असेल तर ते आधी http://netsafe.hdfcbank.com या साईट वर register करावे लागेल. register झाल्यावर तुम्ही ज्या किमतीची खरेदी करायची आहे त्या रकमेचे कार्ड बनवायचे, ते activate करायला OTP (One Time Password - फक्त ५ मिनिटां करताच वैध असतो. ) मोबाईल फोन वर येतो, तो वापरून कार्ड activate करावे लागते. त्यानंतर नेट सेफ कार्ड तयार होते. ज्या साईट वर खरेदी करायची आहे तिथे जाऊन generate झालेल्या कार्ड चा नंबर, validity (हा current month +३ असतो) आणि CVV नंबर दिल्यावर कार्ड verification तुमच्या नेट सेफ आयडी ने होते. जर काही कारणामुळे हे कार्ड वापरले नाही तर २४ तासा नंतर ते आपोआप अवैध होऊन पैसे परत येतात. या प्रकारामध्ये वेण्डर साइट ला तुमच्या खऱ्या कार्डचे details दिले जात नसल्यामुळे काही कारणामुळे ती साईट hack झाली अथवा अजून काही घोळ झाला तरी काळजी नसते.

थोडे अवांतर, online शॉपिंग ही आता अगदी सोपी गोष्ट असली तरी लोकांना online पेमेंट बद्दल अजून ही काही खात्री वाटत नाही. त्याची कारणे बरीच असली तरी नेट सेफ कार्ड पेमेंट मुळे निर्धास्त राहता येते. मी स्वत: गेले ४ वर्षापासून ही सुविधा वापरत आहे.

प्राजक्ता_शिरीन | 13 February, 2015 - 13:07

ऑफीसमधल्या मुलींकडून हे शिकले -

आपल्या जी वस्तू / बॅग / कपडे आवडले आहेत पण किंमत पटत नाहीये डोळा मारा , त्याला सेव्ह फॉर लेटर करून ठेवा / विश्लिस्ट / वॉचलिस्ट मधे टाका. त्यावर ऑफर आली की अ‍ॅलर्ट येतो. >>>> श्या , हा बाफ महिनाभरापुर्वी काढायला हवा होता Wink एक मस्त ऑफर होती कुर्तिजवर . रच्याकने हे हेडरमध्ये टाकू का प्राजक्ता_शिरीन. ?

nshelke - फार महत्वाची माहीती.
पण ह्या साठी HDFC Bank मधे अकाउंट असावे लागते का?

अ‍ॅमेझोन आणि फ्लिपकार्ट वरुन फारच चांगली खरेदी होते.
अ‍ॅमेझोनचा अनुभव फारच चांगला आहे. भाच्याकरीता (माझ्यासाठी देखील Happy ) हॅरी पॉटरची पुस्तक घ्यायची होती. सुरुवातीला किंमत फार होती. दोन तीन वेळा लॉगिन करुन किंमत बघितली होती. आणि विशलिस्ट मधे सगळी पुस्तक अ‍ॅड करुन ठेवली होतीत. काही दिवसांनी अ‍ॅमेझोन कडुन डिस्काउंटची मेल आली.पहिला भाग १९५/- चा ८०/- रुपयाला देउ केले होते. लगेच ऑर्डर नोंदवली. काही दिवसांनी दुसरा भाग देखील ८० रुपयांना देउ केला. तो देखील ऑर्डर केला. परत ३ रा भाग ११०/- चा डिस्काउंट मधे तो ही. असे करत करत सगळ्याच भागांना ५०% पेक्षा जास्त डिस्काउंट देत गेले.
विशलिस्ट मधे जास्त दिवस प्रॉड्क्ट ठेवले तर त्याची किंमत कमी करुन आपल्याला देतात ( किमान१० वस्तुंवरचा आता पर्यंतचा अनुभव) फंडा ट्राय करुन बघा.

आम्ही अजूनही खूप जास्त नेट शॉपिंग करत नाही पण त्यातही फ्लिपकार्टवरुन एक-दोनदाच गोष्टी मागवल्या कारण त्याच वस्तूंना अ‍ॅमेझॉन वा पेपरफ्रायवर चांगले डील मिळाले.
फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनची सर्व्हिस एकदम फास्ट आहे तर पेपरफ्रायवरुन वस्तू यायला फार वेळ लागतो हे मात्र आहे. डिलीव्हरी देताना फोन करुन येतात आणि वस्तू मिळायची घाई नव्हती त्यामुळे चालले आम्हाला पेपरफ्राय.
हल्लीच पेपरफ्रायवरुन कपड्यांचा स्टँड मागवला. त्या स्टँडची लांबी-रुंदी नीट दिलेली नव्हती. आल्यावर तो अपेक्षेपेक्षा फारच मोठा असल्याचे कळले. त्यांना एक फोटो काढून पाठवल्यावर त्यांनी पैसे लगेच परत दिले पण घरी येऊन माणूस स्टँड घेऊन जाणार होता तो आला नाही. एक आठवड्याने त्यांनी स्टँड डिस्पोज ऑफ करा म्हणून सांगितले.

मलाही snapdeal चा खूप चांगला अनुभव आला आहे. प्रॉडक्ट क्वालिटी, डिलीव्हरी, रिटर्न पॉलिसी, रिफंड सर्वच बाबतीत उत्तम. अनेकदा बरंच काय काय हजाराच्या आतलं घेतलं आहे. अॉनलाईन शॉपिंगमधे कष्टाविना मस्त टीपी होतो पण डोकं मात्र शांत पाहिजे त्यासाठी.

पण ह्या साठी HDFC Bank मधे अकाउंट असावे लागते का? >> हो. तुमच्या कार्ड issuing बँकेच्या account ला लिंक होऊन तुम्हाला balance दिसतो.

सध्यातरी SBI, HDFC , ICICI, कोटक महिंद्रा या बँक virtual कार्ड्स देतात. इतर बँका पण देत असतील पण ते त्यांच्या साईट वर जाऊन कळेल.
खालील लिंक वर प्रत्येक बँकेच्या virtual कार्ड activation ची माहिती दिली आहे.

http://www.techzene.com/how-to-get-a-virtual-credit-card-from-sbi-icici-...

या व्यतिरिक्त, Verified by visa सर्विस वापरून तुमचे कार्ड ऑन लाईन वापराकरता सुरक्षित करू शकता. त्या बद्दल ची माहिती खालील लिंक वर मिळेल.

http://www.visa.in/personal/security/protectedeverywhere.shtml

मी आतापर्यंत फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि ईंडियाटाईम्स वरुन वस्तू मागवल्या आहेत. मागवलेल्या वस्तूंच्या क्वालिटीबाबतचा इंडियाटाईम्सचा अनुभव काही चांगला नव्हता.

बाकी फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील चांगल्या आहेत.

जाई, हेडरमधे कॉपी करू शकतेसं Happy

आत्ताचं फिल्पकार्टवरून मागवलेला पहीला कुरता आला, माप परफेक्ट, ५५% ऑफ होता म्हनून मागवला होता की माप चुकलं तर फार फुकत नको जायला पैसे Wink

एका कलीगने शूज मागवले, २ वेळा चुकीचा साईझ आला, त्याने चिकाटीने परत केले आणि आज करेक्ट मापाचे आले एकदाचे.

स्वस्ति, जले पे नमक हां??? Proud

तर, बहिणीने स्विस लाईटचं पेअर वॉच आणलं १५०० ला. नवर्‍याला खुपच आवडल्याने आज गुगल करुन पाहीलं कुठे मिळतंय का ते. तर डील्स बाय अ‍ॅवा ह्या साईटवर सेम वॉच ९९९+ शिपींग चार्जेस १०० असं धरुन १०९९ ला मिळालं. कॅश ऑन डिलीव्हरीने मागवलंय, बघु आता. आल्यावरच कळेल.

कोणी amazon वर credit card ने pay करुन order cancel केली होती का कधी?

मला काही कारणामुळे cancel करावी लागली आहे, refund initiated असा msg आला आहे .. 3-5 days मधे refund होइल असही सागिंतले आहे .. पण होइल का नक्की ? कोणाचा असा अनुभव आहे का?

Pages