ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिरॉ.कॉम नावाच्या साईटवरुन बांधणीच्या दोन ओढण्या मागवल्या होत्या. पाकिट आल्यावर पाहिले तर तीन स्कर्ट होते. त्यांना लगेच फोटो काढून पाठवले तर त्यांचे मेल आले की तुम्ही जाऊन कुरियर करा आणि परत पाठवा आम्ही पुढच्या ओर्डरीत शंभर कमी करु. त्यांना परत पत्र पाठवले की तुमचा वस्तू पाठवणारा माणूस चुका करेल तर मी कुरियर वाल्याकडे तडफडत का जाऊ? मग त्यांचे क्षमा मेल आणि आम्ही तुमच्याकडे येऊन घेऊन जाऊ असे आले. त्यानंतर आजवर कोणी आले नाही. तीन स्कर्ट काही दिवस वाट पाहून वापरायला काढले आणि स्नॅप्डील वरुन त्याच ओढण्या परत मागवल्या.
स्नॅपडील फ्लिपकार्ट जबोंग तिघांचाही अनुभव उत्तम आहे. जबोंग वरुन एक कुर्ता मागवला होता त्यावर मशिन वॉश लिहिलेले असून पण त्याचा रंग गेला आणि पांढर्‍यावर निळा रंग सगळीकडे लागला. त्यांना फोटो पाठवल्यावर त्यांनी परत घेतला आणि त्या किमतीचा मुलीसाठी फ्रॉक घेऊ दिला.
लहान साईट कडे तीन मोठ्या जायंटस इतके कुरियर जाळे आणि मनुष्यबळ नसल्याने घोटाळे होत असावेत.
अमॅझॉन आणि फर्स्ट क्राय, बेबी ओये वरुन पण एक्दोनदा लहान मुलांची स्टेशनरी घेतली होती, अनुभव चांगला.

एक माहिती: जबाँग वाले पाहिल्यांदा रिव्ह्यू टाकत असल्यास एक स्टार वाले रिव्हू प्रसिद्ध करत नाहीत. अर्थात तक्रार निवारण मात्र करतात.
एका चिनी साईटवर स्पष्ट लिहीले होते की निगेटिव्ह रिव्हू आम्हाला वाचून बरे वाटले तरच प्रसिद्ध होतील.
स्नॅपडील वर एकदोनदा निगेटिव्ह रिव्हू लिहून प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांचा एक भिंतीवर लावायच्या हत्तीचा हाईट स्टिकर होता. त्यात चक्रमपणा असा की आधी सर्व वेगवेगळे हाईट मार्क(स्वतः पट्टीने जमिनीपासून सत्तावन्न सेमी मापून पहिला तिथे) लावून त्याला जुळतील असे जमिनी पासून काही अंतरावर हत्तीचे पाय लावायचे होते. (म्हणजे आधी हत्ती चिकटवून आमचा पोपट झाला आणि हाईट मार्क काही स्वतः लिहावे लागले.)
मी अत्यंत उखडून लिहिलेला रिव्ह्यू तिथे अजून आहे ज्यात "हत्तीसारखा जड प्राणी तरंगत जमिनीच्या काही अंतर वर चिकटवावा का लागतो" अशा काही अर्थाची वाक्ये आहेत. (अर्थात ही साईटची चूक नसून स्टिकर बनवणार्‍यांनी छळ केला आहे.)

चुटुर पुटुर गोष्टींसाठी aliexpress.com वापरलं आहे. अलीबाबा ग्रुपची ही रिटेलसाठीची साइट आहे. 'अलीबाबा ग्रुप' असल्यामुळे कोणत्याही देशाचं प्रॉडक्ट असलं तरी ते व्हाया चायना पोस्ट येतं त्यामुळे डिलिवरी टाइम बेक्कार (२५-दिवस ते एक महिना/ १.३० महिना) असतो. घाई नसेल किंवा प्लॅनिंग करुन वेळ काढुन मगच ऑर्डर करायचं. वस्तु मात्र कचर्‍या सारख्या स्वस्त मिळतात. मी नेहमी फ्री शिंपींग वर फिल्टर करुन अशाच वस्तु घेतल्या आहेत. नाही तर कोंबडी ४ आणे आणि मसाला १२ आणे असा हिशोब आहे तिथे.

हेअर अ‍ॅक्सेसरीज ०.५$ / १ $ (like clr extensions for parties, hair bands, rubbers, fancy decorative pieces, clips ) किंवा अशाच प्रकारच्या पार्टीजला लागणार्‍या जंक ज्वेलरीसाठी मस्त आहे. अशी जंक वापरुन १-२ पार्टीज नंतर टाकुन देता येते त्यामुळे कचरा किंमतीच परवडतात. किंवा पार्टी वेअर्स जे ग्रुप्स सेम असल्यामुळे रिपिट करता येत नाहीत ते इथुन घेतले तर फार फटका बसत नाही. एक नॉन ब्रॅन्डेड वन पिस जो पुण्यात कमीत कमी १२००-१५०० ला पडतो तो इथे ७-८ किंवा अगदी १०-१२ डॉलर्सना मिळतो. २-३ पार्टीज नंतर डंप करायला वाईट वाटत नाही.

स्टॉकिंग्ज, टीशर्ट्स, lingerie अशा गोष्टींमधे प्रचंड प्रकार आहेत. फॅब्रिक वाईट नाही पण ब्रॅन्ड फ्रिक लोकांसाठी पण नाही.

बाकी मी गार्डन साठी काही टुल्स घेतली किंवा बॅग्ज घेतल्या त्याही ठीक ठीक होत्या. बॅग्जचे कलर्स मात्र नेटवर आणि प्रत्यक्षात फार फरक होता. परत देण्यापेक्षा असले झंगड कलर्स पार्टीमधे भाव मारुन जातात म्हणुन वापरते आहे.

प्रचंड वरायटी आहे. मेनली फॅशन रिलेटेड अ‍ॅक्सेसरीज. खुप इनोवेटिव आयटेम्स आहेत. फक्त कॉस्मेटिक्स घेणं टाळलं आहे. टाळाच. शेवटी चायना प्रॉडक्ट्स वर किती विश्वास ठेवणार.

फ्लिपकार्ट वरुन बरेच काही मागवले आहे. पण सध्या मी पेटीएम वापरतोय. (https://paytm.com/) खुप छान अनुभव आहे. चांगला डिस्काउंट पण देतात. फक्त हा डिस्काउंट आपल्या वॉलेट मधे जमा होतो. पुढिल खरेदि साठी वापरता येतो.

कोणती साइट निगेटिव्ह रिव्ह्यूज तसेच ठेवते त्यांच्या साईटवर? > Flipkart आणि amazon या साईट्स वर काही प्रॉड्क्ट्स चे निगेटीव्ह रिव्ह्यूज आहेत.
या दोन्ही साईट्स वरून मी कायम च खरेदी करते. काही न आवडलेली प्रॉड्क्ट्स परत दिली आहेत. पण सर्वीस एकदम मस्त . खूप वेळा चांगल्या डील्स मिळाल्या आहेत.

groupon.co.in वर ही खूप चांगल्या डील्स मिळाल्या आहेत. स्पेशली फॉर रेस्टॉरंट्स.

अमॅझॉन वर एक बराराराराराराच महाग टिव्ही होता त्याबद्दल लोकांनी भयंकर वेड्यासारखे रिव्ह्यू लिहिले होते. हा टिव्ही घ्यायला आम्ही आमचे मूल विकून टाकले इ.इ.

मनी ने दिलेली साईट अली एक्प्रेस वेड साईट आहे. ( आय मिन मस्त :))
त्यावर पण सरळ सरळ लोकांनी प्रॉडक्ट हॉरि बल आहे, नॉट गुड इ. लिहिलं आहे.

ऊत्तम चर्चा !

नेहमीच्या साईट्सबरोबरच इतर काही साईट्सची माहीती मिळाली . माबोकर रॉक्स ! Lol

@ दक्षिणा, कपड्याबाबत अगदी अगदी. मी एक कुर्ती मागव्ली होती . अंदाज चुकल्याने बरीच ढगळ झाली.परत करण्याऐवजी अल्तर करण श्रेयस्कर मानल.
@ मामा, ४४,००० ची कॅश ऑन डिलिवरी म्हण्जे भारीच

@ मामी, बुक माय शो फक्त तिकिट्स साठी वापर्तेस की अजून दुसर्यासाठी.

@ नीरजा, रेडिफच लक्षात ठेवेन .

इकाकांनी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन खरेदी करण्याच कारण म्हण्जे स्व्स्ताई. यांना सेट अपचा खर्च नसतो.
इकाका, मला पॅकिंगचा अनुभव चांगला आलाय .

@ रीया, रिव्युज साईट्ससाठि धन्स

अनुने दिलेलि लिंक भारी आहे

बर्याच जणाम्चा फ्लिपकार्टचा अनुभव चांगला आहे असे दिसतेय. मी सुद्धा मोस्टली फ्लिपकार्ट वापरते. चांगल आहे.

आणि डिल शोधण्यात तुम्ही माहिर असाल तर ऑनलाईन शॉपिगसारख्या दुसरा चांगला पर्याय नाही.

>>> राजू, हे कसे करायच ? तुम्ही वेगवेगळ्या साईट्स कंपेर करता का ?

साईज वगैरे अक्षरशः स्वतः मोजून मगच फायनल करावी >>> आशु, मोजली होति साईज , तरीहि चुकलच

मुलिंनो मनी ने सांगितलेली अलिबाबा ची साईट डोळ्याखालून घालाच. तिथे य गोष्टी कचर्‍याच्या भावात मिळतात. एक दोनदा वापरून फेकून द्यायला अतिशय उत्तम आहेत. कॉले ज गोईंग मुलि तर वापरूच शकतात.

जाई आपण नॉर्मली एम चे कपडे वापरत असू तर फक्त ऑनलाईन शॉपिंग करताना एक साईज चढा घ्यायचा. किंवा साईज चार्ट असतोच. त्यातही जरा चढं माप घ्यायच
जास्त झालं तर चालेल, कमी पडू नये.

जास्त झालं तर चालेल, कमी पडू नये >>> एक्झटली. म्हणुन एक साईज ज्यादाचे कुर्ती ऑर्डर केलि. Happy

इथे कोणि घड्याळ ऑर्डर् केलीत का ? काय अनुभव आहेत ? मला घ्यायच आहे

इथे पण मस्त रिव्हु आहेत
स्पिकर

आणि हे हेडफोनचे काय काय लिहिलय मी कार विकुन घेतलाय, दोन महिण्याचा पगार अ‍ॅडव्हान्स देउन घेतल्लय, Just Awesome,Went into a blackhole listening to this, Donated Myself for this piece of Paradise on Earth
एक किडणी विकल्याचा पण होता पण मिळत नहिये तो आता..

त्या aliexpress.com वर काहिच्या काही स्वस्त दिसतंय सगळं. मनीमाऊ, रिलाएबल आहे का ती साईट? तुम्ही नेहमी खरेदी करता का तिथून? प्रॉडक्ट साईटवर दिसतो तसाच येतो का?

Pages