निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
याची जीभही मजेशीर - तोंडाच्या
याची जीभही मजेशीर - तोंडाच्या टोकाशी पण आतल्याबाजूला गुंडाळून ठेवलेली. ही गुंडाळी केव्हा उलगडते व केव्हा भक्ष्याच्या दिशेने फेकली जाते ते कळतही नाही भक्ष्याला.. >>>> बेडुक /टोड्स यांची जीभही अशीच वैशिष्ट्यपूर्ण असते. या बेडुक /टोड्सना फक्त हालचाल करणारेच भक्ष्य (कीटक) खाणे माहित असते. पूर्णपणे मेलेले झुरळ इ. कीटक जर यांच्या समोर टाकले तर ते भक्ष्य हे बेडुक /टोड्स अजिबात खात नाही. या त्यांच्या गंमतीदार सवयीमुळे कॉलेजमधे असताना आम्ही मित्र एक उद्योग करायचो - अगदी छोट्याशा कागदाच्या बोळ्याला दोरा बांधून तो एखाद्या टोडसमोरुन हळुहळु ओढला की तो बिच्चारा टोड तो हालचाल करणारा कीटक समजून त्यावर जीभ फेकून पकडायचा - मग आम्ही त्याला तसे दोर्यासकट वर उचलायचो व जरावेळ त्याला "झोपाळ्यावर झुलण्याचे" फिलिंग द्यायचो - मग त्याची उडणारी धांदल पहात सोडून द्यायचो ...
"झोपाळ्यावर झुलण्याचे" फिलिंग
"झोपाळ्यावर झुलण्याचे" फिलिंग द्यायचो >>>> यावरुन एक गंमत आठवली - आमच्या कंपनीच्या अॅनिमल हाऊसमधे वेगवेगळे प्राणी असतात - गिनी पिग, ससे, हॅमस्टर, उंदीर (पांढरे शुभ्र आणि लाल डोळ्यांचे). वेगवेगळ्या टेस्ट्स करता ते वापरले जातात. यातले उंदीर फार चळवळे असतात - त्यामुळे त्यांच्या अंगात काही औषध वगैरे टोचायचे असल्यास ते जमत नाही - मग एक साधा उपाय करायचा - त्याची शेपटी पकडून त्याला उचलायचे व थोडे गोल -गोल फिरवायचे - यामुळे त्याला थोडी चक्कर येते - अशा बेसावध अवस्थेत त्याला पटकन ते औषध वगैरे टोचून घ्यायचे ...
शशान्कजी... उन्दीर शेपटीला
शशान्कजी...
उन्दीर शेपटीला धरुन नाही पकडु शकत मी. बी एस सी ला असतान्ना बेडुक, गान्डुळ आणि झुरळान्च डीसेक्शन केल तेच खुप झाल. २ र्या वर्षाला झुलॉजी घेणार्यान्ना उन्दीरही होते डीसेक्शनसाठी. ते वातट झालेले उन्दीर पाहुनच कसतरी वाटल आणि तिथेच तो विषय सोडला. 
शशांक.. सगळे डोळ्यासमोर आले
शशांक.. सगळे डोळ्यासमोर आले ना !
मी, वर गारंबीच्या वेलीचे पाण्याशी असलेले नाते सांगितले.. तसाच प्रकार आपल्या सागरगोट्याचाही असतो. त्याचाही प्रसार पाण्यामार्फतच होतो. ( कुणी प्राणी पक्षी खात असेल असे वाटत नाही. )
सागरगोट्याची भरपूर झुडूपे मी श्रीरामपूरला ओढ्याच्या काठी बघितली होती.
रच्याकने, सागरगोट्याला इंग्रजीत Nickenut असा शब्द आहे.
खूपशा सिनेमात रजनीगंधाचे
खूपशा सिनेमात रजनीगंधाचे गुलदस्ते जास्त दाखवतात. पण छान वाटतात. जसे की हे एकः
दा, ही पोहोतुकावाची फुलं
दा, ही पोहोतुकावाची फुलं बरीचशी आपल्या कॅलिआंड्रा सारखी दिसताहेत. फक्त ह्यांचा वृक्ष आहे आणि कॅलिआंड्राचं झुडुप आहे. (अर्थात फॅमिली वेगळीच आहे म्हणा!)
निसर्गातले वेगवेगळे प्राणी
निसर्गातले वेगवेगळे प्राणी पहाणे फार फार गंमतीशीर असते तर कधी ते प्राणी आपल्याला खूप काही शिकवून जातात ...
आमच्या कंपनीत खूप पूर्वी (सुमारे पंधरा-वीस वर्षांपूर्वी) अनेक खेचरे (म्यूल्स) होती. सर्पदंशावरची लस बनवण्याकरता त्यांचा वापर व्हायचा. ही सर्व खेचरे एका मोठ्या मैदानात फिरत असायची - तिथे त्यांचे खाद्य देण्याची एक जागा होती व पाणी पिण्यासाठी एक सिमेंटचा हौद होता - या हौदाची उंची अशी होती की या खेचरांना मान फार खाली न करता पाणी पिता यायचे. मी, माझे अनेक मित्र जाता-येता या खेचरांना न्याहाळायचो - सतत शेपट्या हलवण्याच्या त्यांच्या सवयी आम्हाला नीट माहित होत्या.
एका ऐन उन्हाळ्यात पाहिले तर - ही खेचरे एका रांगेत त्या हौदापाशी उभी होती - रांगेतले पहिले खेचर त्या हौदाचे पाणी आपल्या तोंडाने असे मागे उडवीत होते की रांगेतील मागच्या दो-तीन खेचरांच्या अंगावर ते पाणी पडून ती खेचरे थंड पाण्याने सुखावत होती. ते पाणी उडवणारे खेचर मग त्या रांगेत मागे जाऊन उभे राह्यले व आता पाणी उडवून घेतलेले खेचर आपल्या इतर भाईबंदांवर असेच पाणी उडवण्यासाठी पहिल्या क्रमांकावर उभे राहून इतरांच्या अंगावर पाणी उडवण्यासाठी तोंड - मानेची हालचाल सुरु करत होते ... त्यांचे एकमेकातील सामंजस्य पाहून आम्ही केवळ थक्क झालो होतो ... आम्ही ज्याला मठ्ठ समजायचो ते जनावर खूपच समजूतदार होते तर ... हॅट्स ऑफ टू टीम वर्क ...
सर्पदंशावरची लस बनवण्याकरता
सर्पदंशावरची लस बनवण्याकरता त्यांचा वापर व्हायचा.>> म्हणजे नक्की कसा उपयोग व्हायचा त्यांचा तेही लिहा ना..
मस्त माहिती मिळत आहे तुमच्याकडून. थोडेसे मनोरंजन आणि थोडीशी ज्ञानात भर!!!
शशांकदादा, थांबू नका मस्त
शशांकदादा, थांबू नका

मस्त माहीती देताय
हो शांकली, रंग थोडा गडद असतो.
हो शांकली, रंग थोडा गडद असतो. ऑकलंड मधे भरपूर झाडे आहेत याची.
शशांक.. खरेच खुप कौतुकास्पद आहे त्यांची वागणूक !
वा शशांक छान माहिती.
वा शशांक छान माहिती.
सर्पदंशावरची लस - अँटीस्नेक
सर्पदंशावरची लस - अँटीस्नेक व्हेनम सिरम - (ए एस व्ही एस ) - जेव्हा विषारी साप आपल्याला चावतो तेव्हा ते विष ताबडतोब न्यूट्रलाईज करणे अतिशय जरुरीचे अस्ते अन्यथा प्राणावरच बेतणारे संकट.
साधारणतः भारतात नाग, घोणस (रसेल्स व्हायपर), बँडेड क्रेट (मण्यार) व फुरसे (सॉ स्केल्ड व्हायपर) हे चार विषारी साप आढळतात. यावर जी लस असते ती पॉलीव्हॅलंट असते - या चारी विषारी सापांचे अँटीसिरम वापरुन केलेली असते.
नागाचे वा इतर विषारी सापांचे विष (व्हेनम) हे हाफकिन सारख्या संस्थेत उपलब्ध असते. ते अतिशय काळजीपूर्वक डायलूट करुन घोडा किंवा खेचर याला टोचतात - यामुळे हा प्राणी मरत नाही तर याच्या शरीरात त्या विषाविरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात. मग अशा इम्युनाईज्ड प्राण्याचे थोडेस रक्त काढतात व त्यातील प्लाझ्मा बाजूला करुन आर. बी. सी. त्या प्राण्याला परत देऊन टाकतात - (प्लाझ्मा फेरेसिस). वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया व क्रोर्मॅटोग्राफी कॉलम वापरुन या प्लाझ्मामधील अँटीबॉडीज बाजूला काढतात व लायोफिलायझेशन (फ्रीझ ड्राइंग) टेक्निक वापरुन त्यांना पावडर फॉर्म मधे प्रिझर्व्ह करतात (जी व्हायल आपण केमिस्टकडे पहातो). हेच ते ए एस व्ही एस.
प्रत्येक विषारी सापाच्या अशा वेगवेगळ्या अँटीबॉडीज / अँटीसिरा तयार करुन लायोफिलायझेशन आधी ते एकत्र करतात - यालाच पॉलीव्हॅलंट सिरा म्हणतात - जेव्हा विषारी साप चावतो तेव्हा तज्ज्ञ डॉ.च्या मार्गदर्शनाखाली हे
अँटीसिरा रुग्णाला दिले जाते - जिथे चावा घेतलेला असतो त्याच्या आसपासही हे अँटीसिरा टोचतात - रेडीमेड अँटीबॉडीज / अँटीसिरा रुग्णाला दिल्या जातात त्यामुळे याला पॅसिव्ह इम्युनायझेशनही म्हणतात. सर्पदंशावर हाच एकमेव उपाय आहे - बाकी झाड-पाले-मंत्रतंत्र ही भोंदूगिरी आहे. रुग्णाला प्राथमिक उपचार केल्यानंतर ताबडतोब ही लस जिथे उपलब्ध आहे अशा ठिकाणी उचलून नेणे गरजेचे आहे - रुग्णाच्या शारिरीक हालचालीमुळे जास्त रक्ताभिसरण होऊन हे विष शरीरभर पसरण्याचा धोका असतो - त्यामुळे ते टाळावे.
इथे अजून एक लक्षात घेणे आवश्यक आहे - या अँटीबॉडीज अतिशय स्पेसिफिक असतात. उदा. किंग कोब्रा चावला तर त्यासाठी वापरायच्या अँटीस्नेक व्हेनम सिरम मधे किंग कोब्राच्याच व्हेनम वापरुन केलेल्या अँटीबॉडीज असणे आवश्यक आहे - त्याठिकाणी साध्या नागाविरुद्ध असलेल्या किंवा फुरशाविरुद्धच्या अँटीबॉडीजचा काहीही उपयोग होणार नाही.
उत्तम माहिती. खेचर मरत नाहीत
उत्तम माहिती. खेचर मरत नाहीत हे बरे झाले.
खेचर म्हणजे ?
खेचर म्हणजे ?
वाह!! शशांक सरांचा तास फार्रच
वाह!! शशांक सरांचा तास फार्रच आवडला.. किती मस्त मस्त माहिती मिळाली..
आर्या , छानैत सर्व फोटोज..
मानुषी... थंडी?? वो क्या होती है??
खेचर म्हणजे गाढव आणि घोडी
खेचर म्हणजे गाढव आणि घोडी यांचे बाळ. हे थोडे घोड्यासारखे दिसतात पण बुटके असतात. माणसाने कसा काय यांचा शोध लावला माहित नाही.
वर्षू, मुंबईत दोनच ऋतू
वर्षू, मुंबईत दोनच ऋतू असतात.. एक गरम.. आणि दुसरा जास्त गरम
साधना, हाच एक आंतरजातीय विवाह यशस्वी ठरला आहे म्हणे. मागे लायन आणि टायगर यांचे लग्न लावून, लायगर नावाचा प्राणी जन्माला घातला होता, पण तो जगला नाही असे वाचले.
कुत्रा मांजरीचे लग्न लावले तर
कुत्रा मांजरीचे लग्न लावले तर DOT किंवा CAG निर्माण होतील नै
इथे आधिच एक CAG आहे,
इथे आधिच एक CAG आहे, त्यांनी राजकारण्यांचे डोके पिकवलेय.
मुंबईच्या रस्त्यांवर सध्या
मुंबईच्या रस्त्यांवर सध्या लायन फिरताहेत. ठाण्याला घोडबंदरला दिसला सिंह. कुठुन आला माहित नाही. नॅशनल पार्कवाले म्हणताहेत त्यांछे सिंह आहेत सुखाने पार्कात. हा गिरच्या जंगलातुन फिरत फिरत आला म्हणावा काय"??? दोन दोन विडिओज फिरताहेत वॉट्साप वर. तस्मात ठाणेवासियांनी काळजी घ्या.
काल तोच व्हिडिओ सातार्यात
काल तोच व्हिडिओ सातार्यात आलेला वाघ म्हणून फिरत होता
भटक्या कुत्रांच्या
भटक्या कुत्रांच्या बंदोबस्तासाठी हि निसर्गाची योजना असावी का ? काळजी घ्या खरेच. अगदीच जीवावर आल्याशिवाय सिंहदेखील असला वेडेपणा करणार नाही.
आज बॅक लॉग भरून काढला. धागा
आज बॅक लॉग भरून काढला. धागा वेगाने पळतो आहे.
श्री आणि सौ जिप्सी चे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा, पहिली बेटी धनाची पेटी. लेकिला खूप खूप आशिर्वाद.
बी तुम्ही काढलेले फोटोज अप्रतिम आहेत.
सगळेच खूप छान माहिती शेअर करत आहेत.
दिनेश दा कधी येत आहात? निग चे पुन्हा एक गटग करुया. मागच्या वेळी वाशी ला खूप कमी वेळ सगळ्यांना भेटता आले.
खरंच सिंहाचं डोकं फिरलं असेल
खरंच सिंहाचं डोकं फिरलं असेल तरच तो हे अस्ले प्रकार (म्हणजे मनुष्य वस्तीत येण्याचे वगैरे) करेल!! - बहुधा बिचारा पूर्ण वेडा झाला असावा!! नाहितर हे असलं अचाट कृत्य तो कशाला करेल?? माणूस म्हणजे काय चीज आहे हे त्याच्या आईने त्याला सांगितलेलं दिसत नाही. किंवा मग विसरला असावा.....
सर्वांचे फोटो सुंदर. वरची
सर्वांचे फोटो सुंदर. वरची शशांकजी यांनी लिहिलेली माहिती वाचेन आता.
जिप्सी गुड न्यूज, खरंच छकुलीचा पायगुण. अभिनंदन.
सामी, मी मधल्याच वारी आहे
सामी, मी मधल्याच वारी आहे मुंबईत. संक्रांतीला सार्वजनिक सुट्टी असते का ? एकदा सकाळीच जिप्स्याकडे जाणार आहे. एअरपोर्टला जाताना वर्षूकडे जाणार आहे. जानेवारीतली माझी रजा कमी असते. जुलै मधेच जास्त रजा घेतो मी.
वाह!! शशांक सरांचा तास फार्रच
वाह!! शशांक सरांचा तास फार्रच आवडला.. किती मस्त मस्त माहिती मिळाली..>>>>खरंच दिनेश.,शशांक,यांचे लिखाण वाचनीय असते.
मानुषी... थंडी?? वो क्या होती
मानुषी... थंडी?? वो क्या होती है?? अरेरे>>>>>>>>>>>.. अगं काय सांगू आमच्या नगरातल्या थंडीचं..........पण खरंच इतकं विषम हवामान आहे की थंडी येताना आणि जाताना वॉर्डरोब चेन्ज करावा लागतो!
ह्या फुलांचा लाल रंग खूपच
ह्या फुलांचा लाल रंग खूपच वेगळा आहे. आणि मधला टपोरा भाग त्याला दोन डोळे आहेत आणि बाजूला पुंकेसर आहेत. ते बघून असे वाटते हा एक लाल रंगाचा बग आहे
अगदी वरच फुल बघा.. मोठे डोळे असलेला गोड किडाच वाटतो 
खालील तीन फोटोमधे. रुक्मिनीचे लाल, पिवळे आणि अबोली रंग बघा:
पानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा....



शंकासुराचे पान..

सुंदर! बी नॉट लिसनिंग
सुंदर!
बी नॉट लिसनिंग हं.........................................................................
Pages