ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अली एक्स्प्रेस वर छान पैकी होम डेकॉर आयटम्स आहेत की. सोचेंगे.

तंबूरी सिल्क पण छान साइट आहे.

मी ती पाण्याची रेघ ओढते पण आपटून फोडते नारळ... कोयता वगिअरे घरातच नाहीये. घबरता हैं मै. कोयतेकु.

@अश्वीनी के,नेट बँकिंगच्या सिक्युरीटीपेक्षा विसाची सिक्युर पेमेंट सिस्टीम खुप चांगली आहे, त्यामुळे बिनधास्त खरेदी करता येते. नेट बँकिंगला तितकी सिक्युरीटी नाही.

मॅजेस्टिक बुक हाउसच्या साइटचा पण हाच प्रॉब्लेम आहे पेमेंट गेटवे चा. शेवटी सीओडी पर्याय निवडला.
पण साइट छान आहे.

नारळ कसा फोडावा बाफ आहे की ऑनलाइन खरेदी? Happy

ना क फो मधे एक भर.. माझी एक लहानपणापासूनची कृती आहे. मंडईत उपयोगाला यायची. नारळ विकणार्‍यांकडून नारळ घ्यायचा त्यांना म्हणायचं 'ओ नारळ फोडून पण द्या ना!' (मराठी कळत नसेल त्यांना तर जी भाषा कळते त्यात म्हणायचं. तेवढं एक वाक्य तुम्हाला येत नसेल त्या भाषेतलं तर शिकायचं!). मग आपण घेतलेला नारळ त्यांच्या हातात द्यायचा. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे परत एकदा उजवीकडे परत एकदा डावीकडे बघायचं. आणि मग नारळाकडे बघायचं. नारळ फुटून आपल्या हातात दोन वाट्या येतात.

मला "एनिथिंग कॅन हॅपन" पीडीएफ हवी आहे. (पु लं काय वाट्टेल ते होईल चे इंग्रजी पुस्तक)
अ‍ॅमॅझॉन वर १६००० किंमत दाखवत आहे. याची परवडेल अशी आवृत्ती मिळेल का कुठे? (५०० पर्यंत खर्च करु शकेन)
नेट वर पहिला धडा फुकट मिळतो तो वाचला आणि तहान अजून वाढली.
(विषयाला धरुन नसले तरी ऑनलाईन शॉपिंगला धरुन आहे म्हणून या विषयाचे घोडे पुढे दामटते)
१५३५ ला पेपर बॅक आहे पण त्यावर क्लिक केल्यावर फ्रेंच आवृत्ती येतेय.
मला हवे आहे हे पुस्तक. पीडी एफ किंवा ऑनलाईन. ५००-१००० खर्च करेन. कोणाला माहिती असल्यास पत्ता द्या.

अ‍ॅमॅझॉन वर १६००० किंमत दाखवत आहे. <<<<<
यावर विश्वास न बसल्याने अमेझॉन.इन पाहिले. खरंच १७००० वगैरे किंमत आहे. काय सोन्याचे पत्रे ठोकून पानं बनवली आहेत कायकी! Uhoh (एवढ्या चिमुकल्या पुस्तकावर एवढी इम्पोर्ट ड्यूटी असेल?)

माहितीतले कुणी यूएसमधून एणार असल्यास तिकडून मागवा. दोन डॉलरात पडेल पुस्तक! Happy

खूप दुर्मीळ पुस्तक आहे.
परदेशात असताना कधीकाळी लायब्रर्‍यांत शोधलं होतं.
ती फ्रेंच ची भानगड नसती तर १५४० खर्च केले पण असते(गुप्तपणे)
अत्यंत निर्मळ आणि स्ट्रेसबस्टर पुस्तक आहे. आणि पुलंचं भाषांतर पण त्याच तोडीचं.
http://www.manogat.com/node/8933

ऑनलाइन खरेदीवर नाफोग Wink Lol

या बाफवर माधव यांनी दिलेला सल्ला आज अमलात आणला . फ्लिपकार्टवर पाच हजाराची वस्तू ९९९ रुपड्याना मिळत होती . ऑर्डर प्लेस करणार एवढ्यात खालचे रिव्हूज वाचले आणि वाचलेच : हुश्श् बाहुली:

मी_अनु, पुस्तकाची अ‍ॅमॅझॉनवरची लिंक देणार का ? मला नक्की कोणतं पुस्तक ते कळत नाहीये, त्या प्रमाणे दुसरीकडे शोधता येईल.

http://www.amazon.in/Anything-Can-Happen-George-Papashvily/dp/0312045247
हेलन आणि जॉर्ज पापाश्विली, इंग्लिश आवृत्ती.
(कोणी स्कॅन करुन देईल का? १७००० घालवणार नाही पण ५०० वगैरे देऊ शकते कायद्यात बसत असेल स्कॅन करणे तर)

मी_अनु, एक करता येईल, ते पुस्तक विश्लिस्ट मधे टाकून ठेवा, कधी आली किंमत खाली तर ठीकचं, अजून काही मिळालं तर सांगते Happy

आजच एक वेबसाईट सापडलीये नेट वर, लाईमरोड.कॉम नावाची.. अ‍ॅप डाऊन लोड केलंय.. किमती खूप रिझनेबल वाटल्या म्हणून.. काही अनुभव आहे का कोणाला या साईट चा??

वर्षु मस्त आहे ती साईट. पहिल्याच पानावर लिंक दिलीय मी. बैग खुप मस्त मिळतात आणि कपडे पण छानच असतात.
मलातरी अजुन निराश नाही केल या साईटने.

फ्लिपकार्टवरून च बर्याच वस्तु मागवल्या आजपर्यंत. सगळ्या चांगल्या निघाल्या.
फक्त एक गोष्ट खटकली- ४ महिन्यापूर्वी एक ड्रेस मटेरियल ऑर्डर केले होते 1200 रु. चे 850/- ला मिळाले आणि 15 दिवसांनी सेम मटेरियल क्लोवर सेंटर ला 550/- ला बघितले. तेव्हा पासून थोडी कन्फ्युज आहे फ्लिपकार्ट बद्दल.

स्नॅपडील फ्लिपकार्टांची एक गम्मत आहे. बाय वन गेट वन मध्ये एक वस्तू चांगली आणि एक एकदम झंटॅक रंगाची असते जी एरवी आपण शक्यतो उघड्या डोळ्याने विकत घेणार नाही. (अर्थात असे करणे चूक नाही, मार्केटिंगची एक चांगली युक्ती आहे. आणि मला झंटॅक वाटत असलेले डिझाईन कोणीतरी अत्यंत आवडीने घेईल आणि तिला ते खुलूनही दिसत असेल.)
स्नॅपडिलचा वेस्टर्न ड्रेसचा ५०% वाला वगैरे सेल असतो त्यातले ट्युनिक/ड्रेसेस पाहून डोळे फिरवावे किंवा गपकन मिटून घ्यावे वाटावे इतके भडक असतात. Happy
कूव्हज वर चे कपडॅ पसंत पडतात पण महाग असतात स्नॅपडिल फ्लिपकार्ट पेक्षा त्यामुळे कधी घेतले नाहीत.
फॅशन अँड यु पण चांगली किफायतशीर आहे म्हणे.

Pages