केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ड्रिमगर्ल, मेट्रिक्स बायोलाजचा हा शॅम्पू, कंडिशनर आणि सिरम घे. मी सध्या वापरतेय. मस्त आहे.
कुठल्याही शांपूने धुवायच्या आदल्या रात्री तेल लावणे मात्र मस्ट.
अधूनमधून नारळाचे दूध पण उत्तम.

स्पा दर महिनाल्या सलग वर्षभर तर केला तर डॅमेज केस पण रिस्टोर होतात. कोरडेपणा जाuन छान सूळसूळीत होतात केस.
स्पा किट आणून घरी पण करता येतो स्पा, पण पार्लर मधून करून घेतल्यास पॅम्पर करून घेता येते स्वतःला.आपण स्वतःच मसाज पार्लरसारखा नाही करू शकत घरी अन स्पा मध्ये मसाज चांगला झाला तर इफेक्ट मस्त येतो. सेम लोशन्स / पॅक केसांना व्यवस्थित लावण्याबाबतीत पण.
मेट्रिक्सचं किंवा लॉरिआलच सिरम मस्त आहे जर केस कोरडे अन दुभंगलेले असतील तर.
शॅम्पू लॉरिआल किंवा मेट्रिक्सचा प्रोफेशनल पॅक मिळतो तो बेस्ट आहे. त्याचे कंडिशनर / मास्क डब्ब्यात मिळते.१ लिटर चे पॅक आणले तर बरेच दिवस जातो.

oho, maajhyaa parlourvaline malaa spa vicharle tar he sangitale. ata varache vachun malaahi karavese vatayalaa lagale Happy

@ dreamgirl
हेअर पॅक रेसिपी मिळाली.>>> सांगा ना,म्हणजे शोधायला नको.
प्लीज इथे पेस्ट कर ना
आणि घरी जर स्पा करणार असशील तर जे लोशन असते ते खूप sticky असते. टब किंवा बेसिन मध्ये पहिला wash घे नाहीतर सगळी बाथरूम निसरडी होते ( स्वानुभव)

ग्रेनील मुळे माझे केस फार कोरडे होत आहेत. मी ग्रेनील लावून दोन तास ठेवते, मग फक्त पाण्याने धुते. रात्री तेलाचा मसाज आणि दुसर्‍या दिवशी पतंजलीचा शँपू.
दिवसें दिवस केसांचा कोरडेपणा वाढत चालला आहे आणि ग्रेनील लावायला सुरुवात केल्यापासूनच हे होत आहे.
ग्रेनील भिजवताना त्यात थोडे तेल घालावे का? अजुन कोणाला असा त्रास होतो का?

पीनी - तू conditioner वापरतेस का ? वयानुसार sebum secretion कमी होवून कोरडेपणा वाढत जातो. त्यमुळे, केसांना कोणतीही ट्रिटमेंट केल्या नंतर तेल लावणे conditioner वापरणे गरजेचे आहे.

आणि हो स्पा तेल रेग्युलर , आहरा मध्ये बदल , dryer चा वापर जवळ जवळ बंद केल्या मुळे माझा केस गळतीचा त्रास आटोक्यात आला आहे

मृणाल १ :

नीधप | 1 April, 2013 - 15:54
हा माझा हेअर पॅक. रेग्युलर केला गेला तर खूप उपयोग होईल.
हाताशी वेळ असेल तेव्हा करून बघा.
एक चमचा मेथ्या रात्री भिजत घालायची.
त्या भिजलेल्या मेथ्या (भिजवलेल्या पाण्यासहित), एक ते दीड वाटी नारळाचे दूध, नागरमोथा, जटामांसी, गवलाकचरा, ब्राह्मी, आमलकी, मंजिष्ठ, माका आणि मेंदी सर्व एकेक चमचा
असं सगळं चांगलं घोटून मिक्स करायचं. गरजेप्रमाणे पाणी/ नारळाचे सेकंडरी दूध (एकदा चोथा पिळून झाल्यावर परत तो पाणी घालून मिक्सरमधून काढले की जे पातळ ना दू मिळते ते) घालायचे.
केसाला मेंदी लावताना जी कन्सिस्टन्सी तयार करतो तीच करायची.
एकेका बटेला डोक्यापासून केसाच्या टोकापर्यंत लावायचे. अर्धा-पाऊण तास ठेवायचे आणि नुसत्या पाण्याने धुवून टाकायचे.
रात्री डोक्याला तेल. दुसर्‍या दिवशी सकाळी माइल्ड शांपू.
मस्त होतात केस.

मृणाल १ - हो. मी पतंजलीचा conditioner वापरते. स्पा मात्र नाही केला. आता रेग्युलर करत जाईन. धन्यवाद.

ड्रिमगर्ल, बरं झालं इथे परत पेस्ट केलंस ते. सध्या घरात सिमेंटकाम सुरू असल्याने केसांचे दोरखंड झालेत. काम आटपल्यानंतर केस, हात, पाय इत्यादींसाठी स्पा अगदी गरजेचे आहे. केसांच्या स्पासाठी नीधपची पोस्ट शोधणार होतेच. Happy

अदिती, आयुर्वेदीक दुकानात मिळेल की. आणि एखादे कमीजास्त असले तरी चालणारसे वाटते.

सर्व पावडरी काष्ठौषधीच्या दुकानात मिळतात.
मुंबईत असाल तर दादरला रानडे रोडला एक आयुर्वेदिक औषधांचे दुकान आहे (नाव लक्षात नाही) आणि पार्ल्यात हनुमान रोडला अतुल मेडिकल.
पुण्यात तु बा च्या मागे काष्ठौषधीचे बरेच जुने आणि मोठे दुकान आहे.

नी पॅक चा मिक्स नुसत घोटुन मिक्स करायचा आहे. मेथ्या अख्ख्याच राहातील. त्याचे पाणीच पुरेस आहे का? की तेव्हडा मिक्सर मधुन काठायच आहे?

सॉरी मेथ्या मिक्सरमधून आधी काढून घ्यायच्या किंवा सगळेच मिक्सरातून काढून घ्यायचे हे लिहायचं राह्यलं. Happy

मी तर मेथ्याची पण पूड आणली,
मेंदी आणली नाही कारण माझे केस आधीच कोरडे आहेत. मेंदीने केस कोरडे होतात असे ऐकलेले आहे. त्यातून त्या मेंदीचा रंग चढला केसांवर तर काय ह्याची भीती

plz help me...dr.urjita jain hyanch "jasawand gel" kolhapur madhe exact kute milel?.konala mahiti asel tar plz mala address dya..

बिझी शेड्युल मुळे पार वाट लागलीये... Sad
पुढच्या आठवड्यात भानुपद्म, दादर ला भेट देऊन हेअर पॅक साहित्य घेऊन येणारेय! सध्या ट्रेसेमी वापरतेय! नुकतीच नवी बॉटल आणलेय शाम्पू कंडीशनरची म्हणून ती संपल्यावर मग मेट्रिक्स बायोलाज शाम्पू-कंडिशनर-सिरम ट्राय करेन! तोपर्यंत नारळाचे दूध आणि नारळाचे तेल मसाज वर भागवेन!!

मला एका लग्ना साठी केसांचा वेगळा रंग लावायचा आहे. अजून कधी Hair color वापरला नाही. म्हणून जरा धीर होत नाहीये. Generally मेंदी वापरते. केस थोडे थोडे पांढ्ररे आहेत. कृपया तुमचे सल्ले द्या.

माझे टाळू वरचे केस खूप विरळ होत चाललेत.....कोंडा नाही.....गळताना दिसत पण नाहि.....कोणाला असा अनुभव? उपाय?

प्रीति तिला चौरस आहार वेळच्या वेळी दे. माझ्या मुलीचे ५ वि पर्यन्त केस विरळ होते. त्यानंतर तिचे जेवणसुधारले आणि मग केसही.

मंडळी अर्जंट मदत हवी आहे. मुलीच्या केसात चक्क लिखा आणि एक ऊ मिळाली. बघूनच जाम टेन्शन आले आहे. वय वर्ष सहा. केस खूप लहान बेबी कट आणि पातळ आहेत. लायसील आणू का? कडुलिंबाचा पाला शिल्लक आहे.

मेंदीमूळे केस फारच लालसर झाले आहेत. पार्लरवाले सांगतात मेंदी लावूच नका केसांना, हेअर कलर करा. काहितरी अमोनिया फ्री कलरपण असतात असही म्हणाले. मॅट्रीक्स आणखि कुठलेतरी नाव घेतले.

कलर प्रोटेक्शनचा शॅम्पू सध्या वापरते आहे. त्यांनीच सांगितला आहे.

मला विचारायचे होते की हेअर कलरींग मुळे बाकिचे केसही पांढरे होतात ना....

कोणाला काहि अनुभव

मागे साधनाने सांगितल्या प्रमाणे नारळाचं दुध लावलं केसांना. (लांब आहेत म्हणुन एक वाटी) पण केस मऊ नाही झालेत. पण डोळे, डोक एकदम शांत झाल. खुप छान वाटल. अजुन एकदा लावल तर केस पण मऊ होतिल बहुतेक...

Pages