केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केसाना धुतल्यनन्तर अन्डे+पाणी+ १ चमचा ऑलिव ओइल मिक्सर मधे फिरवून, नियमीत लावणे चांगले आहे का? मला कन्डीशनर प्रत्येक वेळेस लावणे नको वाटते...म्हणून हा प्रश्न..

केसाना धुतल्यनन्तर अन्डे+पाणी+ १ चमचा ऑलिव ओइल मिक्सर मधे फिरवून, नियमीत लावणे चांगले आहे का? मला कन्डीशनर प्रत्येक वेळेस लावणे नको वाटते...म्हणून हा प्रश्न
अंड्याचा वास नाही येत का???

मृणाल, मलाही आधी तसेच वाटत होते की केसाना खूप्प वास येईल..पण मी आत्तापर्यंत 3-4 वेळा लावले आणि अजीबात वास आला नाही. कदाचित oilve oil आणि पाणी मिक्स केल्याने येत नसावा. जर तसे वाटत असेल तर एसेन्षियल ओइल्स मिक्स करता येतील..केस एकदम सुळ्सुळीत आणि सॉफ्ट वाटत आहेत. मी त्यासोबत कधी कधी ट्रेसेमी शॅमपू वापरला तर कधी शीकेकाई...आणि त्यानंतर हे अन्डेवले मिश्रण लावले, 5 मिन ठेवले आणि धुवून टाकले.

माझ्या केसांना कन्डीशनर लावले नाही तर चालतच नाही. त्यामुळे मी नक्की हे करून बघेन
प्रमाण काय घेतेस ?

मला कोणी पार्लरमध्ये करण्यात येणार्‍या हेअर स्पा बद्द्ल माहिती द्याल का ?

म्हणजे कसे करतात, किती वेळ लागतो , खर्च किती , आणि मुख्य म्हणजे किती उपयोगी ?

धन्यवाद... Happy

ग्रेनीलचा काय अनुभव? १-२ महिन्यापासुन ते वापरत आहे त ते वापरणे सुरु केल्यानंतर केस जास्त गळतात असे वाटत आहे. आधी ढिम्म गळत नव्हते. आता ही गळती ग्रेनीलने होत आहे की बोलाफुलाला गाठ आहे ते ग्रेनील वापरणे थांबवल्याशिवाय कळणार नाही पण इथे कोणाला तसा अनुभव आलाय का?

मल ग्रेनील अजिब्बात सूट नाही झालं. म्हणजे केस रंगले नाही (ब्लॅक आणि ब्राऊन दोन्ही शेड्स वापरुन पाहिले). अतिरिक्त गळल्यासारखे मात्र वाटलं नाही.

मृणाल, मी अंड्याचे पिवळा भाग, ३, ३ चमचे ऑलीव्ह ऑईल, ऑलेव्हेरा चा रस ३ चमचे मिक्सर मधुन काढते त्यात असेल तर आवळा पावडर पण टाकते. हा लेप १/२ तास केसाला लाउन नेहमीच्या शॅम्पु कंडीशनर ने धुउन घेते. पण अ‍ॅज अ कंडीशनर कधी वापरल नाहीये.

-२ महिन्यापासुन ते वापरत आहे त ते वापरणे सुरु केल्यानंतर केस जास्त गळतात असे वाटत आहे. आधी ढिम्म गळत नव्हते. आता ही गळती ग्रेनीलने होत आहे की बोलाफुलाला गाठ आहे ते ग्रेनील वापरणे थांबवल्याशिवाय कळणार नाही पण इथे कोणाला तसा अनुभव आलाय का?>>>>>> मलाही तेच वाटतंय.पण काही महिने स्टिरॉईड्स + बोअरवेलचे पाणी पिण्यात आले हाही फॅक्टर होता.जरी कॅलशियम + डी व्हीट.च्या गोळ्या होत्या तरीही केस अर्ध्यापेक्षा कमी झाले.

मुंबईत पावसाळ्यात केसगळती जरा जोरात होते असा माझा अनुभव आहे. बहुतेक पाण्यात वाढवलेल्या क्लोरिनच्या मात्रेमुळॅ असावे. साधारण ऑक्टोबर संपेपर्यंत माझे केस जोरदार गळतात. नंतर परत नेहमीच्या गळतीप्रमाणावर येतात. हल्ली माझी मुलगीही केस खुप गळताहेत म्हणुन अश्रु गाळतेय Happy

Bigenचा माझा अनुभव चांगला आहे. केस गळती कमी करण्यासाठी केस रंगवून झाले की शेम्पू केल्यावर डीप कंडिशनर क्रीम केसांत जवळ जवळ पाच ते सात मिनिटे लावून ठेवते. साईड ईफेक्टस अजून तरी जाणवलेले नाहीत - अमी

Have anybody tried banana and avocado for hair. I have and having good results.

नमस्कार मायबोलीकरहो:)

कोणाला बाणेर \ पाषाण मधील चांगलं पार्लर माहितीये का?मला छानसा hair cut करायचा आहे ,Please कोणाला माहित असेल तर सांगा.तुमचे स्वतःचे अनुभव असतील तर उत्तम..Thanks in advance Happy

माझे केस ना धड सरळ ना धड कुरळे, खुपच गुंडाळलल्यासारखे (waves) आहेत. ३ वर्षापुर्वी मी hair straightning केले होते पण केस खुपच गळायला लागले आणि ७-८ महिन्याने जैसे थे परिस्थिती. कमरेपर्यंत असलेले माझे केस गळुन गळुन शेपटी सारखे दिसु लागले. आता ते कापुन कापुन खांद्या एव्हढेच राहिले आहेत आणि गळणे सुरुच आहे.
पुन्हा एकदा rebonding करवासे वाटतेय पण hairfall ची भिती वाटतेय.
येत्या शुक्रवारी भाच्याचे लग्न आहे तेव्हा मामी म्हणुन जरा मिरवायचेय Wink पण या केसांमुळे मजाच जातेय सगळ्याची. तर मला तुम्हाला विचारायचे आहे की, मी केस सरळ कराण्यासाठी काय करु? २-३ दिवसासाठी केस सरळ करायचे असल्यास केसांचे नुकसान न होता काय उपाय आहेत का? गेल्यावेळेस ५-६ हजाराचा फटका पडलाय त्यामुळे आता एव्हढा खर्च टाळायचा आहे. इतर काही माहिती असल्यास कृपया सांगावी.
माफ करा इथे हा प्रश्न विचारते आहे कारण मला यासाठी दुसरा बाफ असल्यास सापडला नाही. आगाऊ धन्यवाद.

एकाच दिवस हवे असेल तर Ironing किंवा Hair setting करून घ्या ना. >> हे आलेले लक्षात पण सकाळी ६ वाजता बसने निघायचे आहे त्यामुळे त्याच दिवशी करणे शक्य नाही. आदल्या रात्री केले तर दुसर्या दिवशी रात्री पर्यंत इफेक्ट राहिल ना? कुणी ट्राय केलय का?

नाही राहणार .
Flat iron घेवून जाणे अथवा नवरी च्या hair dresser ला पकडणे.
दुसरा उपाय जास्त सोपा आहे. आधी सांगून ठेवल तर नवरीचे make up करायला येणारी जास्त लोक घेवून येवू शकते. पटकन होते नवीन ठिकाणी, घाईच्या वेळी मी तर जाम गोंधळ घालते. आपल्याला काय हव नको ते मात्र ठामपणे सांगायचे

केसगळती बंद झाली. ग्रेनील लावल्यावर काढुन टाकायच्या पद्धतीत काहीतरी चुकत होते ते बदलेले तेव्हा गळणे पुर्ण बंद झाले.

मो, त्याने रंग तात्पुरता येतो असे वाटते. लगेच कमी होऊ लागतो. फक्त त्यात केमिकल नाहीत म्हणुन लावले जाते व. हवे असेल तेव्हाच वापरते.

ग्रेनील लावल्यावर काढुन टाकायच्या पद्धतीत काहीतरी चुकत होते ते बदलेले तेव्हा गळणे पुर्ण बंद झाले.
>> सुनिधी, म्हणजे नेमके काय केले ते लिहीणार का? माझे केस प्रचंड गळत आहेत. त्यामुळे नुकतेच कलरऐवजी ग्रेनील सुरू केलय. ते काढतांना काय काळजी घेऊ ?

ग्रेनील लावल्यावर काढुन टाकायच्या पद्धतीत काहीतरी चुकत होते ते बदलेले तेव्हा गळणे पुर्ण बंद झाले. >> सुनिधी मी ही ग्रेनील लावायचा विचार करत आहे , माझे पुढचेच केस पिकले आहेत. काय काळजी घ्यावी लागेल ते सांगाल का?

निल्सन मला ही २८ ला लग्नासाठी कोल्हापूर ला जायचे आहे, मी २६ ला निघणार आहे आणि तेव्हा च Ironing करून घेणार आहे, लग्नानंतर च केस धुणार आहे. झोपताना व्यवस्थीत काळजी घेतली तर केस रहातात नीट.

ग्रेनील लावलेले केस नुसत्या पाण्याने धुतल्यावर पुढील २४ तासात केस शाम्पूने स्वच्छ धुवायचेच. मी रंग यावा म्हणुन जरा उशीर करत होते.

inochi, yes. I hv been to amanora branch but they hv many more branches in pune. Warning- its expensive. And I dnt believe in any of the "treatments" by salons, so i dnt kno abt that.

इनोची गॅझेल ट्राय करा.भांडारकर रोडवरचं. मस्त आहे. एन्रिच पण छान आहे. वानवडीचं बरंच जुनं आहे सो तिथ्ले स्टायलिस्ट्स चांगले आहेत. अमॅनोराचं पण चांगलं आहे. स्वस्त आणि लोकल पार्लर्स माहित अस्ल्याशिवाय रिस्क घेऊ नका.

Pages