ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक dhgate.कॉम नावाची साइट आहे. तिथे हाँगकाँग मार्केटमध्ये मिळणार्‍या वस्तू मिळतात.

क्राफ्टसविला पण चांगली आहे. ही थोडी इबे/इट्सी सारखी साइट आहे. मी एकदा एकाच ऑर्डरमध्ये ३-४ सेलरकडच्या वस्तू खरेदी केल्या होत्या. त्यातला एक सेलर गायब झाला. मग साइटने साइट क्रेडिट दिले. माझ्या एका कलीगने तिने खरेदी केलेल्या वस्तू अमेरिकेत शिप करवल्या होत्या. तो सेलर पण गायब झाला. तिला मात्र रिफन्ड मिळाला.

एटसी भारतातल्या सेलर्ससाठी तरी अगदी निरूपयोगी आहे. बायर्ससाठी भारतीय सेलर असल्यास ठिके अन्यथा उपयोग नाही. एटसीवरचे सेलर्स हे छोटे मासे आहेत. वन शॉप, किंवा केवळ ऑनलाइन शॉपवाले. त्यामुळे फ्री शिपिंग वगैरे गोष्टी ते देऊ शकत नाहीत. परिणामी एटसीवरून भारत आणि इतर देश अशी खरेदी वा विक्री करायची असेल तर त्रासदायक आहे.
पण एटसीवर वस्तू मात्र एकसे एक आहेत. शक्यतो वन ऑफ अ काइंड. जेनेरिक, मास प्रोड्यूस्ड फारश्या नाहीत.
माझ्या उद्योगाच्या निमित्ताने मिळवलेली ही माहिती. अवांतर वाटत असल्यास उडवून टाकेन.

प्रज्ञा9 , आम्हाला सतत घर बदलावं लागत असल्यामुळे घरात olx वरचं ९0%सामान आहे . वस्तु निट पारखुन घ्यावी आणि deal करता यायला हवं

हायला ! अली एक्सप्रेस साठी बर्‍याच चौकशा आल्या आहेत की. मला अलीची एजंट असल्याचा फील येतो आहे. मी एक धागा वाचायला गुपचुप आले होते पण इथल्या अलीच्या पोस्टस वाचुन लॉग इन करावंच लागलं.

मी वरच्या सगळ्या पोस्टस आठवुन इथे उत्तरं देते. ठीके?

> मी दोनदा खरेदी केली. डेबिट कार्डने पैसे दिले.
> आपला अकाउंट क्रिएट केला कि करन्सी INR निवडायची म्हणजे सगळ्या किंमती रुपीज मधे दिसतात.
कन्वर्जनचा चक्कर रहात नाही.
> मी फक्त फ्री शिपींगवाले पदार्थ ( आयटेम) निवडले कारण फालतु किंमतीची गोष्ट आणि शिपींग चार्जेस
तेवढेच किंवा जास्त हा मुर्खपणा आहे.
> मला जी किंमत नेटवर दिसली तीच फक्त कार्डमधुन डेबिट झाली. नो कस्टम्स. किंवा माझे आयटेम्स
अगदीच चुटुर पुटुर असल्यामुळे असावं, पण नो कस्टम्स.
> मी आता पर्यंत वॉर्डारोबवर चिकटवायला फॅन्सी बटरफ्लाइज ( एकदम भारी आहेत), कलर्ड हेअर चंक
(क्लीपने लावला की खरीच एक केसांची बट कलर केली आहे असं वाटतं , माझा रेड कलर Wink ) एक
टी( बेस्ट मटेरिअल), एक वन पीस ( फार ग्रेट नाही. एक दोन पार्टीज साठीच हवा होता म्हणुन तडजोड
केली, पण ६८० रुपयात काय सोनं मिळणार), एक ट्युब टॉप ( मस्त आहे) स्टॉकिंग्ज ( बंडल
निघाले), एक हँडबॅग (नेटवर दाखवल्यापेक्षा टुकारेस्ट कलर आणि मटेरिअल) बरीच सारी जंक
ज्वेलरी ( ही आपल्या चॉइसवर आहे. चीपो पण आहे आणि बरीच बरी पण मिळाली) एक गार्डनला
पाणी घालायचा पाइप (बारीक रोल करुन ठेवता येतो, क्वालीटी पण चांगली आहे. ) एवढं सारं घेतलं. मिक्सड फीडबॅक देइन, पण किंमती खुप स्वस्त आणि अपेक्षा एक दोन वापराची असल्यामुळे मला चाललं. नवरा ब्रँड फ्रिक आहे आणि खुप टोमणे मारतो त्यामुळे परत कधी तिथुन खरेदी करेन असं वाटत नाही. गंमत म्हणुन एखादा वेळेस स्वस्त वस्तु करा ट्राय. Happy पण कॉस्मेटिक्स नकोच नको. चायना क्वालीटीची भीती !

अलीएक्स्प्रेस्स म्हणजेच अलीबाबा आहे ना वेबसाईट? त्या चायनातल्या एका शिक्षकाने सुरू केलेली? गेल्या २-३ महिन्यापूर्वी ती पब्लिक झाली तेव्हा खूप न्युज वाचल्या होत्या त्याबद्दल.

अली एक्स्प्रेसची अमेरिकेतली साइट पाहिली हे सारं वाचून.
अगदी दोन तीन डॉलर्स पासून वस्तू आहेत. पण त्याच्यावरही फ्री शिपिंग कसं काय आहे ते कळत नाहीय.

अली बाबाचे ओनर जॅक मा हे आता बिलिऑनर झालेले आहेत. साइट खूप जुनी आहे. माझे दोन पैसे:

१. बिग बास्केट. कॉम ग्रोसरी, चिक न, भाज्या, इतर सर्व घरात लागणारे खाद्य पदार्थ गुरुवारी ऑ र्डर टाकते शनिवारी सक्काळचा डिलिवरी स्लॉट सिलेक्ट करते त्याच स्लॉट मध्ये डिलिवरी करायचे बंधन असते त्यांना. सोडेक्सो कुपने घेतात. डॉग फूड, औ ष धे - व्हिक्स वगरिए, पर्सनल केअर, भांडी ऑर्गॅनिक फूड काय ह्वे ते घरपोच मिळते ते मला फार बरे पडते. जड ट्रॉली ओढावी लागत नाही. व वेळ वाचतो. हे महत्वाचे. ह्यांचा लॉयल्टी प्रॉग्राम आहे. त्यामुळे स्पेशल डील्स मिळतात. महिन्याला ७०० रु परेन्त वाचतात.

२) फ्लिपकार्ट उत्तम अनुभव. अमेझॉन उत्तम अनुभव. फॅब फर्निश उत्तम अनुभव. फर्निचर, सॉफ्ट फर्निशिंग घेतले आहे. दिवाळीत कार्पेट, दुवे सेट्स, बेड लिनन, डॉग बेड्स वगिअरे घेतले होते. सर्व मिळून २० के. एक चायना मेड दिव्यांची माळ पण घेतली होती. तीही चांगली निघाली आहे. माळेचे दिवे रात्री लावून संगीत लावून खाली मुंबईचे लुकलुकते दिवे पाहणे हा मस्त पास्ट्टाइम आहे. अमेझॉन वर उत्तम पेट केअर मटेरिअल आहे. कुत्र्यांचे पॉ बटर घेतले. आम्ही इथून अमेरिकेत अमेझॉन प्राइम ने फुकट फास्ट डिलि वरी मित्राला पाठवली होती. ख्रि समस गिफ्ट व नंतर एकदम ९९ डॉलर क्रेडिट कार्ड ला चार्ज झाले. साइट वर जाउन आम्हाला ही सर्विस नको आहे असे सिलेक्ट केल्यावर आठ दिवसाच्या आत ते रिवर्स होउन पैसे परत मला क्रेडिट झाले.

३) सिनेमाची शोजची तिकिटे काढतो. बुक माय शो नाहीतर बिग सिनेमा पीव्हीअर वगैरे. त्यात म्हणजे माझ्या कार्ड वर मुलीच्या सर्व गॄप साठी तिकि टे काढली जातात. व मग ते लोक्स पैसे कॅश देतात. कन्विनि अन्स आहे.

४) कूव्ह्ज जबॉन्ग, फॉरेवर २१ साई टीवरून कपडे घेतले आहेत शूज पण. मायबोली व मॅ जेस्टिक वरून मराठी पुस्तके !!!

५) आयटून्स वरून गाणी, सिनेमे, अ‍ॅप्स गेम्स

६) चुंबक व हॅपेली अन मॅरिड वरून मजेशीर इंडियन सामान् घेतले आहे.

७) सिम्स फोर गेम ऑनलाइन पेमेंट करून डौनलोड केली आहे. असे खूप साइट वरून केले आहे. जसे बिग फिश गेम्स वगैरे.

ऑनलाईन खरेदी करताना क्रेडिट / डेबिट कार्ड ची fraud liability किती आहे ते जरुर बघणे. डेबिट कार्ड मध्ये तुमच्या खात्यातली पुर्ण रक्कम जाउ शकते. तर क्रेडिट कार्ड मध्ये प्रत्येक देशात ही रक्कम वेगेळी असते. सिंगापुर मध्ये तुमचे कार्ड हॅक झाल्यास liability S$100 (4500 रु) तर अमेरिकेत बर्याच कार्ड कंपन्या मध्ये liability शुन्य असते.

मी गेल्या ५ वर्षापासुन भारत , सिंगापुर आणी अमेरिका मधुन ऑनलाईन खरेदी करत आहे. खरेदी ही नेहमी क्रेडिट कार्ड नी amazon, flipkart, sistic (Singapore), vistaprint ह्यासारख्या नावाजलेल्या कंपन्यातुन करतो.

६ महिन्यापुर्वी माझे कार्ड कोणीतरी विमानाचे तिकिट आणि हॉटेल साठी वापरले होते. सिंगापुरर्च्या कार्ड कंपनीला फोन केल्यावर त्यानी लगेच कार्ड बंद केले. तसेच त्यानी Visa च्या fraud prevention ला कळावले. टिकिट आणी हॉटेल वापरलले नसल्याने पुर्ण पैसे परत मिळाले. ( वापरले असते तर ४५०० रुपय कापुन मिळाले असते). हे सगळे निस्तरायला १५ दिवस लागले. (भारतात किती वेळ लागला असता ते सांगता येत नाही) हे कार्ड ३ देशात वापरले असल्याने नक्की कुठुन हॅक झाले हे माहीत नाही. कार्ड कोरीया मध्ये वापरले गेले होते आणी मी ते कार्ड कोरिया मध्ये किवा कुठल्याही कोरीयन कंपनी मध्ये वापरले न्हवते.

त्यामुळे online खरेदी साठी वेगळे डेबिट कार्ड (खात्यात कमी पैसे ठेउन) किवा वेगळे क्रेडिट कार्ड (ज्यामध्ये खर्चाची लिमिट कमी आहे) काढावे. COD साठी हा प्रोबलेम नाही.

प्रिति, त्यांचा - बिग्बास्केट चा - माल गोरेगाव गोडाउन मध्ये असतो. मला कधीकधी चिपस चे २० रु चे पाकीट १ रु ला मिळाले आहे. काही ऑर्डर् मॉडिफिकेशन असल्यास मेल करतात. माल निघाला की मेसेज येतो. इकडचा माल तिकडे असे झा ल्यासही ते माल परत आणून देतात. महिन्याच्या किती ऑर्डर्स झाल्या ते मेन पेज वर दिसते. प्रत्येक वेळी किती सेव्ह केले ते ही गणित बाजूला दिस्ते. सणा सुदी ला त्याचे स्पेसिफिक पॅकेजेस पण असतात जसे होळी दिवाळी, ख्रिस्मस, पूजा साहित्य, रांगोळ्या इत्यादि मिठाई पण असते. पण मला ह्या सर्वाची गरज पडत नाही म्हणून कधी घेतले जात नाही. फुले पण असतात. भांडीपातेली, मुलां च्या वह्या , पेने, कापलेल्या भाज्या सर्व मिळ ते.
सातवी आठवीतली मुले पण आरामात ऑर्डर देउ शकतात. इतकी सोपी साइट आहे.

अमा, फ्रेश भाजी , फळं , यांकरता बिग बास्केट ट्राय करेन आता.. आत्तापर्यन्त बरेच वेळा ग्रीन कार्ट वरून घेतल्यात या वस्तू. वेरी फ्रेश . एकदा तर बीन्स फ्रेश नव्हत्या म्हणून दुसर्‍या दिवशी येऊन बदलून दिल्या होत्या.
बाकी ग्रीन कार्ट च्या वॅन्स ची रेफ्रिजरेटिंग सिस्टिम तितकीशी चांगली वाटली नाही.. एक दोन वेळा वितळलेल्या ( Happy ) बासा फिश फिलेज आणून दिलेल्या.. त्या मी अ‍ॅक्सेप्ट नाही केल्या त्यावर आर्ग्यु न करता , डिलिवरी बॉय ने निमूट पणे परत घेतल्या..

ग्रोसरी करता लोकल बनिया इज ओके.. पण त्यांच्या भाज्या , फळं = अ बिग नो नो!!!

ओ एम जी.. अमा ने सांगितलेल्या चुंबक आणी हॅपिली अनमॅरिड .कॉम आर सिंपली अमेझिंग साईट्स..

खर्रच कसल्या गमतीदार वस्तू आहेत.. कधीच इथे बाजारांतून , मॉल्स मधून पाहिल्या नाहीत..

अ बिग थँकू अमा तुला..!!! भारीच कामाच्या आहेत या साईट्स..

साहिल, तुझा अनुभव शिकण्यासारखाय.. आता ऑनलाईन शॉपिंग करता वेगळा अकाउंट इज अ मस्ट थिंग!!

मी फारशी शॉपिंग-हौशी नाही. घरातील ग्रोसरी बिगबास्केट वरून मागवते. चांगली असते. फळे/भाज्या बद्दल माझा अनुभव ग्रीनकार्ट्चा जास्त चांगला आहे.बिग बास्केट्/ग्रीनकार्ट दोन्ही ठिकाणी वस्तू आवडली नाही तर विनातक्रार परत घेतात.
पुस्तके आणि काही वस्तू फ्लिपकार्ट / आमेझॉन वरून घेतल्या आहेत. किंमत आणि दर्जा याबद्दल अनुभव अतिशय चांगला आहे.

कार्ड वापरण्याबद्दलः
मी शक्यतो COD सुविधा वापरते. माझे कार्ड ४ वर्षांपूर्वी एकदा अ‍ॅमेझॉनवर हॅक झाले होते. खरेदी अमेरिकेतून झाली आणि खरेदीचा नेहेमीपेक्षा वेगळा पॅटर्न पाहून बँकेचा रात्री दोन वाजता मला फोन आला. कार्ड ब्लॉक करणे वगैरे सर्व सोपस्कार होउन मला पैसे परत मिळे पर्यंत १ महिना लागला. तेव्हापासून कोणत्याही साइट वर कार्ड वापरलेच तर रजिस्टर करत नाही. करावे लागलेच तर लगेच डिलीट करते.
अ‍ॅमेझॉनवर स्वतःसाठी गिफ्ट्कार्ड खरेदी करून अकाउंट वर बहुदा ठेवता येइल. त्यातूनच खरेदी करायची.

मला अजुनही प्रॉब्लेमच येतोय पेमेंटसाठी अली एक्स्प्रेसवर... सटरफटरच वस्तु आहेत पण बर्‍याच स्वस्तात मिळतायत. मस्तच साईट आहे पण हाय रे कर्मा....

बापरे हा धागा शॉपिंग अ‍ॅडिक्शन वाढवणार..
भाज्या वगैरे गोष्टींमधे भाजीमार्केटात जाऊन घेतलेली भाजी आणि ऑनलाइन यामधे किंमत व क्वालिटी दोन्ही बाबतीत किती फरक पडतो?

चुंबकचे स्टॉल्स आहेत काही मॉल्समधे - अंधेरीच्या इन्फिनिटी मध्ये आणि कुर्ल्याच्या फिनिक्स मार्केट सिटीमध्ये (मुव्ही थिएटर शेजारी) आहेत.

चुंबक आणि हेप्पीली अनमॅरिड साईट्स मस्तच आहेत. गिफ्ट्स देण्याकरता अनेकदा वापरल्यात. बाकी बिग बास्केट अधून मधून. ग्रीन कार्ट एकदाच मागवलं पण पार्ले भाजी मार्केट आणि देवधरांची घरपोच ताजी भाजी सर्व्हिस जास्त कन्व्हिनियन्ट असल्याने रिपिट केलं नाही.

बाकी फ्लिपकार्ट वरुन पुस्तकं, इलेक्ट्रॉनिक्स (मोबाईल फोन, लॅपटॉप, चार्जर्स, हेडफोन्स, रेकॉर्डर), परफ्यूम्स, कॉस्मेटीक्स, किचन अप्लायन्सेस वगैरे बरेचदा मागवली आहेत. नो तक्रार अ‍ॅट ऑल. पुस्तकांकरता बुकअड्डा किंवा इतरही काही. होम शॉप एटीनही चांगले आहे. आईकरता लेग मसाजर घेतला होता. दिवाळी दरम्यान काही गिफ्ट आयटेम्सही इथून घेतले. फॅब फर्निशवरुन एक लहान कॉस्मेटीक रॅक घेतली. चेअरवालाकडून कम्प्यूटर चेअर घेतली. ऑनलाईन काही साड्या, स्टोल्सही घेतलेत. आजवर क्वालिटीचा काही प्रॉब्लेम आला नाही. साईझ लगेच बदलून मिळाली. ऑर्डर कॅन्सलेश्नही लगेच होते. रेडिफवरुन एकदा डिलिव्हरी फारच उशिरा तीन आठवड्यांनी आली.

मुली कपड्यांकरता, बॅग्जकरता मिन्त्रा, लाईमरोड वापरतात. आतल्या कपड्यांकरता झिवामी चांगली आहे.

या सगळ्याकरता शक्यतो केश ऑन डिलिव्हरी पर्याय किंवा डेबिट कार्ड.

माझं ऑनलाईन शॉपिंग खूप रॅन्डम प्रकारात मोडतं. अनेकदा गरज नसतानाही वस्तू मागवल्या जातात त्यामुळे हल्ली रॅन्दम सर्फिंग कमी केलय. तरी ते होतंच.

नीरजा, ग्रीन कार्टमधे अनेकदा फळे, भाज्यांकरता चांगली डिल्स असतात. मार्केटपेक्षा स्वस्त पडू शकते. त्याकरता मुंबई मिरर किंवा इतर पेपर्समधेही जाहिरात असते किंवा मग त्या साईटवर जाऊन पहावे रेग्यूलरली.

ग्रीन कार्ट एकदाच मागवलं पण पार्ले भाजी मार्केट आणि देवधरांची घरपोच ताजी भाजी सर्व्हिस जास्त कन्व्हिनियन्ट असल्याने रिपिट केलं नाही. <<
ह्म्म वाट्याच मेर्को. Happy

त्याकरता मुंबई मिरर किंवा इतर पेपर्समधेही जाहिरात असते किंवा मग त्या साईटवर जाऊन पहावे रेग्यूलरली. << ओह ओके!

शिवाय पार्ल्यातला भाजीवाला एकच यलो कॅप्सिकम, तीनचारच बेबीकॉर्न्स, ब्रोकलीचा एकच तुरा असं गरजेप्रमाणे देतो तसं इथे करता येत नाही Wink Proud

Aliexpress.com वर नेट बँकिंग दिसत नाहिये. जाऊदे मग. मला लिननचे शर्ट्स दिसलेत तिथे मस्त आणि स्वस्त. साईझ चार्ट पण दिसत नाहिये नक्की कोणता साईझ ऑर्डर करायचा ते बघायला.

Pages