ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मागल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास इतक्या वस्तू ऑर्डर केल्या होत्या की वेगवेगळ्या वेळी डिलि वरी होत होती. व शेजार्‍यांना भरपूर त्रास झाला. त्या जेवायला बसल्या होत्या तेव्हाच डिलिव्हरी आलि इत्यादि. त्यामुळे आता खूप दिवसात काही घेतले नाही व पत्ता बदलून हपिसचा दिला आहे.

DHgate वरुन घेतलेलं चोकर आलं काल. पॅकिंग चांगलं होतं. उद्या फोटु टाकते गळ्यातल्याचा.

बरं, मला एक सांगा. ओळखीच्या घड्याळवाल्याकडे ऑनलाईन घेतलेल्या स्विस लाईट घड्याळाचा बेल्ट कमी करायला नेला होता. त्याने किंमत ऐकुन म्हणाला की ह्यात साधी चायना मेड मशीन असतात प्लास्टीकच्या. त्यामुळे इतक्या कमीत विकतात ते लोक. बिघडलं वगैरे तर तुम्ही कुठे जाणार आहात त्यांना पकडायला.. असं होत असेल का खरंच??

४ दिवसांपूर्वी amazon वरून micromax चा फोन मागवला, पण माझ्या मते त्याच्या battery चा काही problem असावा, १०० टक्के चार्ज करूनही ५-१० मिनिटात काही चार्ज संपून जातो.
कोणाला असा अनुभव आला होता का?

पहिल्यांदाच ऑनलाईन खरेदी केली होती, सो आता यासाठी कोणाकडे तक्रार करावी लागेल? Uhoh

मायक्रोमॅक्स सर्विस सेंटरला जावे लागेल>>> ओके नाठाळ, पण या केस मध्ये फोन बदलुन मिळेल का फक्त battery? I mean फोनच बदलून देण्यासाठी आग्रह करावा का?

अ‍ॅज पर देअर पॉलीसी. माझा मामॅ सर्विस सेंटरचा अनुभव असा की त्यांनी १-१.५ महिना फोन ठेवुन घेतला आणि मग नवीन दिला. तुम्ही DOA (Deffect on Arrival) साठी आग्रह धरा.

<<तुम्ही DOA (Deffect on Arrival) साठी आग्रह धरा>> अ‍ॅमेझॉन ला केस लॉग करा आत्ताच, जर नसेल केली तर

परवा अमेझॉन वरून किंडल विकत घेतले.. सर्व पैसे भरून + ५० एक्सट्रा दिले लौकर डिलिवरी करता तर लगेच काल म्हंजे एका दिवसात आले पार्सल.. पीस इज १ क्लास!!!! हॅपी विथ अ‍ॅमेझॉन

मी पण अ‍ॅमेझॉनवर एक पुस्तक घेतलं काल, फ्लिपकार्टपेक्षा स्वस्त मिळालं. उद्यापर्यंत येईल डिलीव्हरी.

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट, दोन्ही वरून ७-८ रेफरन्स बुक्स मागवली आहेत. एकदा मैत्रिणीला (सिंहगड, वडगाव) गिफ्ट देखील पाठवलंय. दोन्ही फर्स्ट क्लास आहेत!

पण फॅबफर्निशमुळे आता फक्त पुस्तकंच घेणार ऑनलाईन. पोलीसी खूप कॅन्फ्युझिंग आहे आणि ती पण अगदी छोट्या अक्षरांत Sad

मी अलि एक्प्रेस वरून मागवलेलं जेल आय लायनर आलं. मस्त आहे. मला लिक्विड ची फार सवय असल्याने लावायला थोडं अवघड जातंय. पण क्वालिटी वगैरे चांगली आहे. फक्त डिलिव्हरी ला दिड महिना लागला.

होमशॉप१८ वरुन मोराच्या नक्शीचे सुंदर मंगळ सूत्र मागवले होते ते तीन महिन्यात खराब झाले. >>>>

साधारण वर्शापूर्वी voylla वरून मैत्रिणीने जोडव्यांचे दोन सेट मागवले होते . छान वाटले .
मग मी माझ्या बहिणीसाठी तिच्या लग्नात पैजण मागवले .
साखळी थोडी जाड वाटली , अंदाज चुकला , पण तेही खूप छान दिसले , ती अजून वापरते .

नंतर मी मोराच्या नक्शिचे छोटे मंगळ्सूत्र आणि कानातले तर मैत्रिणिने खड्याचे लांब मंगळसूत्र आणि कानातले, सेट मागवले . बोगो मुळे साधारण ५०० रु. पडले अजूनही तशेच्य तशे आहे . एकही खडा पडला नाही की चमक कमी झाली नाही.

अजून काही खरेदी केली नाही नंतर , काही निमित्तच नव्हतं . माझा voylla चा अनुभव चांगला होता .

मी अली एक्स्प्रेस वरून मागवलेला गॉगल आला काल. फक्त त्याचे १७७ रूपये घेतले पोस्टमन ने.
आणि एक पेंडंट नेकलेस पण मागवलं होतं. ते पण आज मिळालं. आत्तापर्यंत मला अली वरून मागवलेल्यापैकी ३ प्रॉडक्ट्स मिळाली आहेत. सगळी नवी कोरी आहेत, पॅकिंग पण चांगलं होतं.
मी आता सपाटा लावणार खरेदीचा Proud

www.indiebazar.com ही साईट पण पहा. कानातल्याची डिझाईन्स हटके आहेत एकदम. किंमती थोड्या जास्ती आहेत पण वर्थ इट.

दक्षिणा Happy

मी पण आता २ हेडफोन्स मागवले आहेत त्यांच्याकडून, आधी मागवलेला ड्युअल पेन ड्राईव्ह ६४ जीबी मस्त मस्त चालतोय मोबाईल ला पण, फक्त डिलीव्हरी टाईम साठी पेशन्स ठेवावा लागतो Happy

हो संदिप प्रॉडक्ट्स चांगली आहेत अलीवरची. आणि शिवाय स्वस्त. दु:ख नाही होणार अगदीच एखादं खराब निघालं तर.

क्राफ्ट्सविला वर कोणी खरेदी केली आहे का? >> कालच पेंडेट सेट आॅर्डर केला होता.. आज मिळाला पण.. अगदी व्यवस्थित आहे Happy

दक्षिणा, गॉगलची क्वालीटी कशी आहे?? आणि गॉगलची किंमत + पोस्टेज मिळुन होणारी किंमत ईथे मिळणार्‍या गॉगलपेक्षा कमी आहे कां??

खूपच मस्त माहिती मिळाली इथे. जाई व सर्वांचे धन्यवाद!

मी अलीकडेच फ्लिपकार्टवरुन मोटोरोला मोबाईल घेतला. पहिल्यांच इतकी मोठी खरेदी ऑनलाईन केली पण खूपच सोयीचं वाटलं. आणखी एक मस्त साईट monginis केकवाल्यांची आहे. अलीकडेच दुसर्‍या शहरात राहणार्‍या मावशीला ऑनलाईन पैसे भरुन बर्थडे केक पाठवला होता. तो वेळेवर डिलिव्हर झाला आणि खूप छान होता असा रिपोर्ट मिळाला.

फ्लिपकार्ट /अमेझॉनवरुन इंडियन कपडे (कुर्ती, थ्री पीस चुडिदार सूट) घेतले आहेत का कुणी? कुर्ती वगैरेच्या स्लीव्हज स्टिच केलेल्या असतात की नंतर आपल्याला लोकल शिंप्याकडून ते काम करुन घ्यावं लागतं?

फ्लिपकार्ट /अमेझॉनवरुन इंडियन कपडे (कुर्ती, थ्री पीस चुडिदार सूट) घेतले आहेत का कुणी? कुर्ती वगैरेच्या स्लीव्हज स्टिच केलेल्या असतात की नंतर आपल्याला लोकल शिंप्याकडून ते काम करुन घ्यावं लागतं?>>>

फ्लिप्कार्ट वर तरी शिवुनच मिलतात .

पिओरा च्या साईट वरुन झिर्कॉन सिल्व्हर ची मंगळसूत्रे गेल्या ३ वर्षात २ दा मागवली. चांगली निघाली.
त्यांची डिझाईन नाजूक आणि सुंदर असतात.

cnw, मी फ्लिपकार्टवरुन कुर्तिज मागवली होती. स्टिच होती. साइजचा प्रॉब्लम झाला होता. मोठी साइज होती ती

थॅन्स स्वस्ति, जाई.

जाई, मग काय केलं? रिटर्न करुन साईझ दुसरा मागवला का? त्यांचा माणूसच येऊन घेऊन जातो ना?

Pages