Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फ्लिपकार्टवरही एका ७०,००० रु.
फ्लिपकार्टवरही एका ७०,००० रु. च्या हेडफोन वर अशक्य कमेंट्स आहेत.. http://www.flipkart.com/sennheiser-hd-800-wired-headphones/product-revie...
जाई.... अगो...४४ हजाराची
जाई....
अगो...४४ हजाराची खरेदी म्हणजे त्यात तीन मोबाईल्सच होते....तेरा हजार प्रत्येकी आणि बाकी चारपाच हजाराचे कपडे. बस्स...शिवाय ती काही माझी एकट्याची खरेदी नव्हती...मोबाईल्स अन्य तिघांचे होते, त्यानी माझ्या नावाचा उपयोग करून माझ्याच अकांउंटवरून ऑर्डर नोंदविली आणि सार्या वस्तू अगदी सुंदर अशा पॅकिंगमधून आल्या आणि मोबाईल्सबाबत कसलीही तक्रार नाहीच.
थोडक्यात फ्लिपकार्ट प्रांतावरून खरेदीबाबत अधिकच विश्वास वाढत गेला.
अश्वे रिलायबल इन व्हॉट टर्म?
अश्वे रिलायबल इन व्हॉट टर्म? प्रॉडक्ट चे रिव्ह्यू आहेत लिहिलेले.
मला फक्त पेमेंट करताना जरा भिती वाटली.
प्रॉडक्ट रिव्ह्यू आणि
प्रॉडक्ट रिव्ह्यू आणि विक्रेत्याचे रेटींग ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
आजकाल बहुतेक शॉपींग साईट्स मार्केटप्लेस मॉडेल वापरतात. विक्रेते तेथे आपल्याकडील वस्तू विकतात आणि आपल्यासारखे ग्राहक विकत घेतात. पूर्वी फ्लिपकार्ट वगैरे स्वतः विक्री करायचे आता तसे होत नाही.
प्रत्येक विक्रेत्याची किंमत वेगवेगळी असू शकते (बहुतेक वेळा असतेच). अशा वेळेस विक्रेता निवडताना फक्त कमी किंमत बघून निवडू नये. त्याचे रेटींग पण बघावे. ५ पैकी रेटींग असेल तर ३.६ वरचे रेटींग चांगले असते. म्हण्जे तो विक्रेता खात्रीशीर असतो. मी सहसा ३.८ किवा त्यावरचा विक्रेता निवडतो.
रेटींग बघताना किती जणांच्या मतांतून ते रेटींग बनले आहे ते पण बघावे. २०० पेक्षा कमी मतांनी ते रेटींग बनले असल्यास ते खात्रीचे असेलेच असे नाही. कदाचीत त्या विक्रेत्याने बोगस मतदान करून आपले रेटींग वाढवलेले असू शकते.
ही सगळी माहिती साईटवर उपलब्ध असते. ती नीट पडताळून बघावी.
क्ष साईट य शहरात डिलीव्हरी देत नाही असे वरच्या काही पोस्ट्स मध्ये म्हटले आहे. ते पूर्णपणे बरोबर नाही. एखादा विक्रेता एखाद्या शहरात डिलिव्हरी देत नाही असे म्हणणे जास्त बरोबर आहे. त्याच साईटवर दुसरा एखादा विक्रेता निवडला तर आपल्याला आपल्या शहरात डिलीव्हरी मिळू शकते.
हल्ली काही कंपन्या ऑनलाईन घेतलेल्या वस्तूला वॉरंटी देत नाहीत. तेंव्हा महागाईची वस्तू घेताना काळजी घ्यावी लागते.
ऑन लाईन शॉपिंग मधे वाईन/लिकर
ऑन लाईन शॉपिंग मधे वाईन/लिकर भेटतात का हो?. वायनरी कडुन डायरेक घरी अशी सोय हवी.
मला फक्त पेमेंट करताना जरा
मला फक्त पेमेंट करताना जरा भिती वाटली.
>>
मी ३-४ वस्तु विकत घेत होते साधारण २००-२५० पर्यंतच्या. पेमेंट होत नाहीय डेबिट कार्डने. खुपच स्वस्त वस्तु आहेत तिथे पण पेमेंटचा इश्यु येतोय. मनिमाऊ, पेमेंट कसं करता तुम्ही?? नेट बँकींगचा ऑप्शन दिसत नाहीय.
योडे मला तरी काहीच इश्श्यू
योडे मला तरी काहीच इश्श्यू आला नाही. तुला काय एर्रोर येतेय?
मी डेबिट कार्डने करतेय
मी डेबिट कार्डने करतेय पेमेंट.एकदा सर्विस अनावेलेबल, मग बॅन्क पेमेंटसाठी अलाव करत नाहीय असे मेसेजेस आले. म्हणुन मी नाद सोडुन दिला. नेट बॅंकींगचा ऑप्शन नाहीय ना तिथे??
अलीएक्सप्रेस मधे पेमेंट कसे
अलीएक्सप्रेस मधे पेमेंट कसे करावे? कस्टम ड्युटी लागेल का? डेबीट कार्ड वापरु शकतो का ?
मी डेबिट कार्ड वापरलं काल.
मी डेबिट कार्ड वापरलं काल. मला काही प्रोब्लेम आला नाही. नेट बँकिंगचं ऑप्शन मला तरी दिसलं नाही काल.
मी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन ,
मी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन , मिन्त्रा,जॅबाँग, आणि स्नॅपडील वरुन शॉपिंग केले आहे. बहुतेक वेळा कॅश ऑन डीलीवरी केली. अतिशय चांगली सर्विस आहे.
अॅमेझॉनवरुन एकदा कॅमेरा ( भारतात) आणि एकदा लेन्सही ( जपानमधे) ऑर्डर केली आहे. चांगले पॅकिंग आणि योग्य सर्विस मिळाली होती. मात्र अशा महागड्या वस्तु घेताना कटाक्षाने रिव्ह्यु, रिटर्न पॉलिसी वाचावी आणि फक्त अॅमेझॉन फुलफिल्ड विक्रेत्याकडुन ( म्हणजे डायरेक्ट अॅमेझॉनच्या डिलीवरीकडून) च घ्याव्या.
छान् धागा आहे, बरेच अनुभव
छान् धागा आहे, बरेच अनुभव कळतायत
यु लव्ह ट्रॅम्पोलीन नावाच्या
यु लव्ह ट्रॅम्पोलीन नावाच्या साईटवरुन मिनी ट्रॅम्पोलिन घेतले. व्यवस्थित आणि ३-४ दिवसात आले. १२ किलो चे पार्सल होते.
)
मिन्त्रा वाले रिटर्न च्या वेळी चांगले पडतात. ते साईझ बदल असेल तर नवी साईझ बरोबर घेऊन येतात आणि तिथल्या तिथे नको असलेली साईझ वस्तू देऊन नवी घेता येते. टॅग न काढलेले हवे.
स्नॅपडिल मध्ये वस्तू परत देऊन त्याचे रिटर्न क्रेडिट (सीओडी असेल तर) आणि खात्यात पैसे जमा (आधी केलेले पेमेंट असेल तर) जमा होते मग नवी साईझ नवे शॉपिंग असल्यासारखी घ्यावी लागते. (हा काही महिन्या आधीचा अनुभव.)
कूव्ह्ज वरुन एकदा घेतले आहे पण कपडे महाग आहेत बरेच.
मोबाईल इ. घेताना कुरियर वाल्याने कितीही नाराजी दाखवली तरी त्याच्यासमोर वस्तू उघडून वस्तू तीच आहे याची खात्री करुन घ्यावी. तो परत घेत नाही पण आपल्याकडे बोलायला मुद्दा राहतो. पार्सल उघडताना कोणाला शूटिंग करायला लावल्यास अधिक चांगले. (हे सर्व दरवेळी करणे इतर लोकांसमोर जरा पॅरॅनॉईड वाटते, त्यामुळे साधारण १० हजार पेक्षा जास्तीच्या वस्तूलाच
जाई, मी fabfurnish.com वरुन
जाई, मी fabfurnish.com वरुन घड्याळ मागवलयं. काळा ताजमहाल. मस्त आहे आणि deals पण चांगल्या आहेत
http://compare.buyhatke.com/
http://compare.buyhatke.com/
या साईटवर विविध साईट्सवर असलेल्या डील्सची तुलना करता येते. भारतापुरतेच सीमित आहे बहुदा.
मनिने सांगितलेल्या साईटवर
मनिने सांगितलेल्या साईटवर मस्त वस्तु आहेत पण मला पेमेंटला प्रॉब्लेम येतोय... हाय रे कर्मा !!
http://www.junglee.com या
http://www.junglee.com या साइट वर पण विविध साइटसवर असलेल्या डील्सची तुलना करता येते.
आम्ही ऑनलाईन शॉपिंग मधे
आम्ही ऑनलाईन शॉपिंग मधे अॅमेझोन, फ्लिप कार्ट, स्नॅप डील वरून पुस्तकं आणी इतर बर्याच वस्तू मागवल्या आहेत.. त्यांची डिलिवरी आणी डील्स भरवशाची आहेत अगदी..
) सांगत होतो कि नोन साईट्स वरून घ्यायला काय होत होतं तुला इ.इ.
पण हल्लीच एक धाडस केलं.. खूप दिवसापासून टीवी घ्यायचा होता.. ऑन लाईन सर्च करत तो शॉप क्ल्यूज वर २०,००० ने कमी किमतीवर मिळत होता. सामसुंग चा ४८ इंच स्मार्ट टीवी चक्क फक्त ६०,००० ला घेतला.
फुल पेमेंट ऑन लाईन केलं, पेमेंट बिफोर डिलिवरी करायची अट होती म्हणून.. मग बरेच दिवस सांगितलेल्या वेळेत येईच ना.. त्यामुळे थोडं टेंशन आलेलं.. नवर्याला... कारण आम्ही सर्व त्याला दिवसातून हजार वेळा ( नजरेने
पण शेवटी एकदाचं दोन, अडीच आठवड्यानंतर सह्ही सलामात पार्सल आलं.. ईजिप्त मेड आहे, आधी दिल्लीला डिलिवर झाला, मग दिल्ली हून शॉप क्लूज नेट्रेन ने मुंबई ला पाठवलं..
लकीली टीवी खूप चांगल्या प्रतीचा निघाला . नो कंप्लेंट्स अॅट ऑल.. इट्स मोर दॅन पर्र्फेक्ट
पण आता दुसर्यांदा ही रिस्क नाही घेणार
aliexpress.com ही खरेदी साईट
aliexpress.com ही खरेदी साईट खरंच आकर्षक दिसतेय. कोणीतरी तिथून खरेदी करा आणि निर्वाळा द्या बरं
मी लॅपटॉप अॅमेझॉनवरून घेतला.
मी लॅपटॉप अॅमेझॉनवरून घेतला. चांगली सर्विस. नॉर्टनचं अॅण्टीवायरसपण ऑनलाईन मागवलं होतं, साईट नाही लक्षात. पण तेही वेळेत आलं होतं. दोन्हीमधे कुठेही काहीही ब्रेकेज वगैरे नाही.
बाकी घरगुती वस्तू/ पुस्तकं/ कपडे वगैरे अजूनही बाजारात जाऊनच घेतलं जातं.
अवांतर... ओएलएक्स चा कुणाला अनुभव आहे का? (मी मागची सगळी पानं वाचली नाहीत त्यामुळे आधी उल्लेख असेल तर मग बघेन सावकाशीने) मला नवीन ट्रेडमिल घेण्याआधी तिथे घ्यावं असं वाटतंय, उपयोग होईल त्यावर मग नवीन घेता येईल.
aliexpress.com ही खरेदी साईट
aliexpress.com ही खरेदी साईट खरंच आकर्षक दिसतेय. कोणीतरी तिथून खरेदी करा आणि निर्वाळा द्या बरं >>>>>>+१
वर्षु, आम्ही टीव्हीच्या
वर्षु, आम्ही टीव्हीच्या बाबतीत ऑनलाईन किमती पाहिल्या. आणि घराजवळच्या डिलरला सांगितल्या. त्याने त्या किमतीत टीव्ही दिला
aliexpress.com वर १ टीबीचे
aliexpress.com वर १ टीबीचे पेनड्राइव्ह आहेत फक्त ८०० रुपयात.
कोणाला काही अनुभव आहे का खरेदीचा.
कोणीतरी तिथून खरेदी करा आणि
कोणीतरी तिथून खरेदी करा आणि निर्वाळा द्या बरं डोळा मारा
<<
हे बरंय.
मारूतिच्या बेंबीत बोट कोण घालणार?
वरदातै , nshelke , लिंकबद्दल
वरदातै , nshelke , लिंकबद्दल धन्स
हेडरमध्ये टाकली तर चालेल का ?
लोक्स, अलीबाबा साइट चायनाची आहे हे लक्षात ठेवून खरेदी करा बर
वर्षुतै , आतापर्यत चायनामेड वस्तु ऐकल्या होत्या . तुझा टी व्ही तर इजिप्तमेड
सावली , अमेजॉनच्या टिपेबद्दल धन्स
वर्षा, अस होउ शकत का भारी
वर्षा, अस होउ शकत का
भारी आहे हे
प्रज्ञा9 , olx बद्दल लिहिले गेलेय नाही या बाफवर अजूनतरी
वर्षे.... रिअली?? वॉव . यू
वर्षे.... रिअली?? वॉव . यू लक्की
प्रीती , पाहते चेक करून
प्रीती , पाहते चेक करून
वर्षु बरोबर आहे महाग वस्तू
वर्षु बरोबर आहे महाग वस्तू नोन साईट वरूनच घ्याव्यात .आम्ही म्हणूनच फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील वरूनच खरेदी करतो . आत्ता गेल्या महिन्यात मी फ्लिपकार्ट वरून स्यामासंग चा फ्रीज घेतला . फ्रीज आल्या आल्या त्याच प्याकिंग खोलून कुरियरच्या लोकांकडूनच जागेवर लाऊन पण घेतला. दोन दिवसांनी त्यांचा डेमो देणारा मनुष्य येउन गेला . तो आल्या आल्या हॉलमध्ये ठेवलेल्या फ्रिजच्या खोक्यात डोकवायला लागला. म्हटलं तिथे काय शोधताय ? म्हणाला फ्रीज. सांगितलं किचनमध्ये मध्ये आम्ही जाग्यावर लाऊन पण घेतला . तर हसायला लागला
ओ एल एक्स वर वस्तू विकतात ना ? त्याच्यावर नव्या कोर्या वस्तू विकत मिळतात का ?
जाई प्रचंड स्वस्त आहेत वस्तू
जाई प्रचंड स्वस्त आहेत वस्तू तिथे, मी तर एकदा वापरून पाहणार आहे. असेनात का चायना मेड
Pages