केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके सुनिधी.. थँक्स..

दक्षिणा, ग्रेनिल ही उर्जिता जैनची मेंदी आहे. विदाऊट केमिकल्स. त्यात मेंदी आणि इंडिगो पावडर असते. इथे झालीये सविस्तर चर्चा पूर्वी.

विदाऊट केमिकल्स. त्यात मेंदी आणि इंडिगो पावडर असते.>>> केमिकल्स असावीत. कारण हाताला लागलेल्या मेंदीचे डाग ७-८ दिवस जात नाहीत.

नॉर्मली पण मेंदी जात नाहीच की ७-८ दिवस.
केमिकल्स असणारच.. ऑर्गॅनिक केमिकल्स म्हणतात तसली. जी झाडांमधे, सजीवांमधे असतातच की.
त्यातलीच काही मेंदीच्या रंगासाठी कारणीभूत असतात.

घरात आहेच ग्रेनील. अजुन वापरले नाहिये.
सुनिधी २४ तासात शॅम्पु वापरल्याने रंग निघुन नाही का जाणार?

Bigen म्हणजे छोटीशी बाटली असते तेच ना? सासुबाई लावतात केस गळती अजिबात जाणवली नाही त्यांना.

इथे नीधपने लिहील्यानुसार नारळाचे दुध लावले. केस गळणे बंदच झाले. जादुच झाली Happy थँक्स नीधप.
कॉलेजमध्ये असताना पण कधी कधी लावायचे पण फरक नाहि जाणवला. केसांचे तेव्हा काही प्रॉब्लेमच नव्हते ना.
नारळाचे दुध काढायचे काम जरा वेळखाऊ वाटले.

देवकी ते काळे डाग इंडिगो पावडरीमुळे असावेत. मी गेले ३० वर्षे तरी केसात मेंदी वापरतेय. वेगवेगळे ब्रँड वापरुन झाले. सुप्रिम मेहंदिपासुन ते नुपुरपर्यंत. आणि ह्या अतिरेकामुळे माझे केस खुप कोरडे झाले. कॉलेजपर्यंत जे केस कुरळे होते ते हळुहळू सरळ झाले. केस कापायला गेले की पार्लरवालीची कमेंट असायचीच केसांच्या कोरडेपणावर. मलाही कधीकधी हात लावावासा वाटत नसे केसांना. हात लावला तर तुटतील इतका कोरडेपणा. पण ग्रेनिलमुळे केसांचा नैसर्गिक मुलायमपणा परततोय हळूहळू. अर्थात अजुन पुर्णपणे मुलायम झाले नाहीत पण खुप फरक आहे. शिवाय केस घनदाटही झालेत. काही नावांबद्दल अजुनही विश्वास शिल्लक आहे आणि उर्जिता जैन हे एक नाव आहे ज्याच्यावर अजुन विश्वास आहे. Happy

मी मेंदी दोन्-तिन तास ठेवुन नंतर साध्या पाण्याने ती धुवुन टाकते. केस कोरडे झाले की तेल लावते. मग जसा वेळ असेल तसे दुस-या किंवा तिस्स-या दिवशी शांपुने केस धुते.

अंधेरी - पार्ल्याच्या आजुबाजूस चांगले पार्लर आहे का, केस काप कापायचे आहेत. केस खूप पातळ आहेत आणि गळतातही.

बायानो थंडीच्या दिवसात केस जास्त गळतात का?
माझे तरी सध्या खूप गळतायेत. असाच अनुभव तुमचा कोणाचा असेल तर थंडी कमी व्हायची वाट बघते नाहीतर ह्या गळतीवर उपाय सांगा.

हो. माझेही केस थंडीत नेहमीपेक्षा जास्त गळतात. कोरड्या हवामानामुळे असेल.

असाच अनुभव तुमचा कोणाचा असेल तर थंडी कमी व्हायची वाट बघते नाहीतर ह्या गळतीवर उपाय सांगा >
मी नारळाचे दूध केसाला लावून १ तासाने केस शॅम्प्पू न लावता धूते , आणि दोन दिवस तसेच थोडे तेलकट केस ठेवून वावरते. जास्त चिपचिपीत पण होत नाहीत आणि केस गळती आणि राठपणा कमी वाटतो. करून बघा. फक्त केस सुटे सोडायला मिळत नाहीत :-). जमल्यास विकेन्ड ला करू शकता.

थंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थ आणि प्रोटीन्सची शरिराची गरज वाढते. तेलबिया (तीळ, आळशी, जवस, बदाम, सूर्यफूल, आक्रोड, शेंगदाणे) आणि अंडी, दूध, चीज, डाळी, कडधान्ये इत्यादींचे प्रमाण वाढवा आहारातले. तसेच हिरव्या पालेभाज्या, बीटही रोज खात जा. कॉड लिव्हर तेलाच्या गोळ्या मिळतात त्याही घेतल्या तरी चालते.

केसांना आठवड्यातून दोनदा कोमट तिळाच्या, बदामाच्या किंवा खोबरेल, ऑलिव्ह अशा कोणत्याही तेलाचा मसाज करुन सौम्य शाम्पूने केस धुवा. कंडीशनर भरपूर लावा. नारळाच्या दुधाचा उपायही उपयोगी पडेल.
पातंजलीचा शाम्पू आणि दिव्य केश तेलही चांगले आहे. शक्य असेल तर वापरा.

केस कोरडे, दुभंगलेले असतील तर मॅट्रीक्सचे सिरम वरुन लावा. मेंदी लावणं थंडीत टाळा. ब्लो ड्रायरने सध्या तरी अजिबात केस सुकवू नका.

हे जनरल उपाय आहेत. केस गळायचे कारण आहार आणि अयोग्य निगा असेल तर त्यावर उपयोगी आहेत. या व्यतिरिक्त काही मेडिकल कंडिशन असेल तर फिजिशियनचा सल्ला घ्या.

ह्या रविवारी नारळ दुधाचा प्रयोग नक्की . २ दिवस वेणी घालून फिरेन मी
१/२ वाटी नारळाचे घट्ट दुध मुळापासून टोकापर्यंत लावायचे . ( लावायचे का तेल लावतो तसे scalp ला चोळायचे ? ) १ तासाने कोमट पाण्याने धुवून टाकायचे
असेच ना????
@ शर्मिला - इतर वेळी जास्त नाही गळत पण गेली १-२ वर्ष डिसेंबर मध्ये खूप गळतात अस लक्षात आले
पातांजली पुण्यात कुठे मिळेल. ग?
केसांसाठी कोणी चांगला डॉक्टर असेल तर सांगा ? शक्यतो अनुभव असेल तर बरे.

थंडीत आहारात बदल करायला हवा जाणीवपूर्वक. आपण कॅलरी कॉन्शसनेस मुळे ते टाळतो. वरच्या सूचना अमलात आणून बघा. मला आणि माझ्या मुलींनाही थंडीत त्याचा नेहमी उपयोग होतो.

केसांचा डॉक्टर- जाहिराती करतात त्या बात्रा, रिचफिल ट्रायकॉलीजिस्ट्सकडे जाण्याचं टाळा शक्यतो. जोवर त्यांची (महागडी) ट्रीटमेन्ट चालू असते तोवर फरक दिसतो. थांबवल्यावर जैसे थे. मग पुन्हा त्यांच्याकडे. ते नेव्हर एडींग ट्रिटमेन्टचा प्रकार आहे (बात्राच्या अनुभवावरुन हे सांगते आहे).

तुमच्या रेग्यूलर फिजिशियनला आधी विचारा. काही उपाय, औषधे तो/ती ही सुचवेल. किंवा मग योग्य डॉक्टरही सुचवेल. पण बाकी इतर वेळी केस नॉर्मल असतील तर थंडीत गळण्याची कारणे आहार, निगा हीच असतात.

शक्य असेल तर चांगला हेअर स्पा ही करुन घ्या. मात्र हा निदान् दोन तीन वेळा केला तरच फरक जाणवेल.

थंडीत आहारात बदल करायला हवा जाणीवपूर्वक. आपण कॅलरी कॉन्शसनेस मुळे ते टाळतो - हम्म बहुदा हे कारण असेल . कारण सध्या वजनाकडे जरा वाकड्या नजरेने बघतीये

केशर, नाही ग्रेनील २४ तासांपेक्षा जास्त केसावर राहिले तरी फरक पडत नाही. आणि ते तसेही रंगासारखे टिकत नाहीच. लगेच २-३ दिवसात उडायला लागतो रंग. पॅकवर १० दिवसांनी पुन्हा लावावे असे लिहिलेले असते. मी आधी मेंदी लावते. ती शांपु न करता काढायची. मग केस वाळले की ग्रेनील लावायचे. असा अनुभव आहे की डायरेक्ट पांडर्‍या केसाना लावण्या ऐवजी मेंदीच्या लाल केसांवर ग्रेनील जास्त काळे होते.
साधना, तुम्ही पण लावता का? काय अनुभव आहे तुमचा?

मला हेअर स्पा बद्दल माहिती हवी आहे. मी जितक्या वेळा केल तितक्या वेळा मी समाधानी नव्हते. कदाचित माझ्या अपेक्षा जास्त असतील. किमत साधारणपणे ७०० ते १००० रु.होती.
नक्की काय अपेक्षा ठेवावी उदा जर मी फेशीयल केल तर स्कीन nourished वाटते. इथे काय होणे अपेक्षित आहे.
कोणते स्पा चांगले ?
कोणते सलून चांगले ?

माझ्याकडे साध्या मेंदीची पाने नाहीत आणि बाजारची मेंदी वापरणे मी ग्रेनिल सुरू केल्यानंतर बंद केलेय. त्यामुळे मी थेट ग्रेनिलच केसांवर लावते. माझा तरी ग्रेनिलचा अनुभव चांगला आहे. खुप पांढरे केस असतील तर मात्र चार चार दिवसांनी ग्रेनिल लावुन त्या केसांना ब-यापैकी काळे करावे. एकदा काळा रंग आला की मग १५ दिवसात एकदा लावले तरी चालु शकेल. ग्रेनिलमुळे माझ्या केसांचा पोत खुप सुधारला हे मी वर लिहिले आहे.

मी कधी स्पा केले नाही. त्यामुळे सांगु शकत नाही. स्पा म्हणजे आधी तेल लावुन मालिश, मग केस स्वच्छ धुवुन त्यावर कंडिशनर थापुन ते दोन तास ठेऊन परत साध्या पाण्याने धुणे अशी साधारण ट्रिटमेंट आहे, थोडाफार इथे तिथे बदल असु शकतो. कधी तेल लावल्यावर स्टिमही देतात. मुळात केसांचा पोत चांगला असेल तर ह्या ट्रिटमेंटनंतर केस सुळसुळीत व सुंदर होतील. पण मुळात केस जर रुक्ष आणि खरखरीत असतील तर एका सिटींगचा फारसा परिणाम होणार नाही. वारंवार सिटींग्ज करुन केसांचा पोत सुधारावा लागेल.

केसांचे आरोग्य आपल्या एकुण आरोग्यावर अवलंबुन आहे. केसांची काळजी करताना हा फॅक्टरही विचारात घ्यावा.

साधना, स्पा असे नसते.
मी करून घेतले आहे.
लॊरिएल चा डबा मिळतो स्पा चा ते एक मॊइश्चरायझिंग लोशन सारखे प्रकरण असते. आणि त्यात इफेक्टसाठी वेगळी सोल्युशन्स असतात. ते सोल्युशन लोशनामधे मिसळून स्काल्पला लावायचे चोळायचे. केस धुतलेले असायला हवेत. मग नुसतेच लोशन केसांना सर्व बाजूंनी लावून केसांच्या बटाही व्यवस्थित चोळून काढायच्या. नंतर अर्धा तास ठेवायचे. (स्टीम घेतल्यास उत्तम) आणि मग नुसत्या पाण्याने धुवून काढायचे. हे घरीही करता येते.

माझी पार्लरवाली जे मॊइश्चरायझिंग लोशन लावायची त्यात बरीच आयुर्वेदिक द्रव्ये असायची असे वासांवरून वाटायचे. प्लस ते बर्‍यापैकी तेलकटपण होते. ती ते लोशन स्काल्पला लावत चांगला २०-२५ मिनिटे मसाज करायची. केसांनाही लावायची मग स्टीम आणि मग शांपू-कंडीशनर वॉश करून द्यायची.

रिचफिलचे स्पा किट आहे त्यात एक तेल आहे + एक नरिशर ते एकत्र करून स्काल्पला लावायचे. मसाज करायचा. मग ट्यूबमधे हेअर पॅक आहे तो केसांच्या बटांना लावायचा सर्व बाजूंनी. अर्धा तास ठेवून मग त्यांच्याच स्काल्प क्लिन्सर ने धुवून काढायचे. कंडिशनिंगची जरूर पडत नाही.

स्पा रेग्युलर केल्याने टेक्श्चर छान रहाते केसांचे.

स्पा मधे केसांना पॅकही लावतात. काही वेळा आयुर्वेदिक हर्ब्जच्या, मेथीच्या वस्त्रगाळ पावडरींचा असतो. घरी रात्रभर भिजवलेले मेथी दाणे वाटूनही त्याचाही पॅक केसांना लावता येतो.

स्पा मधे बेसिकली केस खूप हायड्रेट करतात. मसाज, स्टीम हा त्याचा एक भाग. डॅमेज्ड केसांची तकाकी, हेल्थ पुन्हा रिस्टोर करणे हा प्रमूख हेतू असतो स्पा करुन घेण्यात. त्याकरता रेग्युलर ट्रीटमेन्ट स्पाही असतो.

साधना, मेंदी लावतच नाहीस का? मला वाटलेलं मेंदीत मिक्स करून लावायचे असते ग्रेनील. सध्या दोन-तीनदा टच अप करून घेतलं लॉरीयल ने पण गळतात भयंकर. तो भयंकर वासही नाही आवडत! पण १५ दिवसांची निश्चिंती म्हणून करावं लागतं, पांढरे केस नको वाटतात अगदी. म्हणून मेंदी किंवा ग्रेनील वापरायचा विचार करतेय.

घरच्या घरी स्पा घेणार असू तर काय प्रोसीजर आहे? घरी स्टिम घेण्यासाठी काय करावं? स्टिमर मिळतो का?
स्पा रेग्युलर केल्याने टेक्श्चर छान रहाते केसांचे. >> महीन्यातून एकदा करावं का?

थंडीमध्ये जास्तच भुरभुरीत होतात केस. दिवसा फंक्शनला जायचं असेल आणि मोकळे सोडायचे असतील तर आयर्न न करता बर्‍यापैकी सेट रहावेत यासाठी काय करता येईल? केस वेव्ही आहेत सरळ नाहीत म्हणून नीट विंचरलेले जागच्या जागी राहत नाहीत जाईपर्यंत! लिवॉनचे सिरम कोणी वापरून पाहीले आहे का?

वेळ असेल तर कर घरी. लॉरिएल किंवा रिचफिल दोघांचे आहेत किटस.
मी खूप वेळ असेल तेव्हा एक हेअर पॅक बनवते घरीच कधी कधी.
त्याची रेसिपी याच बाफवर मागे कुठेतरी आहे.

Pages