ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक उदाहरण -

हा टॉप मी २५० ला घेतला शुक्रवारी , आज तोचं ६१८ ला आहे - टॉप

योग्य वेळेला लक्ष ठेवून घेतलं तर कमी पैशात काम होईलं असं दिसतयं.

(लिंक चालत नसेल तर काढून टाकते.)

कबीर, मला कुणी पेमेंट केलय का असं विचारयचं आहे. इतकही कळु नये म्हणजे कमाल आहे.
योडी तुझं झालं का पेमेंट अएक्ष वर?
दक्षिणा तु कसं केलस सांगशील का?

अली एक्स्प्रेस पेमेंट मी क्रेडीट कार्ड ने केलं, काहीच प्रॉब्लेम नाही आला, पण प्रॉडक्ट डिलीव्हरी खूप उशीरा आहे, २५ फेब्रुअरी सांगितले आहे

मी पण डेबिट कार्ड ने करत होते. पण पेमेंट होउ शकत नाही असा मेसेज आला. टोटल ४०० च्या आसपास होती म्हणुन असेल का?

$४००? Uhoh

नाठाळ, ते भांडंच फुटेल असं वाटतं. दोन्ही साईट्सवरचं पातं अगदी छोटं दिसतंय. आपण नारळ त्या पात्यावर नेम धरुन हाणायचाय बहुतेक. नेम चुकला तर वाट. तिथले प्रतिसाद पहा :-P. कोयताच आणलेला बरा. कोयत्याने येतो मला नारळ फोडता. शेजारच्यांकडून नारळ फोडून आणावा लागतो म्हणून अस्लं काही शोधत होते.

थोडे अवांतर, नारळ फोडायची एक सोपी युक्ती. नारळ साफ करून झाल्यावर, त्याच्या मध्यभागी पाण्याची एक रिंग करावी. जर आपटून फोडत असाल तर प्रश्नच नाही. पण जर हातात घेऊन बत्ता, कोयता अथवा इतर वजनदार वस्तू ने फोडत असाल तर तो पाण्याच्या रेषे प्रमाणे फुटतो. जर रेष योग्य प्रकारे केली असेल तर बरोबर दोन गोल वाट्या मिळतात.

शेजारच्यांकडून नारळ फोडून आणावा लागतो म्हणून अस्लं काही शोधत होते.>>>>>..>> शेजार्‍यांना, शेजारधर्म पाळण्याची संधी दिलेली जास्त बरे. Happy

अहो पण त्या रेषेवर बरोब्बर घाव बसला तर! पाण्याच्या रेषेने नारळ फुटत असता तर नारळाच्या आत पाणी ठेवलेच नसते निसर्गाच्या करणीने Lol (हलके घ्या)

चिनी नववर्षाची सुट्टी असते. ती डायरेक्ट २८ फेब्रुअरी पर्यंत. त्यामुळे अलिएक्सप्रेसच्या डिलेव्हर्‍या लेट होणारेत.

ऑनलाईन खरेदी डेबिट कार्डने करावी ,शक्यतो विसा डेबीट वापरावे. अलिकडे रुपे डेबिट कार्ड बँका देतात ,ते कुठेच चालत नाही.

अहो पण त्या रेषेवर बरोब्बर घाव बसला तर! >> नाही आशू, घाव त्या रेषेच्या आसपास बसला तरी पाण्याच्या रेषेवरच नारळ फुटतो. याचं शास्त्रीय कारण कोणीतरी विषद करून सांगेलच इकडे.

अश्विनी के, ते यन्त्र प्रदर्शनात किंवा express वे वर फ़ूड मॉल मध्ये सहज मिळतं. उपयोग विशेष नाही.

कोयतीचाही नेम चुकला
>>
नेहमीची सवय असेल तर नाही चुकत. मी चॉपरने फोडते नारळ.. फारच अवांतर होतंय हे. अश्वे, नको घेऊस ते यंत्र. एका पैशाचा उपेग नाही त्याचा.

Pages