ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिग बास्केट आणि https://aaloo.in वरुनही खरेदी करते.
दोन्हीचा अनुभव छान आहे.
बिग बास्केट ग्रोसरी अगदी सांगितलेल्या वेळेतच आणुन देतात.
aaloo.in वरुन भाज्या घेते. छान स्वच्छ असतात आणि साधारणपणे वेळेतच आणुन देतात. फक्त प्रत्येक भाजीला एक प्लास्टीक पिशवी असते , ते नको वाटतं. मागे एकदा प्लास्टीक पिशवी घालु नका असे सांगितले होते तर तेव्हा न घालता पाठवल्या पण एक ऑर्डरमधली भाजी मिसींग होती.
फळं मात्र आवडली नाहीत.

एकदम सही माहिती मिळतेय!
जॅबाँग, मिन्त्रा मधुन कुर्तीज घेतल्या होत्या.. एकदम पर्फेक्ट .. एक साईजसाठी रिटर्न करताना पण अजिबात कटकट नव्हती.. उसगावात मेसीज, अ‍ॅमेझॉन वरुन बरीच शॉपिंग केली होती..

अमाने सुचवलेल्या चुंबक आणि हॅपिली अनमॅरीड साईट मस्त आहेत. एकदम गंमतीशीर! >> धन्यवाद अमा +१

Double post

चुंबकचा स्टॉल विविआना मध्ये पण आहे. जनरली फॉरेव्हर २१ मधून कचकून खरेदी झाल्यावर आपको कुछ लेना है क्या चुंबकसे असे मला विचारले जाते Happy कीचेन/ वॅलेट( जे बरेच खाली झालेले असते)

पीबी टीन्स साइट पण फार छान आहे. भारतात शिपिन्ग करत नाही बहुतेक अजून पण बेड लिनन, गर्ल्स रूम साठी छान. सुझान खान चे बुटीक आहे त्याची पण ऑनलाइन साइट आहे. जेवणाच्या प्लेटस म्हणून तिथे एकदा चक्क तांब्याची बारकी परात होती. एक जेयपोर नावाची साइट आहे. तिथे मस्त ज्वेलरी असते.

दुसरे म्हणजे मॅक डिलिवरी व डॉमिनो डिलिवरी भरपूर वापरतो ऑनलाइन ऑर्डर देउन घरी पोहोचे परेन्त खाणे येते. खरे सांगायचे तर वीकांताला ऑनलाइन शॉपिन्ग वार म्हनावे लागेल.

सर्विसेस पण खूप वापरतो. प्लेन बुकिन्ग्ज मेक माय ट्रिप वरून. प्रत्येक हॉटेलच्या साइटवरूनच बुकिन्ग करतो.

मी आजवर सगळ्यात जास्त ऑनलाइन विकत घेतलेली गोष्ट म्हणजे विमान प्रवासाची तिकिटे.
अजूनही मला कपडे ते भाज्या वगैरे वस्तूंना हात लावून मगच विकत घ्यायला आवडतात.

मिन्त्रा आणि इतरही काही साईट्सवर सध्या पन्नास टक्के दिस्काउन्ट सेल चालू आहेत. ब्रॅन्डेड गोष्टी जॅकेट्स, शूज वगैरे चांगल्या आहेत.

साइज व क्वांटिटीच्या चुका माझ्याकडूनही होतात. पाच किलो साखर १६ लिंबे, भली मोठी केचपची बाटली अगदी छोटा पेट फुड चा पुडा असे घरी आले आहे पण चूक त्यांची नाही. मी सिलेक्ट करताना चित्र बघून ऑर्डर करते व फायनल चेक करत नाही. आता डिसेंबर मध्ये घेतलेली साखर मार्च परेन्त नक्की पुरेल. पण इम्पल्स पर्चेस वर काबू ठेवणे शक्य आहे. ऑर्डर रिव्यू करून हवे तितकेच घेता येते.
ऑर्डर दिल्यानंतरच काही गोष्टी आठवतात हे ही अजून.

चेक लिस्ट बनवून मग ल्यापटॉप उघडने वर्क करते.

बिग बास्केट ,लोकल बनिया - दोन्ही ठीक. मला बिग बास्केट जास्ती आवडते. .....
भाज्या आणि फळे मात्र फारशी नाही आवडली.

बाकी वस्तुन्साठी मात्र online grocery shopping हा concept खुपच आवडतो!! फार वेळ वाचतो . आणि माझ्यासाठी impulse buy पण खुप कमी होतात.

ते शिबोरी वाले.
शिबोरी हे एक बांधणीसारखे टेक्निक आहे आणि ते अजूनही हातानेच केले जाते. त्या हाती काम केलेल्या कापडाचे तुकडे आहेत ते.
म्हणजे प्रत्येक कानातले युनिक. एकासारखे दुसरे असणे अशक्य टाइप.
म्हणून ती किंमत.

माझ्या मैत्रिणिंमध्ये अलिएक्स्प्रेस एक्दम हिट आहे.
अगदी १०० रु ची वस्तु असली तरी शिप्पिंग चार्जेस असतातच असे नाही .
या बायका बरेच काही मागवत असतात .
आर्ट आणि क्राफ्ट वाल्यासाठी खजिनाच आहे . अगणित प्रकारच्या गोष्टी आहेत .

एकीने तिच्या लेकीसाठी स्टीकर ब्लॅकबोर्ड मागवला होता .
वर्ष होत आलं चान्गला चालला आहे . बाकी तर लहान सहान गोष्टी मागवतच असताच.
वरायटी खूप आहे

पेमेन्ट आणि ऑर्डर डिलेवरीचा कधीच प्रोब्लेम आला नाही .
जर कधी माल आउट ऑफ स्टोक असेल तर क्रेडिट नोट मिळते किन्वा पैसे परत मिअळतात .

मी कालपासुन साईट बघतेय पण माझं पेमेंटच होत नाहीय. म्हणजे जेवणाने भरलेलं ताट समोर आहे पण हात बांधलेले असं झालंय माझं..

मी कालपासुन साईट बघतेय पण माझं पेमेंटच होत नाहीय. म्हणजे जेवणाने भरलेलं ताट समोर आहे पण हात बांधलेले असं झालंय माझं..>> असं झालं तर आम्ही म्हनतो इट इज अ साइन. हे शॉपिन्ग आता करू नये अशी देवाची/ कर्माचि/ इंटरनेटची इच्छा आहे. व सोडून देतो. सर्व बाहेर इतरत्र मिळते.
उगीच त्या साइटला जास्त भाव द्यायचा नाही.

मलाही तसंच वाटलं अमा, म्हणुन आज सक्काळीच चांगल्या पवित्र वातावरणातही पेमेंट करुन पाहिलं पण सगळं निरर्थक. आता उद्या एक शेवटचा ऑप्शन म्हणुन नवर्‍याचं कार्ड ट्राय करुन बघणार. आणि जर त्याने पेमेंट झालं तर अशी smiley-happy093.gif नाचणार..

Pages